जॉर्ज बुश त्याच्या टेक्सास मधल्या रँच वरच्या तळ्यात पाय बुडवून निवांतपणे विचारशून्य अवस्थेत मासे पकडत बसला होता. तसं 'विचारशून्य बुश' हे गाईचं गोमूत्र किंवा पिवळा पीतांबर म्हंटल्या सारखचं! आजुबाजूला ४-५ बॉडीगार्डस आपण त्या गावचेच नाही असं भासवायचा प्रयत्न करत उभे होते. वॉर ऑन टेररची घोषणा करून वर्ष दीड वर्ष होऊन गेलेलं होतं. जिकडे तिकडे विविध देशांचे सैनिक बिन-लादेन साठी गळ टाकून बसले होते, पण तो बिन-धास्त होता. दोन्हीही गळ टाकूंना यश नव्हतं.. आता गळ म्हंटल्यावर कसं कोण सापडणार? खरं तर बुशला 'ओसामा बिन लादेन' हे नाव मनातून फार आवडायचं, भारदस्त वाटायचं. डोक्यात खोल कुठेतरी स्वत:च नाव 'ओसामा बिन बुशेन' असं काहीतरी करावं असा पण विचार चालायचा. काही झालं तरी बुशच्या लोकप्रियतेला बिन लादेन मुळे उधाण आलं होतं.. अल्ला मेहरबान तो गधा पेहलवान म्हणतात तसं.. त्याबद्दल बुशला कृतज्ञता होती.. पण हे तो उघडपणे बोलू शकत नव्हता.
'मि. प्रेसिडेन्ट, आपल्याला डोनल्ड रम्सफेल्ड साहेबांचा फोन आहे'.. अचानक त्याची खाजगी सचिव, मार्गारेट ऊर्फ मॅगी, चिवचिवली आणि बुश एका विचारशून्य अवस्थेतून दुसर्या विचारशून्य अवस्थेत गेला. आधीची सेक्रेटरी, नताशा, बाळंतपणाच्या रजेवर गेल्यानंतर मॅगी नुकतीच जॉईन झाली होती.. पण अजून ती बुशच्या अंगवळणी पडली नव्हती.
'आयला! तू कोण? सिक्युरिटीssssssssssssssssss!'.. जरासा अनोळखी चेहरा दिसला तरी बुशला ती अतिरेक्यांची चाल वाटून छातीत धडधड व्हायची! पण आजुबाजूच्या ४-५ बॉडीगार्डस पैकी एकही धावत आला नाही. त्यांच्या ते अंगवळणी पडलेलं होतं!
'सर! मी मॅगी! नवीन सेक्रेटरी!'.. मॅगीनं न कंटाळता सुमारे ७३व्यांदा तेच उत्तर दिलं.
'मॅगी? ही नताशा आताशा दिसत नाही ती? कुठे गेली?'
'सर, ती बाळंतपणाच्या रजेवर गेली आहे! आणि आपल्याला डोनल्ड रम्सफेल्ड साहेबांचा फोन आहे'.. मॅगी थंड सुरात म्हणाली. बुशच्या दुर्लक्षामुळे मॅगीला उपेक्षितांचे अंतरंग अंतर्बाह्य उमजलं होतं.. कधी कधी तिला वाटायचं - एकवेळ क्लिंटनचं 'संपूर्ण' लक्ष चालेल पण बुशचं दुर्लक्ष नको!
'आयला! या डोनल्ड डकला हीच वेळ सापडली का? त्याला सांग एक मासा गावला की लगेच फोन करतो म्हणून!'.. माशांबरोबर चाललेल्या लपंडावात व्यत्यय आलेला बुशला खपत नाही.
'पण सर! ते अर्जंट मॅटर आहे म्हणतात!'.. त्यावर बुशचा चेहरा शँपेन मधे माशी पडल्यासारखा झाला.
'अगं! माशांचं मॅटर पण अर्जंटच आहे म्हणावं! तळलेले मासे तर फारच डिलिशस मॅटर असतं! ऑsss!'.. बुशच्या पायाला अचानक एक मासा चावून गेल्यानं तो कळवळला.. गळाला लावलेल्या मॅटर पेक्षा माशांना बुशच्या पायाचं मॅटर जास्त डिलिशस वाटलं असावं.
'सर! खरंच फार सीरियस मॅटर आहे म्हणत होते'.. मॅगी काकुळतीला आली.
'व्हॉटिज द मॅटर?'
'वेल! ते म्हणत होते की .. इटिज द मॅटर ऑफ द अँटी मॅटर दॅटिज द मोस्ट इंपॉर्टन्ट मॅटर! अॅज अ मॅटर ऑफ फॅक्ट, इटिज नॉट एक्झॅक्टली अ मॅटर देअरफर नॉट अॅन ऑर्डिनरी मॅटर, बट अ मॅटर ऑफ लाईफ अँड डेथ!.. असं बर्याच वेळा मॅटर मॅटर म्हणाले! त्यावरून मला काहीतरी अर्जंट मॅटर आहे इतकंच समजलं!'.. कशाचाही अर्थबोध न होणारी सर्व वाक्यं लक्षात ठेवून, जशीच्या तशी, एका पाठोपाठ एक, धडाधड फेकण्याचं तिचं कौशल्य खरंच अफलातून होतं.. आपल्याकडच्या कुठल्याही परीक्षेत ती सहज पहिली आली असती.
'ओ माय गॉड! व्हॉटिज द मॅटर विथ यू?'.. मॅटरची मात्रा उगाळून उगाळून लावल्याने बुशच्या ग्रे मॅटरची पुरती वाट लागली.
'सर! आय मीन, देअर इज सम अर्जंट मॅटर ऑफ द अँटी मॅटर!'
'आँ! अगं नक्की काय ते सांग ना! अर्जंट मॅटर की अँटी मॅटर?'.. काही लोकांना बेडरुम, बाथरुम सारखंच मशरुम पण वाटतं त्यातला प्रकार!
'सर, दोन्हीही!'
'श्या! काय छपरी आहे लेकाची! साध्या एका मॅटर बद्दल धड बोलेल तर शप्पत! नुसती मॅटर मॅटर करतेय.. हिला पण मॅटर्निटी लीव्हवर पाठवायला पाहीजे' .. बुश स्वतःशीच पुटपुटला, मग तिला म्हणाला.. 'बरं जा! मॅटर घेऊन ये.. आय मीन.. फोन घेऊन ये!'
'सर, फोन इकडे आणता येत नाही! सिक्युअर लाईन आहे'
'आयला! सिक्युअर म्हणजे लाईन काय खांबाला सिक्युअर केली आहे काय? बरं! मी येतो तिकडे!'
बुश गळ टाकून.. म्हणजे सोडून.. फोन घ्यायला गेला.
'अरे डोनल्ड! लेका काय जगबुडी आली की काय? तुला मी कित्ती वेळा सांगितलंय की मला मासे पकडत असताना पकडू नकोस.. आय मीन.. डिस्टर्ब करू नकोस म्हणून! पटकन सांग आता काय मॅटर आहे ते? तिकडे मासे माझी वाट पहात आहेत!'
'सॉरी मि. प्रेसिडेन्ट! पण काय करणार मॅटरच तसं आहे! फॅक्ट ऑफ द मॅटर इज, मला तुम्हाला सांगणं भागच होतं, नो मॅटर व्हॉट यू आर डुइंग! इट्स अ मॅटर ऑफ द अँटी मॅटर! यू नो? देअर इज धिस अँटी मॅटर विच इज नॉट रिअली ए मॅटर!'. आज सगळ्यांना मॅटरची ढाळ का लागली आहे ते बुशच्या आकलनशक्तीच्या बाहेरचं होतं.
'डोन्या! मला जरा नीट सांगशील का?'
