Posts

Showing posts from 2009

गोट्याचा घोळ

"... सीआयडी मागे लागलाय".. घरातून बाहेर पडता पडता मला गोट्याचं बोलणं अर्धवट ऐकू आलं. तो शेजारच्या दीपाशी बोलत होता. गोट्या म्हणजे आमचं एकुलतं एक कार्ट. गोट्याचे कारनामे हळूच कान देऊन ऐकायला मला आवडलं असतं, खरं तर.. पण कामाला जाणं भाग होतं.. अनिच्छेनेच मी निघालो. मला नेहमी भरपूर काम असतं.. डोकं वर काढायलाही फुरसत नसते.. पण दिवसभर 'आयला! ह्या गोट्यानं काय घोळ घातला?' या प्रश्नानं मला, चपलेला चिकटलेल्या च्युईंगम सारखं छळलं. मग बँकेतून दिल्याला फोन करून सीआयडी ऑफिसातून काही माहिती मिळतेय का ते पहायला सांगीतलं. त्याला काही फारशी माहिती मिळाली नाही. सीआयडीचे लोक काळाबाजार करणारे, तस्करी करणारे नाही तर अतिरेकी लोकांच्या मागावर असतात अशी एक मोघम माहिती मिळाली. विमनस्क अवस्थेत संध्याकाळी घरी आल्यावर सरीताला झालेला प्रकार सांगीतला. सरीता: "अय्या खरंच सीआयडी मागे लागलाय? मला बघायचाय खराखुरा सीआयडी कसा दिसतो ते.".. हिचा बालिशपणा कधी उफाळून येईल त्याचा काही नेम नसतो. मी: "सीआयडी म्हणजे काय गणपतीची आरास आहे का बघायला? दारावर विकायला येणार्‍या माणसांसारखी अगदी सामा...

नुस्ता स.दे.

Image
"एखाद्या अनोळखी माणसाला मी दिलेलं गाणं गुणगुणताना ऐकणं यापेक्षा इतर कशानही मला जास्त आनंद होत नाही. एकदा कलकत्त्या पासून सुमारे २० मैल लांबच्या एका तलावात, एकदा मी गळ टाकून बसलो होतो. मासे पकडत बसणे हा माझा एक छंद आहे. त्यादिवशी माझं नशीब चांगलं नव्हतं.. कारण दिवसभर बसून एकही मासा मिळाला नाही. निराश होऊन मी निघणार एवढ्यात एका १० वर्षाच्या पोराने तलावात सूर मारला.. आणि तो 'तदबीरसे बिगडी हुई तकदीर बना ले' हे माझं बाझी तलं गाणं गाऊ लागला. त्याला याची कल्पनाही नसणार की हे गाणं देणारा माणूस पलिकडच्या तीरावर गळ टाकून बसलाय! तो माझ्या आयुष्यातला मला मिळालेला सगळ्यात मोठा मासा आहे. असंच एकदा मी बांद्रा स्टेशनवर मालाडला जाण्यासाठी उभा होतो. जवळंच काही कामगार कुदळ फावड्यांच्या हालचालींच्या ठेक्यावर माझं शबनम चित्रपटातलं गाणं गात होते. ते ऐकता ऐकता मी इतका गुंग झालो की ती लोकल कधी आली अन् गेली ते मला कळलंच नाही." हे खुद्द सचिनदेव बर्मन याचं भाष्य आहे! काही लोक त्याला एसडी बर्मन म्हणतात तर काही दादा बर्मन.. माझ्या लेखी तो 'नुस्ता सदे' आहे.. कारण त्याचं गाणं आवडलं की म...

