Posts

Showing posts from February, 2016

संगीत चिवडामणी!

ही तशी जुन्या काळातली गोष्ट आहे. कुणास ठाऊक कसा पण मला संगीताशी झटापट करायचा झटका आला. माझ्या आयुष्यात स्वर कमी आणि व्यंजनं जास्त असल्यामुळे असेल कदाचित! तर मी गिटार शिकायचा घनघोर निर्णय घेतला. छे! छे! पोरगी पटवायला म्हणून नाही हो! तेंव्हा माझं लग्न झालेलं होतं आणि एक ८ महिन्याचा मुलगा पण होता. आता तुम्ही जाणुनबुजून व्यंजनांचा आणि लग्नाचा संबंध लावायला गेलात तर माझी व्यंजनं आणखी वाढवाल! असं म्हणा की माझं सर्जनशील मन कुठेतरी व्यक्त होण्याची धडपड करत होतं आणि  ते मला स्वस्थ बसू देत नव्हतं! आता गिटारच का शिकायचं ठरवलं? श्या! इतक्या चांगल्या वाद्याचं नाव त्या सतत तुंबलेल्या, घाण वास मारणार्‍या, डासांचं नंदनवन असलेल्या थिजलेल्या काळ्याशार पाण्यातून बुडबुडे फुटणार्‍या नाला सदृश वस्तूशी जुळणारं का बरं आहे? नावात काय आहे म्हंटलं तरी मधुबालाला अक्काबाई म्हंटल्यावर ते लोभस रूप डोळ्यासमोर येणार आहे का? त्रिवार नाही. पण ते असो. कारण मोठ्या लोकांनी म्हणून ठेवलेल्या गोष्टी, कुठलाही वाद न घालता, जशाच्या तशा स्विकारायच्या असतात अशी आपली संस्कृती सांगते. तर गिटार शिकायचं खरं कारण म्हणजे पिक्चर मधल...