'सर! ते फोनवर सांगता येणार नाही! देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. तुम्ही ताबडतोब वॉशिंग्टनला या! मी डिफेन्सच्या शास्त्रज्ञांबरोबर आपली एक मिटिंग अॅरेंज केलेली आहे. त्यात सगळा उलगडा होईल'. देशाची सुरक्षितता म्हंटल्यावर बुशला काही पर्याय राहीला नाही. ९/११ च्या आधी असंच दुर्लक्ष केल्यामुळे फार मोठी नामुष्की झाली होती.. जगज्जेत्या मुष्टिधारकाच्या आकडेबाज मिशा त्याच्याच नाकावर बसून दिवसाढवळ्या कुरतडल्यासारखी! परत तसंच केलं तर तो निवडून येण्याची शक्यताच नव्हती. मॅगीला त्याने ताबडतोब एका विमानाची व्यवस्था करायचं फर्मान सोडलं.
'सर! एअरफोर्स वन विमानतळावर सज्ज आहे!'.. तिला कल्पना होतीच.
'अगं! मी येताना त्याच विमानाने आलो ना? आता जाताना एअरफोर्स टू ने जातो. म्हणजे अतिरेक्यांवर सॉलिड गेम पडेल. हे बघ! ९/११ नंतर मी प्लॅन केलेलं काहीच करायचं नाही असं ठरवलंय!'.. बुश 'व्हॉट अॅन आयडिया सरजी!' असा चेहरा करून डोळे मिचकावत म्हणाला.
'सर! ते 'एअरफोर्स टू'च आहे. पाटी बदलली आहे फक्त!'.. आता मॅगीने 'व्हॉट अॅन आयडिया सरजी!' असा चेहरा करून डोळे मिचकावले.
'वा! वा! ब्रिलियंट! बहोत खूब!'.. 'आपण त्याचं घर उन्हात बांधू हां!' म्हंटल्यावर पोरं कशी खुलतात तसा बुश खूष झाला.. आणि त्याला प्रथमच मॅगीबद्दल थोडा आदर वाटायला लागला.
व्हाईट हाऊसच्या मिटिंग रूम मधे बुशने पाऊल ठेवलं. तिथे स्टेट सेक्रेटरी कॉलिन पॉवेल, डिफेन्स सेक्रेटरी डोनल्ड रम्सफेल्ड, सेक्रेटरी ऑफ होमलॅन्ड सिक्युरिटी टॉम रिज आणि असेच बरेचसे सटर फटर सेक्रेटरी व डिफेन्स मधले तज्ज्ञ शक्य तितके लांब चेहरे करून बसले होते. मधून मधून शेजारच्याशी हलक्या आवाजात हातातल्या कागदांवर काहीतरी खुणा करत बोलत होते.
'हं! बोला काय प्रॉब्लेम आहे ते!'.. बुशने वेळ न घालवता मुद्द्याला हात घातला.. कारण त्याला लगेच परत जाऊन माशांना हात घालायचा होता.
'सर! सीआयए कडून एक इंटेलिजन्स रिपोर्ट आलाय. इराक वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन बनविण्याच्या प्रयत्नात आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यात तालिबान पण सामील असावं असा अंदाज आहे. ते जर खरं असेल तर तालिबान इथे 'रिटर्न ऑफ ९/११' करून हलकल्लोळ माजवेल'.. टॉम रिजने सूतोवाच केलं.
'आपल्याला माहिती पण नसलेलं असं कुठलं वेपन असणार ते? कुठलंही असलं तरी नोहाऊ आपल्याकडूनच ढापला असणार ना त्यांनी!'.. बुशला अमेरिकेच्या तंत्रज्ञानातल्या आघाडीबद्दल तिळमात्र देखील शंका नव्हती.
'नाही सर! त्याचा नोहाऊ आपल्याकडे नाही!'.. बुशला परत माश्याने चावा घेतल्याचं फिलिंग आलं.
'आँ! असं काय आहे जगात की जे अमेरिकन शास्त्रज्ञांनी शोधलेलं नाही!'
'आहे सर! इंटरनेट!'.. एक शास्त्रज्ञ पचकला.. तो मूळचा युरोपातला होता.
'हॅ! इंटरनेटसारखं चिल्लर काहीतरी नका सांगू हो! असो! काय नवीन वेपन आहे ते?'
'सर, ते अँटी मॅटर बाँब बनवत आहेत असं सीआयएचं म्हणणं आहे'.. परत मॅटरने डोकं वर काढल्यामुळे बुश खवळला.
'आरे! काय सकाळपासनं सगळे मॅटर अँटी मॅटर बडबडताहेत? मला कुणी साध्या सोप्प्या भाषेत या मॅटर बद्दल सांगणार आहे का?'.. पॉवेलनं एका शास्त्रज्ञाला खूण केली आणि तो बोलू लागला.
'मि. प्रेसिडेन्ट! आपल्या विश्वातल्या सर्व वस्तू ज्या पासून बनलेल्या आहेत त्याला मॅटर म्हणतात.. हे पेन, कागद, टेबल, कपडे, जमीन, गाड्या, घरं सगळं सगळं मॅटर पासून बनलंय! अँटी मॅटर म्हणजे असं मॅटर की जे मॅटर नाहीये.. पण मॅटरसारखं आहे. म्हणजे आपण अँटी मॅटरने बनलेल्या जगाची कल्पना केली तर त्यात सुद्धा हे पेन, कागद, टेबल, कपडे, जमीन, गाड्या, घरं.. सगळं सगळं असेल पण अँटी मॅटर पासून बनलेलं! त्यात अँटी माणसं असतील अँटी ऑक्सीजनवर जगणारी आणि अँटी जमिनीवर चालणारी, अँटी प्रोटॉन आणि अँटी इलेक्ट्रॉन म्हणजे पॉझिट्रॉन पासून बनलेला अँटी हायड्रोजन वायू असेल, असे प्रत्येक गोष्टींचे अँटी अवतार असतील. पण.. पण.. (इथे एक ड्रॅमॅटिक पॉझ) मॅटर आणि अँटी मॅटर एकत्र राहू शकत नाहीत. ते एकमेकांच्या संसर्गात आल्यावर एकमेकांना नष्ट करतात. व्हेन मॅटर अँड अँटी मॅटर इंटरॅक्ट, बोथ मॅटर अँड अँटी मॅटर सीझ टु मॅटर'.
'ऑं? नष्ट करतात? म्हणजे नक्की काय करतात?'
'म्हणजे एक ग्रॅम मॅटर आणि एक ग्रॅम अँटी मॅटर एकत्र आले तर २ ग्रॅम इतके मास (वस्तुमान) भस्मसात होऊन प्रचंड ऊर्जा बाहेर पडते.. E=mc**2 या सूत्राप्रमाणे! काहीही शिल्लक रहात नाही.'
'काहीच शिल्लक रहात नाही?.. राख, धूर वगैरे तरी राहीलच की!'.. बुशला ती कल्पना अल्कोहोल विरहीत बिअर सारखी वाटली.
'नो सर! काहीच नाही! नो मास! म्हणून तर आम्ही त्याला वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन म्हणतो!'.. आता जोर 'मास' वर आला.
'आय सी! इटिज नॉट अ स्मॉल मॅटर देन!'.. बुशला नवीन शस्त्राची अंधुक कल्पना आल्यासारखं वाटलं.
'सर! बट देअरिज नो मॅटर लेफ्ट'.. 'नो' वर जोर देत शास्त्रज्ञ म्हणाला.. शास्त्रज्ञांना सगळं कसं अगदी प्रिस्साईज बोलायला लागतं.
'ओके ओके! पण मला सांगा, हे त्या लोकांनी कसं शोधलं? आपल्या शास्त्रज्ञांना कसं काय माहिती नाही याबद्दल?'.. माणसाची निर्मिती पण अमेरिकन शास्त्रज्ञांनीच केली असणार इतका बुशचा त्यांच्यावर अंध विश्वास होता!
