बंड्या वाघ माझा शाळासोबती! आम्ही शाळेत असताना त्याला साप चावला होता. त्याचं असं झालं.. त्याच्या घरात आई-वडील कुणी नव्हतं.. तो एकटाच खेळत होता.. मधेच त्याला काहीतरी बांधायला दोरीची आवश्यकता भासली.. म्हणून तो घरात आला.. तर आतल्या दरवाज्यावरच एक, त्याला हवी होती तशी, दोरी लोंबकळताना दिसली.. क्षणाचाही वेळ न घालवता त्यानं ती धरली आणि ओढली.. त्याच्या दुर्दैवाने तो विषारी साप होता.. सापानं त्याचं काम चोख बजावलं.. त्यावर बंड्याला काय करावं ते सुचेना.. आईला शोधून काढून दवाखान्यात जाई पर्यंत थोडा उशीर झाला.. म्हणजे बंड्याला दवाखान्यातच अॅडमिट करावं लागलं.. थोडे आधी उपचार झाले असते तर लगेच घरी जाता आलं असतं इतकंच.. अपघात असल्यामुळे ती एक पोलीस केस पण झाली. बंड्या वाचला खरा पण घरच्यांच्या आणि आमच्या तोंडचं पाणी पळवलं त्यानं!
दुसरे दिवशी एका भुक्कड पेपरात चक्क बंड्याच्या मृत्यूची वार्ता छापून आली.. जिचा त्याच्या घरच्यांना काहीच पत्ता नव्हता.. लगेच शाळेला सुट्टी देण्यात आली.. धक्का बसलेल्या अवस्थेत वर्गातली काही मुलं आणि एक दोन मास्तर सुतकी चेहर्याने त्याच्या घरी गेले.. घरी फक्त वडील होते त्याचे.. वडलांना वाटले सगळे चौकशीसाठी आले आहेत म्हणून त्यांनी हसत हसत 'अरे वा! या या या' असं म्हंटलं.. लोकांना विचित्र वाटायला लागलं.. एव्हढा स्वतःचा मुलगा गेला आणि हा माणूस सरळ हसतोय? बहुतेक एकुलता एक मुलगा गेल्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय असं सगळ्यांना वाटलं आणि परिस्थिती आणखीनच विचित्र झाली.. कसंबसं चाचरत चाचरत एका मास्तराने 'अं अं अं, मि. वाघ... बंडू असा अचानक गेला.. तुमच्या.....' वगैरे बोलायला सुरुवात केली. पण वडिलांनी त्यांना मधेच तोडून 'बंडू कुठे गेला? तो तर दवाखान्यात आहे. उद्या घरी येईल.' असं सांगितल्यावर आमची खात्रीच झाली की वडिलांच्या डोक्यावर नक्की परिणाम झालाय.. असा बराच सनसनाटी गोंधळ झाल्यावर कुणीतरी दवाखान्यात त्याला बघायला जायची आयडिया टाकली आणि खरी परिस्थिती समोर आली.
असा हा बंड्या वाघ एक अद्भुत भूतचुंबक आहे. तुम्ही भूतचुंबक हा शब्द ऐकला आहे का? नसेलच ऐकला! कसा ऐकणार म्हणा कारण मी तो आत्ताच तयार केलाय! मी तो लोहचुंबक किंवा कवडीचुंबक असल्या शब्दावरूनच बनवला आहे. तर, लोहचुंबका भोवती जसे एक अदृश्य चुंबकीय क्षेत्र असते ज्यामुळे आजुबाजूचे लोह त्याच्याकडे खेचले जाते तसेच भूतचुंबका भोवतीही एक अभूतपूर्व चुंबकीय क्षेत्र असते ज्यामुळे आजुबाजूची भुतं आकर्षित होतात. फरक इतकाच आहे की यातली ही भुतं ही भूतदया शब्दातली 'मुकी बिचारी कुणी हाका' टाईप भुतं असतात.
तर अशा कुठल्याही भुताला आकर्षित करण्याचा बंड्यात एक अंगभूत गुण आहे. सगळं छान चाललेलं असताना, आजुबाजूचा एखादा प्राणी मुद्दाम वाट वाकडी करून त्याला आडवा जाणार! मांजरं तर हमखास! तो दिसला की कुंपणावरचे सरडे जमिनीशी ४५ अंशाचा कोन करून, गळ्यातल्या गळ्यात धापा टाकत, रंग न बदलता एखाद्या मानवंदना देणार्या सैनिकाप्रमाणे समोर निश्चल बघत रहातात. कुत्रीही जवळ येऊन वास घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत.. अगदी पिसाळलेली देखील. मी त्याच्या बरोबर असलो आणि एखादं कुत्रं दिसलंच तर माझी अवस्था रस्त्याच्या कडेच्या खांबासारखी होते. पक्ष्यांना तर त्याचं डोकं वरून टॉयलेट सारखं दिसतं की काय कुणास ठाऊक!
एकदा आम्ही दोघं कँटीनला, आमच्या पोटातल्या कावळ्यांची शांत करण्यासाठी, जात असताना एका कावळ्यानं त्याच्या डोक्याच्या दिशेने झडप मारली.. त्याच्याही पोटात कावळेच ओरडत होते की काय माहीत नाही.. नशिबानं समोरून झडप मारली म्हणून बरं.. कावळा त्याला दिसला तरी.. त्यानं त्याला कसंबसं चुकवून मागं वळून पाहिलं.. तर त्याला तो कावळा यू टर्न मारून परत हल्ला करण्याच्या तयारीत दिसला.. मग विमानातून गुंड कसे जमिनीवरील एकट्या हिरोच्या मागे लागतात तशा धर्तीवर काही हल्ले झाले.. बाजुच्या पोरांनी आरडाओरडा केल्यावर कावळा पळून गेला आणि बंड्या काकबळी होता होता वाचला. आपल्या घरट्यातलं पिल्लू आपलं नसून कोकीळेचं आहे असा कावळ्याला साक्षात्कार होतो तेव्हा चिडून जाऊन तो असे हल्ले करतो म्हणे! आपल्या बिनडोकपणाचं खापर आपल्याशी दुरान्वयानेही संबंधित नसलेल्यांवर फोडणे ही फक्त माणसाचीच मक्तेदारी नाहीये हे मी त्यातून काढलेलं एक गाळीव रत्न!
कॉलेजात बंड्या स्कॉलर म्हणून प्रसिद्ध झाला होता. त्या प्रसिद्धीला या काकभरार्यांमुळे जरा नजर लागली. तो येताना दिसला की काव काव करून काव आणण्याचे प्रकार सुरू झाले. तरी बंड्या शांत होता. त्याला माहिती होतं की परीक्षा जवळ आल्या की हेच सगळे कावळे त्याला गूळ लावायला येणार आहेत.. अगदी मुली पण! मुली तर इतक्या घोळात घ्यायचा प्रयत्न करायच्या की सगळ्याच त्याच्या प्रेमात पडल्या आहेत असं लोकांना वाटावं.. त्यानंही स्वतःचा एक दोन वेळा तसा गैरसमज करून घेऊन प्रेमभंगाचे एकतर्फी झटके खाल्ले होते.. नाही असं नाही. पण आता तो मुलींच गोड बोलणं व्यवस्थित गाळून ऐकायला शिकला होता.
वास्तविक, त्याच्या सगळ्या प्रेमभंगांचं मूळ मुली नव्हत्या. एका प्रेमभंगाला एक 'भूत' पण कारणी'भूत' झालं होतं. तेव्हा त्याची शीला बरोबर पिक्चरला जायची पहिली वहिली डेट ठरली होती.. थेटरवरच भेटणार होते ते. थेटरकडे जायच्या वेळेला आईने त्याला पोस्टात एक पत्र टाकायला सांगीतलं. जवळच्या पेटीत पत्र टाकल्यावर त्याला ते पेटीच्या तोंडात अडकून पडलेलं दिसलं म्हणून जरा आत हात घालून ढकलणार.. तो.. आत बसलेल्या विंचवाची ब्रह्मानंदी लागलेली टाळी भंग झाली आणि त्यानं एक प्रेमळ दंश केला. ठो ठो बोंबलत हात बाहेर खेचल्या बरोबर विंचूही बाहेर आला. आपल्याला 'ते' जालीम प्रकरण चावलंय हे पाहून बंड्या वाघ पाठीमागे लागल्यासारखा धावत डॉक्टरकडे गेला. मोबाईलचा जमाना नसल्यामुळे औषधपाणी, मलमपट्टी होईपर्यंत तिकडे शीलाची कोनशीला झाली आणि नंतर बंड्याला शीला नामक इंगळी पण डसली. बंड्यानं खरं कारण सांगायचा प्रयत्न केला पण तिचा विश्वास बसला नाही.. आफ्टरॉल, विंचू चावणं हे डास चावण्याइतकं काही कॉमन नाहीये हो!
पण जस्सीची गोष्ट वेगळी होती. ती त्याच्या प्रेमाच्या दलदलीत रुतत चालली होती. कॉलेज क्वीन जस्सी म्हणजे पोरांच्या भाषेत एक 'सामान' होती. कॉलेजच्या पोरांमधे जस्सी प्रश्न काश्मीर प्रश्नापेक्षा जास्त चिघळलेला होता. पोरांची हृदयं पायदळी तुडवत ती कॉलेजला आली की सगळे जण 'शब्द एक पुरे जस्सीचा, वर्षाव पडो मरणाचा' या आकांताने तिच्याशी काहीबाही बोलायचा प्रयत्न करीत असत. पण जस्सीची नजर बंड्याचा शोध घेत भिरभिरायची. तो दिसला की त्याच्याशी काही तरी कारण काढून बोलल्याशिवाय ती त्याला सोडत नसे. पण बंड्या जस्सी सारखी लस्सी देखील फुंकून फुंकूनच प्यायचा. इतकंच काय, पण ती दिसली तर त्याची तिला चुकवायची धडपड चालायची.
पण परमेश्वराची लीला कशी अगाध असते पहा.. अजून एका प्राण्यानं वाट वाकडी केली आणि बंड्याच्या आणि जस्सीच्या प्रेमाचा मार्ग सरळ झाला. त्याचं असं झालं.. बंड्या सायकल वरून कॉलेजला येत होता. जवळच्या फुटपाथ वरून जस्सी कॉलेज कडेच निघालेली होती. बंड्याचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. तो त्याच्याच तंद्रीत होता. इतक्यात समोरून एक उधळलेली म्हैस सुसाट वेगाने त्याच्याच रोखाने पळत येताना दिसली. तिला चुकवायला म्हणून बंड्यानं सायकल पटकन फुटपाथकडे वळवायचा प्रयत्न केला. पण तितका वेळ मिळाला नाही. म्हशीच्या धडकेनं सायकलच्या दोन्ही चाकाचे द्रोण झाले. बंड्याला खूप लागलं, शिवाय एका पायाचं हाड मोडलं.. त्याला काही सुधरत नव्हतं.. म्हशीच्या भीमटोल्यामुळे आजुबाजूला एकच गलका झाला. लोकांचा त्याच्या भोवती गराडा पडला.. जस्सी मधे घुसून त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत होती.. 'बंडू! बंडू!'.. तिच्याकडे त्याचं लक्ष गेल्यावर तो 'म्हैस! म्हैस!' ओरडला.. लोक घाबरून भराभरा बाजूला झाले.. जस्सीचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं.. तिला खरं तर 'बंडू! बंडू! तुम ठीक तो हो ना?' असं काहीतरी विचारायचं होतं.. पण तिची 'बंडू! बंडू!' याच्या पलीकडे गाडी जात नव्हती.. आणि बंडूची 'म्हैस! म्हैस!' या पलीकडे! त्यांच ते 'बंडू! बंडू!.. म्हैस! म्हैस!' ऐकून ती म्हैस पण जबड्यातल्या जबड्यात खिंकाळली असती. शेवटी त्याला लोकांनी उचलून परस्पर हॉस्पिटलात नेलं.
पण जस्सीचा असा गोड गैरसमज झाला की बंड्यांनं केवळ तिला वाचवायला सायकल मधे घातली.. कारण तिनं त्या दिवशी लाल रंगाचा टॉप घातला होता म्हणून त्या म्हशीला 'घेतलं शिंगावर'चा प्रयोग तिच्यावर करायला ते एक आमंत्रण होतं.. आता तिच्या प्रेमाचा दाब ४४० व्होल्टच्या पलीकडे गेला.. तिला त्याच्या शिवाय काही सुचेना.. कुठल्याही म्हशीच्या चेहर्याऐवजी बंड्याची छबी दिसायची.. म्हशीच्या काळ्याभोर डोळ्यातून बंड्या तिच्याकडे प्रेमाने बघतोय आणि म्हणतोय.. 'जस्सी! जस्सी!'. बंड्याच्या आठवणी अशा सारख्या दाटून यायच्या. तिचं कशातच लक्ष लागेना. ती नित्यनेमाने दवाखान्यात रोज त्याच्या चौकशीला जायची. दवाखान्यातून तो घरी गेल्यावर घरीही जायला लागली. बाकीचे मित्रमैत्रिणी पण यायचे पण जस्सीसारखे रोज नाही.. ते बंड्याच्याही लक्षात आलं आणि तो तिच्या येण्याची आतुरतेने वाट पाहू लागला. आणि मग त्याच्या लक्षात आलं 'जस्सी जैसी कोई नहीं!'
म्हशीनं बंड्याला दिलेल्या अनपेक्षित 'कलाटणी'मुळे ती दोघं प्रेमात पडल्यानंतर त्यांनी एकत्र सिनेमाला जाणं काही अनपेक्षित नव्हतं. ते जुवेल थीफ बघायला गेले.. तनुजा देवानंदला पटवायचा प्रयत्न करत असते तो सीन चालू होता आणि बंड्याच्या हातावर जस्सीनं हात ठेवला.. किंवा बंड्याला तरी तसं वाटलं.. तो सुखावला.. 'रात अकेली है, बुझ गये दिये' तनुजाचं गाणं सुरू झालं आणि बंड्याला कळेना की जस्सीचा हात इतका खरखरीत कसा? अंधारात त्यानं डोळे ताणून ताणून पाहीलं तर त्याला त्याच्या हातावर एक मोठी घूस बसलेली दिसली. त्यानं घाबरून हात झटकला आणि ती जस्सीच्या मांडीवर पडली... 'आके मेरे पास, कानोमें मेरे.... अॅssssssss'.. आशाच्या मादक आवाजामुळे मोरपीस फिरल्यासारखे वाटतंय न वाटतंय तोच जस्सीच्या थिएटरभेदी किंकाळीमुळे रोंगटे खडे हो गये! ती उठून उभी राहिली आणि तिनं अंगावरचं धूड उचलून फेकलं ते पुढच्या रांगेतल्या कुण्या बाईच्या डोक्यावर पडलं. 'अॅssssssss'.. दुसरी थिएटरभेदी किंकाळी आली. किंकाळ्यांच्या बॅकग्राऊंड वर घुशीची रांगेरांगेतून आगेकूच चालू होती. देवानंद तनुजाला काय करावे कळेना. जस्सी भीतिने चांगलीच थरथरत होती मग सिनेमा अर्धवट टाकून ते निघून आले.
बंडू आणि जस्सी प्रेम प्रकरण आता कॉलेजभर झालं होतं.. कॉलेजचं शेवटचं वर्ष संपत आलं होतं.. त्यांनीही शिक्षण संपल्या संपल्या लग्न करायचा निर्णय घेतला होता. साहजिकच जस्सीच्या बापाला भेटणं आवश्यक होतं. तिचा बाप आर्मीतला एक रिटायर्ड कर्नल होता. त्यांच्या घरी बंड्या गेल्यावर जस्सी बापाला बोलवायला गेली. बंड्या त्यांच्या दिवाणखान्यातल्या वेगवेगळ्या बंदुकींचं निरीक्षण करत होता.
