Posts

Showing posts from 2011

दुसरे महायुद्ध : ऑपरेशन मिंसमीट

मधे बीबीसी वर दुसर्‍या महायुद्धातल्या ऑपरेशन मिंसमीटबद्दल एक अफलातून माहितीपट दाखविला. ऑपरेशन मिंसमीट हे जर्मन सैन्याला गंडविण्यासाठी ब्रिटिशांनी रचलेल्या एका सापळ्याचं नाव होतं.. ती एक अफलातून गंडवागंडवी होती ज्यामुळे हजारो प्राण पुढे वाचले. त्या माहितीपटात ऐकलेली आणि विकीपीडिया सारख्या सायटींवरून उचलेली ही माहिती आहे. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश हेर खात्यातल्या काही सुपिक टाळक्यांनी व्यवस्थित नियोजन करून एक भेदी पुडी सोडली. ती इतकी बेमालूम होती की तिच्या वावटळीत खुद्द हिटलर गुंडाळला गेला. आणि सर्वात विशेष म्हणजे त्या पुडीचा नायक होता एक मृत देह.. एक प्रेत! (१). १९४२ च्या शेवटी शेवटी दोस्त राष्ट्रांनी उघडलेली मोरोक्को, अल्जिरिया, पोर्तुगाल व ट्युनिशिया येथील आघाडी यशस्वी होऊ घातली होती. युद्धाची पुढील पायरी म्हणून भूमध्य समुद्राच्या उत्तर भागात मुसंडी मारायचा विचार चालू होता. उत्तर आफ्रिकेतून एक तर इटलीतून किंवा ग्रीसमधून हल्ला चढविला तर पलिकडून येणार्‍या रशियाच्या सैन्यामुळे जर्मन कोंडित सापडणं शक्य होतं. त्यात पण सिसिलीचा (इटली) ताबा मिळविला तर दोस्तांच्या नौदलाला भूमध्...

गोट्याची शाळा

गोट्याचा शाळेतला प्रवेश त्याच्या या जगातल्या प्रवेशापेक्षा क्लेशकारक निघाला. सुरुवातच मुळी कुठल्या माध्यमातल्या शाळेत घालायचं इथून झाली.. मराठी की इंग्रजी? माझ्या वेळेला इंग्रजी माध्यमाच्या शाळा असल्या तरी तिथे मराठी मुलांना घेत नाहीत असा समज असावा. त्यामुळे, 'कुठलं माध्यम?' सारखे कूट प्रश्न कुणालाही पडले नाहीत. पूर्वी मी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सरसकट कॉन्व्हेन्ट स्कूल म्हणायचो.. कॉन्व्हेन्ट स्कूल म्हणजे मुलींची शाळा असते असं ज्ञानमौक्तिक माझ्या अकलेचं मंथन करून एकाने काढल्यावर मी कॉन्व्हेन्टला सुद्धा इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणू लागलो. कोंबडा झाकला तरी सूर्य उगवायचा रहात नाही तसं माझं इंग्रजीचं अज्ञान कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी प्रतिष्ठेची लक्तरं उधळल्याशिवाय रहात नाहीत ती अशी! त्यामुळेच, गोट्याला इंग्रजी शाळेत घालायचा मी गंभीरपणे विचार करत होतो.. म्हणजे मला मराठीचा अभिमान आहे, नाही असं नाही. मराठीचा अभिमान वाटण्याचं मुख्य कारण ती एकमेव भाषा लिहीताना व बोलताना मला अगदी घरात वावरल्यासारखं वाटतं हे असावं! कुठलाही न्यूनगंड नाही की टेन्शन! या उलट इंग्रजीचं! समोर कुणी ...