एका परंपरेचा अस्त

ज्यानी कुणी आपल्या वाढत्या वयातली महत्वाची वर्षं पुणे विद्यापीठात काढली (घालवली आहेत असं मी म्हणणार नाही) आहेत त्यानं विद्यापीठातल्या 'अनिकेत' कँटिनबद्दल ऐकलं नसेल तर तो एकतर ठार बहिरा असला पाहीजे किंवा त्याला स्मृतिभ्रंश तरी झाला असला पाहीजे. कारण ते नुसतं कँटिन नव्हतं.. ती एक मास्तर विरहित शिक्षण संस्था होती.. हल्ली HR ची लोकं, त्यांच्या नोकर्‍या जस्टिफाय करायला, कसले कसले सॉफ्ट स्किलचे ट्रेनिंग प्रोग्रॅम घेऊन बिचार्‍या कर्मचार्‍यांचा जीव नकोसा करतात ते सगळं ट्रेनिंग इथे नकळत होऊन जायचं. तिथले पदार्थ फार चविष्ट होते अशातला काही भाग नव्हता, पण स्वस्त मात्र होते. खरं आकर्षण तिथल्या वातावरणाचं होतं. भारत क्रिकेटची मॅच जिंकत असेल तर मैदानावर जसं वातावरण असतं तसं वातावरण कायम! पीढीजात सुतकी चेहर्‍यावर देखील स्मित झळकवण्याची क्षमता त्या वातावरणात होती. परीक्षेत नापास झाल्याचा वैताग, मास्तरनं झापल्यानं आलेली कटुता, बापाशी झालेल्या भांडणाचं वैषम्य, प्रेमभंगाचं दु:ख, आपल्याला आयुष्यात काही करायला जमणार नाही ही भीति.. असल्या मन पोखरणार्‍या विचारांचा निचरा करण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे...

रिसेशन - एक काथ्याकूट

(टीपः या लेखातील पात्रे 'ठरविले अनंते' या लेखातून उचलली आहेत. तो लेख माझाच असल्यामुळे लेखकाची पूर्वपरवानगी घेण्याची गरज वाटली नाही. किंबहुना, लोकांनी तो लेख वाचावा या निर्मळ हेतुनेच हा प्रपंच केला आहे.) "अरे चिमण्या, आजकाल सगळं ग्लोबल झालंय. तिकडे खुट्ट झालं की इकडे पटापट दारं लावतात. तिकडे माशी शिंकली की इकडे लोकं सर्दीची औषधं घेतात. इकडच्या बिळात अल कायदा सरपटला तर तिकडचे लोक काठ्या घेऊन मारायला निघतात. इतकंच काय, साधं वॉर्मिंग पण ग्लोबल झालंय तर!".. 'रिसेशन ग्लोबल आहे की नाही' या माझ्या भाबड्या प्रश्नावर दिल्यानं आख्यान लावलं होतं. आमची साप्ताहिक सभा भरली होती. मी, सरिता, दिल्या आणि कल्पना एवढेच उपस्थित होते.. मक्या आणि माया अजून उगवले नव्हते. मला अजूनही कल्पनाच्या डोळ्यांकडे पहायचं डेरिंग होत नाही. काहीतरी बोलायचं म्हणून मी दिल्याला चावी मारली होती अन् माझ्या कर्माची फळं भोगत होतो. कल्पना तन्मयतेनं दिल्याचं बोलणं ऐकत होती.. दिल्याच्या गाढ्या नॉलेजवरचा विश्वास उडण्या एवढे दिवस त्यांच्या लग्नाला झाले नव्हते, त्याचं हे लक्षण. सरिता सुध्दा मन लावून त्याचं ब...

