तेथे पाहिजे जातीचे.. भाग-२
तेथे पाहिजे जातीचे.. भाग-१ इथे वाचा! 'हाय सडॅ! डू यू हॅव अ मोमेंट?'.. वेगवेगळे आकडे व आलेखांच्या डबक्यातून सदानं डोकं वर केलं. स्टुअर्ट केबिनच्या दारातून विचारत होता. सदा: 'हो! हो! ये की. बोल काय म्हणतोस? कसं वाटलं तुला इथे?' 'हं! मी तेच बोलायला आलो होतो. तसं तुमचं ऑफिस अॅज सच, इज अॅज गुड अॅज एनी! पण खरं सांगायचं तर मला थोड्या गोष्टी खटकल्या. म्हणजे मला इथे येऊन तसे चार पाचच दिवस झालेत. काही फार नाहीत. ठाम मत बनवण्याइतके तर नाहीच नाही. पण म्हंटलं तुला आजच सांगावं.. कारण आता उद्या मी जाणार दिल्लीला आणि तिकडून परत घरी!' 'दिल्लीला? ताजमहाल बघायला का? अरे वा! ते कधी ठरलं तुझं?' 'ते मी आलो त्याच दिवशी संध्याकाळी मला राकेशने सांगितलं.'.. स्टुअर्टला ताजमहाल पहायची इच्छा आहे हे सदानंच राकेश पांडेला म्हणजे सीईओला सांगितलं होतं. खुद्द राकेशनंच अंधारात ठेवल्याचा दणका सदाला अवघड जागचं दुखणं होतं. 'असं होय! फारच छान! तुला नक्कीच आवडेल ताजमहाल! एनीवेज, तू खटकल्याचं बोलत होतास.. ' 'हां! तर मला असं जाणवलं की ओव्हरॉल टेक्निकल स्किल्स...