वाळवी

'बॅकप हुकला नि कंप्युटर रुसला'.. म्हणजेच, जेव्हा बॅकप घेतलेला नसतो तेव्हाच नेमकी त्याची गरज भासते अशी 'जंगलातली एक म्हण' या धर्तीची 'आयटीतली एक म्हण' आहे! हा अनुभव घेतल्याशिवाय कोणताही कोडगा प्रथितयश कोडगा म्हणवला जातं नाही. बॅकपचं यंत्र बिघडण्यापासून एक दिवस बॅकप नाही घेतला तर काय होणार आहे? असल्या अनाठायी आत्मविश्वासापर्यंत बॅकप न घेण्याची अनंत कारणं असू असतात! पण महत्वाचा डेटा असलेल्या कंप्युटरने डोळे फिरवायचं कारण मात्र शेअरबाजार कोसळण्याइतकच अनाकलनीय असतं. 'बॅकप मधेच नाही तर रिस्टोअर कुठून होणार?'.. म्हणजेच, बॅकप वरचा डेटा परत जसाच्या तसा रिस्टोअर झाल्याशिवाय बॅकप नीट झाला आहे असं मानू नये.. 'आयटीतली अजून एक म्हण'! हे 'माणूस मेल्याशिवाय विषाची परीक्षा होत नाही' असं म्हंटल्यासारखं वाटेल कदाचित! पण ते तितकंच सत्य आहे. याचा अनुभव ज्या कोडग्याने घेतला असेल तो खरा 'सर्टिफाईड कोडगा'! या म्हणीच्या पुष्ट्यर्थ एक उदाहरणच द्यायला पाहीजे -- पूर्वी एकदा एका बँकेच्या शाखेचा डेटाबेस कोलमडला. ते त्यांना खूप उशीरा समजलं. तोपर्यंत चुकीच्या ...

वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन

जॉर्ज बुश त्याच्या टेक्सास मधल्या रँच वरच्या तळ्यात पाय बुडवून निवांतपणे विचारशून्य अवस्थेत मासे पकडत बसला होता. तसं 'विचारशून्य बुश' हे गाईचं गोमूत्र किंवा पिवळा पीतांबर म्हंटल्या सारखचं! आजुबाजूला ४-५ बॉडीगार्डस आपण त्या गावचेच नाही असं भासवायचा प्रयत्न करत उभे होते. वॉर ऑन टेररची घोषणा करून वर्ष दीड वर्ष होऊन गेलेलं होतं. जिकडे तिकडे विविध देशांचे सैनिक बिन-लादेन साठी गळ टाकून बसले होते, पण तो बिन-धास्त होता. दोन्हीही गळ टाकूंना यश नव्हतं.. आता गळ म्हंटल्यावर कसं कोण सापडणार? खरं तर बुशला 'ओसामा बिन लादेन' हे नाव मनातून फार आवडायचं, भारदस्त वाटायचं. डोक्यात खोल कुठेतरी स्वत:च नाव 'ओसामा बिन बुशेन' असं काहीतरी करावं असा पण विचार चालायचा. काही झालं तरी बुशच्या लोकप्रियतेला बिन लादेन मुळे उधाण आलं होतं.. अल्ला मेहरबान तो गधा पेहलवान म्हणतात तसं.. त्याबद्दल बुशला कृतज्ञता होती.. पण हे तो उघडपणे बोलू शकत नव्हता. 'मि. प्रेसिडेन्ट, आपल्याला डोनल्ड रम्सफेल्ड साहेबांचा फोन आहे'.. अचानक त्याची खाजगी सचिव, मार्गारेट ऊर्फ मॅगी, चिवचिवली आणि बुश एका विचारशून्य ...

शाही शुभमंगल!

