Posts

Showing posts from February, 2009

ताणलेलं सsप्राईज!

(टीपः- 'सsप्राईज! सsप्राईज!' ही कथा वाचल्यावर काही आंबटशौकीन वाचकांनी 'पिक्चरमधे काय झालं?' अशी निर्लज्जपणे पृच्छा केली. असला भोचकपणा मला मुळीच आवडत नाही. म्हणून खरं तर माझ्या खाजगी गोष्टी वरची ही कथा लिहीणार नव्हतो. पण काय करणार? हल्ली पापाराझींचा इतका सुळसुळाट झालाय ना की त्यामुळे कुठलही गुपित फार दिवस कुपित रहात नाही. असल्या आगंतुक लोकांनी भलते सलते फोटो घालून सनसनाटी मथळ्याखाली उलट सुलट लिहीण्यापेक्षा आपणच सत्य परिस्थिती कथन करावी असं ठरवून मी हे नाईलाजास्तव लिहीत आहे. निदान 'प्रकाश माटेचं काय झालं?' हा प्रश्न सामना पिक्चरमधल्या मास्तरसारखा तुम्हाला तरी सतावणार नाही अशी आशा आहे. ) कांताची सरप्राईज पार्टी संपली होती. बरेचसे लोक घरी गेले होते. उरलेले आवराआवर करत होते. अनुराधा बरोबर पिक्चर पहायच्या कल्पनेनं एकीकडे माझं मन आनंदानं ग्लासातल्या मल्ड वाईन पेक्षा जास्त जोरानं हिंदकळत होतं. पण दुसरीकडे 'खरंच तिला माझ्याबद्दल काही वाटतंय का?' ह्या शंकेनं उच्छाद मांडला होता. काय करणार? मी एक चिंतातुर जंतु आहे, कन्या राशीचा असल्यामुळं अंमळ जास्तच! कन्या राशी...