Posts

Showing posts from 2025

क्रिकेटचे पाळणाघर

Image
 लॉर्ड्स क्रिकेट मैदान ही क्रिकेटची पंढरी आहे हे सर्वश्रुतच आहे. दर वर्षी हजारो पर्यटक भक्तिभावाने फक्त हे मैदान बघायला येतात. त्यात भारतीय लोकांची संख्या सगळ्यात जास्त आहे हे तिथे काम करणार्‍या माणसानेच मला सांगितलं. अर्थात भारतीयांचे एकूण क्रिकेट वेड बघता यात नवल वाटण्यासारखं काही नाही म्हणा! मी पण त्यातलाच एक! पण क्रिकेटचं अति वेड असलं तरी क्रिकेटच्या एकूण इतिहासाबद्दल मी तरी अनभिज्ञ आहे.  उदाहरणार्थ, क्रिकेटचा जन्म कुठे झाला? मी याचं उत्तर बेधडकपणे लॉर्ड्स असं दिलं असतं. हा प्रश्न मला कधीही पडला नाही आणि मला ही कधी कुणी विचारला नाही. याचा अर्थ इतरांना पण तो पडला असण्याची शक्यता नाही. कुठलेही नस्ते प्रश्न न पडणं आणि पडले तरी त्यावर खोलात जाऊन विचार न करणं हा माझा स्थायीभाव आहे. तर, क्रिकेटचा जन्म कुठे झाला हे नक्की कुणालाच माहिती नाही. पण इतकं माहिती आहे की क्रिकेट शेकडो वर्षांपासून दक्षिण इंग्लंडमधे खेळलं जात होतं. तेथे सोळाव्या शतकामधे क्रिकेट खेळलं गेल्याचे संदर्भ आहेत.  क्रिकेटचा जन्म कुठे झाला हे नक्की माहिती नसलं तरी क्रिकेटचं पाळणाघर कुठे होतं ते नक्की माहिती आह...

अतिक्रमण

 कधी कधी अकस्मात काय घडेल काही सांगता येत नाही. मी एकदा रात्री साडे अकराच्या सुमारास मित्राकडून परत येत होतो. तो रहातो ऑक्सफर्ड पासून सुमारे 100 मैल लांब! निम्मा अधिक रस्त्ता कापून झाला होता आणि शेवटी एका हायवेला लागायचं होतं. हायवेची एक खासियत आहे. चुकून भलत्याच बाजूकडे जाणारा रस्ता पकडला की 10/15 मैलांचा फटका बसू शकतो कारण मधेच कुठे यू-टर्न घ्यायची सोय नसते. पुढचा एक्झिट घेऊन तिथे हायवे ओलांडून उलट्या बाजूचा रस्ता घ्यावा लागतो. त्या रात्री मी नेमका चुकीच्या बाजूचा हायवे धरला. अशा चुका मला नवीन नाही म्हणा! आत्तापर्यंत पुष्कळ वेळा ते करून बसलोय. पण आता घरी पोचायला आणखी उशीर होणार म्हणून स्वत:ला शिव्या देत देत पुढचा एक्झिट घेतला, फिरून उलट्या दिशेने हायवेकडे जाणारा रस्ता (स्लिप रोड) पकडला. आता फक्त वेग वाढवून हायवेच्या गर्दीत घुसणं बाकी होतं. इथल्या हायवेंची कमाल वेगमर्यादा 70 मैल आहे. त्यामुळे गाडी सुमारे 60 मैलाच्या वेगाने मारली तर हायवेच्या प्रवाहात मिसळायला सोप्पं जातं. वेग वाढवायला सुरुवात केली तोच डाव्या बाजूच्या झाडीत थोडीशी हालचाल झालेली डोळ्याच्या कोपर्‍यानं टिपली.  म्...