एक वेळ विद्युतमंडळ झटका कधी देईल ते सांगता येतं पण राजेरजवाड्यांना केव्हा काय करायचा झटका येईल ते नाही. आता हेच पहा ना, त्या वेस्टमिन्स्टर अ‍ॅबीत केटचं आणि विल्यमचं साग्रसंगीत लग्न झालं.. सॉरी विवाह झाला, पुलंच्या म्हणण्याप्रमाणे आलतू फालतू लोकात लग्न होतात, उच्चभ्रूंमधे विवाह होतात. ते बघायला कोट्यवधी लोक नटुन थटुन टिव्ही समोर बसले होते म्हणे! आता एकदा तो विवाह झाल्यावर परत भारतीय पद्धतीने कशाला करायला पाहीजे? पण राणीच्या उतारी वर हुकूम कोण टाकणार? तिच्या अवती भोवती फिरकायची खुद्द प्रिन्स फिलिपची पण छाती नाही! प्रिन्स फिलिप कोण म्हणून विचारताय? इंग्लंडात असं विचारणं हे पंढरपुरात विठोबा कोण विचारण्यासारखं आहे. हा प्रिन्स फिलिप म्हणजे ड्युक ऑफ एडिंबरा म्हणजे राणीचा सख्खा नवरा! पण मग तो प्रिन्स कसा? किंग का नाही? कारण, इंग्रंजांची संबोधनं कुणाच्याही आकलन शक्तीच्या कमाल मर्यादे बाहेरची असतात! अत्यंत व्यग्र दिनचर्येमुळे आणि सततच्या प्रलोभनांमुळे लग्नासारखी क्षुल्लक गोष्ट राजेरजवाडे सहज विसरू शकतात या गोष्टीला इतिहास साक्षी आहे. मग विल्यम किंवा केट भलतं सलतं काही तरी करून बसले तर राणील...

भरकटंती

कुठे तरी काही दिवस तरी भटकंतीला जाऊ या असं कधी तरी कुणाला तरी वाटतंच. दुर्दैवाने, या वेळेलाही तसंच झालं! आम्ही दिल्याच्या ऑफिसात त्याच्या बायकोचा शिर्‍याचा प्रयोग चाखत होतो. आमचा एक मित्र, संदीप, अमेरिकेहून आला होता, त्याच्या बरोबर. इतर एनाराय मित्रांसारखीच त्याचीही, बायकोला चुकवून, आमच्या बरोबर टीपी करण्याची माफक अपेक्षा होती. परदेशातून आल्यावर एकदाचं बायका-पोरान्ना बायकोच्या माहेरी डंप केलं की बाजीरावांना रान मोकळं मिळतं. मग एक दोन दिवस इकडे तिकडे झाले तरी बायको फारसं मनावर घेत नाही... किंबहुना तिलाही तेच हवं असतं. पण इथल्या सगळ्यांनी कामं टाकून त्यांच्यामागे धावावं असं या एनारायना का वाटतं? म्हणजे तसा एक काळ होता.. त्यांनी तिकडून आणलेल्या सिगरेटी आणि दारूत अवाजवी इंटरेस्ट असल्यामुळे त्यांना वाजवी पेक्षा जास्त भाव दिला जायचा.. पण आता? मक्या: 'ए हा संदीप सहलीचं एक प्रोजेक्ट करू या म्हणतोय!'.. कुठल्याही फालतू गोष्टीला 'प्रोजेक्ट' म्हणायची फ्याशनच झालीये हल्ली! आयटीत काम करून करून डोक्याची अशी मशागत होत असावी.. कटिंगला जाणे, एक प्रोजेक्ट! कोपर्‍यावरच्या दुकानातून दूध आ...

स्मोकिंग किल्स

जेम्स बाँडला जसं 'लायसन्स टू किल' असतं तसं आम्हाला गणपती उत्सवात 'लायसन्स टू चिल' मिळायचं. मिळायचं म्हणणं तितकसं बरोबर नाही.. आम्ही तो आमचा जन्मसिद्ध हक्क समजायचो.. पाली जशा कुणाच्याही घरातल्या भिंतीं आपल्याच बापाच्या समजतात तसा! रात्री ११ पर्यंत घरी येण्याची घातलेली मर्यादा पहिल्या दिवशी १२, दुसर्‍या दिवशी १ अशी विसर्जनापर्यंत हळूहळू दुसर्‍या दिवशीच्या सकाळ पर्यंत रबरबँड सारखी कशी ताणायची हे पोरं आपोआप शिकतात. तेव्हा आम्ही पौगंडावस्थेतले, म्हणजेच पर्मनंट गंडलेले होतो! गणपतीच्या नावाखाली आम्ही काय काय बघायचो आणि कुठे कुठे फिरायचो हे जर आई वडिलांना कळलं असतं तर आम्हाला आमचं घर पण गणपतीसारखं लांबूनच बघायला लागलं असतं! अशाच एका उत्सवात माझी सिगरेटशी तोंडओळख झाली आणि त्याचं पर्यवसान तिची ओढ लागण्यात झालं! तेव्हा आम्ही उच्चभ्रू लोकांसारखं धूम्रपान करायचो नाही तर बिड्या फुकायचो किंवा मद्यपान करायच्या ऐवजी बेवडा मारायचो. आमचे मध्यमवर्गीय शब्द अगदी क्रूड असले तरी नेमके होते! त्या काळी फुकणार्‍यांकडे न फुकणारे आदराने बघायचे, हल्ली मी इथल्या शाळेत जाणार्‍या पोरापोरींकडे बघतो तस...

