पेशाचे भोग
'कंप्युटर विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे देतो' असं मास्तरने सांगितल्यावर एका नवशिक्याने, निरागसपणे, 'पुण्याहून मुंबईला जाणारी डेक्कन क्वीन किती वाजता सुटते?' असा सोप्पा प्रश्न कंप्युटरला टाकला. त्यावर कंप्युटरने एरर! एरर! असा, दाराच्या फटीत शेपटी चिणल्यासारखा, जीवघेणा आक्रोश केल्यावर तो नवशिक्या त्याच्या विरुद्ध फतवा निघाल्यासारखा टरकला. त्यावर त्या मास्तरने, 'कंप्युटर मधे आपणच आधी माहिती भरायची असते, मग कंप्युटर तीच माहिती आपल्याला परत देतो' अशी सारवासारवी केली. कसली सॉलीड गेम टाकली की नाही? जी माहिती आपल्याला आधी पासूनच आहे ती प्रथम कंप्युटर मधे भरायची, नंतर तीच, प्रश्न विचारून काढून घ्यायची? कितीही चमत्कारिक वाटली तरी आवळा देऊन आवळाच काढायची कला मला जमलीच! कारण पूर्वी कॉलेजमधे प्रॅक्टिकल्स न करता फक्त बरोब्बर उत्तरं देणारीच ऑब्झर्व्हेशन्स जर्नल मधे लिहायची चालुगिरी! त्यानंतर मात्र माझं घोडं अल्गोरिदम नामक दलदलीत जे फसलंय ते अजून पर्यंत! कंप्युटर नवसाला पावावा म्हणून अल्गोरिदम नामक र्हिदम कोणत्याही ड्रमवर वाजवला जात नाही.. हे सुरवातीलाच मुद्दाम सांगत...