'सर! आपल्याला माहिती होतं त्याबद्दल! पॉल डिरॅक या इंग्लिश शास्त्रज्ञाने त्याचा शोध लावलाय.. खूप पूर्वी.. १९२८ मधे. पण कुणाला त्याचा बाँब बनवता येईल असं का वाटलं नाही ते माहीत नाही!'.. मधेच पॉवेलनं आपलं ज्ञान पाजळलं.
'त्याचं काय आहे सर, अँटी मॅटर सहजा सहजी मिळत नाही! खरं तर विश्वाची निर्मिती झाली तेव्हा मॅटर आणि अँटी मॅटर सम प्रमाणात निर्माण झालं होतं. पण आत्ता पाहीलं तर विश्वात सर्वत्र मॅटरच पसरलेलं दिसतंय. अँटी मॅटर कुठे गुल झालंय कुणास ठाऊक? त्याचा पत्ताच नाही'.. आता रम्सफेल्डला पण चेव चढला.
'अरे! तुम्ही गुगल करून पहा. गुल झालेल्या सर्व गोष्टी गुगल मधे सापडतात'.. ही सूचना ट्रॅफिक जॅम मधे सापडलेल्याला पार्किंग तिकीट देण्याइतकी मूर्खपणाची होती. आपल्यालाही थोडं फार समजतं असं शास्त्रज्ञांना दाखवायची खुजली बुशला नेहमीच व्हायची.
'विथ ड्यु रिस्पेक्ट मि. प्रेसिडेन्ट! पण नाही सापडलं!'.. आलेला सर्व वैताग 'मि. प्रेसिडेन्ट'च्या उच्चारात कोंबत एक शास्त्रज्ञ फणकारला.. मोठ्या पदावरच्या माणसाबरोबर बोलताना झालेली चिडचिड त्याच्या पदाच्या उल्लेखात दडपायची असते हे सर्वज्ञात होतं.
'मग नक्कीच ते अतिरेक्यांनी पळवलं असणार. दुसरं काय?'.. कधी मासे मिळाले नाही तर त्याचा ठपका बुश अतिरेक्यांवर ठेवायचा.
'एक्झॅक्टॅली सर! सीआयएचं तेच म्हणणं आहे. अतिरेक्यांनी ते पळवून इराकच्या आटलेल्या तेलविहीरीत लपवून ठेवलं आहे असा संशय आहे. तुम्ही नुसता इशारा करा, ८ दिवसात इराकवर कब्जा करून सगळं अँटी मॅटर तुमच्यापुढे हजर करतो. दॅट विल एंड द मॅटर वन्स अँड फॉर ऑल'.. युद्ध पिपासू रम्सफेल्ड चुकून एक शास्त्रीय सत्य बोलून गेला. सर्व शास्त्रज्ञांच्या कळपाला मात्र अँटी मॅटरचा आडोसा करून मोठी रिसर्च ग्रँट मिळवण्यात जास्त रस होता.
'अरे भाऊ! पण असा कसा काय एकदम हल्ला करता येईल? काही तरी ठोस कारण हवं! यूएन काय म्हणेल?'.. पॉवेलची राजनैतिकता जागी झाली. अँटी मॅटर वापरून इराक वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन बनविण्याच्या प्रयत्नात आहे, हे जगाला सांगितलं तर, अँटी-वॉर लॉबी आपल्याला उघडपणे विरोध करेल, असं वाटल्यामुळे, कुठेही अँटी मॅटरचा उल्लेख न करता, नुसतंच वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन असं म्हणायचं ठरलं.
'पण मला एक सांगा! या अँटी मॅटर बाँबची वात मॅटरची असेल की अँटी मॅटरची?'.. बुशच्या वातुळ प्रश्नाने शास्त्रज्ञांना वात आला.. सर्व सेक्रेटरींनी मख्ख चेहरा करून शास्त्रज्ञांकडे पाहीलं. शास्त्रज्ञांच्या डोळ्यासमोर उदबत्तीने लवंगी फटाका लावणारा बुश आला. परत एकदा 'ड्यु रिस्पेक्ट' दिल्यावर एका शास्त्रज्ञाने त्याला अँटी मॅटर आणि मॅटर यांची भेसळ करून चालत नाही याची परत आठवण करून दिली.
'येस्स्स! मला एक आयडिया सुचली आहे. आपण अँटी मॅटर वापरून अँटी टेररिस्ट निर्माण करू या! म्हणजे, जेव्हा टेररिस्ट आणि अँटी टेररिस्ट दोन्ही एकमेकांना भेटतील तेव्हा एकमेकांना कायमचे नष्ट करतील'.. बुशची अजून एक 'व्हॉट अॅन आयडिया सरजी!' मोमेंट!
'ग्रेट आयडिया! खरच सॉलिड आयडिया!'.. रम्सफेल्डनं भरभरून दाद दिली आणि बुशने मान ताठ करून बाकिच्यांकडे पाहीलं.
'मला वाटतं, आपण अँटी मॅटर वापरून टेररिस्ट निर्माण करायला पाहीजेत. कारण, अँटी-मॅटर वापरून केलेले अँटी-टेररिस्ट हे टेररिस्टच होतील.. दोन अँटी एकमेकांना कॅन्सल करतील म्हणून'.. टॉम रिजचं एक अभ्यासपूर्ण मत!
'मला वाटतं हे सगळं संशोधन करण्यासाठी आपल्याला एक नवीन सुसज्ज प्रयोगशाळा हवी. 'नवीन' या साठी की त्यामुळे ती आपल्याला गुप्त ठेवता येईल!'.. एका शास्त्रज्ञाची 'लोहा गरम है हाथोडा मार दो' मोमेंट!
ताबडतोब बुशने उदार मनाने कित्येक हजार कोटी डॉलरचं बजेट गुप्त प्रयोगशाळेसाठी दिलं. अँटी मॅटर अस्तित्वात असलं तरी ते काही मिली सेकंदाच्या वर टिकत नाही, हे शास्त्रज्ञांना माहिती होतं.. त्यांच्या वर्तुळात अँटी मॅटर ही एक टर उडवायची गोष्ट झाली होती. वॉर ऑन टेरर मुळे संशोधनाचं बजेट कमी करून डिफेन्सचं वाढवलेलं होतं. त्यामुळेच त्यांनी ते पैसे आनंदाने घेऊन त्यांच्या आवडत्या संशोधनावर घालवले. असामान्य गुप्ततेमुळे कुणालाच ते शास्त्रज्ञ कशावर आणि का काम करत आहेत ते समजायला मार्ग नव्हता.
दरम्यान, तिकडे प्रचार यंत्रणांनी, वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शनचा बागुलबुवा दाखवून युद्धाची संमती मिळवली. युद्ध करून, इराक काबीज करण्यात आलं. लगेच तिकडे शास्त्रज्ञांची टीम अँटी मॅटरचा शोध घ्यायला पाठविण्यात आली. अपेक्षेप्रमाणे, त्यांच्या हाताला अँटी मॅटरच काय कुठलंही सटर फटर मॅटर लागलं नाही.
शेवटी, वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शनचं मॅटर क्लोज केल्यामुळे एक अँटी क्लायमॅक्स मात्र झाला.
-- समाप्त --
मी माझ्याशीच वेळोवेळी केलेली भंकस म्हणजेच हे चर्हाट! आता फक्त माझ्याशीच का? कारण सोप्प आहे. फारसं कुणी माझी भंकस ऐकून घ्यायला तयार नसतं.
Wednesday, September 7, 2011
Monday, August 8, 2011
शाही शुभमंगल!