मागून अचानक बापाचा आवाज आला.. 'चल मी तुला पिस्तूल कसं चालवायचं ते शिकवतो'.. हातात पिस्तूल, भरदार पांढरी दाढी, कल्लेदार मिश्या करडा आवाज या सगळ्यांच्या एकत्रित परिणामांमुळे बंड्या थरथरायला लागला. बापानं त्याला बागेत नेलं.. पिस्तुलाचा सेफ्टी कॅच काढल्याशिवाय गोळी उडत नाही ते सांगीतलं.. मग तो कसा काढायचा ते दाखवलं.. एका लांबच्या झाडावर नेम धरून त्यानं गोळी झाडली.. ती बरोब्बर त्यानं सांगितलं होतं तिथं घुसली होती.. बंड्याची थरथर अजूनच वाढली.. मग त्यानं सेफ्टी कॅच लावला आणि पिस्तूल बंड्याच्या कानशीलावर रोखलं.. म्हणाला.. 'घाबरू नकोस. गोळी उडणार नाही'.. बंड्या आता लटलटायला लागला होता.. कानशीलापासून फक्त एक फुटावर मरण उभे होते.. सेफ्टी कॅच लावलेला असताना सुद्धा चुकून गोळी उडाली तर?.. बंड्याला घाम फुटला.. हृदय डेक्कन क्वीनसारखं धडधडत होतं.. बापाने सावकाश ट्रिगर ओढला.. टिक.. गोळी उडाली नाही. बंड्याला हुश्श्श झालं! आता घामाच्या धारा वहात होत्या.. ते सगळं अनावर होऊन शेवटी बंड्या कोसळला.. नंतर तापाने फणफणला.. त्यात तो पिस्तूल, सेफ्टी कॅच, गोळी, ढिश्यांव असलं काहीबाही बरळायचा.
तिच्या बापाला एखादा वाघासारखा मर्द माणूस जावई म्हणून हवा होता.. झाल्या घटने वरून बापाने बंड्या वाघ आहे पण मर्द नाही असा निष्कर्ष काढला आणि लग्नाला साफ नकार दिला! या खेपेला बाप नावाचा प्राणी बंड्याला आडवा आला. पण जस्सीनं पळून जाऊन लग्न करायचं ठरवलं.. आमच्या अजून एका मित्राच्या ओळखीचे भटजी लग्न लावून द्यायला तयार झाले.. जवळच्या दुसर्या एका गावातल्या मंदिरात जायचं आणि लग्न करायचं असा प्लॅन ठरला.. ठरल्या प्रमाणे काही मित्रमैत्रिणी, बंड्या, जस्सी, बंड्याचे आई वडील आणि ते भटजी मंदिरात आले.. लग्न सुरू झालं.. बंड्या आणि जस्सी हातात माळा घेऊन उभे होते.. मंगलाष्टकांचा शेवट जवळ आला त्याच वेळेला बंड्याला तिचा बाप येताना दिसला.. त्यानं मानेनेच बाजुच्या मित्रांना खुणावलं.. भटजी आता शेवटचं 'शुभमंगल सावधान!' म्हणणार इतक्यात बंड्याच्या पँटिच्या आतमधे मांडीपाशी काहीतरी खसफसलं.. बंड्यानं हार टाकला आणि एका हातानं मांडी जवळचा भाग घट्ट धरून सूंबाल्या केला तो थेट मंदिरा बाहेर! जस्सीच्या बापामुळे त्याचा धीर खचला असं काहींच मत होतं.. तर 'शुभमंगल सावधान!' ऐकताच पळ काढणारा बंड्या हा रामदासांचा आधुनिक अवतार आहे असं काहींच! तिकडे बंड्या धावत धावत एका झाडामागे गेला.. मागे मित्र होतेच.. बंड्यानं घाईघाईने पँट काढली आणि झटकली.. त्यातून एक पाल बाहेर पडली.. बंड्या पँट चढवून परत आला.. त्याची आणि तिच्या बापाची नजरानजर झाली.. बंड्याच्या चेहर्यावर चिंतेचं जाळं पसरलं.. ते पाहून 'डोंट वरी! मै तुम्हे आशीर्वाद देने आया हूं!' असं बाप म्हणाला आणि सगळ्यांचच टेन्शन गेलं.. नंतर लग्न यथासांग पार पडलं.
अजूनही बंड्याच्या आयुष्यात भुतं लुडबुडत असतात.. लेकिन वो किस्से फिर कभी!
== समाप्त ==
मी माझ्याशीच वेळोवेळी केलेली भंकस म्हणजेच हे चर्हाट! आता फक्त माझ्याशीच का? कारण सोप्प आहे. फारसं कुणी माझी भंकस ऐकून घ्यायला तयार नसतं.
Sunday, September 26, 2010
Wednesday, September 1, 2010
ऐका हो ऐका!
दिल्या: 'अरे मक्या! काय झालं? इतका काय विचार करतोयस?'.. कधी नव्हे ते भरलेल्या साप्ताहिक सभेत विचारमग्न मक्या डोक्याला हात लावून शून्यात बघत बसलेला होता.. हो. बरेच दिवसांनी आमच्या साप्ताहिक सभेचा कोरम फुल्ल होता.. म्हणजे सगळ्या बायका आलेल्या होत्या.. कधी नव्हे ते तिघींना टीव्हीवर कुठलीही मालिका बघायची नव्हती.. कुठेही नवीन सेल लागलेला नसल्यामुळे आणि चालू सेलना भेटी देऊन झालेल्या असल्यामुळे शॉपिंगला जायचं नव्हतं.. 'हसून हसून पोट दुखायला लागेल' अशी जाहिरात केलेलं कुठलंही विनोदी नाटक कम सर्कस बघायची नव्हती... आणि कुठल्याही गोssड हिरोचा पिक्चर लागलेला नव्हता.
मी: 'माया! तू ह्याला तुझ्या जडीबुटीतलं काय उगाळून दिलंस?'.. मी मायाच्या आयुर्वेदिक पदवीवर थोडे शिंतोडे उडवून वातावरणात जान आणायचा प्रयत्न केला.
माया: 'माझी कुठलिही मात्रा त्याच्यावर चालत नाही!'
मक्या: 'अरे बाबा! आम्ही एक नवीन पॅकेज तयार केलंय.. डॉक्टरांसाठी. छोट्या मोठ्या दवाखान्यातनं जे पेशंट येतात ना.. त्यांच्या अपॉइंटमेंटच्या नोंदी.. त्यांची मेडिकल हिस्टरी.. त्यांच्या टेस्टचे निकाल.. त्यांना वेळोवेळी लावलेले पैसे.. त्यांना दिलेली प्रिस्क्रिप्शन्स.. असं सगळं त्यात ठेवता येतं. ते त्या डॉक्टरांना उपयोगी पडेल खूप!'
दिल्या: 'हो पडेल ना! मग त्यात तू विचार करण्यासारखं काय आहे? मायाला दवाखाना घेऊन देतो आहेस काय?'
मक्या: 'अरे बॉस मलाच त्याचं मार्केटिंग बघायला सांगतोय'
मी: "त्यात काय विशेष आहे? एक हातगाडी घे, त्यावर तुझ्या पॅकेजच्या सीड्या टाक आणि भंगारवाल्यासारखं गल्लीबोळातून ओरडत फिर 'एss! पॅकेजवालेssय!'".. माझ्या ओरडण्यामुळं बाजुच्या लोकांना खरच भंगारवाला आल्याचा संशय आला.
दिल्या: 'तू मार्केटिंग बघायचं हे कुणाचं मेंदुबालक?'.. मेंदुबालक म्हणजे ब्रेनचाईल्ड हे कळायला मला जरासा वेळच लागला.. आम्ही पूर्वी केलेल्या मराठवळण्याच्या रेट्याचे दणके असे अधून मधून आम्हालाच बसतात.
मक्या: 'आरे! आमचा मार्केटिंग मॅनेजर सोडून गेला.. आता नवीन शोधतोय.. पण जाता जाता त्यानं बॉसच्या डोक्यात 'तोपर्यंत मी मार्केटिंग करू शकेन' असं घुसवलं. त्याच्या मते ते माझ्या रक्तात आहे.'
माया: 'काही रक्तात वगैरे नाहीय्ये हां! तो मार्केट मधून भाजी आणण्याला मार्केटिंग म्हणायचा'.. मायाला सात्विक का कसला तरी संताप आलेला दिसला.. बहुतेक कौटुंबिक असावा.
सरिता: 'ए! पण ते भंगारवाल्यासारखं ओरडत फिरणं हे त्याच्या प्रतिष्ठेला शोभणारं नाही हां!'
माया: 'प्रतिष्ठा?'.. मायाच्या सूचक नजरेत त्यांच्यातल्या ताज्या भांडणाचे पडसाद असावेत असं मला वाटून गेलं.
दिल्या: 'रिक्षातून ओरडत फिरणं जास्त प्रतिष्ठेचं वाटेल का? हे चित्र कसं वाटतंय?.. रिक्षाच्या दोन्ही बाजुला पोस्टरं लावलेली आहेत.. आणि एक लाउडस्पीकर.. मक्या ड्रायव्हर शेजारी अंग चोरून बसलेला आहे.. रिक्षाच्या मागनं दोन चार उघडी नागडी पोरं नाचत चाल्लीयत.. आणि मक्या ओरडतोय
ऐका हो ऐका!
समस्त डाक्टरान्नो ऐका!
तुमच्यासाठी आणलंय हे
खास पॅकेज बर्का!'.
दिल्याच्या सचित्र वर्णनामुळे मक्या सैल झाला, त्याचा डोक्यावरचा हात निघाला, मिशीतल्या मिशीत हसत तो म्हणाला -
मक्या: 'आयला! काय धमाल येईल ना? सुरुवात माझ्या बॉसच्या घरापासनंच करतो.'
मी: 'म्हणजे तुझ्या रक्तातलं मार्केटिंग बघून रक्तदाब वाढायचा त्याचा!'
माया: 'नको. नको. त्याच गल्लीत माझं माहेर आहे. मक्याच्या डोक्यावर परिणाम झाला म्हणून आईचा रक्तदाब वाढेल नक्की.'
सरिता: 'म्हणजे? अजून कल्पना नाही त्यांना?'
दिल्या: 'कल्पना...... मला आहे.'.. आम्हाला गरीब विनोद कळत नाहीत असं दिल्याला वाटलं की काय कुणास ठाऊक! पण त्यानं आपल्या बायकोकडे, कल्पनाकडे, बोट दाखवलं.
मक्या: 'पण मला या टीव्हीवरच्या जाहिराती लोकांवर नक्की कशा परिणाम करतात त्याची खरच माहिती काढायचीय. एखादी जाहिरात द्यावी असा विचार चाल्लाय माझा.'
कल्पना: 'ते मी सांगू शकेन. मी अभ्यास केलाय त्याचा.'.. कल्पनेला एकदाच तोंड फुटलं.
मक्या: 'मग सांग ना!'
कल्पना: 'जाहिरातींची बरीच तंत्र आहेत. काही जाहिरातीत अतिशयोक्तीचं तंत्र वापरतात. तुम्हाला काय सांगायचंय त्याचीच अतिशयोक्ती करायची'.
सरिता: 'म्हणजे?'
कल्पना: 'म्हणजे असं बघ.. एखादी वॉशिंग पावडरची जाहिरात घे.. चिखलाचे डाग पडलेले पोरांचे कपडे हातात घेऊन एक सुबक गृहिणी हे डाग कसे जाणार अशी चिंता करीत उभी असते..'
दिल्या: 'ती सुबक गृहिणी असते. जाहिरातीतल्या गृहिणी सुबकच असाव्या लागतात'.
सरिता: 'ही अतिशयोक्ती आहे?'
कल्पना: 'तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस!'
मी: 'आयुष्यात तिला तेवढी एकच चिंता असते.. ती मिटली की तिचं जीवन सुखासमाधानाने कसं फुलून जाणार असतं.. मुलं आनंदातिरेकाने तिला 'मम्मीsss!' म्हणून मिठी मारणार असतात.. बॉसने केलेली धुलाई विसरून नवरा तिच्या धुलाईची(!) प्रशंसा करणार असतो.. सासूच्या पांढर्या साडीला ट्यूबच्या प्रकाशाची झळाळी मिळणार असते.. इ.इ.'
दिल्या: 'पण डाग घालवणार कोण? धोब्याला तर कपडे देता येत नाहीत, कारण तो असं गाणं म्हणण्याची शक्यता जास्त...
दाग जो तूने दिया, हमसे मिटाया न गया
हमसे धोया न गया, तुमसे धुलाया न गया'.. दिल्यानं ते 'हमसे आया न गया' च्या चालीवर म्हंटल्यावर आम्ही ओशाळून आजुबाजुला पाहिलं. नेमके सगळे आमच्याचकडे दयार्द्र नजरेने बघत होते.
मी: 'नशीब त्या तलतच! तो हयात असताना ही गाणी म्हंटली असतीस तर उगीच त्या बिचार्याच्या पोटावर पाय आला असता.'
सरिता: 'ए! गपा रे! हं! तू सांग गं कल्पना!'
कल्पना: 'अशा सुबक संभ्रमात ती सुबक गृहिणी पडलेली असतानाच अजून एक सुबक उपटसुंभीण कुठलीशी वॉशिंग पावडर घेऊन उपटते आणि बजावते.. बाई गं! तुझ्या सर्व समस्यांच मूळ तू वापरतेस त्या यःकश्चित पावडरमधे आहे. ही पावडर वापर की लगेच डाग साफ'.
दिल्या: 'पावडरवालीच्या साडीतून फुले पडत असतात.. ते पाहून आपण 'फुले का पडती शेजारी?' या विचारात पडतो.. जरा जास्त पैसे मोजले असते तर फुलं न पडणारी चांगली साडी मिळाली असती असही वाटून जातं.. अर्थात् असे प्रश्न फक्त पुरुषांनाच पडतात.. स्त्रियांकडे त्याचं, त्यांच्यामते, अगदी तर्कशुद्ध स्प्ष्टीकरण असतं.'
कल्पना: 'फिरत्या विक्रेत्यांना हाडहुड करून दारातून घालवून देणार्या त्या बाईला ती पावडरवाली आपल्या घरात अशी कशी घुसली हा प्रश्न अजिबात पडत नाही.. तरी पण पडत्या फुलाची आज्ञा घेऊन ती त्या पावडरचा वापर अखेर करतेच. मग कपड्यांच्या बोळ्यातून, फसफसणार्या सोड्यासारखा, भसभस माती सुटताना दाखवण्याचा सीन हमखास येतोच. वास्तविक, बचकभर चिखलात माखलेले कपडे साध्या पाण्यात घातले तरी माती बाहेर पडतेच याकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष केलं जातं. प्रेक्षक पहिल्या सुबकिणीच्या चेहर्यावरच्या परमोच्च आनंदात विरघळून जातात.'
मी: 'या नंतरचा एक महत्वाचा सीन मुद्दामच कापलेला असतो.. मी म्हणून तुम्हाला सांगतो.. त्या धुण्यात सासरेबुवांचा निळा शर्ट पूर्णपणे पांढरा होतो.. ते पाहिल्याबरोबर त्यांचे डोळेही पांढरे होतात! त्यावर सासुबाई 'निळा काय? पहिल्या पासून पांढराच होता तो' असं ठणकावतात.. त्यामुळे त्यांची कवळीखीळही बसते.'.. ऐनवेळेला दातखीळीला खीळ घालून त्याची कवळीखीळ केल्याचा मलाच आनंद झाला.
माया: 'जाहिरातवाल्यांच एक बरं असतं.. त्यांना त्यांच्या कर्माची फळं भोगायला लागत नाहीत. जाहिरात करणं हे त्यांच कर्म पण फळं गिर्हाईकं भोगतात.. त्यांच्या सांगण्याच्या आविर्भावावरून असं वाटतं की ती पावडर वापरून कुठलेही डाग जातील मग ते कपड्यावरचे असोत किंवा चारित्र्यावरचे असोत नाही तर सामानाचे!... नंतर खिसा साफ होण्याचं फळ आणि कळ गिर्हाईकं भोगतात.'
कल्पना: 'तर याच्यात त्या पावडरने कुठलाही डाग जातो याची अतिशयोक्ती केली आहे हे तुमच्या सारख्या सुजाण लोकांच्या लक्षात आलेच असेल.'
सरिता: 'हे तू सांगेपर्यंत नव्हतं आलं हं लक्षात!'.. तिच्या खरंच लक्षात आलं नव्हतं की ती गंमत करत होती ते काही कळालं नाही मला.. बायकांच्या बोलण्यावरून नक्की त्यांच्या मनात काय आहे ते फक्त इतर बायकांच जाणे!
मी: 'मला टूथपेस्टच्या जाहिरातीची एक आयडीया आलीये. युवराजसिंग बॅटिंग करतोय.. शोएब बोलिंगला उभा आहे. पहिला बॉल टाकतो तो उसळून धाडकन युवराजच्या थोबाडावर बसतो.. तो हेल्मेटमुळे वाचतो.. पण चिडून युवराज हेल्मेट काढतो आणि परत पाठवून देतो. पुढचा बॉल पण जोरात उसळतो आणि त्याच्या दातावर आपटून फाइनलेगला चौकार बसतो. अंपायर दाताला हात लावून चौकाराची खूण करतो.. बस्स! यानंतर काही बोलायचं नाही.. नुसता कॅमेरा त्या टूथपेस्ट वर मारायचा.'