हे बगचि माझे विश्व

मी प्रोग्रॅमर नामक पामराला कोडगा म्हणतो. एकतर तो कुणाच्याही आकलन शक्ती बाहेरचा कोड पाडून स्वतःला आणि दुसर्‍याला कोड्यात टाकतो म्हणून, आणि ऑफिसात बारक्या सारक्या चुकांवरून बॉसच्या शिव्या खाऊन खाऊन, वेळेवर घरी न गेल्यामुळे घरच्यांची मुक्ताफळं झेलून झेलून, क्लाएंटनं येता जाता केलेला अपमान सहन करून करून तो मनाची एक विशिष्ट अवस्था गाठतो - अर्थात् त्याचा 'कोडगा' होतो. येता जाता चुका काढणे, सदैव किरकिर करणे, चांगल्या कामाचं चुकूनही कौतुक न करणे, आपल्या चुका दुसर्‍याच्या माथी मारणे, पगारवाढीच्या काळात हटकून तोंडघशी पाडणे अशी कुठल्याही बॉसची काही ठळक स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. माझा बॉस, वैद्य, याला अपवाद नव्हता. त्याचं वागणं बोलणं चालणं पाहून आणि वैद्य नावाशी मस्त यमक जुळतं म्हणून आम्ही त्याला दैत्य म्हणायचो. आमच्या ग्रुपमधे दहा-बारा कोडगे होते. गुलामांवर नजर ठेवणार्‍या रोमन मुजोरड्याप्रमाणे तो अधून मधून राऊंडवर यायचा. तो येतोय असं दिसलं की सगळीकडे एकदम शांतता पसरायची. काम करतोय हे ठसवण्यासाठी जिवाच्या आकांताने कीबोर्ड बडवला जायचा. काही धाडसी कोडगे शेवटच्या क्षणापर्यंत मायबोलीवर टीपी करत...

गिरमिट

काल परत एकदा ते घडलं. परीक्षा द्यायला बसलो होतो. पेपर बघून तोंडाला फेस आला होता. प्रश्न ओळखीचे होते पण पाठ केलेलं काहीच आठवत नव्हतं. शेजारच्या बाकावर बसलेल्या मक्याकडे पाहीलं. तो ठणाठण लिहीत सुटला होता. ह्याला कशी काय आज माझी मदत लागत नाहीये? नेहमी आम्ही एकमेकांना सांभाळून घेतो. आम्हा दोघांना बर्‍याच वेळा पूर्ण उत्तर, पहिले एक दोन शब्द सांगीतल्याशिवाय, आठवतच नाही. एकदा शब्द कळाले की पुढचं धडाधड बाहेर पडतं. ते एक दोन शब्द आम्ही एकमेकांना हळूच सुचवत असतो. पण आज हा गडी बघायलाच तयार नाही. आता पेपर कोरा जाणार. म्हणजे एक वर्ष गेलं ना कामातून! भयाण टेंशन आलं. अंगाचा थरकाप झाला. प्रचंड घाम फुटला आणि मला जाग आली. शेजारी बायको निवांत झोपली होती. हळूहळू स्वप्न पडल्याचं लक्षात आलं आणि सुटकेचा निश्वास टाकला. हुश्श! ही अशी परीक्षेची स्वप्नं मला अजून पडतात. तेच तेच पेपर मी परत परत देत असतो.. अगदी स्वप्नात सुध्दा पूर्वी हा पेपर दिला आहे याची मला जाणीव असते. लोकांना कशी गोड गोड स्वप्नं पडतात? असल्या स्वप्नांच्या मागे कोवळ्या वयातले, मनावर खोलवर परिणाम करणारे, धकाधकीचे प्रसंग लपलेले असतात असं मी कुठेत...

भेजा फ्राय!

"नमस्कार, ब्रिटीश टेलिकॉमवर आपलं स्वागत आहे. कृपया पुढील पर्याय कान देऊन ऐका आणि योग्य तो पर्याय निवडा", फोनवरून धमकीवजा सूचना आली. मी घर बदलतोय हे मला बी.टी.ला सांगायचं होतं. त्याचं काय आहे.. आम्हाला अधूनमधून घर बदलल्याशिवाय चैन पडत नाही. वर्षानुवर्ष एकाच घरात काय रहायचं? शीss!.. एकाच गावात रहात असलो तरी काय झालं? काहीतरी नवेच करा ही त्या मागची प्रेरणा, हल्लीच्या भाषेत - ड्रायव्हिंग फोर्स! पर्यायांचं पाल्हाळ लागलं, मी कान दिलेलाच होता, फक्त पर्याय निवडणं बाकी होतं. "तुम्हाला नवीन टेलिफोन कनेक्शन घ्यायचं असल्यास १ दाबा." "तुम्हाला नवीन बीटी ब्रॉडबँड हवे असल्यास २ दाबा." "तुमच्या बीटी ब्रॉडबँडबद्दल काही विचारायचे असल्यास ३ दाबा." "तुम्हाला टेलिफोनच्या बिलाबद्दल काही शंका असल्यास ४ दाबा." "तुमचा टेलिफोन बिघडला असल्यास ५ दाबा." "वरील पैकी काहीच करायचे नसल्यास ६ दाबा", मी ६ चं बटण दाबलं. "बीटीच्या नवीन ऑफर्सबद्दल माहिती हवी असल्यास १ दाबा" "बीटीच्या कस्टमर सर्व्हेमधे भाग घ्यायचा असल्यास २ दाबा...