एक वेळ विद्युतमंडळ झटका कधी देईल ते सांगता येतं पण राजेरजवाड्यांना केव्हा काय करायचा झटका येईल ते नाही. आता हेच पहा ना, त्या वेस्टमिन्स्टर अॅबीत केटचं आणि विल्यमचं साग्रसंगीत लग्न झालं.. सॉरी विवाह झाला, पुलंच्या म्हणण्याप्रमाणे आलतू फालतू लोकात लग्न होतात, उच्चभ्रूंमधे विवाह होतात. ते बघायला कोट्यवधी लोक नटुन थटुन टिव्ही समोर बसले होते म्हणे! आता एकदा तो विवाह झाल्यावर परत भारतीय पद्धतीने कशाला करायला पाहीजे? पण राणीच्या उतारी वर हुकूम कोण टाकणार? तिच्या अवती भोवती फिरकायची खुद्द प्रिन्स फिलिपची पण छाती नाही!
प्रिन्स फिलिप कोण म्हणून विचारताय? इंग्लंडात असं विचारणं हे पंढरपुरात विठोबा कोण विचारण्यासारखं आहे. हा प्रिन्स फिलिप म्हणजे ड्युक ऑफ एडिंबरा म्हणजे राणीचा सख्खा नवरा! पण मग तो प्रिन्स कसा? किंग का नाही? कारण, इंग्रंजांची संबोधनं कुणाच्याही आकलन शक्तीच्या कमाल मर्यादे बाहेरची असतात!
अत्यंत व्यग्र दिनचर्येमुळे आणि सततच्या प्रलोभनांमुळे लग्नासारखी क्षुल्लक गोष्ट राजेरजवाडे सहज विसरू शकतात या गोष्टीला इतिहास साक्षी आहे. मग विल्यम किंवा केट भलतं सलतं काही तरी करून बसले तर राणीला तोंड दाखवायला एकतरी दरबार शिल्लक राहील का? म्हणून दोन वेळा लग्न केल्यास त्यांच्या मनात एकमेकांबद्दलच्या प्रेम भावनेचं ठिबक सिंचन होईल व बाँडिंग वाढीस लागेल अशी शक्यता राणीला वाटली असावी.
तसंही हल्ली इकडे भारतीय पद्धतीनं लग्न करायचं फॅडच व्हायला लागलंय म्हणा! भारतीय पद्धतीने लग्न केलं तर म्हणे लग्न जन्मोजन्मी टिकतं. डोंबल त्यांचं! जमाना बदललाय हल्ली! हल्ली 'दर वर्षी वेगळा पती दे' असं वडाला साकडं घालणार्यांचं प्रमाण वाढलंय! पण डायानाचं ते तसं झाल्यापासून राणी शँपेन सुद्धा फुंकून पिते असं आमचे भिंतीचे कान सांगतात.
आधी अरुण नायर आणि लिझ हर्ली यांनी भारतीय पद्धतीने लग्न केलं (त्यांच आता मोडलंय म्हणा).. नंतर केटी पेरी आणि रसेल ब्रँडने री ओढली.. नाही! नाही! मोडण्याची नाही! लग्नाची म्हणतोय मी! जे जे काही तथाकथित वलयांकित लोकं करतात ते ते आपण नाही केलं तर आपलं वलय लयास जाईल अशी सार्थ भीती राणीला पडली असणार, दुसरं काय?
तर या अभूतपूर्व विवाह सोहळ्याचा हा बैठा वृत्तांत आहे!
भारतीय लग्नपद्धती बद्दल इंग्लंडात अंधार असल्यामुळे लग्नाच्या प्रोजेक्टचं मॅनेजमेंट आऊटसोर्स करायचं ठरलं. तसं भारताबद्दल प्रचंड अज्ञान आहे म्हणा! भारतात प्रचंड गरिबी आहे हे त्यातलंच एक! कारण भारतातली गरिबी दिसते, इकडची दिसत नाही!.. इकडचे गरीब करदात्यांनी दिलेल्या घरात, करदात्यांनीच दिलेल्या भत्त्यावर नोकरी न करता आनंदाने रहातात.. इतकाच काय तो फरक!
प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून नारायण पेक्षा कोण योग्य माणूस सापडणार? पण आऊटसोर्सिंग मुळे केंटरबरीचे आर्चबिशप आणि इतर मान्यवर पाद्र्यांनी संप केला.. त्यांना अनुल्लेखाने मारण्यात आलं. 'दर्जाचा विचारही न करता सर्व काही भारतीय लोकांकडून स्वस्तात करून घ्यायची प्रथा बोकाळत चालली आहे. या निमित्ताने भारतीय लग्नपद्धती शिकण्याची आमची एक अमूल्य संधी हिरावली गेली आहे आणि ही बाब अत्यंत चिंताजनक आणि शरमेची आहे.'.. असे खेदजनक सूर त्यांनी काढले.
हे लग्न मुंबईत करायचा घाट घातल्यावर वसंतसेनेपासून शिवसेने पर्यंत सर्वांच्या हातात कोलीत मिळालं. बिहार्यांचा प्रश्न ऐरणीवर नसल्यापासून त्यांनाही बरेच दिवसात जाळपोळ करायला काही स्फोटक मिळालेलं नव्हतं. त्यांचं लग्न इथे लावण्यातून आपली गुलामी वृत्ती अजूनही कशी दिसून येते आहे हा त्यांचा मुख्य मुद्दा होता. पण अर्थमंत्र्यांना त्यातून मेडिकल टूरिझम सारखी मॅरेज टूरिझम ही इंडस्ट्री खुणावत होती. त्यावर सेनेने त्यांची नेहमीची 'खणकर' भूमिका घेऊन सहार विमानतळाची धावपट्टी खणायची धमकी दिली. शेवटी राणीनेच माघार घेतली आणि लग्न बकिंगहॅम पॅलेस मधेच करायचं ठरवलं. साहजिकच, अर्थमंत्र्यांच्या संधीची चिंधी झाली.
मग प्रश्न आला पुरोहित निवडीचा! तशी जाहिरात झळकल्यावर विहिंपने 'प्राण गेला तरी गोमांस खाणार्या पापी लोकांचं कुणी पौरोहित्य करणार नाही' अशी भूमिका घेतल्यामुळे बर्याच गुरुजींची इच्छा असून केवळ समाज काय म्हणेल या भीती पोटी माघार घ्यावी लागली. भटजी मिळण्याची मारामार झाल्यामुळे नारायणाने त्याच्याच एका मित्राला, सतीशला, ते काम दिले. घरी नियमित होणारी त्याची पूजा वगळता त्याचा पूजेशी असा संबंध आलेला नव्हता. मग त्याला भारतात काही दिवसाच्या क्रॅश कोर्सला पाठवलं. गेल्या गेल्या कार क्रॅश करून त्यानं सुरुवात केली.. उरलेला वेळ हॉस्पिटलमधे पाय वर करून रामरक्षेसारखे थोडे फार संस्कृत श्लोक पाठ करण्यात घालवल्यावर लगेचच तो एक्स्पर्ट भटजी म्हणून दाखल झाला. आयटीत नेहमी असंच चालत असल्यामुळे कुणालाच त्यात वावगं वाटलं नाही. पण आपली हुशारी दाखवली नाही तर तो नारायण कसला? त्यानं एका भटजीला आपला सल्लागार नेमून विहिंपच्या फतव्यातून व्यवस्थित पळवाट काढली.
