Posts

Showing posts from 2008

सोबती

Image
पहाटेचे ६ वाजलेले असतात. मी कामावर जाण्यासाठी म्हणून गाडीपाशी येतो. उशीरा निघालो तर ऑफिसला जायला २ तासांच्यावर वेळ लागतो म्हणून लवकर निघण्याचा खटाटोप! गाडीवर भरपूर फ्रॉस्ट जमलेले असते. एकंदरीत थंडीचे दिवस उदासवाणेच असतात.. छोटा दिवस, जास्त अंधार, येताजाता धुकं व बर्फ, दणकट थंडी आणि भेसूर दिसणारे निष्पर्ण वृक्ष! शिव्या घालत घालत निरुत्साहाने बर्फ काढतो आणि गाडी घेऊन निघतो. हाताला लागेल ती सिडी सरकवून गाणी लावतो. "आखोंमें तुम दिलमें तुम हो".. हाफ टिकट मधलं किशोर व गीता दत्तचं गाणं लागतं. पिक्चरमधले प्रसंग डोळ्यासमोर तरळू लागतात आणि हळूच ओठांच्या कोपर्‍यातून हसू फुटतं. मन प्रफुल्लित होतं. आपोआप मी गुणगुणायला लागतो. डोळ्यावरची झोप उडून जाते. मघाचा वैताग कुठल्याकुठे पळून जातो. परक्या देशात अचानक जुना जवळचा मित्र भेटल्याचा आनंद होतो. कधी एकदाचा संपतोय हा प्रवास असं वाटायच्या ऐवजी आता संपूच नये असं वाटतं! हाफ टिकट मधे किशोरनं काय अशक्य अभिनय केलाय! कधी कधी असं वाटतं की दिग्दर्शक त्याला फारसं काही सांगायच्या फंदात पडला नसावा.. 'सेटवर जा आणि पाहीजे तो गोंधळ घाल!' एवढंच सां...

वयम् मोठ्ठम्? खोट्टम्!

कॉलेजात असताना मी भरपूर लांब केस ठेवले होते. रस्त्यात पोरी देखील वळून वळून बघत असत. त्या नजरा मत्सराच्या होत्या की 'काय ध्यान आहे' अशा अर्थाच्या होत्या यावर विचार करून मी त्रास करून घेत नसे. मला फार अभिमान होता केसांचा, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं! लांब केस ठेवण्याचं माझं ध्येय माझ्या बापाने न्हाव्याकरवी खुंटवलं. आपल्या पोटावर पाय आणणार्‍या लोकांचा कट उधळलाच पाहीजे या विचाराने पेटून त्या दिवशी न्हाव्याने एकदम मिलीटरी कटच मारला आणि दुप्पट पैसे लावले. हाय! हाय! मेरे बालोंके टुकडे हजार हुए कोई इधर गिरा कोई उधर! कॉलेज संपून नोकरी लागेपर्यंत मी 'पांढरकेशी' झालो होतो. चार वर्षं नोकरी केल्यावर माझ्या कंपनीनं मला कंप्युटर शिकायला परत कॉलेजात पाठवलं. पहील्या दिवशी मी वर्गात पाऊल ठेवताच सगळी जन्ता मीच मास्तर आहे असं समजून खाडकन् उभी राहीली. मला असं वाटलं की जन्तेला माझ्या मागं मास्तर दिसला म्हणून मी वळून पाहीलं. मागं अर्थातच कुणी नव्हतं. खरा प्रकार लक्षात येताच 'काय मठ्ठ पोरं आहेत' अशी नजर टा़कून मी हसलो. पण ते हसण्यावारी नेण्याचं प्रकरण नव्हतं. हळूहळू माझ्या लक्ष...

ठरविले अनंते

"चिमण्या? तू बघता बघता शंभरी गाठलीस?" मित्रांबरोबर आमचा साप्ताहीक बाहेरख्यालीपणा (म्हणजे बाहेरचं हादडणं) चालू होता तेंव्हा मक्या एवढ्या जोरात ओरडला की आजुबाजूच्या टेबलांवरचं वातावरण एकदम तंग झालं.. लहान पोरं घाबरून रडायला लागली... पण नंतर सगळं आलबेल आहे हे कळताच लोकांच्या प्रश्नांकित नजरा 'सोसत नाही तर ढोसायची कशाला इतकी' अशा बदलल्या. आम्हाला हे नेहमीचच होतं म्हणून त्याचं काही सुखदु:ख नव्हतं. मक्याच्या डोळ्यात मात्र 'काय होतास तू, काय झालास तू' असे भाव विस्फारले होते. हे आश्चर्य मी वयाची शंभरी गाठण्याबद्दल नसून वजनाची शंभरी गाठण्याबद्दल होतं कारण माझ्या बायकोनं.. म्हणजे सरीतानं.. नुकताच तसा गौप्यस्फोट केला होता. मी, सरीता, मकरंद (मक्या) प्रभू व त्याची बायको माया आणि दिलीप(दिल्या) अत्रे दर आठवड्याला भेटतो. सामान्य लोकांसाठी असलेल्या एका सामान्य बँकेत मी एक सामान्य मॅनेजर आहे व सरीता घर सांभाळते. मक्या आय टी कंपनीत मॅनेजर आहे आणि माया आयुर्वेदीक डॉक्टर आहे. दिल्या CA आहे आणि त्याची स्वतःची इन्व्हेस्ट्मेंट कंपनी आहे. 'ब्रह्मचर्य हेच जीवन, वीर्यनाश हा मृत्यु...