अभिनय.. एक खाणे

पूर्वी पुण्यातल्या रूपाली/वैशाली हॉटेलात तुरळक गर्दी असायची. कधीही गेलं तरी बसायला नक्की जागा मिळायची.. शिवाय एका कॉफीवर बराच वेळ शिळोप्याच्या गप्पा ठोकता यायच्या! काही नाही घेतलं तरी वेटर हाकलायला यायचे नाहीत.. त्या मागे बहुतेक हॉटेल अगदीच रिकाम रिकाम वाटू नये हा उद्देश असावा.. 'कामाशिवाय जास्त वेळ बसू नये' छाप पाट्या पण नव्हत्या. वेटरांनाही आमच्याशी गप्पा मारायला वेळ असायचा. हल्ली आत घुसायला पण रांग असते. थोडा वेळ जरी काही न घेता कुणी बसलेलं दिसलं तरी वेटर लगेच येऊन नम्रपणे 'काय आणू?' विचारतात.. चाणाक्ष लोकांना ती 'टळा आता' ची गर्भित सूचना आहे हे लगेच समजतं! त्या दिवशी कॉलेज सुटल्यावर नेहमी प्रमाणे शीण घालवायला मी रूपालीत धडकलो. एका टेबलावर राम्या शून्यात नजर लावून नुसताच बसला होता. राम्या म्हणजे आमच्यातला सखाराम गटणे. रोज तो तिथे एकच कॉफी घेऊन तासन तास पुस्तकं वाचत बसायचा. पुस्तक बिन राम्या म्हणजे जल बिन मछली, नांगी बिन विंचू, आयाळा बिन सिंह, सोंडे बिन हत्ती.. नाही.. ओसामा बिन लादेन नाही! 'काय राम्या? आज पुस्तक नाही? असं कसं झालं? मुंग्यानी मेरु पर्वत...

सरकार राज

सरकारी कार्यालयाचे अनंत झटके खाल्ल्यामुळे कार्यालय या शब्दाची कार्य + आलय अशी फोड कुणा गाढवानं केली हा प्रश्न मक्या मला नेहमी विचारतो. त्याच्या मते त्याची फोड खरी 'कार्य जिथे लयास जाते ते ठिकाण' अशी सार्थ व्हायला हवी होती.. शाळांमधलं शिक्षण कालबाह्य आहे ते असं! मक्याचं आणि सरकारी कार्यालयांचं काहीतरी वाकडं आहे हे मात्र नक्की! त्यानं सरकारी कार्यालयाच्या जितक्या वार्‍या केल्या तितक्या पंढरीच्या केल्या असत्या तर प्रत्यक्ष विठोबा 'कर कटेवरी' अवस्थेत त्याच्या घरात येऊन खाटेवर उभा राहीला असता. संत महात्म्यांना कधी सरकारचा बडगा बघायला मिळाला नसावा नाही तर त्यांनी 'जन्म मरणाचे फेरे परवडले पण सरकारी हापिसाचे नको!' असा टाहो फोडला असता. लग्नानंतरचे झटके खायच्या आधी मक्याला आणि त्याच्या होणार्‍या बायकोला (मायाला) रजिस्टर्ड लग्न करण्याचा झटका आला. वास्तविक, त्यांचं लग्न हे दोन्हीकडचं पहीलं आणि शेवटचं होतं तरीही ते दोघे 'काहीतरी नवेच करा' या मानसिकतेचे बळी असल्यामुळे त्यांच्या हट्टापायी कुणाचंच काहीही चाललं नाही! मग काय? मी आणि मक्या मॅरेज रजिस्ट्रेशन हापिसात लग्ना...