कैच्या कै संगीतिका

(टीपः- एका बंगल्यात दुपारच्या वेळी निवांत बसलेलो असताना अचानक मागच्या दारातून दोन पाली आणि पाठोपाठ एक सरडा प्रवेश करते झाले. त्यांनी क्षण दोन क्षण थांबून माझ्याकडे पाहीलं आणि लगेच पुढच्या दारातून पसार झाले. यावर आधारित बाकीचा हा कल्पना उल्हास आहे! ) एक आटपाट शेत होतं. शेताला खडबडित बांध होता. त्या बांधाच्या खबदाडीत 'देसरडा' नावाचं सरडा कुटुंब रहात असे. रणबीर हा देसरडांचा एकुलता एक मुलगा. बांधापलीकडे एक बंगला होता. त्याच्या भिंतींवर 'पाल' नावाचे पालींचे कुटुंब विहार करायचे. दीपिका ही पालांची एकुलती एक मुलगी. लहानपणापासून रणबिरला पालींच्या चुक चुक आवाजाचं विलक्षण आकर्षण होतं. पालींचा चुक चुक आवाज आला की तो नेहमी आईच्या मागे लागायचा. (चालः टप टप टप काय बाहेर वाजतंय) चुक चुक चुक काय बाहेर वाजतंय ते पाहू चल ग आई चल ग आई बंगल्यात जाऊ पण आई, सरड्याची धाव कुंपणापर्यंत या सरडा नीतिनुसार, कधीही त्याला बंगल्यात घेऊन गेली नाही. तो हिरमुसला व्हायचा. लहान असल्यामुळे फारसं काही करूही शकत नव्हता बिचारा! पण मोठा झाल्यावर एकवार बंगल्यात घुसून त्या आवाजाचा शोध घ्यायचा या वेडानं ...

अंतिम सsप्राईज!

Image
(टीपः- बरं झालं मी 'ताणलेलं सsप्राईज!' आधी लिहीलं ते. का ते तुम्हाला ह्या 'अनु'दिनीतील निवडक उतार्‍यांवरून कळेल! ) वास पूर्णपणे जायला २ दिवस लागले. च्युईंगम सारखा तो संपतच नव्हता. तोपर्यंत मला वासांसि अजीर्णानि झालं. हल्ली तर मला जळी स्थळी काष्ठी पाषाणी अनुच दिसायला लागली होती... मी संपूर्णपणे अनुरक्त झालो होतो.. अगदी गाडी चालवताना सुद्धा. त्या भानगडीत मी एकदा सिग्नल तोडला. नशिबानं मागून राजेश येत होता. त्यानं फोन करून मला त्याच्या दुकानावर यायला सांगीतलं. दुकानात त्यानं मला जे दाखवलं आणि सांगीतलं ते ऐकून मी मुळापासून हादरलो.. बॉसने टीपी करताना पकडावं तसा. कारण एका ताज्या साप्ताहिक समाचार मधे एका पोटार्थी पापाराझीनं माझा चांगलाच समाचार घेतला होता. ती सनसनाटी बातमी अशी होती - **************************************************** अमली पदार्थांच्या तस्करीबद्दल एका लफंग्यास अटक:- आमच्या इंग्लंडच्या बातमीदाराकडून मागच्या आठवड्यात वरकरणी साळसूद दिसणार्‍या एका सराईत ड्रग विक्रेत्यास पोलीसांनी शिताफीने पकडले. प्रकाश माटे असं नाव सांगणारा हा भामटा रस्त्यावरून चालला असत...