Posts

Showing posts from January, 2025

अतिक्रमण

 कधी कधी अकस्मात काय घडेल काही सांगता येत नाही. मी एकदा रात्री साडे अकराच्या सुमारास मित्राकडून परत येत होतो. तो रहातो ऑक्सफर्ड पासून सुमारे 100 मैल लांब! निम्मा अधिक रस्त्ता कापून झाला होता आणि शेवटी एका हायवेला लागायचं होतं. हायवेची एक खासियत आहे. चुकून भलत्याच बाजूकडे जाणारा रस्ता पकडला की 10/15 मैलांचा फटका बसू शकतो कारण मधेच कुठे यू-टर्न घ्यायची सोय नसते. पुढचा एक्झिट घेऊन तिथे हायवे ओलांडून उलट्या बाजूचा रस्ता घ्यावा लागतो. त्या रात्री मी नेमका चुकीच्या बाजूचा हायवे धरला. अशा चुका मला नवीन नाही म्हणा! आत्तापर्यंत पुष्कळ वेळा ते करून बसलोय. पण आता घरी पोचायला आणखी उशीर होणार म्हणून स्वत:ला शिव्या देत देत पुढचा एक्झिट घेतला, फिरून उलट्या दिशेने हायवेकडे जाणारा रस्ता (स्लिप रोड) पकडला. आता फक्त वेग वाढवून हायवेच्या गर्दीत घुसणं बाकी होतं. इथल्या हायवेंची कमाल वेगमर्यादा 70 मैल आहे. त्यामुळे गाडी सुमारे 60 मैलाच्या वेगाने मारली तर हायवेच्या प्रवाहात मिसळायला सोप्पं जातं. वेग वाढवायला सुरुवात केली तोच डाव्या बाजूच्या झाडीत थोडीशी हालचाल झालेली डोळ्याच्या कोपर्‍यानं टिपली.  म्...