सरिता: 'म्हणजे काय? माझ्या काही नाही आलं हं लक्षात!'.. दिल्यानं कपाळावर हात मारला. नेहमी तिची बाजू घेणारा तो, पण आज त्याचाही कपाळमोक्ष झाला. मी डोकं आपटायला योग्य भिंतीचा शोध घेऊ लागलो.. त्या हॉटेलात भिंतींना सगळीकडे अणुकुचीदार बांबूचं डिझाईन होतं त्यामुळे घाई घाईने शोध थांबवला. सगळ्याच बायकांचे प्रश्नार्थक चेहेरे बघून शेवटी मक्यानं 'टूथ बाईज' असं सांगीतलं.. तरीही काही सुधरेना म्हंटल्यावर 'लेग बाईज' पासून सुरुवात करून ते गूढ उकलून दिलं.. मग सर्व महिलांनी फार महत्वाची गोष्ट समजल्यासारखा चेहरा केला.
माझ्या आयडीयाची अशी तुफानी वादळात सापडलेल्या डासासारखी झालेली वाताहात बघून मी ती टूथपेस्ट कंपनीला विकायचे बेत रद्द केले. बरोबरच आहे.. कारण, ती जाहिरात कमितकमी ५०% जनतेच्या डोक्यावरून शोएबच्या बंपरसारखी जाणार असेल तर काय उपयोग? आणि दुर्दैवाने नेमकी तीच जनता घरात कुठली वस्तू विकत आणायची याचा निर्णय घेते हो!
कल्पना: 'एखाद्या लोकप्रसिद्ध माणसाला त्या वस्तूबद्दलची स्लोगन बोलायला लावणे, लोकांना एखाद्या गोष्टीची भीति घालून मग विक्रीची वस्तू कशी त्यांना वाचवेल हे ठसवणे अशी पण तंत्रं आहेत.'
दिल्या: 'ए! तंत्रं खूप झाली आता! मक्या आपण तुझी जाहिरातच तयार करू ना त्यापेक्षा!'
माया: 'हां चालेल! पण स्लोगन काय करू या?'
कल्पना: 'पॅकेजचं नाव काय आहे रे?'
मक्या: 'अजून ठरलेलं नाही!'
दिल्या: 'असे कसे रे तुम्ही नाव न ठेवता पॅकेज विकायला काढता? बारसं व्हायच्या आधीच लग्न झाल्यासारखं वाटतं.'
सरिता: 'चला आपण नाव पण ठरवू या.'
माया: 'क्लिनीसॉफ्ट कसंय?'
मक्या: 'श्या! ते नॅपीचं नाव वाटतं अगदी! त्यापेक्षा मेड-एड बरं आहे. सध्या तेच घेऊन चालू.'
कल्पना: 'हे कसं वाटतंय? दवाखान्यातल्या एका रिसेप्शनिस्ट भोवती १७६० पेशंट गोळा झालेत. एक अपॉइन्टमेन्ट मागतोय, एक बिल मागतोय, एक टेस्ट रिझल्ट मागतोय... असा सगळा सावळा गोंधळ आहे. तिकडे ती रिसेप्शनिस्ट प्रचंड बावरली आहे. ती एकाची रिसीट दुसर्याला, दुसर्याचा रिझल्ट तिसर्याला असं करून अजून भर घालतेय.. पेशंटांच्या चेहर्यांवर वैताग स्पष्ट दिसतो आहे.. त्यामुळे तिच्या डोक्यातून धूरच यायचा बाकी आहे फक्त! शेवटी, पुढचा पेशंट बराच वेळ आत नाही आला म्हणून डॉक्टर बाहेर येतात आणि समोरचं दृश्य पाहून हतबुद्ध होतात.'
दिल्या: 'रिसेप्शनिस्ट सुबक पाहीजे. बाहेर येणारा डॉक्टर नको. ती डॉक्टरीण पाहीजे.. आणि सुबक पण.'
कल्पना: 'अरे हो रे! तू आधी तुझी सुबक सुबक ही बकबक थांबव बरं जरा! हां! तर तो डॉक्टर बधीर होऊन स्वतःच अपॉइन्टमेन्टची वही घेऊन पुढचा पेशंट कोण आहे ते बघायला लागतो.. पण ते त्याला नीट समजत नाही.. कारण काही नाव खोडलेली असतात, तर काही नावांच्या पुढे वर खाली जाणारे बाण असतात.. शिवाय तिचं अक्षर त्याला समजत नाही.'
माया: 'हा हा! खुद्द डॉक्टरला दुसर्याचं अक्षर समजत नाही हे मस्त वाटेल बघायला.'
सरिता: 'तेव्हढ्यात त्याचा दुसरा डॉक्टर मित्र येतो. आणि त्याला मेडएड वापरायला सांगतो. लगेच पुढच्या सीनमधे एकदम आमूलाग्र बदल दाखवायचा. तीच खोली पेशंटांनी गच्च भरलेली आहे.. पण सारं कसं शिस्तीत चाललं आहे.. कुठेही गडबड गोंधळ नाही.. एक भयाण शांतता आहे.. स्मशानात असावी इतकी.. '
मी: 'मघाची ती धूर उडवणारी रिसेप्शनिस्ट आता स्मितहास्य फेकताना दाखवायची. तिला आता भरपूर वेळ आहे.. तिला एका छोट्या आरशात बघून मेकप करताना दाखवलं की झालं.'
सरिता: 'मग डॉक्टरच्या खोलीत कॅमेरा.. तो कंप्यूटरवर काही तरी टायपतोय. ते अर्थातच मेडएड पॅकेज असतं. मग डॉक्टर अत्यंत आनंदी चेहर्यानं म्हणतो 'मेडएडने होत आहे रे आधी मेडएडची पाहीजे'. ही स्लोगन कशी आहे?'
मक्या: 'किंवा.. तो डॉक्टर आणि त्याची बायको मस्त बीचवर फिरताहेत.. त्याची बायको म्हणते मेडएड ब्रिंग्ज पीपल टुगेदर'.
दिल्या: 'आता पेशंटांच्या चेहर्यांवर पराकोटीचं समाधान नांदतय.. जसे काही ते सदेह वैकुंठाला चालले आहेत... त्यातला एक म्हणतो.. उरलो उपचारापुरता'.
माया: 'ही मस्त आहे रे दिल्या!'
मक्या: 'ठीक आहे! मला चांगल्या आयडिया मिळाल्या आहेत सध्या पुरत्या! पुढचा महीनाभर ते पॅकेज खूप डॉक्टरांना दाखवायचं आहे. मग त्यांच मत कळेल. त्यानंतर जाहिरातीचं फायनल करणार आहोत. तर आता एकदम महीन्या नंतर भेटू'.
नेहमी प्रमाणे बराच उशीर झाला होता. सगळे ताबडतोब जे पांगले ते एकदम महीन्यानंतर मक्या आल्यावर भेटले. मक्याचा चेहरा आजही विचारमग्न दिसत होता. आजही कोरम फुल्ल होता.. आजही कुठली मालिका, सेल, नाटक सिनेमा असलं काही आड आलं नव्हतं. दिल्यानं तोंड फोडलं..
दिल्या: 'आज काय झालं रे? नवीन मार्केटिंग मॅनेजर घेतला का?'
मक्या: 'नाही रे! ते पॅकेज इतक्या डॉक्टरांना दाखवलं पण कुणालाच आवडलं नाही'
सगळे: 'व्हॉsssट?'
मक्या: 'अरे त्यात सगळं अकाउटिंग पण आहे ना, ते नकोय कुणालाच.'
दिल्या: 'आयला! खरंच की रे! त्यांचा सगळा कॅशचा व्यवहार असतो नाही का! हम्म्म! ते सोडून बाकीचं वापरा म्हणावं'.
मक्या: 'अकाउटिंग काढलं तर फार मोठा फायदा होणार नाही ते वापरून. आता माझ्यावरच 'उरलो उपचारापुरता' म्हणायची वेळ आलीय.'
मी: 'आता नक्कीच तुला त्या सीड्या हातगाडीवर टाकून 'एss! पॅकेजवालेssय!' ओरडत फिरायला पाहीजे.'

Monday, August 23, 2010
रिचर्ड फाइनमन
"मी घरी जातोय!" आपल्या ऑफिसमधून बाहेर डोकावून फाइनमनने आपल्या सेक्रेटरीला, हेलन टक ला, सांगीतलं. पण घरी जाण्यासाठी ऑफिसातून बाहेर पडायच्या ऐवजी शर्ट काढत काढत स्वारी परत ऑफिसात गेली. हेलन चक्रावली. थोड्या वेळाने दबकत दबकत तिनं त्याच्या ऑफिसात डोकावलं तर स्वारी शांतपणे कोचावर पहुडली होती. गेले काही दिवस त्याचं हे असं वेड्यासारखं चाललं होतं.. कधी तो लेक्चरला जायचं विसरायचा, तर कधी त्याला आपली पार्किंगमधे ठेवलेली गाडी सापडायची नाही!
हे सगळं तो एकदा घरा शेजारच्या फुटपाथला अडखळून डोक्यावर पडल्यामुळे आणि त्याने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे झालं होतं. डोक्याच्या आत थोडा रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याला आजुबाजुची किंवा स्थलकालाची जाणीव राहिली नव्हती आणि आपण काय करतोय हेही त्याला उमगत नव्हतं. शेवटी त्याला डॉक्टरकडे नेल्यावर हे सगळं बाहेर आलं आणि त्याच्यासकट इतरांनाही समजलं.
"मला का नाही कुणी सांगीतलं?".. फाइनमनने त्याच्या एका जवळच्या मित्राकडे त्याबद्दल विचारणा केली. मित्र म्हणाला - "ओ कमॉन! तुला कोण सांगणार? तू बर्याच वेळेला असं वेड्यासारखं करतोस! तसं बघायला गेलं तर अफाट बुध्दिमत्ता आणि वेड यातला फरक जरा सूक्ष्मच असतो."
"हे बघ! पुढच्या वेळेला मी असलं काही करायला लागलो तर ताबडतोब मला सांगायचं".. फाइनमनने त्याला खडसावून प्रकरण तिथे संपवलं.
बाकी अत्यंत बुद्धिमान शास्त्रज्ञांबद्दल आपला असा समज असतो की ते आपल्याच तंद्रीत असतात.. त्यांना आजुबाजूला काय चाललंय याची जाणीव नसते.. ते स्वतःशीच बोलतात.. अत्यंत विसराळू असतात.. काहीही कपडे घालतात.. इ. इ. मात्र, वरचा किस्सा वगळता, फाइनमन यातल्या बर्याच गोष्टींना अपवाद होता.
फाइनमनला १९६५ सालचा पदार्थविज्ञान शास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार मिळालेला होता. त्यावेळचा पुरस्कार टोमोनागा, श्विंगर आणि फाइनमन या ३ शास्त्रज्ञांमधे विभागला होता. तिघांनीही वेगवेगळ्या पद्धतीने इलेक्ट्रॉन, प्रोटॉन असे विद्युत भारित कण आणि फोटॉन हे एकमेकांच्या संपर्कात आल्यावर काय काय होऊ शकेल ही एकच मूलभूत समस्या (क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स) सोडविण्याचं शास्त्र निर्माण केलं होतं. अशा समस्या अनेक ठिकाणी निर्माण होतात. उदा. एखाद्या वायूवर एक्स-रेज पडले तर काय काय होईल? अशी एखादी विशिष्ट समस्या तिघांच्या पद्धतीने हाताळली तरीही एकच उत्तर येतं म्हणून तर तो पुरस्कार तिघांना विभागून मिळाला. यात अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीची अनेक इंटिग्रल्स येतात. पण फाइनमनचे वैशिष्ट्य असं की त्याने, प्रत्येक इंटिग्रल प्रत्यक्षात कणांची काय घडामोड दाखवतेय हे आकृतीने कसे दर्शविता येईल हे सुचवले. किचकट इंटिग्रल्सपेक्षा त्या आकृत्या काढणं, त्यावर चर्चा करणं आणि नंतर त्यावरून गरज पडेल तेव्हा प्रत्यक्ष इंटिग्रल लिहीणं हे फार सोप्प झालं.. त्यामुळेच त्या आकृत्यांना सगळ्यांनी डोक्यावर घेतलं. त्या आकृत्या फाइनमन डायग्रॅम्स म्हणून प्रसिद्ध आहेत.. इतक्या की नंतर जेव्हा फाइनमनच्या सन्मानार्थ पोस्टाचं तिकीट काढलं तेव्हा पोस्टाला सुद्धा ते त्या आकृत्यां शिवाय अपूर्ण वाटलं.
ज्यांना फाइनमन ऐकूनही माहीत नाही ते म्हणतील फाइनमनमधे विशेष असं काय आहे? इतर अनेक नोबेल विजेत्यांसारखा हा अजून एक! हे खरं असलं तरी त्याचं कर्तृत्व इथेच संपत नाही. तो प्रथम एक प्रामाणिक, निर्भीड, हसतमुख, आनंदी, कलंदर, मिष्कील, विद्यार्थ्यांवर प्रेम करणारा, दुसर्यांना मदत करणारा, चतुरस्त्र, गप्पिष्ट आणि चौकस असा एक दुर्मिळ माणूस होता.. आणि या सगळ्या नंतर एक नोबेल विजेता होता. त्याच कारणामुळे त्याच्यावर लोकांनी प्रचंड प्रेम केलं, अजूनही करतात.. त्याला वाहिलेली साईट पाहिली तर ते लगेच पटेल (साईटचा दुवा लेखाच्या शेवटी दिला आहे(४)).
त्याच्या अनौपचारिक गप्पांच्या ध्वनीफितीवरून 'शुअर्ली यू आर जोकिंग, मि. फाइनमन' आणि 'व्हॉट डू यू केअर व्हॉट अदर पीपल थिंक?' ही पुस्तकं लिहीली गेली. त्यातलं 'शुअर्ली..' हे पुस्तक खूप गाजलं आणि आत्तापर्यंत त्याच्या ५ लाखांवर प्रती खपल्या आहेत. त्या पुस्तकाच्या पीडीएफचा दुवा लेखाच्या शेवटी दिला आहे(३). दुर्देवाने या पीडीएफ मधे काही टायपो आहेत.. बर्याच ठिकाणी 'b' ऐवजी 'h' पडलं आहे त्याचा वाचताना फार त्रास होतो. पण एक साधासुधा मध्यमवर्गीय माणूस आपल्याशी हास्यविनोद करत गप्पा मारतोय असं वाटावं इतकी सहज आणि अनौपचारिक शैली या पुस्तकाची आहे. काही प्रकरणांमधे थोडी फार पदार्थविज्ञानासंबंधी चर्चा येते, ती काही जणांना समजणार नाही कदाचित! पण तो भाग सोडून पुढे वाचत राहीलं तरी मजा कमी होत नाही.
फाइनमनचा जन्म १९१८ मधे झाला. १९३५ ते १९३९ एम आय टी मधे शिकल्यावर तो प्रिन्स्टन मधे १९४३ पर्यंत पुढील शिक्षणासाठी प्रो. व्हीलर बरोबर काम करत होता. एक दिवस व्हीलरने फाइनमनला त्या कामाबद्दल सेमिनार घ्यायला सांगीतलं. ते त्याचं पहिलं वहिलं सेमिनार! जाहीर झाल्यावर खुद्द आइन्स्टाईनने ते ऐकायला येणार असल्याचं कळवलं. ते ऐकल्यावर मात्र त्याचं जे धाबं दणाणायला सुरूवात झाली ते सेमिनार संपेपर्यंत कसं दणाणत राहीलं त्याचं एक मस्त वर्णन 'शुअर्ली..' मधे आहे. त्यानंतर १९४६ पर्यंत तो अॅटमबाँब बनविण्याच्या कामात गुंतला. बाँब बनविल्यानंतर तो कॉर्नेल मधे प्रोफेसर म्हणून रुजू झाला. मग १९५१ पासून तो कॅल्टेकमधे त्याच्या मृत्युपर्यंत, १९८८ पर्यंत, राहीला! २८ जानेवारी १९८६ ला चॅलेंजर हे अवकाश यान उड्डाणाच्या वेळेस जळून भस्मसात झाले.. आतल्या सर्व अंतराळवीरांसकट! प्रेसिडेंटने नेमलेल्या या अपघाताच्या चौकशी समितीत फाइनमन होता. सत्यपरिस्थिती समजण्यासाठी तो सरळ ज्यांचा यान बांधण्यात प्रत्यक्ष हात होता त्यांच्याकडे गेला.. तसे न करण्याबद्दल दिलेले नासाचे सर्व संकेत धुडकावून! शेवटी तो नासाने यानाच्या सुरक्षिततेमधे केलेली तडजोड कशी अपघातास कारणीभूत झाली ते सिद्ध करण्यात यशस्वी झाला.
