Posts

Showing posts from October, 2011

वाळवी

'बॅकप हुकला नि कंप्युटर रुसला'.. म्हणजेच, जेव्हा बॅकप घेतलेला नसतो तेव्हाच नेमकी त्याची गरज भासते अशी 'जंगलातली एक म्हण' या धर्तीची 'आयटीतली एक म्हण' आहे! हा अनुभव घेतल्याशिवाय कोणताही कोडगा प्रथितयश कोडगा म्हणवला जातं नाही. बॅकपचं यंत्र बिघडण्यापासून एक दिवस बॅकप नाही घेतला तर काय होणार आहे? असल्या अनाठायी आत्मविश्वासापर्यंत बॅकप न घेण्याची अनंत कारणं असू असतात! पण महत्वाचा डेटा असलेल्या कंप्युटरने डोळे फिरवायचं कारण मात्र शेअरबाजार कोसळण्याइतकच अनाकलनीय असतं. 'बॅकप मधेच नाही तर रिस्टोअर कुठून होणार?'.. म्हणजेच, बॅकप वरचा डेटा परत जसाच्या तसा रिस्टोअर झाल्याशिवाय बॅकप नीट झाला आहे असं मानू नये.. 'आयटीतली अजून एक म्हण'! हे 'माणूस मेल्याशिवाय विषाची परीक्षा होत नाही' असं म्हंटल्यासारखं वाटेल कदाचित! पण ते तितकंच सत्य आहे. याचा अनुभव ज्या कोडग्याने घेतला असेल तो खरा 'सर्टिफाईड कोडगा'! या म्हणीच्या पुष्ट्यर्थ एक उदाहरणच द्यायला पाहीजे -- पूर्वी एकदा एका बँकेच्या शाखेचा डेटाबेस कोलमडला. ते त्यांना खूप उशीरा समजलं. तोपर्यंत चुकीच्या ...