Posts

Showing posts from December, 2009

गोट्याचा घोळ

"... सीआयडी मागे लागलाय".. घरातून बाहेर पडता पडता मला गोट्याचं बोलणं अर्धवट ऐकू आलं. तो शेजारच्या दीपाशी बोलत होता. गोट्या म्हणजे आमचं एकुलतं एक कार्ट. गोट्याचे कारनामे हळूच कान देऊन ऐकायला मला आवडलं असतं, खरं तर.. पण कामाला जाणं भाग होतं.. अनिच्छेनेच मी निघालो. मला नेहमी भरपूर काम असतं.. डोकं वर काढायलाही फुरसत नसते.. पण दिवसभर 'आयला! ह्या गोट्यानं काय घोळ घातला?' या प्रश्नानं मला, चपलेला चिकटलेल्या च्युईंगम सारखं छळलं. मग बँकेतून दिल्याला फोन करून सीआयडी ऑफिसातून काही माहिती मिळतेय का ते पहायला सांगीतलं. त्याला काही फारशी माहिती मिळाली नाही. सीआयडीचे लोक काळाबाजार करणारे, तस्करी करणारे नाही तर अतिरेकी लोकांच्या मागावर असतात अशी एक मोघम माहिती मिळाली. विमनस्क अवस्थेत संध्याकाळी घरी आल्यावर सरीताला झालेला प्रकार सांगीतला. सरीता: "अय्या खरंच सीआयडी मागे लागलाय? मला बघायचाय खराखुरा सीआयडी कसा दिसतो ते.".. हिचा बालिशपणा कधी उफाळून येईल त्याचा काही नेम नसतो. मी: "सीआयडी म्हणजे काय गणपतीची आरास आहे का बघायला? दारावर विकायला येणार्‍या माणसांसारखी अगदी सामा...

नुस्ता स.दे.

Image
"एखाद्या अनोळखी माणसाला मी दिलेलं गाणं गुणगुणताना ऐकणं यापेक्षा इतर कशानही मला जास्त आनंद होत नाही. एकदा कलकत्त्या पासून सुमारे २० मैल लांबच्या एका तलावात, एकदा मी गळ टाकून बसलो होतो. मासे पकडत बसणे हा माझा एक छंद आहे. त्यादिवशी माझं नशीब चांगलं नव्हतं.. कारण दिवसभर बसून एकही मासा मिळाला नाही. निराश होऊन मी निघणार एवढ्यात एका १० वर्षाच्या पोराने तलावात सूर मारला.. आणि तो 'तदबीरसे बिगडी हुई तकदीर बना ले' हे माझं बाझी तलं गाणं गाऊ लागला. त्याला याची कल्पनाही नसणार की हे गाणं देणारा माणूस पलिकडच्या तीरावर गळ टाकून बसलाय! तो माझ्या आयुष्यातला मला मिळालेला सगळ्यात मोठा मासा आहे. असंच एकदा मी बांद्रा स्टेशनवर मालाडला जाण्यासाठी उभा होतो. जवळंच काही कामगार कुदळ फावड्यांच्या हालचालींच्या ठेक्यावर माझं शबनम चित्रपटातलं गाणं गात होते. ते ऐकता ऐकता मी इतका गुंग झालो की ती लोकल कधी आली अन् गेली ते मला कळलंच नाही." हे खुद्द सचिनदेव बर्मन याचं भाष्य आहे! काही लोक त्याला एसडी बर्मन म्हणतात तर काही दादा बर्मन.. माझ्या लेखी तो 'नुस्ता सदे' आहे.. कारण त्याचं गाणं आवडलं की म...