त्यानं अनेक पुस्तकं लिहीली आणि त्याच्यावरही अनेक पुस्तकं लिहीली गेली. कितीही किचकट विषय अगदी सोप्पा करून शिकविण्यात त्याचा हातखंडा होता. १९६० च्या सुमारास, कॅल्टेक मधे, पदार्थविज्ञानाचा अभ्यासक्रम बदलायला हवा असा एक विचार प्रवाह सुरू झाला.. पदवी परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम मागासलेला आहे.. त्यात नवीन संशोधनाबद्दल काहीच माहिती नाही.. असं सर्वसामान्य मत होतं. नवीन अभ्यासक्रम तयार करणे आणि त्याप्रमाणे शिकविणे ही जबाबदारी फाइनमन वर सोपविण्यात आली. त्याच्या मदतीला दिलेल्या कॅल्टेकच्या शिक्षकांनी त्याची सर्व लेक्चर्स रेकॉर्ड करून नंतर 'फाइनमन लेक्चर्स ऑन फिजिक्स' या नावाचे ३ ग्रंथ छापले. ते प्रचंड गाजले. अजूनही ते छापले जातात. आत्तापर्यंत त्या ग्रंथांच्या फक्त इंग्रजीतल्या १० लाखांवर प्रती खपल्या आहेत. त्यांची इतर भाषातही भाषांतरे झाली आहेत.
प्रथम अभ्यासक्रमात मूलभूत सुधारणा हवी आहे असं वाटणं आणि नंतर फाइनमन सारख्या एका ख्यातनाम शास्त्रज्ञाकडून नुसता अभ्यासक्रमच नाही तर लेक्चर्ससुद्धा घेण्याची कल्पना येणं हे फक्त शिक्षणाबद्दल प्रचंड तळमळ असणार्यांनाच सुचू शकतं. हे सगळं वाचल्यावर, निदान मला तरी, त्या विद्यार्थ्यांचा हेवा वाटतो आणि मग प्रश्न पडतो की.. भारतातली विद्यापीठं कधी जागी होणार?
त्याला शिकविण्यात विलक्षण रस होता. ब्राझिलमधेही त्यानं एक वर्ष शिकवलं. तिथे शिकविताना त्याला जाणवलं की त्या पोरांकडे फक्त पुस्तकी ज्ञान आहे.. ते त्यांना व्यवहारातले प्रश्न सोडवायला वापरता येत नाहीये.. अगदी भारतातल्या शिक्षणासारखंच! पोरं वर्गात प्रश्न विचारत नसत.. इतर पोरं नाव ठेवतील म्हणून. या सगळ्या अडचणीतून मार्ग काढत फाइनमनने अभ्यासक्रम पूर्ण केला. वर्षाच्या शेवटी पोरांनी फाइनमनला त्याला तिथे आलेल्या अनुभवाबद्दल भाषण देण्याची विनंती केली. त्या भाषणाला ब्राझिलच्या सरकारातले शिक्षण तज्ज्ञ आणि कॉलेज मधले शिक्षक पण हजर होते.. अगदी टेक्स्टबुकं लिहीणारे देखील. त्या भाषणात त्यानं ब्राझिलमधल्या अभ्यासक्रमात शास्त्र विषयाचा कसा अभाव आहे हे सोदाहरण स्पष्ट केलं.
त्याच्यापेक्षा सुमारे ९ वर्षांनी लहान असलेली त्याची बहीण जोअॅन ही पुढे नासाच्या जेट प्रपल्शन लॅबमधे शास्त्रज्ञ झाली. तिच्या आठवणीतली एक गोष्ट फार मजेशीर आहे.. 'रिचर्ड माझा पहिला शिक्षक होता आणि मी त्याची पहिली विद्यार्थिनी! आमच्या घरी एक कुत्रा होता. त्याला आम्ही काही गमती जमती करायला शिकवीत असू. त्याचं शिकणं बघून रिचर्डला वाटलं की मीही काही तरी शिकवायच्या लायकीची आहे. तेव्हा मी तीन एक वर्षांची असेन. तो मला अगदी सोप्प्या बेरजा वजाबाक्या करायला शिकवायचा.. आणि बरोबर उत्तर आलं की बक्षीस म्हणून मला त्याचे केस ओढू द्यायचा.'
लॉस अॅलामॉस मधे ज्या ठिकाणी बाँब बनविण्याचं काम चालू होतं त्याच्या आजुबाजूला काहीच नव्हतं.. ते मनुष्य वस्तीपासून शक्य तितकं लांब होतं.. ते लोकांपासून गुप्त तर ठेवलं होतंच शिवाय तिथली सुरक्षा व्यवस्थाही अत्यंत कडक होती. तिथे करमणुकीची साधनं फारशी नव्हती. त्या काळात फाइनमनच्या हातात एक बोंगो पडला आणि मग तो बडविण्यात त्याला अपार आनंद मिळायला लागला. हळूहळू त्याला त्याची चटक लागली आणि पुढे लॉस अॅलामॉस सुटल्यावर देखील त्याचा तो छंद चालू राहीला. ब्राझिल मधे त्यानं त्यांच वाद्य(टँबोरिन) शिकण्यासाठी अपार मेहनतही केली. त्या नंतर, आपल्याकडे कशा गणपती विसर्जनाच्या मिरवणुकी असतात तशा प्रकारच्या, ब्राझिल मधल्या जत्रेमधे त्यानं ते वाजवलं.
वेगवेगळ्या प्रकारची कुलुपं उघडण्याची कलाही त्यानं लॉस अॅलामॉस मधे असतानाच आत्मसात केली. त्याचा उपयोग मुख्यत्वेकरून लोकांची मदत करण्यासाठी तो करायचा. पण एखाद्या कडक इस्त्रीतल्या जनरलला, तिथल्या सुरक्षेला काही अर्थ कसा नाहीये ते पटविण्यासाठी, त्याच्यासमोर त्याचीच तिजोरी उघडून त्याची झोप उडविण्यासाठीही करायचा.
त्याची चौकस बुद्धी त्याला कधी स्वस्थ बसू द्यायची नाही. प्रिन्स्टनला असताना त्याला मुंग्याबद्दल कुतुहल निर्माण झालं.. त्यांचं अन्न त्या कशा शोधतात? त्यांना अन्नासाठी कुठे जायला पाहीजे हे कसं समजतं? इ. इ. त्यासाठी मग त्याचे त्याच्या खोलीत येणार्या मुंग्यांवर प्रयोग सुरू झाले. त्यातून त्याने काही निष्कर्ष काढले.. मुंग्या चालताना रस्त्यात एक प्रकारचा द्रव सोडतात ज्याचा वास मुंग्यांना येतो आणि त्यामुळे इतर मुंग्यांना तोच रस्ता चोखाळता येतो. हा द्रव वाळायला सुमारे अर्धा तास लागतो.. त्यानंतर मुंग्यांना तो रस्ता परत पकडता येत नाही. खाद्याकडून आपण वारुळाकडे चाललो आहोत की वारुळाकडून खाद्याकडे हे मुंग्यांना कळतं का? याच्या उत्तरासाठी फाइनमननं एक मस्त प्रयोग केला. तो चालणार्या मुंगीला कागदात उचलून गोल गोल फिरवून, ती ज्या दिशेला चालली असेल, त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला किंवा कधी त्याच दिशेला ठेवायचा.. मग ती मुंगी कुठे जातेय ते बघायचा.. ती मुंगी सरळ तिचं तोंड ज्या बाजूला असेल तिकडे चालती व्हायची. पुढे ब्राझिलमधे दिसलेल्या मुंग्यावर त्यानं हाच प्रयोग केला तर त्याच्या लक्षात आलं की त्या मुंग्यांना दोन चार पावलं टाकताच कळतंय की आपण विरुद्ध दिशेला चाललो आहोत.
तो एक द्रष्टाही होता.. १९५९ साली "देअर इज प्लेन्टी ऑफ रूम अॅट द बॉटम" या भाषणात त्यानं भविष्यात एकेक अणू आपल्याला पाहीजे तिथे ठेऊन काय काय होतं ते पहाणं शक्य होईल असं विधान केलं. पुढे १९८० च्या दशकात ते शक्य झालं आणि त्या तंत्रज्ञानाला नॅनोटेक्नॉलॉजी हे नाव मिळालं.
इतकी अफाट बुद्धिमत्ता आणि भरपूर सारासार विवेक बुद्धी असलेल्या माणसाला देखील एकदा नैराश्याने ग्रासले होते. हे ऐकल्यावर तो एक दैवी चमत्कार नसून आपल्यासारखाच एक साधासुधा माणूस आहे हे जाणवतं.. मग तो जवळचा वाटायला लागतो.. सामान्य माणसांसारखाच ताणतणावामुळे कोलमडू शकणारा, असा! बाँबचं काम संपल्यावर तो कॉर्नेल मधे प्रोफेसर म्हणून लागला. पण त्याची अशी एक भावना झाली होती की तो बौद्धिक दृष्ट्या संपला आहे.. त्याच्यात काही करायची कुवत राहिलेली नाही.. हे विद्यापीठ आपल्यावर इतके पैसे खर्च करतंय खरं पण त्यांना माहित नाहीये की आपल्याला काही जमणं शक्य नाहीये.. इ. इ. तो चक्क पदार्थविज्ञान सोडून अरेबियन नाईट्स सारखी पुस्तकं वाचायला लागला. इतरांच्या आपल्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत अशी कल्पना करून घेऊन त्या दबावाने तो पार नैराश्याच्या खाईत बुडाला. पण मग हळूहळू तो स्वतःशी विचार करायला लागला की.. 'जरी हल्ली पदार्थविज्ञानाचा मला तिटकारा वाटत असला तरी एके काळी मला ते आवडायचं. का बरं आवडायचं? कारण मी त्याच्याशी खेळत असे. तेव्हा असा विचार करत नसे की हे जे काही मी करतोय त्याने काही नवीन संशोधन होणार आहे की नाही ते! मला ते करायला आवडतंय इतकं कारण मला पुरेसं होतं.' त्यानंतर त्यानं हाच दृष्टीकोन ठेवायला सुरुवात केली.. जे आवडतंय ते करायचं, बस्स! मग एक दिवस कॉर्नेलच्या कँटिनमधे एकाने एक थाळी वर फेकली. वर जाताना ती डचमळत होती आणि त्यावरचं पदकाचं चित्र फिरत होतं. फाइनमनच्या मनात विचार आला की त्या पदकाची हालचाल सांगणारं सूत्र काय असेल? मग तो त्याच्या मागे लागला. ते सूत्र शोधून काढता काढता त्याला पदार्थविज्ञानाची गोडी परत कशी लागली ते कळलं नाही. आणि मग एक दिवस त्याला नोबेल मिळवून देणारं संशोधन त्याच्या हातून झालं.
त्याच्या वडिलांमुळेच त्याला शास्त्राची गोडी लागली. त्याच्या वडिलांनी त्याला कधी तू शास्त्रज्ञ हो म्हणून सांगीतलं नाही आणि स्वतः त्याचे वडीलही शास्त्रज्ञ नव्हते.. ते एक सेल्स मॅनेजर होते. मग हे कसं घडलं? याचं उत्तर फाइनमनने स्वतःच नॅशनल सायन्स टीचर्स असोसिएशन समोर केलेल्या भाषणात दिलं आहे (खाली ५ क्रमांकाचा दुवा पहा). त्यातलं मला आवडलेलं एक उदाहरण देतो.
त्याचे वडील त्याला दर सप्ताहाच्या शेवटी जंगलात फिरायला घेऊन जात असत. एकदा त्यांनी त्याला एक पक्षी दाखवून सांगीतलं - 'तो पक्षी बघितलास? त्याचं नाव ब्राऊन-थ्रोटेड थ्रश. त्याला जर्मनीत हाल्सेनफ्लुगेल आणि चिनी भाषेत चुंग लिंग म्हणतात. पण जरी तू त्याची वेगवेगळ्या भाषेतली नावं लक्षात ठेवलीस तरी तुला त्या पक्षाबद्दल काहीच माहिती नसणार आहे. त्यामुळे तुला फक्त वेगवेगळ्या देशातले लोक त्याला काय म्हणतात एव्हढेच कळेल. तो गातो कसा? त्याच्या पिल्लांना उडायला कसा शिकवतो? उन्हाळ्यात किती तरी मैल प्रवास करून कुठे जातो आणि तिथून परतीचा रस्ता कसा शोधतो इ. इ. ही खरी त्या पक्षाबद्दलची माहिती. ती मिळवण्याच्या प्रयत्नात रहा!'
मला तरी मुलातून एक नोबेल पारितोषिक विजेता निर्माण करणार्या त्याच्या वडिलांचं जास्त कौतुक वाटतं!
====== समाप्त======
छायाचित्रांचे आणि इतर माहितीचे स्त्रोत ::
१. पोस्टाचं तिकीट - http://shallwemeanderon.blogspot.com/2009/05/forever-meandering.html
२. बोंगो वाजविताना - http://kempton.wordpress.com/2006/11/26/richard-feynman-great-minds-of-our-time/
३. शुअर्ली यू आर जोकिंग, मि. फाइनमन(पीडीएफ)- http://tenniselbow.org/scott/feyn_surely.pdf
४. फाइनमनला वाहिलेली साईट -- http://www.feynman.com
५. नॅशनल सायन्स टीचर्स असोसिएशन समोर केलेले भाषण, व्हॉट इज सायन्स - http://www.fotuva.org/feynman/what_is_science.html

Tuesday, July 13, 2010
क्लोज एन्काउंटर्स ऑफ द चायनीज काईन्ड
आपल्या ऑफिसात कामाला नसलेल्या, आपल्या शेजारी रहात नसलेल्या, आपल्याला रोजच्या बसमधे न भेटणार्या, आपल्या मुलाच्या मित्राचा बाप नसलेल्या, म्हणजे थोडक्यात आपल्याला कुठेही न भेटणार्या आपल्या सारख्याच सामान्य चिन्याशी आपली रोज भेट होण्याची किती शक्यता आहे? माझ्या मते, प्रियांका चोप्रा माझी हिरॉईन होण्याची जेव्हढी शक्यता आहे तेव्हढीच.. पण तरीही ती शक्यता माझ्या बाबतीत वास्तवात आली.. एका चिन्याच्या भेटीचा योग रोज आला.
तेव्हा मी रोज ५० मैल लांब असलेल्या गावातून ऑक्सफर्डला गाडी हाकत यायचो. पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे डोळ्यात येणारे पाणी (त्याऐवजी पेट्रोल आलं असतं तर किती बरं झालं असतं असं वाटायचं) आणि डिव्हायडरने प्रत्यक्ष भेटून दाखवलेलं झोपेचं खोबरं या विघ्नांना शरण जाऊन मी एका कार शेअर साईटला साकडं घातलं.. कंप्युटर पाण्यात ठेवला.. आणि थोड्याच दिवसात.. म्हणजे तब्बल एका वर्षा नंतर एका चिन्याने साद दिली.
आम्ही प्राथमिक चर्चा करायला प्रथम भेटलो.. पहिलं हाय हॅलो झाल्यावर मी त्याला त्याचा नेहमीचा रस्ता जाणून घेण्यासाठी विचारलं "हाऊ डू यू गो टू ऑक्सफर्ड?".
तो: "हाऊ व्हॉट?" कॅसेट चुकून जास्त वेगाने वाजवली तर जसा आवाज येतो तसा आल्यासारखा त्याचा चेहरा झाला होता.
मी: "विच वे यू गो?"
तो: "विच व्हॉट?" परत मख्ख चेहरा आणि मिचमिचे डोळे अजून बारीक.. मी इतका कर्णबंबाळ बोलतो का?
मी : "व्हॉटिज युवर युज्वल रूट?"
तो: "युवs व्हॉट?" त्याच्या चेहर्यावर काही समजल्याचे भाव नव्हते.. त्याच्या व्हॉटच्या मार्यापुढे माझ्या इंग्रजीने मान टाकली आणि मी हतबुद्ध झालो.