यथावकाश पत्रिका जमते आहे की नाही ते पहायचा दिवस ठरला, त्याबद्दल सतीशला माहिती नव्हतं. जेव्हा समजलं तेव्हा तो बायको बरोबर शॉपिंग करत होता. अशा संभाषण दर्या नेहमीच्याच असल्याने त्यालाही काही आश्चर्य वाटलं नाही. मग तसाच घाईघाईत बायकोला घेऊन राजवाड्यावर दाखल झाला. सल्लागार परस्पर आला. टाईट जीनची प्यांट आणि स्लिव्हलेस टॉप घालून बायको आली होती. तिच्या वजनापेक्षा अंगावर घातलेले पौंड जास्त होते. वास्तविक, खांदे उघडे टाकून किंवा डोक्यावर हॅट न घालता राणी समोर जायचं नसतं! आणि गुडघे थोडे वाकवून आणि झगा हातांनी किंचितसा उचलून राणीला अभिवादन करायचं असतं. तिनं काय पकडलं आणि काय उचललं तिचं तिला माहिती! राणीला हसू आवरलं नाही पण शाही शिष्टाचार अंगी भिनलेले असल्याने तिने ते हसू मंद स्मितामधे बदलले.
मागे मिशेल ओबामा सुद्धा उघड्या खांद्यांनी राणीला भेटली होती. त्यावर कुणीतरी भोचक प्रश्न विचारलाच 'How could she meet the queen with bare arms?' त्यावर त्याला असं मार्मिक उत्तर मिळालं 'Because, americans are allowed to bear arms'. थोडक्यात काय, तर लोकांनी असा रीतिरिवाजांचा आणि परंपरांचा केलेला खुर्दा राणीला, बिचारीला, चालवून घ्यावा लागतो! कारण शेवटी एका खालसा राज्याची ती नाममात्र राणी! बाकी इंग्रजांवर, त्यांनी फक्त भारतातच तनखा बहाद्दर राजे केले, असा पक्षपाती आरोप करता येणार नाही म्हणा!
पत्रिका जमवायला बसले खरे पण दोघांच्या पत्रिकेचाच पत्ता नव्हता. पत्रिका करायची म्हणजे पंचांग हवे. नक्की कशासाठी आपण घाईघाईत निघालो आहोत ते न समजल्यामुळे सल्लागार काहीच न घेता आला होता. 'हे पंचांग'.. नारायणाने काखोटीला मारलेल्या लॅपटॉप वर एक पंचांग काढून दिले. हल्लीच्या जगात गुगलगाय झाल्याशिवाय पंचांग पण हाताला लागत नाही. त्यामुळेच, 'प्राचीन संस्कारांचा आणि अर्वाचीन तंत्रज्ञानाचा वैभवशाही मिलाफ' अशा शब्दात वर्तमानपत्रांनी या विवाहाचा उदोउदो केला.
पत्रिका करता करता मुलाचा राक्षसगण निघाल्यामुळे बाका प्रसंग उभा राहीला. इतक्या मोठ्या राज्याच्या राजपुत्राचा राक्षसगण? राजघराण्याला देवासमान मानणार्या जनतेला काय वाटेल? आणि ते सांगायचं कसं? त्यात मुलीचा मनुष्यगण निघाल्याने गणाचे गुण जुळेनात. शेवटी न डगमगता नारायणाने बेधडकपणे ३६ गुण जुळल्याचं सांगितलं. खरं तर हाडवैरासाठी राखीव असलेला हा आकडा नेमका पत्रिका पूर्ण जुळलेली आहे हे दाखवायला कसा काय वापरतात कोण जाणे! सल्लागाराने ११ जुलैच्या सोमवारी सकाळी १०:२३चा मुहूर्त काढून अजून एका राष्ट्रीय सुट्टीची सोय केली.
आधी एकदा लग्न झालेलं असल्यामुळे साखरपुडा बायपास झाला. लग्न झालेल्यांच परत लग्न लावताना काही वेगळे मंत्र/विधी असतात की नसतात यावर काही भटजींमधे एका ऑनलाईन फोरमवर घणाघाती चर्चा चालू होती.. विशेषत: सोडलग्न करायची गरज आहे का यावर! त्याची परिणती नेहमी प्रमाणे एकमेकांची उणीदुणी काढण्यात आणि एकमेकांना शेलक्या शिव्या देण्यात झाल्यामुळे नारायणाने नेहमीचेच विधी करायचं ठरवलं.
मुलीकडची लग्नाची पत्रिका अशी ठरली -
||सद्गुरू श्री पोप प्रसन्न आणि श्री श्री आनंदमयी मेरी माँ प्रसन्न||
आमचे येथे जीझस कृपेकरून आमची जेष्ठ कन्या चि. सौ. कां. कॅथरिन हिचा विवाह राजपुत्र विल्यम (हिज हायनेस प्रिन्स ऑफ वेल्स श्री. चार्लस विंडसर आणि कै. प्रिन्सेस डायाना यांचे जेष्ठ चिरंजीव) याच्याशी दिनांक ११ जुलै, २०११ सकाळी १०:२३ वाजता बकिंगहॅम पॅलेस येथे करणेचे योजिले आहे. कार्य सिद्धिस नेणेस जीझस समर्थ आहेच. तरी आपण विवाहास अगत्य येणेचे करावे.
प्रीतिभोजन दुपारी १ ते ३.
कृपया विल्यम आणि केटच्या लग्नाच्या भेटवस्तू या संकेत स्थळावर लिहीलेल्या भेटवस्तूपैकीच गोष्टी भेट म्हणून द्याव्यात.
-- खालती मिडलटन फॅमिलीतल्या बर्याच जणांच्या नावांबरोबर 'आमच्या केटी ताईच्या लग्नाला यायचं हं!'.. असे एका शेंबड्या बंटीबाबा मिडलटनाचे चिमखडे बोल पण होते.
पत्रिका छापून आल्यावर नीट वाचून बघायला बजावायचं नारायण विसरला नाही.
भेटवस्तूंच्या यादीत मिक्सर मायक्रोवेव्ह असल्या गृहोपयोगी वस्तू पाहून सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात होते. 'राजपुत्र झाला म्हणून काय झालं? शेवटी केटला स्वयंपाकीणच बनवणार का?' या भाषेत काही स्त्री मुक्तांचा संताप मुक्त झाला. शिवाय, राजघराण्यातल्या लोकांना असल्या वस्तूंची गरज कधी पासून पडायला लागली? असा पण सूर होता. त्यांच्याकडच्या गृहोपयोगी वस्तू जगावेगळ्या असतात व त्यांना शेफ किंवा बटलर अशी काहीशी नावं असतात. त्यांच्यात बागेतलं तण कुणी काढायचं यावर तणतण होऊन ताणतणाव निर्माण होत नाहीत. त्यासाठी माळी नावाचं उपकरण असतं!
सावकाश गाडी केटच्या पोशाखाकडे वळाली.
'एलिझाबेथ इमॅन्युएलला सांगू या कपडे डिझाईन करायला'.. एका पोक्त पण मनाने तरुण असलेल्या बाईंनी आपले विचार मांडले.
'तिला नको. माझं ऐका, त्या पेक्षा अॅलेक्झांडर मॅक्वीनला सांगू. आता तो जिवंत नाही पण त्याच्याकडची डिझायनर भारी आहे एकदम!'.. नारायणाचं ठाम मत.
'पण डायानाचे तिच्याचकडे केले होते म्हणे!'
'हो! ते ८१ साली! तेव्हा तिचं आणि डेव्हिडचं लग्न नव्या कापडासारखं घट्ट होतं. ९० साली ते विरल्यावर तिचा डेव्हिडशी आणि कलेशी एकदमच घटस्फोट झाला'.. हे ऐकल्यावर लहान थोर समस्त स्त्री वर्गात नारायणाबद्दल अपार आदर निर्माण झाला.. वास्तविक असलं ज्ञान नारायणाला त्याच्याच सौ कडून बर्याच पैशांच्या मोबदल्यात वेळोवेळी मिळालेलं होतं.
'बघ बाबा! राणीची अशी काहीशी इच्छा होती म्हणे!'
