भरकटंती
कुठे तरी काही दिवस तरी भटकंतीला जाऊ या असं कधी तरी कुणाला तरी वाटतंच. दुर्दैवाने, या वेळेलाही तसंच झालं! आम्ही दिल्याच्या ऑफिसात त्याच्या बायकोचा शिर्याचा प्रयोग चाखत होतो. आमचा एक मित्र, संदीप, अमेरिकेहून आला होता, त्याच्या बरोबर. इतर एनाराय मित्रांसारखीच त्याचीही, बायकोला चुकवून, आमच्या बरोबर टीपी करण्याची माफक अपेक्षा होती. परदेशातून आल्यावर एकदाचं बायका-पोरान्ना बायकोच्या माहेरी डंप केलं की बाजीरावांना रान मोकळं मिळतं. मग एक दोन दिवस इकडे तिकडे झाले तरी बायको फारसं मनावर घेत नाही... किंबहुना तिलाही तेच हवं असतं. पण इथल्या सगळ्यांनी कामं टाकून त्यांच्यामागे धावावं असं या एनारायना का वाटतं? म्हणजे तसा एक काळ होता.. त्यांनी तिकडून आणलेल्या सिगरेटी आणि दारूत अवाजवी इंटरेस्ट असल्यामुळे त्यांना वाजवी पेक्षा जास्त भाव दिला जायचा.. पण आता? मक्या: 'ए हा संदीप सहलीचं एक प्रोजेक्ट करू या म्हणतोय!'.. कुठल्याही फालतू गोष्टीला 'प्रोजेक्ट' म्हणायची फ्याशनच झालीये हल्ली! आयटीत काम करून करून डोक्याची अशी मशागत होत असावी.. कटिंगला जाणे, एक प्रोजेक्ट! कोपर्यावरच्या दुकानातून दूध आ...