थोडा वेळ नुसतंच एकमेकांकडे शून्य नजरेने बघितलं.. अचानक मला त्याचा इंपीडन्स मिस्मॅच होतोय असा साक्षात्कार झाला.. मी नेहमीच्या वेगाने इंग्रजी बोललो की वाक्यातला जेमतेम दुसरा तिसरा शब्द कानातून आत मेंदूपर्यंत जाऊन रजिस्टर होऊन त्याचा अर्थ लागेपर्यंत वाक्यच संपत.. मग उशीरा मंगल कार्यालयात गेल्यामुळे बँडवाल्यांच्या पंक्तीला बसायला लागल्यासारखा त्याचा चेहरा होतो.. आणि वाक्यातला एखादा समजलेला शब्द घेऊन, त्याला 'व्हॉट' जोडून, तो मला प्रतिप्रश्न करतो. मला हे कळायला इतका वेळ लागण्याचं काही कारण नव्हतं खरं, कारण माझंही ब्रिटीशांशी बोलताना अगदी अस्सच होतं.
रस्ता प्रकरण मिटवून आम्ही एकमेकांना कुठं भेटायचं आणि कुठं सोडायचं यावर व्हॉटाघाटी सुरू केल्या.
नकाशातल्या एका रस्त्यावर बोट ठेऊन तो म्हणाला "आय सेंड यू हिअs".. त्या ठिकाणातलं तो मला काय पाठवणार आहे ते कळेना. 'सेंड व्हॉट' म्हणायची प्रचंड उर्मी त्याला राग येईल म्हणून दाबली. पण माझी मूक संमती आहे असं त्याला वाटायचं म्हणून मी प्रचलित मार्ग स्विकारून म्हंटलं - "सॉरी?"
तो: "आय सेंड यू हिअs इन ऑक्सफर्ड अँड यू सेंड मी हिअs".. आता नकाशातल्या दोन ठिकाणांवरून बोट फिरलं.. एक माझ्या ऑफिसजवळचं होतं आणि एक त्याच्या. त्याला सेंडणं म्हणजे सोडणं म्हणायचं होतं.
मग आमची सेंडायच्या जागांवर चर्चा झाली. एक जागा "नो एनी पाsकिंग" म्हणून गेली.. 'नो एनी' हा त्याचा आवडता वाक्प्रचार होता.. 'एकही अमुक टमुक नाहीये' याला तो 'नो एनी अमुक टमुक' म्हणायचा.. 'नो एनी बस फॉs लंडन', 'नो एनी रेस्टॉरंट' असं. दुसरी एक जागा तिथं खूप ट्रॅफिक असतं ("कार्स आs टू मच") म्हणून फेटाळली गेली. तिसरी जागा 'पीपल स्पिडिन ड्रायव्हिन' म्हणजे लोक त्या रस्त्यावर खूप स्पिडिंग करतात म्हणून बोंबलली. शेवटी एकदाच्या सेंडायच्या आणि उचलायच्या जागा ठरल्या.
का कुणास ठाऊक पण जाता जाता त्यानं मला लायसन्स मागून उचकवला.. माझ्याकडे बघून या फाटक्याकडे गाडी सोडा पण लायसन्स तरी असेल की नाही असं वाटलं बहुतेक त्याला.. किंवा मी कुणाचीही मदत न घेता गाडी चालवू शकतो यावर अविश्वास. पण इतक्या नवसासायासाने गावलेला शेअरोत्सुक इसम सहजासहजी घालवण्यात काही 'अर्थ' नव्हता म्हणून मी पडतं घेऊन त्याला लायसन्स दाखवलं.. नंतर उगीचच त्याचं लायसन्स मागून, भारतीय असलो तरी उगीच पडती भूमिका घेणार नाही, हे बाणेदारपणे दाखवून दिलं.. कुठे माझ्यासारखा सह्यगिरीतला वनराज आणि कुठे तो ग्रेट वॉलच्या फटीतला किरकोळ कोळी? कार शेअर करण्यापूर्वी घ्यायची काळजी या संबंधी त्या साईटवर काही सूचना आहेत त्याच तो पाळत होता असं त्यानं नंतर आमची गट्टी जमल्यावर सांगीतलं.
गोरापान, मिचमिचे डोळे, चौकोनी फ्रेमचा चष्मा, बुटका, हसरा चेहरा आणि नीट कापलेले पण सरळ वळणाशिवाय इतर कुठल्याही वळणाला न जुमानणारे केस असं साधारण रंगरूप होतं त्याचं. पहिल्या काही दिवसात आमचं चांगलं जमलं आणि एकमेकांशी जमेल तसं बोलायला सुरुवात झाली. तो बेजिंग जवळच्या कुठल्याशा शहरातून आलेला होता.. त्यानं चीनमधेच एन्व्हायरनमेंटल इंजिनिअरिंग मधे पीएचडी केलेली होती.. प्रेमविवाह झालेला होता.. बायको त्याच्याच वर्गातली होती.. त्याला शाळेत जाणारा एक मुलगा होता. इकडे येऊन ७/८ वर्ष झालेली होती.. इकडे आल्यावर त्याच्या बायकोने इंजिनिअरिंग मधे मास्टर्स करून नोकरी घेतली होती. त्याच्या बायकोला स्वयंपाक येत नव्हता. डॅननं तिला शिकवला पण अजूनही तिला तितकासा चांगला जमत नाही म्हणून तो स्वतःच करायचा.
त्याचं नाव डॅन होतं. त्याचं खरं नाव झँग चँग असलं काही तरी झांजेच्या आवाजासदृश होतं. चिन्यांना त्यांच्या नावांची परदेशी लोकांनी केलेली चिरफाड अजिबात चालत नसावी.. कारण बहुतेक चिनी इकडे इंग्रजी नाव घेतात.. कुठल्याही गैरचिन्याला चिनी नावांचा उच्चारकल्लोळ करणं सहज शक्य आहे.. कारण चिनी भाषेत प्रत्येक शब्द ४ वेगवेगळ्या प्रकारे उच्चारता येतो आणि प्रत्येक उच्चाराचा अर्थ वेगळा होतो.. हो.. आपल्या भाषेत भावनांच्या छटा दाखवायला आपण शब्दाच्या उच्चाराला उतार चढाव देतो.. पण चीनी भाषेत उतार चढावाचे चक्क वेगवेगळे अर्थ होतात.
तर, पहिला उच्चार आपण कुठल्याही शब्दाचा करू तसा सरळ करायचा.. म्हणजे सुरात कुठलाही चढ-उतार न करता. शब्द वरच्या सुरात चालू करून खाली आणला की होतो दुसरा उच्चार. शब्द वरच्या सुरात चालू करून, खाली आणून परत वर नेला की तिसरा उच्चार. चौथ्या उच्चारासाठी शब्द खालच्या सुरात चालू करून वर न्यायचा. 'माझं नाव चिमण आहे' याचं चिनी भाषांतर 'व्हादं मिंझ जियाव चिमण' असं आहे पण उच्चारताना व्हादं चा तिसरा उच्चार, मिंझ चा दुसरा, जियाव आणि चिमण चा पहिला उच्चार करायचा.. यापेक्षा वेगळे उच्चार स्वतःच्या जबाबदारीवर करावेत.. वेगळे केले तर 'चिमण वनवासात गेला होता' असा पण अर्थ निघू शकेल!
चिनी भाषेत शब्द मुळाक्षरांपासून बनत नाहीत.. शब्द हेच एक मुळाक्षर असते. शाळेत त्याना 'ऐसी अक्षरे मेळवीन' न शिकविता 'ऐसे शब्द मेळवीन' असं शिकवितात. त्यामुळे परकीय भाषेतील शब्द चिनी भाषेत लिहायचा म्हणजे एक मोठ्ठा द्राविडी प्राणायाम! त्या शब्दाच्या उच्चाराच्या तुकड्यांच्या साधारण जवळचे चिनी भाषेतले शब्द एकमेकांना जोडायचे. भाषेच्या लिपीत मुळाक्षरं नसणं याचा किती फायदा किंवा तोटा आहे हे पहायचं असेल तर घटकाभर असं समजा की मराठीत मुळाक्षरं नाहीत, फक्त शब्द आहेत... तर कम्युनिटी चं 'कमी-नीति', मोबाईल चं 'मोर-बाईल' किंवा कस्टमर चं 'कस-टर-मर' अशी अभद्र रूपं होतील... तसंच टेलिफोन, क्वीन अशासारख्या शब्दांच तर पूर्ण भजं होईल. हा अर्थातच माझा अंदाज आहे.. प्रत्यक्षात चिनी भाषेत अगदी अस्संच होतं की नाही मला माहीत नाही.
मला असं कळालं की चिनी भाषेत 'र' च्या फार जवळचा शब्द नसल्यामुळे त्यांना त्याचा उच्चार नीट करता येत नाही.. त्याचा उच्चार थ्रु सारखा वाटतो. त्यात 'र'ची पूर्ण बाराखडी म्हणायला सांगीतली तर फेफरं येईल.. यामुळेच चिनी माणूस महाराष्ट्रात गुरं वळायला योग्य नाही कारण तो 'हल्या थिर्रर्रर्र' म्हणूच शकणार नाही. या अशा कारणांमुळेच चिनी लोकांच्या इंग्रजी उच्चारावर फार मर्यादा येत असाव्यात. चिनी लोक is चा उच्चार 'इ' आणि 'ज' लांबवून करतात... ईsजs.. त्यामुळे कानाला थोडी इजा होते. तसंच 'just' चं जsस्टs, 'pick me up' चा पिक्कs मी अपs, बिगचा उच्चार बिग्गs! पण बाल्कनी चा बाल्खली मात्र चांगलाच गोंधळात टाकतो!
एकदा त्यानं मला विचारलं 'यू हॅव सां?'.. 'सां व्हॉट?' मी विचारलं.. आता मी निर्ढावलेला व्हॉटसरू झालो होतो.. पण डोक्यात 'सांवर सांवर रे, उंच उंच झुला' नांदत होतं. शेवटी बर्याच मारामारी नंतर तो 'तुला मुलगा आहे का?' असं विचारत होता हे समजलं.
मीही माझ्या परीने त्याला बुचकळ्यात टाकायचं काम करायचो, नाही असं नाही.. शेवटी सह्यगिरीतला वनराज कमी पडेल का कुठे? त्याला एकदा म्हंटलं 'हॅव यू सीन धिस पिक्चर, कॅसीनो रॉयाल?'.. लगेच प्रश्न आला 'व्हेअs?'.. आता मी बुचकळलो.. मला 'सीन व्हॉट?' किंवा तत्सम प्रश्नाची अपेक्षा होती.. या बहाद्दराचा असा व्हॉट चुकलेला नवरा कसा झाला?.. 'व्हेअर हॉट? इन द थिएटर! इट्स न्यू जेम्स बॉन्ड पिक्चर' माझ्या उत्तरामुळे त्याची ट्यूब लागली... 'ओ! यू मीन मूव्ही" म्हणून तो फिदीफिदी हसला... मराठीतले असे नेहमीचे शब्दप्रयोग कधी मान खाली घालायला लावतील काही सांगता येत नाही बघा.
पूर्वी चिनी भाषेतलं लिखाण वरून खाली आणि उजवीकडून डावीकडे करायचे. गंमत म्हणून मी 'रंग ओला आहे.. विश्वास नसल्यास हात लावून बघा' हे दोन ओळीत लिहीलं तर ते प्राचीन शिलालेखाचे तुकडे शेजारी शेजारी ठेवल्या प्रमाणे दिसलं.
ब वू त स स स वि आ ओ रं
घा न ला हा ल्या न श्वा हे ला ग
हिंमत असेल तर सरळ वाचून अर्थ लावून दाखवा! अशा लिहीण्यानं मानेला नको इतका व्यायाम होतो हे बहुधा त्यांच्या लक्षात आलं असावं कारण आता ते आपल्यासारखंच लिहायला लागले आहेत. असे काही तोटे असले तरी काही बाबतीत चिनी भाषा समृद्ध आहे.. वेगवेगळ्या नात्यांना असलेल्या शब्दांच्या बाबतीत इंग्रजी भाषेला फारच मर्यादा आहेत.. काका असो वा मामा इंग्रजीत तो अंकल असतो, काकू आणि मावशी यांना एकत्रितपणे आँट खाली दडपतात. चिनी भाषेत मात्र काकाला दोन शब्द आहेत.. बापापेक्षा लहान भावाला एक आणि मोठ्याला दुसरा. अशीच श्रीमंती इतर नात्यांच्या बाबतीत सुद्धा आहे. पूर्वी एका चिन्यानं मला सांगीतलं होतं की चिनी भाषेत बापाला 'टो' म्हणतात. आपल्या पायाच्या अंगठ्याकडे बोट दाखवून 'धिसिज नॉट माय टो!' असा विनोद पण तो नेहमी करायचा. ते आठवून मी त्याला विचारलं 'तुमच्यात बापाला 'टो' म्हणतात ना?'. त्यावर त्यानं मला "छे छे! कुणी सांगीतलं तुला? बापाला 'बा' म्हणतात".. काही काही लोकांना आपलं तोकडं ज्ञान पाजळायची किती खाज असते ना? मग ओशाळं हसत मी विचार करू लागलो की मराठीतला 'बाबा' शब्द ऐकला तर ते 'दोन बाप' असा अर्थ काढतील काय?
गर्दी टाळायला पहाटे लवकर अर्धवट झोपेतून निघायची माझी प्रथा आम्ही चालू ठेवली.. झोप उडवायला हिंदी गाणी लावून मी मोठमोठ्यांदा ओरडत जात असे.. डॅनच्या एंट्रीमुळे मन तसं करायला धजावत नव्हतं.. न जाणो, उगाच रात्री गुरासारखा 'बचाव! बचाव!' असं ओरडत उठायचा!.. त्यामुळे कुठे तरी अस्वस्थ वाटत होतं.. पण पहिल्या २/३ दिवसात माझी भीड चेपली आणि माझ्या ड्रायव्हरकीच्या दिवशी बिनधास्तपणे हिंदी गाणी लावायला लागलो.. ओरडायचो नाही, नुसती गुणगुणायचो.. त्यानंही प्रथम ती लक्षपूर्वक ऐकण्याचं नाटक करून आवडल्याचं सांगीतलं.. गाण्यांचे अर्थही विचारले. काही दिवसांनी त्याचंही धैर्य वाढलं आणि त्यानं हळूच 'मी झोपू शकतो का?' असं विचारलं.. मनात म्हंटलं 'बिच्चारा! सुसंस्कृतपणा दाखवण्यापोटी स्वतःची झोप किती मारत होता?'.. पण वरकरणी आनंदाने हो म्हंटल कारण आता त्याला अर्थ सांगावा लागणार नव्हता.. अहो, गाण्यांचे भाषांतर इंग्रजीत करणं महाकर्मकठीण प्रकरण आहे.. बघा, 'तेरे मेरे सपने अब एक रंग हैं' चं भाषांतर 'युवर ड्रीम्स अँड माय ड्रीम्स नाऊ हॅव वन कलर'.. किंवा 'वो चुप रहे तो मेरे दिलके दाग जलते हैं' चं भाषांतर 'इफ ही इज सायलेंट देन माय हार्टस् स्कार्स बर्न'.. छे! छे! भीषण आहे हो.. आपल्या इंग्रजीची लक्तरं निघतात अगदी! जास्त उदाहरणं देत नाही, यू गॉट द पॉईन्ट!
'तेरे मेरे' चं भाषांतर केल्यावर मला प्रश्न पडला की याचा नक्की अर्थ काय होतो? म्हणजे, एकाच रंगाच्या ड्रीममधे काय इतकं रोमँटिक असेल? एक तर एकच रंग असला तर ड्रीम मधलं काय दिसणार? एकाच रंगाच्या फळ्याकडे पाहील्यावर काय दिसेल? एक रंग फक्त! ते काय रोमँटिक असेल का? मला तरी प्रेमात पडल्यावर इस्टमनकलर स्वप्न दिसणं जास्त रोमँटिक वाटतंय!