'तिला काय समजतंय म्हातारीला? आणि त्याला केटचे कपडे सुटसुटीत बनवायला सांगा! मागच्या लग्नासारखा १०० फुटी लांब झगा नकोय म्हणावं! लग्नात होम वगैरे असणार आहे, त्यात जाऊन पेटला तर भर लग्नात सती जायची वेळ यायची!'.. भलभलत्या रिस्कांचा विचार प्रोजेक्ट मॅनेजर नाही करणार तर कोण?
बकिंगहॅमच्या हिरवळीवर भरजरी कापडं लावून शाही शामियाना उभारला. आत मधे मोठ मोठाली झुंबरं टांगलेली होती. सबंध पाऊल रुतेल असला गुबगुबीत गालिचा पसरलेला आणि मुख्य प्रवेशद्वारापासून स्टेज पर्यंत रेड कार्पेट अंथरलेलं, सर्वत्र उंची अत्तर फवारलेलं, एकीकडे चंदनाचं स्टेज, मांडी घालण्याची सवय नसल्यानं स्टेजवर एका हस्तिदंती टेबलावर होमाची सोय, भोवती बसण्यासाठी रत्नजडित आसनं असा सगळा थाट! जिकडे पहावं तिकडे निव्वळ वैभव टांगलेलं, पसरलेलं, ल्यायलेलं, फवारलेलं किंवा लपेटलेलं होतं. अस्वलाला केसांचा आणि मोराला मोरपिसांचा काय तोटा? तसंच!
पण आफ्रिकेतला दुष्काळ लक्षात घेऊन नारायणाने अक्षतांसाठी तांदूळा ऐवजी सोन्याचा वर्ख लावलेल्या थर्मोकोलच्या खास अक्षता बनवायला सांगितल्या व अक्षतांसाठी लागणारा तांदूळ आफ्रिकेत वाटपासाठी पाठवला. त्यातून मूठभर लोकांना मूठभर भात मिळाला. आपल्या आनंदामधे गरिबांसाठी दयेचा एक कोपरा ठेवणार्या राजघराण्याच्या औदार्याचं तोंड फाटे पर्यंत कौतुक झालं. कृतज्ञते दाखल राणीने नंतर नारायणाला 'सर'की बहाल केली.
काही लोकांमधे लग्नात गोंधळ घालायला गोंधळी बोलावण्याची प्रथा आहे. त्यांना लग्नातला अंगभूत गोंधळ कमी वाटतो की काय कुणास ठाऊक! म्हणजे कोकणस्थांनी बोलावलं तर ठीक आहे एक वेळ, पण देशस्थांनी सुद्धा? मात्र सिक्युरिटीचा गोंधळ होईल म्हणून शाही गोंधळ रद्द करण्यात आला.
हा विवाह सोहळा टीव्हीवर जिवंत दाखवणार असल्याचं ऐकल्यावर सल्लागार भटजी घाबरला.. विहिंपच्या कार्यकर्त्यांनी टीव्ही पाहिला तर त्याला सहकुटुंब जिवंत ठेवणार नाहीत म्हणून तो घरीच थांबला. घरून व्हॉईस चॅट वापरून तो सगळे मंत्र म्हणणार होता. राज घराण्यातल्या लोकांसमोर सोवळं नेसून कसं जायचं (शिवाय इंग्लंडातली थंडी) म्हणून सतीश सुटाबुटात आला होता. विधी चालू असताना त्याचा टाय मधे मधे होमाकडे झेपावत होता. मग केटने दिलेल्या केसातल्या आकड्याने त्याने तो शर्टाला अडकवला.
प्रिन्स चार्लस स्कॉटलंडचा ट्रॅडिशनल ड्रेस म्हणजे लाल काळ्या चौकटीचा स्कर्ट आणि वर एक जॅकेट घालून आला होता. शामियान्यापायी हिरवळीवरच्या काही किड्यांची घरंदारं उध्वस्त झाल्या कारणाने त्यांनी प्रिन्सशी अंमळ जास्तच सलगी दाखवली. त्यामुळे प्रिन्स मधेच राजवाड्यात जाऊन सुटाबुटात आला.
सावत्र मुलाचं लग्न म्हणून कॅमिला चांगलीच नटून थटून आली होती. ओठांना लिपस्टिक, खुरांना नेल पॉलिश व गालाला रूज चोपडून डोक्यावर फॅन्सी हॅट ठेवल्यावर एखादी गाय जशी दिसेल तशी ती दिसत होती.
राणी आणि प्रिन्स फिलिप त्यांच्या नेहमीच्या उंची पोशाखात होते.
प्रिन्सेस बिअॅट्रिसने हॅट घातली आहे की डिश अँटेना लावली आहे यावर मतभेद होते. इतर स्त्रिया ऑक्टोपस, जेली फिश, शिंपला, किंवा घरटं इत्यादी गोष्टीं सारख्या दिसणार्या वैशिष्ट्यपूर्ण हॅटा घालून आल्या होत्या.
विवाहविधी पहाटे पासूनच सुरू झालेले होते. पाहुणे मंडळी हळूहळू उगवत होती. लवकरच उपस्थितांच्या लक्षात आलं की भारतीय लग्नात वधू वर आणि त्यांचे आईबाप एका कोपर्यात काहीतरी विधीत सतत गुंतलेले असतात. ते लक्षपूर्वक पहाणे हे पाहुण्यांवर बंधनकारक नसते. त्यामुळे त्यांनी खुर्च्या हव्या तशा फिरवून आपापली गटबाजी प्रस्थापित करून गप्पा हाणायला सुरुवात केली.
त्यातलं हे निवडक शाही गॉसिप!
'या विल्यमच्या भोवती हजार जणी फिरतात म्हणे! सांगत नाही पण तो कधी कुणाला!'
'तशा वडाच्या झाडाभोवती पण लाख जणी फिरतात. झाड सांगतं काय कधी?'
'दोघे एकाच कॉलेजात शिकत होते म्हणे!'
'हो नाहीतर काय! एकत्रच रहात होते की आणि!'
'त्यानं म्हणे केटला एका फ्याशन शो मधे झिरझिरीत कपड्यात पाहीलं आणि पाघळला! आम्हाला काय घालता येत नाहीत का तसले कपडे?'
'बिच्चारी डायाना! आज कित्ती आनंदात असली असती!'
'चार्लसनेच मारलीन म्हणतात तिला! काय पाहीलंन त्या कॅमिलात कोण जाणे!'
'विल्यमनं तसं काय नाय केलंन म्हणजे मिळवली!'
'डायानाने पोरांना अगदी मध्यमवर्गीय वळण लावलंन हो! मॅक्डोनल्डस मधे घेऊन जायची ती त्यांना!'
'मॅक्डोनल्डस? हे काय असतं?'
'डायाना पण काय अगदी सोज्वळ वगैरे नव्हती हां! ती पण फिरली नंतर बर्याच जणांबरोबर!'
'काय भिकेचे डोहाळे लागलेत विल्यमला! तोलामोलाच्या मुलीशी तरी लग्न करायचं!'
'बाप तसा मुलगा!'
'हा विल्यम त्या एअरफोर्सच्या किरकोळ पगारात कसा काय रहात असेल? ड्रायक्लिनिंगचा तरी खर्च निघत असेल का त्यातून?'
मुहूर्ताची वेळ जवळ आली तशी नारायणाने माईक उचलून सूचनांचा भडिमार केला.. 'हे पहा, मंगलाष्टकं म्हणणार्यांनी आधीच स्टेजवर या, नाहीतर मुहूर्ताची वेळ आली, तरी मंगलाष्टकं सुरूच राहतात. लग्न लागल्यावर वधू-वरांना कपडे बदलण्यासाठी अर्धा तास तरी लागेल, तेव्हा आधीच त्यांना भेटण्यासाठी रांगा लावू नयेत. जेवणाची तयारी असली, तर तोपर्यंत जेवून घ्यायला हरकत नाही. तिसरी महत्त्वाची सूचना अशी आहे की, आजकाल लग्न लागल्यावर वधू-वरांना उचलून घेण्याची एक नवीच प्रथा पडत चालली आहे. मागे एका लग्नात वजन न पेलल्याने वधू पडली. त्यातून अनर्थ होण्याची भीती असते. तेव्हा असा प्रकार कुणी करू नये. सर्वांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असल्याने मुद्दामहून या सूचना करतो आहे.'
