कैच्या कै संगीतिका
(टीपः- एका बंगल्यात दुपारच्या वेळी निवांत बसलेलो असताना अचानक मागच्या दारातून दोन पाली आणि पाठोपाठ एक सरडा प्रवेश करते झाले. त्यांनी क्षण दोन क्षण थांबून माझ्याकडे पाहीलं आणि लगेच पुढच्या दारातून पसार झाले. यावर आधारित बाकीचा हा कल्पना उल्हास आहे! ) एक आटपाट शेत होतं. शेताला खडबडित बांध होता. त्या बांधाच्या खबदाडीत 'देसरडा' नावाचं सरडा कुटुंब रहात असे. रणबीर हा देसरडांचा एकुलता एक मुलगा. बांधापलीकडे एक बंगला होता. त्याच्या भिंतींवर 'पाल' नावाचे पालींचे कुटुंब विहार करायचे. दीपिका ही पालांची एकुलती एक मुलगी. लहानपणापासून रणबिरला पालींच्या चुक चुक आवाजाचं विलक्षण आकर्षण होतं. पालींचा चुक चुक आवाज आला की तो नेहमी आईच्या मागे लागायचा. (चालः टप टप टप काय बाहेर वाजतंय) चुक चुक चुक काय बाहेर वाजतंय ते पाहू चल ग आई चल ग आई बंगल्यात जाऊ पण आई, सरड्याची धाव कुंपणापर्यंत या सरडा नीतिनुसार, कधीही त्याला बंगल्यात घेऊन गेली नाही. तो हिरमुसला व्हायचा. लहान असल्यामुळे फारसं काही करूही शकत नव्हता बिचारा! पण मोठा झाल्यावर एकवार बंगल्यात घुसून त्या आवाजाचा शोध घ्यायचा या वेडानं ...