भाषेचे कितीही अडथळे आले तरी आमची एकमेकांशी चालू झालेली भंकस कधीही थांबली नाही, उलटी ती वाढतंच गेली. माझ्याशी इंग्रजीतून बोलल्यामुळे त्याला फायदा होतो असं तो म्हणायचा.. नुसतं म्हणायचा नाही तर माझे आभार पण मानायचा. त्याच्या इंग्रजीबद्दल त्याला मुळीच आत्मविश्वास नव्हता. तो शाळेपासून इंग्रजी शिकला होता तरीही! पण बोलण्याचा सराव कधी झाला नाही.. म्हणजे माझ्यासारखंच.. फरक इतकाच की माझं कॉलेजपासून पुढंच शिक्षण इंग्रजीतून झालं आणि त्याचं नाही.. आणि नोकरीत सतत इंग्रजी वापरावं लागलं त्यामुळे, कदाचित, माझं इंग्रजी त्याच्यापेक्षा बरं होतं. त्याला ४ ओळींची इंग्रजी मेल लिहायला अर्धा तास लागतो असं तो म्हणायचा.. कारण, अर्थ व वाक्यरचना या गोष्टी तो पुन:पुन्हा तपासून पहायचा. लोक त्याला इंग्रजीवरून हसतील अशी भीति नेहमी वाटायची. या न्यूनगंडामुळे तो फक्त चिनी लोकांतच मिसळायचा. बाकीच्यांशी फक्त औपचारिक बोलण्यापर्यंतच मजल. त्याची बायको जेव्हा शिकत होती तेव्हा त्यानं त्याच्या क्षेत्रातलं काम मिळवायचा आटोकाट प्रयत्न केला होता पण मिळाला नाही. त्याचही कारण त्याच्यामते इंग्रजी हेच होतं. मग त्यानं मॅकडोनाल्डसारख्या दुकानातल्या कामांवर समाधान मानलं.
असंच एकदा त्याला अचानक काही तरी आठवलं......
डॅनः 'तुमच्या सिनेमात खूप गाणी असतात ना?'
मी: 'हो! बेदम गाणी असतात.'
डॅनः 'खूप पूर्वी मी एक हिंदी सिनेमा पाहिला होता चीनमधे'
मी: 'आँ! काय म्हणतोस काय? कुठला?'.. मी अक्षरशः उडालोच.. पाकीस्तान, आखाती देश किंवा रशिया असल्या देशांमधे हिंदी पिक्चर बघतात ते माहिती होतं.. पण चीनमधे?.. शक्यच नाही.. यानं नक्की दुसर्याच कुठल्या तरी भाषेतला पाहीला असणार.
डॅनः 'त्याचं नाव रेंजर'
मी: 'रेंजर? या नावाचा कुठलाच सिनेमा नाहीये'
डॅनः 'आय नो! मी त्या नावाचं भाषांतर सांगतोय तुला'.. बोंबला! मेंदुला सर्व प्रकारचे ताण देऊनही मला रेंजर कुठल्या हिंदी पिक्चरचं नाव असेल काही सांगता येईना. मी हार पत्करली.
मी: 'काही सुधरत नाहीये रे!'
डॅनः 'त्यातल्या हिरॉईनचं सिनेमातलं नाव लीडा होतं'.. लीडा? येडा आहे का हा? असली नावं कधी असतात का भारतात?
मी: 'अरे बाबा! असली नावं आमच्यात नसतात.'
डॅनः 'भटक्या माणूस असतो.. जिप्सीं सारखा.. त्यातलं एक गाणं असं होतं'.. असं म्हणून तो काही तरी गुणगुणला.. शब्द नाही नुसती चाल.. माझ्या पार डोक्यावरून गेलं.
मी: 'मला नाही कळत आहे. जिप्सी? ओ! कारवाँ होतं का नाव?'
डॅनः 'मला नाही सांगता येणार!'.. मग त्यानं संध्याकाळी परत जाताना गुगललेली काही पानं हातात ठेवली.. ती आवारा पिक्चरबद्दल होती. त्यात नर्गिसचं नाव रिटा आहे. हा लीडा काय म्हणत होता कोण जाणे!
मी: 'हम्म्म्म! ही स्टोरी घरदार नसलेल्या एका बेकार गुंड माणसाची आहे. तू जिप्सी काय म्हणत होतास?'
डॅनः 'आवारा म्हणजे भटक्या ना? म्हणून मी रेंजर्स किंवा जिप्सी म्हणत होतो!'
मी: 'नाही. तो घरदार नसलेला असतो.. होमलेस'
डॅनः 'ओ होमलेस! मग आवाराचं चिनी भाषांतर बरोबर केलं होतं.. लिउ लाँग त्झ! म्हणजे होमलेस. त्याचं काय आहे. इथल्या रेंजर्स नावाच्या फुटबॉल क्लबला पण चिनी भाषेत लिउ लाँग त्झ म्हणतात!'
चिनी लोकांची इंग्रजी भाषांतरं हा टिंगलीचा एक स्वतंत्र विषय आहे. त्याबद्दल गुगल रद्दी डेपोत बरंच काही सापडेल. तरीही रहावत नाही म्हणून ही काही उदाहरणं... विमानतळावरच्या इमर्जन्सी एक्झिट दारावर -- 'नो एंट्री ऑन पीस टाईम'; बंद असलेल्या हॉटेलवर -- 'द हॉटेल इज नॉट ओपन बिकॉज इटिज क्लोज्ड'; रेल्वे पोलीस केंद्रात लिहीलेली सूचना -- 'इफ यू आर स्टोलन, कॉल द पोलीस अॅट वन्स'; रस्त्यावर निसरडं आहे हे सांगायला -- 'स्लिप केअरफुली!'; सावधान पाण्यात पडाल -- 'टेक केअर टू फॉल इन्टू द वॉटर'; सुस्वागतम -- 'वेलकम फॉर कमिंग'.
एकदा भारतीय क्रिकेट टीम इंग्लंडच्या दौर्यावर आली आणि मी गाडीमधे त्याला न जुमानता कॉमेंट्री ऐकायला सुरुवात केली. परिणामी त्याला क्रिकेट कसा खेळतात याची उत्सुकता लागली. मी घरी जाऊन विचार करायला लागलो की याला हा खेळ कसा समजावून द्यावा? तेसुध्दा इंग्रजीत? शेवटी गुगलच्या माळ्यावर हे एक अशक्य वर्णन हाती मिळालं....
You have two sides, one out in the field and one in. Each man that's in the side, that's in, goes out, and when he's out, he comes in and the next man goes in until he's out. When they are all out, the side that's out comes in and the side that has been in goes out and tries to get those coming in, out. Sometimes you get men still in and not out.
When a man goes out to go in, the men who are out try to get him out, and when he is out he goes in and the next man in goes out and goes in. There are two men called umpires who stay all out all the time and they decide when the men who are in are out. When both sides have been in and all the men have out, and both sides have been out twice after all the men have been in, including those who are not out, that is the end of the game!
मी त्याला हे वाचून दाखवलं आणि त्याच्याकडे हसत हसत पाहीलं.. मला जोरदार हास्याची अपेक्षा होती.. पण त्यानं म्हशीसारख्या बधीर चेहर्यानं तो कातिल प्रश्न टाकला... 'आउट व्हॉट?'. सुंदरी समोर शायनिंग करायला जावं आणि पाय घसरून शेणात पडावं असं झालं. त्याला त्यातला विनोद समजावून सांगणं माझ्या इंग्रजी कक्षेच्या बाहेरचं होतं.
तो मला वेळोवेळी चीनची कशी वेगवान प्रगती चालली आहे सांगायचा. किती झपाट्याने ते नवीन रस्ते रेल्वे लाईन्स टाकतात ते ऐकून मला हेवा वाटायचा. त्यांच सरकार लागणार्या जमिनीचा ताबा इतक्या पटकन कसं काय घेतं हा प्रश्न मला पडल्यावर तो म्हणाला की सर्व जमिनी सरकारच्याच मालकीच्या असतात. चिनी माणसानं घर घेतलं तरी खालची जमीन ही सरकारच्याच मालकीची असते. त्यामुळे जर ती जागा रस्त्यात जाणार असेल तर सरकार त्याला दुसरीकडे घर देतं आणि लागणारी जागा काढून घेतं. त्यावर वाटाघाटी, चर्चा, मोर्चे किंवा न्यायालयीन दावे असल्या काही भानगडींना वाव नाही. कुणी प्रयत्न केल्यास सरकारी वरवंटा फिरतो. सर्वच बाबतीत हीच परिस्थिती! कुठल्याही अधिकार्याला 'का' प्रश्न विचारायचा नाही ही लहानपणापासूनची शिकवण! त्यामुळे शाळेत मास्तरलाही फारशा शंका विचारायची पध्दत नाही.
असंच एकदा इंग्लंडमधल्या एका सरकारी खात्याने गैरव्यवहार केल्याबद्दल न्यायालयाने त्या खात्याला दंड ठोठावला. त्यावर मी सहज त्याला म्हणालो की हा दंड ते खाते शेवटी आपण भरलेल्या टॅक्स मधूनच भरणार मग त्याला काय अर्थ राहीला? तो दंड जबाबदार अधिकार्यांच्या पगारातून कापून घेतला पाहीजे. अशी सगळी माझी टुरटुर त्यानं लक्षपूर्वक ऐकून घेतली मग एकदम म्हणाला की 'असा जो तुम्ही लोक विचार करू शकता ना, तो आम्ही करूच शकत नाही. कारण आम्हाला तशी सवयच नसते. आम्हाला गपगुमान सरकार सांगेल ते ऐकायची सवय आहे.' तत्क्षणी मला जाणवलं की मी स्वतंत्र देशात जन्मलो आहे ते किती मोलाचं आहे. त्याचं मोल पैशात करता येणार नाही. हुकुमशाहीत लोकांची पध्दतशीर वैचारिक नसबंदी होत असेल तर ती प्रगती काय कामाची? स्वतंत्र विचार करण्यालाच बंदी असेल तर माणूस म्हणवून घेण्याचा काय फायदा? हे जाणवल्यावर मात्र मला चीनचा हेवा वाटेनासा झाला.

Tuesday, June 1, 2010
एका जाज्वल्य उपक्रमाबाबत
"काही नाही. निदान महाराष्ट्रात तरी सगळं शिक्षण मराठीतूनच द्यायला पाहीजे. तरच मराठी जगेल. नाही तर पाली, संस्कृत सारखी मराठी पण नामशेष होईल." दिल्यानं साप्ताहिक सभेत आणलेला नवीन प्राणी.. उत्तम बापट.. मुठी आपटून आपटून पोटतिडिकेनं बोलत होता. त्याच्या वाक्यावाक्यातून मराठीचा जाज्वल्य अभिमान मायक्रोवेव्हमधल्या पॉपकॉर्न सारखा उसळत होता. त्याच्या युवराजसिंगी धडाक्यामुळे माझ्यातही पोटतिडिक निर्माण झाली.. पण तिच्या उत्पत्तिचं मूळ भुकेमधे होतं हे नंतर उमजलं. मी हळूच मक्या आणि दिल्याकडे पाहिलं. ते बिअर पिऊन थंडावले होते, तिकडे उत्तम उत्तम (उत्तमोत्तम म्हणावे का?) पेटला होता. मला त्याचं म्हणणं पटत होतं.. तसं मला कुणीही काहीही जरा ठासून सांगीतलं की पटतंच.
मी: "खरय तुझं. आपण तरी काय करणार?".. मी काही तरी गुळमुळीत बोललो.
उत्तमः "अरे काय करणार म्हणजे? काय नाही करू शकणार?".. जोरात मूठ आपटून तो आणखी उसळला.. याला आता मूठ आपट बापटच म्हणायला पाहीजे.. तत्काळ मी भलतंच बोलल्याची जाणीव झाली.. मी नर्व्हसपणे इकडे तिकडे पाहीलं. थंडावलेले मक्या, दिल्या मदतीला यायची शक्यता नव्हती.
उत्तमः "आपणच करून ठेवलं आहे हे सगळं. आपणच आपली पोरं इंग्रजी शाळेत घातलीयत. ही मध्यमवर्गीय मानसिकता आहे.. कळप प्रवृत्ती आहे.. सगळे शिक्षणतज्ज्ञ सांगून दमलेत.. मातृभाषेतून शिकलेलं जास्त चांगलं कळतं. पण आम्हाला कळतंच नाही ते.".. बाप रे! माझा घसा मुठा नदी इतका कोरडा पडला.. कारण मी माझ्या पोराला इंग्रजी शाळेतच शिकवलाय.. याला कळालं तर मला त्याच्या जाज्वल्य अभिमानाच्या भट्टीत, मक्याच्या कणसासारखा भाजून, वरती तूप मीठ लावून खाईल. तेवढ्यात दिल्या जागा झाला. मला जरा हायसं वाटलं. उत्तमची फिल्डिंग मला एकट्यालाच करावी लागणार नव्हती.
दिल्या: "आपण मराठीसाठी काही तरी करायला पाहीजे.. तिचे पांग फेडायला पाहीजेत.. काय करता येईल त्याचा विचार करा."
मक्या: "आपण शक्य तितक्या जणांशी मराठीतून बोलायचं.".. हे दोघे का थंडावले होते? या माझ्या अज्ञानाच्या अंधारावर मागच्या टीव्हीनं एक तिरीप टाकली. त्यावरची आयपीएलची एक मॅच नुकतीच संपली होती. त्यातल्या आनंदीबाला चुंबनं फेकित परत चालल्या होत्या. अधुन मधून मंदिरा एकदोन माजी क्रिकेटपटूंना काही तरी सांगताना दाखवत होते. तेही तन्मयतेने ऐकत होते. ती बहुधा नजाकतभरा ग्लान्स कसा करावा ते सांगत असावी. तेव्हढ्यात उत्तम किंचाळला.
उत्तमः "बासssss! आपण क्रिकेटची कॉमेंट्री मराठवळूया. आता आयपीएल मधे पुणं पण असणार. तेव्हा पुण्याचा काही वेगळेपणा दिसायला नको का? पुणं महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. तेव्हा आपणच दिशा दाखवली पाहीजे. आणि शिवाय मराठी वापरावरचा एकूण दबावही वाढत चाललाय."
मी: "काय करू या? मराठु.. ळू.. ळूया? वळू पहाता पहाता गळू आल्यासारखं वाटलं मला."
उत्तमः "मराठवळणे. म्हणजे मराठीत भाषांतर/रुपांतर करणे. मी केलेला शब्द आहे तो.".. उत्तम अभिमानाने म्हणाला.. त्याच्या चेहर्यावर स्वतःच्या बागेतली झाडं दाखवणार्यांच्या चेहर्यावरचे भाव होते.. "म्हणजे आपण क्रिकेटची मराठीतून कॉमेंट्री करायची."
दिल्या: "अरे पण पूर्वी बाळ ज पंडित सारखे लोक करायचे ना मराठीत कॉमेंट्री! आपण काय वेगळे दिवे लावणार त्यात?".
उत्तमः "हो! पण त्यातले बरेचसे शब्द इंग्रजीच असायचे. क्षेत्ररक्षणाच्या सगळ्या जागांना कुठे आहेत मराठी शब्द? सांग बरं स्लिपला किंवा कव्हरला काय म्हणशील?"
मक्या: "गुड आयडिया! चला आपण शब्द तयार करूया. आधी काय फिल्डिंगवाले घ्यायचे का?"
उत्तमः "ठीक आहे. फिल्डिंग दोन बाजूंमधे विभागलेली असते.. ऑन आणि ऑफ.. त्यांना काय म्हणू या?"
मी: "चालू आणि बंद".. सगळ्यांनी तिरस्काराने माझ्याकडे पाहीलं.
दिल्या: "चालू आणि बंद काय आरेsss? तो दिवा आहे काय?"
मी: "बरं मग दुसरे सुचव.".. त्यावर खूप डोकं खाजवून देखील दुसरे शब्द मिळाले नाहीत. मग नवीन मिळेपर्यंत तेच ठेवायचे ठरले.. आणि बघता बघता खूप शब्द तयार झाले.
ऑफ साईडच्या जागा
-----------------
स्लिप - घसरडं किंवा निसरडं. फर्स्ट स्लिप म्हणजे पहिलं निसरडं.
थर्ड मॅन - तिर्हाईत.
पॉईन्ट - बिंदू. सिली पॉईन्ट - मूढ बिंदू. बॅकवर्ड पॉईन्ट - मागासबिंदू किंवा प्रतिगामी बिंदू
गली - घळ. डीप गली - खोल घळ.
कव्हर - आवरण. डीप कव्हर - खोल आवरण. एक्स्ट्रा कव्हर - अवांतर आवरण.
मिड ऑफ - अर्ध बंद. लाँग ऑफ - दूर बंद. सिली मिड ऑफ - मूढार्ध बंद.
स्विपर - झाडूवाला.
ऑन साईडच्या जागा किंवा लेग साईडच्या जागा
--------------------------------------
शॉर्ट लेग - आखूड पद. फॉरवर्ड शॉर्ट लेग - पुरोगामी आखूड पद. लाँग लेग - लंबूटांग किंवा लंब पद.