वादळ

अखेर मी विद्यापीठात पदार्थविज्ञान शिकायला दाखल झालो. खरं तर बरीच वर्ष मला पदार्थविज्ञान कशाशी खातात हेच माहीत नव्हतं. पदार्थविज्ञान म्हणजे निरनिराळ्या खाद्यपदार्थांच्या कृतींचे शास्त्र असणार अशी माझी 'जिव्हा'ळ्याची समजूत होती. अर्थात इतर अनेक समजूतींप्रमाणे ही पण यथावकाश निकालात निघाली. पाळण्यात असताना पाय सतत तोंडात घालण्याच्या माझ्या सवयीमुळे जाणकारांनी मी पुढे लहान तोंडी मोठा घास घेणार असं भाकीत केलं होते म्हणे, जे फारच बरोबर निघालं. पण बाबांचे माझ्याबद्दलचे भाकीत साफ चुकलं. ठीकठाक असलेल्या सर्व गोष्टी मोडण्याच्या माझ्या विध्वंसक उद्योगांमुळे खवचटपणे ते आईला म्हणायचे "चिमाजीअप्पा पुढे डिमॉलीशन इंजीनिअर होणार". बाबा मला प्रेमाने चिमाजीअप्पा म्हणायचे. जेमतेम पाचवी पास असलेल्या आईला मी कुणीतरी मोठा माणूस होणार म्हणून कृतकृत्य व्हायचं. पण त्यामुळं मला मात्र मी इंजीनिअरींगकडे जावसं वाटू लागलं. नंतर हार्डवेअर लिमिटेशनमुळे मला तिकडे प्रवेश नाही मिळाला. शेवटी प्रवाहपतित माणसं जे करतात तेच मी पण केलं - म्हणजे आधी B.Sc. व मग M.Sc. आमच्या कंपूतले काही जण B.Sc. नंतर सूज्ञपणे...

पुण्याची वाट

काही शब्दांचा किंवा वाक्प्रचारांचा अर्थ समजलेला असतो पण अनुभवाची जोड मिळाल्याशिवाय उमजत नाही. पोटात गोळा येणे याचा अर्थ उमगायला जायंट व्हील किंवा रोलरकोस्टर मधे एकदा तरी बसायला लागतं. असंच एकदा २५-३० वर्षांपूर्वीचं जुनं पुणं डोळ्यासमोर तरळलं आणि आमूलाग्र बदल होण्याचा अर्थ तत्काळ उमगला. जुनं पुणं एक शांत, छोटं व सुंदर असं आटपाट नगर होतं. इतकं की लोकं, विशेषतः मुंबईकर, पुण्याला पेन्शनरांचं गाव म्हणून हिणवायचे. पण पुणेकरांना त्याची फिकीर नव्ह्ती. निवांतपणा त्यांच्या नसानसात भिनलेला होता. इथली दुकानं सकाळी ४ तास आणि संध्याकाळी ४ तास उघडी असायची, ती सुध्दा लोकांवर उपकार म्हणून. गिर्‍हाईक आलंच तर दुकानदार पेपरात खुपसलेली मान वर करण्याची सुध्दा तसदी घेत नसत. वरती एखाद्या गिर्‍हाईकानं चुकून अमुक एक वस्तू दाखवता का असं विचारलच तर 'विकत घेणार असाल तर दाखवतो' असं म्हणण्याचा माज फक्त पुणेरी दुकानदारच करू शकत. तेंव्हा पुण्याच्या पोलीसांना 'ट्रॅफिक जॅम' याचा अर्थ उमगलेला नव्हता. स्कूटर ही वस्तू दुर्मिळ होती कारण ती नंबर लावून मिळायला १०-१० वर्ष लागायची. चारचाकी बहुतेकांच्या आवाक्...