सतीशने आणि नारायणाने अंतरपाट धरला. सल्लागार भटजीने व्हॉईस चॅटवरून मंगलाष्टकं सुरू केली. अधून मधून नेट कनेक्शन बोंबलत होतं त्यामुळे नारायणाने सतीशला मंगलाष्टकं म्हणायला सांगितल्यावर त्याची ततपप झाली.
'अरे शार्दुलविक्रीडित वृत्तातलं काहीही म्हण.'.. नारायणाने आपलं ज्ञान पाजळलं. एसेसीत ऑप्शनला टाकलेलं ते वृत्त अचानक असं खिंडीत पकडेल याची सतीशला मुळीच कल्पना नव्हती. मग नारायणाने त्याला मंगलाष्टकांच्या चालीवर 'आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक' म्हणून दाखवलं आणि त्याच पद्धतीने श्लोक म्हणायची सूचना केली. सल्लागाराची मंगलाष्टकं शॉर्ट वेव्ह रेडियो स्टेशनसारखी वर खाली होत होती त्यामुळे प्रेक्षकांना दोन दोन मंगलाष्टकांचा आनंद मिळाला.
गंगा सिंधु सरस्वती ..... विजयते रामं रमेशंभजे!
रामेणाभिहता निशाचरचमू ..... गोदावरी नर्मदा!
मग मात्र नारायणाने मोबाईल काढून (एका हाताने अंतरपाट धरलेला होताच) सल्लागाराला फोन लावला.
'अरे कुठलं भिकार ब्रॉडबँड घेऊन ठेवलं आहेस रे? त्यापेक्षा डायल-अप वापरून ये बरं!'
'ब्रॉडबँड'कुठलं? माझ्याकडे साधं रबरबँड पण नाहीये. मी डायल-अपच वापरतोय'.. ही जोक मारायची वेळ होती का?
शेवटी बाकीची मंगलाष्टकं फोनवर म्हंटली, तसं आधीच का नाही केलं कोण जाणे! सगळ्या गोष्टी उगीचच कटिंग एज टेक्नॉलॉजीने करण्याचा अट्टाहास म्हणजे शेजारी बसलेल्याशी बोलायला फेसबुक वापरण्यातला प्रकार! यथावकाश 'तदेव लग्नं... शुभमंगल सावधान' वगैरे झाल्यावर तुतार्या, सनई चौघडा असल्या बर्याच वाद्यांनी कल्ला केला. एव्हांना सर्व पाहुण्यांना अक्षतांचा खरा उपयोग समजला होता. त्यांच्यातल्या त्यांच्यात विविध आकाराच्या हॅटांमधे अक्षता फेकून गोल मारायची साईड स्पर्धा लग्न होऊन गेल्यानंतरही चालू होती.
सप्तपदी चालू असताना काही अल्लड तरुणींनी विल्यमच्या चपला पळवल्या. अशा वेळेला काय करायचं असतं ते माहिती नसल्यामुळे विल्यमने त्याच्या सेक्रेटरीला सांगून दुसरा जोड मागवला. मग नारायणाने त्यातली गंमत सांगितल्यावर विल्यमने प्रत्येक तरुणीला हाईड पार्कमधे फिरवून आणण्याचे वचन दिले.. अर्थातच, केटच्या डोक्यातून येणार्या धुराकडे दुर्लक्ष करून.. आणि एक छदामही न देता चपला परत मिळवल्या.
केटने वेगवेगळ्या प्रसंगी घेतलेले उखाणे
बकिंगहॅमच्या कोनाड्यात उभी मेरी माता
विल्याचं नाव घेते माझा नंबर पयला
लाडू करंज्यांनी भरला आहे रुखवत
विल्यमरावांनी घेतला किस सर्वांच्या देखत
बकिंगहॅम पॅलेसची सिक्युरिटी झेड
विल्यमरावांना लागलंय विमानांचं वेड!
शेवटी बकिंगहॅम पॅलेसात उंबरठ्यावरचं माप लाथाडून केट जाणार होती. पण इकडे उंबरठ्यांची फ्याशन नाहीये हे नारायणाने आधीच ओळखून चंदनाचा एक खास उंबरठा तयार करून घेतला होता. परत एकदा संभाषणाच्या खाईमुळे केटला माप पायाने लवंडायचे माहीत नव्हते. त्यात उंबरठ्याची सवय नसल्यामुळे केट उंबरठ्याला अडखळून पडली.. उंबरठा आणि मापासकट डाईव्ह मारून केटचा गृहप्रवेश झाला.. आणि ते आनंदाने नांदू लागले!

Sunday, June 26, 2011
भरकटंती
कुठे तरी काही दिवस तरी भटकंतीला जाऊ या असं कधी तरी कुणाला तरी वाटतंच. दुर्दैवाने, या वेळेलाही तसंच झालं! आम्ही दिल्याच्या ऑफिसात त्याच्या बायकोचा शिर्याचा प्रयोग चाखत होतो. आमचा एक मित्र, संदीप, अमेरिकेहून आला होता, त्याच्या बरोबर. इतर एनाराय मित्रांसारखीच त्याचीही, बायकोला चुकवून, आमच्या बरोबर टीपी करण्याची माफक अपेक्षा होती. परदेशातून आल्यावर एकदाचं बायका-पोरान्ना बायकोच्या माहेरी डंप केलं की बाजीरावांना रान मोकळं मिळतं. मग एक दोन दिवस इकडे तिकडे झाले तरी बायको फारसं मनावर घेत नाही... किंबहुना तिलाही तेच हवं असतं. पण इथल्या सगळ्यांनी कामं टाकून त्यांच्यामागे धावावं असं या एनारायना का वाटतं? म्हणजे तसा एक काळ होता.. त्यांनी तिकडून आणलेल्या सिगरेटी आणि दारूत अवाजवी इंटरेस्ट असल्यामुळे त्यांना वाजवी पेक्षा जास्त भाव दिला जायचा.. पण आता?
मक्या: 'ए हा संदीप सहलीचं एक प्रोजेक्ट करू या म्हणतोय!'.. कुठल्याही फालतू गोष्टीला 'प्रोजेक्ट' म्हणायची फ्याशनच झालीये हल्ली! आयटीत काम करून करून डोक्याची अशी मशागत होत असावी.. कटिंगला जाणे, एक प्रोजेक्ट! कोपर्यावरच्या दुकानातून दूध आणणे, अजून एक प्रोजेक्ट!
दिल्या: 'कुठं जायचं बोला? काश्मीर, सिमला, कोडाइकॅनाल, केरळ, उटी, कन्याकुमारी झालंच तर चतु:श्रुंगी?' दिल्यानं उडप्याच्या हॉटेलमधल्या वेटरच्या एकसुरी झपाट्यात मेन्यु सांगीतला.
संदीपः 'चतु:श्रुंगी?' चमचमीत मिष्टान्नांच्या पंक्तीत परिपाठादी काढ्याची अळी आल्यामुळे संदीपची गाडी हास्य दरीत कोसळली. आम्ही हा जोक खूप पूर्वीच 'सरताज' केला होता त्यामुळे आम्ही 'काय उगाच फालतू जोकला हसतो?' असे चेहरे केले.
दिल्या: 'हो. चतु:श्रुंगीला आमच्या अर्ध्या अर्ध्या दिवसाच्या खास बजेट टूर असतात.' दिल्याच्या तोंडून आता सराईत टूर ऑपरेटरची टुरटुर सुरू झाली.