स्क्वेअर लेग - चौरस पद.
मिड विकेट - अर्धी दांडी.
मिड ऑन - अर्ध चालू. सिली मिड ऑन - मूढार्ध चालू. लाँग ऑन - लांब चालू.
काऊ कॉर्नर - गायनाका.
लेग स्लिप - पद निसरडं.
शॉर्ट फाईन लेग - आखूड सुपद.
बाद व्हायचे शब्द
-------------
क्लीन बोल्ड - याला त्रिफळाचित असा शब्द आहे, परंतु त्याचा त्रिफळाचूर्णाशी घनिष्ट संबंध वाटल्यामुळे तो आम्हाला तितकासा आवडला नाही. दांडीगुल हा पर्यायी शब्द सुचविला आहे.
हँडलिंग द बॉल - हस्तचित
टाईम्ड आउट - वेळचित
हिट विकेट - स्वचित
ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड - अडथळाचित
अवांतर धावांचे शब्द
----------------
नो बॉल - नचेंडू
बाय - पोटधाव. बाय-इलेक्शनला पोट-निवडणूक म्हणतात म्हणून.
लेगबाय - पद-पोटधाव.
वाईड - रुंदधाव
क्रिकेट मधील फटके
----------------
ड्राईव्ह - तडका, तडकावणे क्रियापदावरून बनवलेला शब्द.
लेग ग्लान्स - पद नजर
फ्लिक - झटका
पुल - हिसका
फॉरवर्ड डिफेन्सिव्ह स्ट्रोक - पुरोगामी संरक्षक फटका /टोला
बॅकवर्ड डिफेन्सिव्ह स्ट्रोक - प्रतिगामी संरक्षक फटका /टोला
स्क्वेअर कट - चौरस काप. अपर कट - वरचा काप. लेट कट - निवांत काप
हूक - आकडा
गोलंदाजीचे प्रकार
--------------
ऑफ स्पिन - बंद फिरकी
लेग स्पिन - पद फिरकी
स्विंग बोलिंग - झोकदार गोलंदाजी
इन स्विंगर - अंतर्झोकी
आउट स्विंगर - बहिर्झोकी
इतर शब्द
--------
बॅट - धोपटणं. यावरून बॅट्समनला धोपट्या असा एक शब्द केला. पण तो द्रविडसारख्याला लागू होत नसल्यामुळे काढून टाकला.
बेल - दांडिका, विट्टी
ओव्हरथ्रो - अतिफेक
डेड बॉल - मृत चेंडू
टायमिंग - समयोचित
टायमर - समयदर्दी
मिसटाईम्ड शॉट - समयभंगी फटका
नाईटवॉचमन - निशानिरीक्षक / निशाचर
ओपनर - उघड्या / प्रारंभक
फिल्डर - क्षेत्ररक्षक / अडव्या
फिल्डिंग - क्षेत्ररक्षण / नाकेबंदी
फुलटॉस - बिनटप्पी
यॉर्कर - पदटप्पी
बाउन्सर - कपाळमोक्षी
बॅटिंग क्रीज - फलक्षेत्र
मास्टर ब्लास्टर - महा-रट्टाळ फलंदाज
प्रत्येक शब्दासाठी खूप वादविवाद झाले. ते सगळे काही मी इथे देत बसत नाही. हे ऐकायला कसं वाटतंय हे पहाण्यासाठी लगेच एक कोरडी धाव (ड्राय रन) घेतली.. म्हणजे काही शब्दांचा वाक्यात उपयोग करून पाहीला.. ती वाक्यं......
'वीस षटकी विश्वचषक स्पर्धेत युवराजने महा-रट्टाळ फलंदाजी केली. त्याने एका षटकात ६ सज्जड रट्टे मारल्यामुळे ब्रॉड हा गोलंदाज एकदम चिंचोळा झाला.'
'सचिनने त्याची अशी नाकेबंदी केली आहे. यष्ट्यांच्या मागे रायडू, पहिल्या निसरड्यात सचिन आहे. हरभजन तिर्हाईत आहे, मागासबिंदूत तिवारी, आवरणात धवन, पोलार्ड अर्धा बंद, सतीश अर्धा चालू, ड्युमिनी अर्धी दांडी, चौरस पायावर मलिंगा आणि सुपदावर फर्नांडो.'
'झहीरचा पहिला चेंडू.. कपाळमोक्षी.. द्रविडच्या कानाजवळून घोंगावत गेला.. द्रविडने आकडा मारायचा प्रयत्न केला.. पण चेंडू आणि धुपाटण्याची गाठभेट झाली नाही आणि तो सरळ रायडूच्या हातात गेला.. धाव नाही.. द्रविड आकडा लावायचा सावली सराव करतोय.. झहीर गोलंदाजीच्या खुणेकडे चाललाय.. दरम्यान चेंडू निसरड्याकडून मागासबिंदू, आवरण असा प्रवास करीत अर्ध्या बंद जागेपर्यंत आला.'
'शोएब अख्तरच्या चेंडूला जोरदार वरचा काप मारून सचिननं त्याला तिर्हाईताच्या डोक्यावरून सरळ मैदानाबाहेर धाडला.'
'सचिन आणि सेहवाग हे दोन उघडे आता फलंदाजीला येताहेत.'
'युवराज हा एक उत्तम समयदर्दी फलंदाज आहे, पण दीपिका प्रकरणामुळे सध्या त्याला वेगळ्याच दर्दने पछाडले आहे.'
'तो आखूड टप्प्याचा चेंडू सेहवागने डोळ्यासमोरची माशी हाकलावी इतक्या सहजतेने गायनाक्या पलीकडे झटकला.'
एकंदरीत अशी वाक्यं ऐकताना, झणझणीत फोडणी दिल्यासारखी, एक वेगळीच मजा येत होती. याचा जनमानसांवरील परिणाम अजमावण्यासाठी अशाच प्रकारची एक छोटी कॉमेंट्री मराठीतून करून आम्ही एका वृध्द क्रिकेटप्रेमींना ऐकवली.. त्यावर त्यांनी आम्हाला एव्हढंच सुनावलं.. 'अरे यापेक्षा काही देवाचं वगैरे म्हणत जा'.

Monday, April 26, 2010
उच्चारकल्लोळ
कुणी मला सांगीतलं की "मी माझं नाव लिहीतो 'खरे' पण म्हणतो 'खोटे'", तर मी म्हणेन खर्याची दुनिया नाही राहिली राव! हो, मग दुसरं काय म्हणणार? उच्चार जर 'खोटे' करायचाय तर 'खरे' लिहायचंच कशाला? 'खोटे' च लिहीना लेका! हे असं मला तरी वाटतं, तुम्हालाही तसंच वाटेल कदाचित! कारण, आपल्या देवनागरी लिपीत अक्षराप्रमाणे आणि अक्षराला लावलेल्या काना, मात्रा वेलांटी इ. इ. प्रमाणे नेमका उच्चार सूचित होतो. काही शब्दं हुलकावणी देऊन जातात, नाही असं नाही.. उदा. तज्ञ हा शब्द तज्ज्ञ असा लिहीला जातो, तर सिंह चा उच्चार सिंव्ह असा होतो... पण बहुतांशी उच्चार नीट करायला जमतात.
देवनागरी लिपीत अक्षरांचे उच्चार जमले की बहुतेक शब्दांचे उच्चार जमतात.. अर्थात, थोड्या गोच्या वगळता. मराठीतल्या 'च' चा उच्चार काही शब्दांमधे 'च्य' असा होतो, उदा. चप्पल.. उच्चार च्यप्पल न करता चप्पल असा केला तर चांगलं गाणं ऐकताना मधेच जबरी खरखर आल्यासारखं वाटतं. 'ज' चं पण तसंच आहे. 'लक्ष्य' चित्रपटात अमिताभने एका मराठी माणसाची भूमिका केली आहे.. कॅप्टन दामले त्याचं नाव.. त्यात एकदा तो एक मराठी म्हण म्हणतो.. कुठली ते आता आठवत नाही.. त्यात तो नको तिथे 'च' चा उच्चार 'च्य' असा करून तिडिक आणतो. 'चुकार चंदूने चरखा चालवता चालवता चारोळीयुक्त चमचम चोरून चाखली' हे वाक्य 'च्युकार चंदूने च्यरखा च्यालवता च्यालवता च्यारोळीयुक्त च्यमच्यम च्योरून च्याखली' असं वाचणार्याच्या असतील नसतील त्या सर्व पिढ्यांचा उध्दार करावासा वाटेल की नाही? तसंच. अशी घोडचूक अमिताभसारख्या नटानं केल्याबद्दल त्याला योग्य शासन काय करावे याचा मी बरेच दिवस विचार करीत होतो. पण परवा कुणी तरी हा प्रश्न परस्पर सोडवला.. क्वालालंपूर विमानतळावर त्याने अमिताभला शाहरुख खान अशी हाक मारून योग्य ती जागा दाखवली.
अक्षरांच्या उच्चारां इतकच महत्व शब्दांतल्या अक्षरांवरील आघाताला (अॅक्सेंट) आहे! शब्दांच्या अक्षरांवरील आघातात थोडा जरी बदल केला तरी कीर्तनाला जाऊन रॅप संगीत ऐकल्यासारखं होतं. उदाहरणार्थ, निवडणूक हा शब्द म्हणताना आपण तो निवड-णूक असा तोडतो. याचे निव-डणूक असे तुकडे केले किंवा कणकवलीचे तुकडे कणक-वली असे केले तर तो शब्द पटकन कळतच नाही. तसंच 'याला काही अर्थ आहे का?' या वाक्यातल्या 'अर्थ' या शब्दाचा उच्चार इंग्रजी Earth ( अsर्थ् ) सारखा केला तर कानाची आग मस्तकात जाते.
मी उच्चारग्रस्त व्हायला माझ्या आयुष्यात आलेले बहुतेक सगळे कारणीभूत आहेत.. जास्त करून मास्तर आणि मित्रमंडळी. एकीकडे, मराठी हिंदी सारख्या विषयांचे मास्तर स्पष्ट उच्चार करा म्हणून डोकंफोड करायचे. आणि इंग्रजी मधे, शब्दोच्चाराबद्दल 'स्पष्ट न बोललेलेच बरे' असा सूर असायचा. कधी इंग्रजी शब्दातल्या अक्षरांचे उच्चार करायचे नसतात तर कधी नसलेल्या अक्षरांचे उच्चार करायचे असतात. हे गौडबंगाल मला अजूनही कळालेलं नाही. त्यामुळे काही अक्षरांचे उच्चार नको तेव्हा केल्या / न केल्याने मी लोकांची खूप करमणूक केली आहे. इंग्रजीत R चा उच्चार न करायची एक प्रथा आहे. काय अघोरी प्रथा आहे! मराठीत नाही आहे ते किती बरं आहे ना? नाही तर 'नदीला पूss आला' म्हणावं लागलं असतं.
मराठी शाळेत इंग्रजी शिकण्याचा प्रमुख तोटा बरोबर उच्चार ऐकायला न मिळणे हा एक आहे. J चा उच्चार ज्ये करायचा असतो हे कळण्यासाठी मला बरीच उमेदीची वर्ष खर्च करायला लागली. Deaf चा उच्चार डेफ, डीफ नाही.. त्याचा उच्चार Leaf सारखा करायचा नसतो.. Oven चा आव्हन, Computer चा कंप्युटर, Sarah चा सेरा आणि Diana चा डायाना अशा अनेक उच्चारांची मौलिक भर माझ्या हितचिंतकानी कॉलेजात आणि नंतरच्या आयुष्यात घातली.
मात्र अमेरिकेत पाऊल ठेवल्यावर माझ्या बर्याच उच्चारांचं पानिपत झालं. अमेरिकन लोकं O चा उच्चार बर्याच शब्दात 'आ' असा करतात.. उदा. Project चा प्राजेक्ट व Honest चा आनेस्ट. तसंच ते 'I' चा उच्चार काही शब्दात 'इ' ऐवजी 'आय' करतात.. उदा. Vitamin चा व्हायटामिन किंवा Carolina चा कॅरोलायना. आपल्याकडच्या सुनीता (Sunita) या नावाचा उच्चार अमेरिकेत सनायटा होण्याची खूप शक्यता आहे. ज्या शब्दांचा शेवट tory ने होतो अशा काही शब्दांच्या अमेरिकन उच्चारात शेवटी टोरी येतो, उदा. Observatory आब्झर्व्हेटोरी, Inventory इन्व्हेटोरी. पण Laboratory चा उच्चार लॅब्रेटोरी कसा काय होतो ते ब्लडी अमेरिकनच जाणे! अजून काही उल्लेखनीय अमेरिकन उच्चार असे आहेत.. Niagara नायाग्गरा, Z चा झी, Connecticut कनेटिकट, Newark नुवर्क, Illinois इलिनॉय, Mature मॅटुअर, Tuition ट्युईशन, Coupon क्युपॉन.
अमेरिकेत असताना Schedule ला शेड्युल ऐवजी स्केड्युल म्हणायचं वळण जिभेला महत्प्रयासानं लावलं होतं. आता इंग्लंडात आल्यावर ते वळण परत सरळ करायचा आटोकाट प्रयत्न चाललाय. एकदा, Garage या शब्दाचा नेमका उच्चार काय हे माहीत नसल्यामुळे मी नेटवरच्या एका स्थळाची मदत घेऊन तो ऐकला. त्यानं मला गराज असा उच्चार सांगीतला. नंतर माझ्या गाडीचा इन्श्युरन्स काढायच्या वेळेला मला 'रात्री गाडी कुठे ठेवणार?' हा प्रश्न टाकताच, मी ऐटीने 'गराज' असं सांगीतलं. त्यावर २/३ मिनीटं विचार करून त्यांनं मला 'म्हणजे गॅरेज का?' असा प्रतिप्रश्न करताच माझा बँड वाजला. तिकडे त्याच्या चेहर्यावरचे 'न जाने कहाँ कहाँसे चले आते हैं' असे भाव मला फोन मधून स्पष्ट दिसले.
इंग्लंडमधेही मला सर्व सामान्य तर्काला तोंडघशी पाडणारे खूप उच्चार ऐकायला मिळाले. Edinburgh हे वाचल्यावर मी त्याचा पीटसबर्ग सारखा एडिन्बर्ग असा उच्चार केला. त्याचा खरा उच्चार एडिन्बरा ऐकल्यावर मात्र कानात 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' चे सूर घुमायला लागले. Gloucester, Bicester, Leicester, Worcester या गावांचे उच्चार अनुक्रमे ग्लोस्टर, बिस्टर, लेस्टर, वूस्टर असे होतात. त्यांच्या स्पेलिंग मधल्या ce या अक्षरांना उच्चारात काडीची किंमत नाही. पण Cirencester याचा उच्चार मात्र सायरनसेस्टर असा व्यवस्थित स्पेलिंगप्रमाणे होतो. 'H' चा उच्चार काही लोक 'हेच्य' असा करतात. हा उच्चार मी ऑस्ट्रेलियन आणि काही तमिळ लोकांकडूनही ऐकला आहे. Norwich चा नॉर्विच नसून नॉरिच, Greenwich ग्रिनिच आणि Derby चा डर्बी नसून डार्बी आहे. Plymouth Portsmouth चे उच्चार प्रथम दर्शनी प्लायमाउथ पोर्टस्माउथ असे वाटतील, प्रत्यक्षात ते प्लिमथ पोर्टस्मथ असे होतात. काही उल्लेखनीय उच्चार - Magdalen मॉडलेन, Tortoise टॉटस, Caius कीज.
शब्दांच्या शेवटी ham येत असेल तर त्याचा हंबरल्यासारखा 'हम' असा उच्चार होतो. उदा. Birmingham बर्मिंगहम, Fareham फेर्हम. याच नियमाने Cheltenham चा चेल्टन्हम असा व्हायला पाहीजे. निदान, माय फेअर लेडी मधे रेक्स हॅरिसन तरी तसा करतो. पण त्याचा सर्रास चॉल्टन्हम असा थोडा विचित्र उच्चार होतो. जॉर्ज बर्नार्ड शॉला असले उच्चार ऐकून किती हताश व्हायला झालं असेल याची आता मला थोडी फार कल्पना यायला लागली आहे. इंग्लंड मधे उत्तरेला न्यू कॅसल गावाच्या आजुबाजूला इंग्रजी या नावाखाली जे काही उच्चारतात ते इथल्या भल्याभल्यांना देखील पहिल्या फटक्यात कळत नाही. त्या उच्चार पध्दतीला जॉर्डी म्हणतात. त्यात dead डेडे, cow कू, house हूस, strong स्ट्रांग, out ऊट असे भयानक उच्चार होतात. याच्याही उत्तरेकडचे स्कॉटिश लोकांचे काही उच्चार असे आहेत.. Earth एर्थ, Pound पौंड, Time टैम.
