Posts

Showing posts from April, 2011

स्मोकिंग किल्स

जेम्स बाँडला जसं 'लायसन्स टू किल' असतं तसं आम्हाला गणपती उत्सवात 'लायसन्स टू चिल' मिळायचं. मिळायचं म्हणणं तितकसं बरोबर नाही.. आम्ही तो आमचा जन्मसिद्ध हक्क समजायचो.. पाली जशा कुणाच्याही घरातल्या भिंतीं आपल्याच बापाच्या समजतात तसा! रात्री ११ पर्यंत घरी येण्याची घातलेली मर्यादा पहिल्या दिवशी १२, दुसर्‍या दिवशी १ अशी विसर्जनापर्यंत हळूहळू दुसर्‍या दिवशीच्या सकाळ पर्यंत रबरबँड सारखी कशी ताणायची हे पोरं आपोआप शिकतात. तेव्हा आम्ही पौगंडावस्थेतले, म्हणजेच पर्मनंट गंडलेले होतो! गणपतीच्या नावाखाली आम्ही काय काय बघायचो आणि कुठे कुठे फिरायचो हे जर आई वडिलांना कळलं असतं तर आम्हाला आमचं घर पण गणपतीसारखं लांबूनच बघायला लागलं असतं! अशाच एका उत्सवात माझी सिगरेटशी तोंडओळख झाली आणि त्याचं पर्यवसान तिची ओढ लागण्यात झालं! तेव्हा आम्ही उच्चभ्रू लोकांसारखं धूम्रपान करायचो नाही तर बिड्या फुकायचो किंवा मद्यपान करायच्या ऐवजी बेवडा मारायचो. आमचे मध्यमवर्गीय शब्द अगदी क्रूड असले तरी नेमके होते! त्या काळी फुकणार्‍यांकडे न फुकणारे आदराने बघायचे, हल्ली मी इथल्या शाळेत जाणार्‍या पोरापोरींकडे बघतो तस...