Posts

Showing posts from July, 2015

जलपायरी ते जलचक्र!

Image
इंग्लंडच्या समृद्धीचं एक प्रमुख कारण इथे १२ महीने पडणारा पाऊस! त्यामुळे इथल्या नद्या नेहमी भरभरून वाहत असतात आणि सगळी झाडं, हिवाळ्याचे दिवस सोडता, मस्त हिरवीगार असतात. या सतत वाहणार्‍या पाण्याचा कुणी कल्पकतेनं वापर केला नसता तरच नवल होतं! पाण्याच्या प्रवाहाच्या जोरावर पिठाची गिरणी चालवणं तसंच नद्यांचा व्यापारादी वाहतुकीसाठी वापर करणं हे काही सर्वसामान्य वापर आहेत. नद्यांमधे इथे थोड्या थोड्या अंतरांवर बंधारे घातले आहेत. त्यांना धरणं नाही म्हणता येत कारण त्यांची उंची खूपच कमी असते. नदीचं पाणी त्यामागे अडतं आणि बंधारा भरला की त्यावरून वाहू लागतं. बंधार्‍याच्या तळाशी पन्हळ करून ते पाणी चक्की फिरवायला पूर्वी वापरलं जायचं. बंधार्‍याच्या तळाशी पाण्याच्या प्रवाहाचा जोर अर्थातच जास्त असतो. आता या सगळ्या गिरण्या बंद झाल्या आहेत म्हणा! पण हे बंधारे बोटींच्या प्रवासाला मात्र अडथळा निर्माण करतात. त्यासाठीच जलपायरीची निर्मिती झाली. जलपायरी (वॉटर लॉक) म्हणजे एक मोठा हौदच असतो ज्यात एका वेळेला २/४ बोटी राहू शकतात. या हौदाला दोन दरवाजे असतात. एक बंधार्‍याच्या खालच्या बाजूला उघडतो तर दुसरा वरच्या. ...