तेथे पाहिजे जातीचे.. भाग-3
तेथे पाहिजे जातीचे.. भाग-१ इथे वाचा! तेथे पाहिजे जातीचे.. भाग-२ इथे वाचा! 'अय्या! तुझाssच फोन! दोन सेकंदांपूर्वीच मला वाटलं तुझा फोन येणार आणि आलाच!'.. सदाची बायको चित्कारली. 'का? तुला का असं वाटलं?' 'अरे मला नं हल्ली असे अनुभव येताहेत! अचानक मनात काहीतरी उमटतं आणि ते खरं होतं! स्वामी आकुंचन महाराजांची कृपा, दुसरं काय?' 'आँ! मगाशी काय उमटलं होतं?' 'हेच की तू फोन करून सांगणार की आज आपण जेवायला बाहेर जाऊ या म्हणून!' 'जेवायला बाहेर जाऊ या हे सांगायला मी नाही फोन केला काय! आकुंचन महाराजांना प्रसरण पावायला लावून कृपेचा अजून एक इन्स्टॉलमेंट घे! मी फोन एक प्रश्न विचारण्यासाठी केलाय' 'असं काय करतोस रे? आज अगदी कंटाळा आलाय मला स्वैपाकाचा! जाऊ या नं आपण!' 'बरंss! जाऊ या! इतकं काये त्यात अगदी? एका प्रॉब्लेमनं माझ्या ग्रे-मॅटरचं बाष्पीभवन झालंय! तो ऐक आधी! तो स्टुअर्ट आहे ना? त्याची ताजमहाल ट्रिप आम्ही स्पॉन्सर केली होती. आता तो आमचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करणारे लवकरच! तर लगेच राकेशनं त्याची ट्रिप कॅन्सल केली आणि मला म्हणत...