रोमन लिपी बर्याच युरोपियन भाषेतले लिखाण करण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे या लिपीतल्या काही अक्षरांचा उच्चार भाषेप्रमाणे वेगवेगळा होतो. माझ्या मते 'J' हे अक्षर सगळ्यात जास्त प्रदूषित आहे. त्याचा स्पॅनिश भाषेत 'ह' असा उच्चार होतो. उदा. San Jose सॅन होजे, Jalapeno हालापेनो, Natasja नताशा. जर्मन भाषेत 'J' चा उच्चार 'य' असा होतो. उदा. Ja या, Jung युंग, Jogurt योगर्ट. एका भाषेत, बहुतेक स्विडीश, भाषेत 'J' चा उच्चार 'इ' असा होतो. उदा. Fjord फिओर्ड, Bjorn बिऑन. तसंच 'V' चा उच्चार जर्मन भाषेत काही वेळा 'फ' असा होतो. उदा. Volkswagon फोक्सवॅगन, Von Neumann फोन नॉयमन.
इंग्रजी भाषेत इतर भाषांमधले भरपूर शब्द घुसले आहेत आणि त्यांचा जमेल तसा उच्चार केला जातो. Avatar या चित्रपटाच्या नावाचा अॅवॅटार असा प्रचंड विनोदी उच्चार केला जातो. Memoir मेम्वा, Paris पारी, Artois आर्ट्वा, envelope आन्व्हलोप, Peugeot पेजो, Renault रेनो, Louis लुई असे काही फ्रेंच शब्दांचे उच्चार आहेत. यांचे भलतेच इंग्रजी उच्चार ऐकून फ्रेंचांचीही बहुधा करमणूक होत असेल, कारण माय फेअर लेडी च्या 'व्हाय कान्ट द इंग्लिश लर्न टू स्पीक' या गाण्यात म्हंटल्याप्रमाणे ते कडवे उच्चारवादी लोक आहेत..
Why can't the English
Teach their children how to speak
Norwegians learn Norwegian
The Greeks are taught their Greek
In France every Frenchman
Knows his language from A to Zed
The French don't care what they do actually
As long as they pronounce it properly
इतकी वर्ष इतका शब्दच्छळ करून, ऐसे उच्चार मेळवून मी एवढंच तात्पर्य माझ्यापुरतं काढलंय की कुणीही उच्चाराबद्दल काही सांगीतलं तर फारसं मनावर घ्यायचं नाही.
(टीप :- हा सर्व लेख ऐकीव माहितीवर आधारित आहे. )

Sunday, January 17, 2010
अवकाश वेध
ऑक्सफर्डच्या हिस्टरी ऑफ सायन्स म्युझियम मधे अॅस्ट्रोलेब (Astrolabe) या एका जुन्या बहुपयोगी उपकरणाबद्दलची माहिती ऐकण्याचा योग नुकताच आला. ते यंत्र पूर्वी त्या म्युझियममधे पाहिलेलं होतं पण त्याचा वापर तेव्हा कसा करायचे ते समजलं नव्हतं. त्यामुळे ते भाषण ऐकायला उत्सुकतेने गेलो.
अॅस्ट्रोलेब हे वेळ बघण्यासाठी तसेच आकाशातील ग्रह व तारे यांच्या जागा शोधण्यासाठी वापरलं जायचं. ते ८ व्या शतकात मुस्लिम देशामधे वापरायचे. तिथून १२ व्या शतकात ते युरोपात आले. भाषणात ते यंत्र दाखवून ते कसं वापरायचं याचं व्यवस्थित प्रात्यक्षिक दिलं. त्या दिवसापासून यावर एक लेख लिहायला पाहीजे असं डोक्यात घोळत होतं. पण प्रत्यक्ष हातात यंत्र न घेता आणि तुम्ही समोर नसताना तुम्हाला ते कसं सांगावं याचा विचार चालू होता आणि अधिक माहितीसाठी गुगल करणंही चलू होतं. इंटरनेट हे एक मोठं रद्दीच दुकान आहे, त्यात काहीही सापडतं किंवा कधी कधी काहीच नाही. सुदैवाने माझ्या हाती एक खजिनाच हाताला लागला. हा लेख त्या मिळालेल्या खजिन्याबद्दल आहे.
अॅस्ट्रोलेबचा इतिहास इथे आहे.
या व्हिडिओत अॅस्ट्रोलेबने वेळ कशी बघायची याचं प्रात्यक्षिक दिसेल.
अॅस्ट्रोलेब सारखा चालणारा कंप्युटर प्रोग्रॅम एका स्थळावर मिळाला. तो जुन्या काळच्या डॉसवर चालणारा आहे. त्याच्या प्रोग्रॅमरच्या म्हणण्या प्रमाणे तो विंडोजवर पण चालतो. माझ्या पीसीवर तो प्रोग्रॅम चालवल्यावर माझ्याकडच्या विंडोजने मोठ्ठा आ वासला, तो रिसेट केल्यावरच बंद झाला. मग आणखी शोधाशोधी केल्यावर बरेच वेगवेगळे प्रोग्रॅम सापडले. त्यातले काही अॅस्ट्रोलेब सारखे चालणारे आहेत तर काही नाही. त्यातले काही फुकट आहेत तर काही नाही. मी या लेखात एका फुकट प्रोग्रॅमचा दुवा आणि तो कसा चालवायचा याची थोडी फार माहिती दिलेली आहे. पण सगळेच आकाशाचा वेध घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. हे प्रोग्रॅम तुम्ही सागितलेल्या शहरावरचे आकाश दाखवतात.. तुमच्या शहराचे अक्षांश व रेखांश त्यात सुरुवातीला घातल्यावर. नासाने १५ जानेवारीच्या सूर्यग्रहणाचा मार्ग दाखविण्यासाठी गुगलचा नकाशा वापरून एक स्थळ बनवले आहे. हा नकाशा झूम करून आपल्या शहरावर टिचकी मारली तर अक्षांश रेखांश कळतील. या स्थळावरून आपल्याला पाहीजे त्या शहराचे अक्षांश व रेखांश मिळवता येतील.
एक मुद्दाम नमूद करण्यासाठी गोष्ट म्हणजे या प्रोग्रॅममधे आपल्याला पाहिजे ती तारीख आणि वेळ घालता येते. त्या वेळेची आकाशातली ग्रह तार्यांची स्थिती कळते. मग आपल्याला हवी तशी वेळ मागे पुढे करून ती स्थिती कशी बदलतेय ते प्रत्यक्ष बघता येते, थोडक्यात अॅनिमेशन करता येते. अॅनिमेशन बघण्यासाठी मी नुकतंच झालेलं १५ जानेवारी २०१० चं सूर्यग्रहण त्यावर पाहीलं. आधी मी प्रोग्रॅममधे ऑक्सफर्ड हे शहर घातलं होतं. पण अॅनिमेशन मधे ग्रहण दिसेना, चंद्र नुसताच सूर्याच्या बाजूने जात होता. मग लक्षात आलं की ते ग्रहण इंग्लंडमधे दिसणारच नव्हतं. नंतर रामेश्वरचे अक्षांश रेखांश घातल्यावर दिसलं. कुठल्याही जागेचे अक्षांश रेखांश घालून तिथलं आकाश घरबसल्या बघता येणं हा या प्रोग्रॅमचा अजून एक मोठा फायदा आहे.
इथे 'हेलो नॉर्दर्न स्काय' हा प्रोग्रॅम मिळेल. याचं नावं जरी 'हेलो नॉर्दर्न स्काय' असलं तरी दक्षिण गोलार्धातील शहरांसाठी सुध्दा हा प्रोग्रॅम चालतो (मी चालवून नाही बघितला अजून). याची दोन व्हर्जन्स आहेत. सुरुवातीला त्यातलं Small basic package HNSKY230.exe हे घेऊन Install करा. प्रोग्रॅम सुरू करून प्रथम File->Settings मधे जाऊन तुम्हाला हव्या त्या शहराचे अक्षांश रेखांश व टाईमझोन घाला.
माझं खगोलशास्त्राचं ज्ञान यथातथाच असल्यामुळे, या प्रोग्रॅममधे वापरलेल्या संज्ञा आणि प्रोग्रॅममधून काय आणि कसं दिसतं ते समजून घेण्यात बराच वेळ गेला. तुमचा कदाचित तेवढा वेळ जाणार नाही. तरीही माहिती नसणार्या वाचकांचा वेळ जाऊ नये म्हणून मी काही माहिती खाली दिली आहे ती उपयोगी पडेल असं वाटतं.
हा प्रोग्रॅम सेलेस्टियल स्फिअर (वैश्विक गोल) दाखवतो. वैश्विक गोल म्हणजे पृथ्वी भोवती गृहित धरलेला, प्रचंड आकाराचा एक गोल. याचा आणि पृथ्वीचा मध्यबिंदू एकच असतो. या संबंधीच्या काही संज्ञा खालील आकृतीवरून समजतील. आपलं शहर उत्तरेला जेवढं जास्त तेवढा धृव तारा आकाशात जास्त उंच (लॅटिट्युड) दिसतो. पृथ्वीचा मध्यबिंदू आणि पृथ्वीचा उत्तर धृव यातून काढलेली सरळ रेषा वैश्विक गोलाला जिथे छेदते तो नॉर्थ सेलेस्टियल पोल (वैश्विक उत्तर धृव). अशीच व्याख्या वैश्विक दक्षिण धृवाची करता येते. या गोलाचेही विषुववृत्त असते त्याला सेलेस्टियल इक्वेटर (वैश्विक विषुववृत्त) म्हणतात. पृथ्वीचं विषुववृत्त सर्व बाजूंनी वाढवले तर ते वैश्विक गोलाला जिथे मिळेल ते. पृथ्वीचा मध्यबिंदू आणि आपलं डोकं यातून काढलेली सरळ रेषा वैश्विक गोलाला जिथे छेदते तो बिंदू म्हणजे झेनिथ! आपल्या शहराच्या जमिनीला स्पर्श करून जाणारे वर्तुळ सर्व बाजुंनी वाढवले तर ते वैश्विक गोलाला जिथे मिळेल ते वर्तुळ म्हणजे क्षितीज. क्षितीजाच्या वर असलेले ग्रह तारे आपल्याला दिसू शकतात, खालचे नाही.
आता असं समजा की पृथ्वीचा मध्यबिंदू आणि कुठलाही तारा यातून काढलेली सरळ रेषा वैश्विक गोलाला जिथे छेदते त्या बिंदूला तो तारा चिकटवलेला आहे. अशारीतिने सर्व ग्रह तारे चिकटवल्यावर तो गोल जसा दिसेल तसा गोल आपल्याला प्रोग्रॅममधून दिसतो. आपण गोलाकडे गोलाच्या बाहेरून पहात असतो. पृथ्वी स्वतः भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे जसजशी फिरते तसतसा हा गोल पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतोय असं भासतं. वैश्विक उत्तर धृव, झेनिथ, वैश्विक दक्षिण धृव या मधून जाणारे वर्तुळ म्हणजे मेरिडियन. घराच्या गच्चीत दक्षिणोत्तर दोरी बांधा, ही दोरी मेरिडियनला समांतर असेल. आता दोरीखाली डोकं उत्तरेकडे आणि पाय दक्षिणेकडे करून रात्रीच्या वेळी आकाशाकडे बघत पडा. तारे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतील.
इक्लिप्टिक (Ecliptic) म्हणजे सूर्याचा वैश्विक गोलावरचा मार्ग. प्रोग्रॅममधे हा मार्ग तपकिरी रंगाच्या तुटक रेषेने दाखवला आहे. चंद्र आणि इतर ग्रह या रेषेच्या जवळपासच दिसतील, कारण पृथ्वीसकट सर्व ग्रह जवळपास एकाच पातळीत सूर्याभोवती फिरतात. वैश्विक गोलावर चिकटवलेल्या तार्यांच्या अक्षांश रेखांशाला डेक्लिनेशन (Declination) आणि राइट असेन्शन (Right Ascension) म्हणतात. प्रोग्रॅममधे हे आकडे डाव्या बाजूच्या वरच्या कोपर्यात दिसतात. या प्रोग्रॅमचा एक स्क्रीनशॉट खाली दिला आहे.

स्क्रीनशॉट मधे क्षितीज मातकट रंगाच्या ठळक रेषेने दाखवलं आहे. क्षितिजावर SE, S, SW अशी अक्षरं दिसतील. याचा अर्थ आत्ता स्क्रीनवर दक्षिणेकडचं आकाश दिसत आहे. जर कर्सर स्क्रीनच्या अगदी उजवीकडच्या, डावीकडच्या, वरच्या किंवा खालच्या बाजूकडे नेला तर एक बाण दिसेल. तिथे क्लिक केलं तर त्याबाजूचं आकाश स्क्रीनवर दिसेल. ज्या तुटक रेषेच्या आजुबाजुला चंद्र, गुरू आणि युरेनस दिसत आहेत ती रेषा म्हणजे इक्लिप्टिक.
सुरुवातीला Screen मेन्यूमधील Altitude grid, Constellations, Orthographic Projection हे सेट करा. Objects मेन्यूमधील Name all stars, stars, planets हे सेट करा. यामुळे स्क्रीनवर जरा कमी गर्दी दिसेल. Date मेन्यूमधील Enter date, time वापरून पाहिजे ती तारीख, वेळ निश्चित करता येईल. त्यानंतर F3, F4 दाबून मिनिटं मागे पुढे, F5, F6 दाबून तास मागे पुढे किंवा F7, F8 दाबून दिवस मागे पुढे करता येईल. यातली कुठलेही बटण सतत दाबून धरले तर अॅनिमेशन दिसेल. नंतर कधीही Date मेन्यूमधील Now वापरून चालू वेळ परत आणता येईल. त्याच मेन्यूमधील Follow System Time वापरलं तर घड्याळ जसजसं पुढे जाईल तसतशा ग्रह, तार्यांच्या नवनवीन जागा स्क्रीनवर दिसतील.
स्क्रीनवरच्या कुठल्याही ग्रह तार्यावर क्लिक केलं तर त्या वस्तूचं नाव आणि डेक्लिनेशन आणि राइट असेन्शन दिसेल. नंतर Ctrl + Alt + L दाबलं तर ती वस्तू लॉक होते. म्हणजे अॅनिमेशन मधे ती सतत स्क्रीनवर रहाते नाहीतर दिसेनाशी होण्याची शक्यता असते.
या सूचनांच्यामुळे हा प्रोग्रॅम वापरणे सुलभ होईल अशी आशा आहे. अवकाश वेधाचा आनंद लुटा.
हा प्रोग्रॅम हान क्लाइन या डच माणसानं बरीच वर्ष घालून लिहीला आहे. तो एक हौशी खगोल अभ्यासू आहे. हा प्रोग्रॅम लिहून तो फुकट इतरांना उपलब्ध करून दिल्याबद्दल त्याचं कौतुक करावं तेवढं थोडच आहे. इतकच नाही तर तुम्ही त्याला काही अडचणी आल्यास मेल टाकून प्रश्न विचारू शकता. त्याचा मेल आयडी आहे - han.k@hnsky.org. प्रोग्रॅम आवडला तर त्याला आभाराचा संदेश जमलं तर पाठवा.
हा प्रोग्रॅम एक उत्कृष्ट शैक्षणिक साधन आहे. याचा वापर करून अवकाशाचा अभ्यास करा. आपल्या ओळखीच्या सर्वांना हा जरूर द्या, दाखवा, शिकवा. मी अजून हा प्रोग्रॅम पूर्णपणे वापरायला शिकलेलो नाही, परंतु जेव्हा काही नवीन इंटरेस्टिंग गोष्टी कळतील तेव्हा मी याच लेखात त्या टाकेन.
== समाप्त ==
जाता जाता --
आकाशात काही ग्रह कधी कधी उलटे फिरताना दिसतात. वास्तविक सर्वच ग्रह सूर्याभोवती घड्याळाच्या काट्याच्या विरुध्द दिशेने फिरतात. पण पृथ्वीवरून पहाताना काही ग्रह मधेच उलटे जाताना दिसतात. असं का होतं याच या अॅनिमेशन मुळे व्यवस्थित कळेल. वक्री मंगळ

Subscribe to:
Posts (Atom)