संदीपः 'चतु:श्रुंगी चढून उतरल्यावर मग भेळ खाऊन परत यायचं का?'.. प्रत्येकाला टूरच्या पैशात फुकट काय काय आहे ते माहिती हवंच असतं.
दिल्या: 'भेळ खाणं ऑप्शनल आहे, तुमच्या बजेट प्रमाणे'.. कनवटीला डॉलर मिरविणार्या संदीपचा कचरा करण्याची संधी दिल्या कशी सोडणार?
संदीपः 'ट्रेकला जायचं का?... सिंहगड, तोरणा, राजगड, लोहगड'
'सर, एक सही हवी होती' मधेच दिल्याच्या ऑफिसातला एकजण सही घेऊन गेला.
मक्या: 'चिमण्या असेल तर ट्रेकला मी येणार नाही.'
संदीपः ('नाव चंद्रकला आणि अंगी पौर्णिमेचा घेर' अशा माझ्या नावाशी व्यस्त प्रमाण दाखविणार्या देहाला आपादमस्तक न्याहाळत) 'चिमण्या? तू ट्रेकला पण जातोस?'
मी: 'तसा मी बर्याच क्षेत्रात धडपडतो, पण कुठेच धड पडत नाही. पण ट्रेकला जायचं असेल तर मीच येणार नाही.'
संदीपः 'का रे बाबांनो?'
मी: 'कारण डोंगरावर रिक्षा मिळत नाहीत'.. डोंगर आणि रिक्षाचा संबंध लावता लावता संदीपच्या डोक्याची जिल्हा परिषद झाली.
दिल्या: 'ट्रेकला जाणं आणि भिकेचे डोहाळे लागणं यात काही फरक नाहीय्ये असं चिमणचं म्हणणं आहे!'
मी: 'अरे मागे आम्ही एका ट्रेकला गेलो होतो.. डोंगर चढून चढून माझी फासफूस झाली.. मला वाटत होतं तेवढा डोंगर चढून झाला की संपला ट्रेक.. नंतर कळालं की नुसता तेवढाच डोंगर नाही तर अजून तसे दोन डोंगर चढाय उतरायचे आहेत.. मग मात्र माझा धीर खचला.. मी भूक भूक सुरू केलं.. थोडं चरु या म्हंटलं.. मी डब्यातून गुलाबजाम, बाकरवड्या, पेढे बर्फ्या असं भरपूर आणलं होतं.. ते हाणल्यावर सगळे तिथेच आडवे झाले आणि ट्रेकचं पानिपत झालं. माझ्यामुळे ट्रेक बोंबलतो असा बिनबुडाचा आरोप हे लोक तेव्हापासून करतात.'
दिल्या: 'गपा रे! उगा शिरा ताणून ताणून बोलू नका!'
मी: 'नाही रे! मी शिरा खाऊन खाऊन बोलतोय!'
संदीपः 'बरोबर आहे. बरोबर आहे. नो ट्रेक. कुठे तरी निवांत पडायचंय. मस्त बियर ढोसायची. मनात आलं तर हिंडायचं नाही तर झोपायचं.. असं काही तरी पाहीजे.'
मक्या: 'अरे! मस्त सिमला कुलू मनाली असं कुठे तरी जाऊ या. तिथं हॉटेलात बसल्या बसल्या पण छान हिमालय दर्शन होतं. कुठं चढायची गरज नाही.'
मी: 'तिथपर्यंत जाऊन यायलाच ४ दिवस लागतील.'
संदीपः 'विमानाने जाऊन येऊ.'
मी: 'ए भाऊ! विजय मल्ल्या काही माझा सासरा नाही. आणि माझ्या सासर्याकडे खेळण्यातलं विमान पण नाही. त्यामुळे तू तिकीटं काढलीस तर मी फॅमिलीसकट येईन.' यावर सगळ्यांचं एकमत झाल्यामुळे विमान रद्द झालं.
दिल्या: 'बरं, मग कुठं जाऊ या?'
मी: 'तीन चार दिवसात कुठे जाऊन येणार? महाबळेश्वर?'
मक्या: 'नको. आमचा हनिमून तिथेच झाला.'
मी: 'तेव्हापासून तू त्याचा धसका घेतलाहेस काय?'
दिल्या: 'हां! त्या कटु आठवणींना धैर्याने, परत परत, सामोरा गेलास तरच तो आघात बोथट होईल.'
संदीपः 'मला पण महाबळेश्वर नको.'
मी: 'तुझा पण ह.मू. तिथेच झाला?'.. एक काळ होता जेव्हा सगळे महाबळेश्वरलाच हनिमूनला जायचे.
संदीपः 'हमू नाही रे. पण सारखं काय तिथंच जायचं?'
मी: 'अरे तुला तर नुस्तं ढेरी वर करून पडायचंय, वर बियर ढोसायचीय तर महाबळेश्वर काय नि गोठा काय, काय फरक पडतो?'
मक्या: 'आपण मुरुड जंजिराला जाऊ या का?'
दिल्या: 'चालेल. मी गाडी बुक करतो. किती सीटर करू या?'
मी: 'नको. गाडीचं तू नको बघू. तुझ्या गाड्या कधीही येत नाहीत'
दिल्या: 'काही नाही हां! नेहमी व्यवस्थित वेळेवर आलेल्या आहेत'.. दिल्यानं असं बोलणं म्हणजे जकात नाक्यावर व्यवस्थित पैसे खाणार्या बापाला 'तुम्हाला पैसे कमवायची अक्कल नाही' असं त्याच्याच चिरंजीवांनी ऐकविण्यातला प्रकार!
मी: 'हो का? मागे तू चांगली टेंपो ट्रॅव्हलर बुक केली होतीस. आणि आली एक जुनी पुराणी फाटकी मॅटेडोर, सिटं उसवलेली.. ती पण २ तास उशीरा! नुसत्या प्रवासालाच दुप्पट वेळ लागला आपल्याला, त्यापेक्षा घोडागाडीनं कमी वेळ लागला असता'
दिल्या: 'अरे होतं असं क्वचित कधी तरी'
मक्या: 'आणि ती दुसरी गाडी तू आणलेली? ती रस्त्यात दोन वेळा बंद पडली.. ती?.. त्यामुळे आपण 'रास्ता रोको' करतोय असं जाणार्या येणार्यांना वाटत होतं.. त्याचं काय?'
दिल्या: 'अरे गाडीला प्रॉब्लेम कधीही येऊ शकतो. एकदा तू सांगितलेली गाडी आली नाही म्हणून आपण आपल्या गाड्या घेऊन गेलो होतो. आठवतंय? तेव्हा तुझी पण गाडी बंद पडली होती की! आपण समजून घेतलं पाहीजे!'.. हा भुईनळा का त्या गाडिवाल्यांचा इतका कैवार घेतोय?
संदीपः 'डिझेलची गाडी नको. मला लागते'.
परत, सरांना 'सर'पण देणार्या ऑफिसातल्या माणसांपैकी एक, सरांची सही घेऊन गेला.
मक्या: 'मग रेल्वेने जाऊ या'
मी: 'पण बुकिंग तू करू नकोस. मागच्या दिवाळीत तू या वर्षीच्या दिवाळीच्या तारखांप्रमाणे बुकिंग केलं होतंस ते कुणाचंही कुटुंब विसरणार नाही. सगळा प्रवास मुंबईच्या लोकलच्या प्रवासासारखा वाटला होता. आठवतंय ना?'
मक्या: 'अरे तो एजंटाचा घोळ! मी काय करणार त्याला?'
मी: 'सांगितलं ना? बुकिंग तू करू नकोस.'
दिल्या: 'अरे पण मुरुड जंजिर्याला रेल्वे कुठे जाते? उगीच भांडू नका! आपण आपल्या गाड्या काढू!'
संदीपः 'गुड! पण एमटीडीसीच्या हॉटेलांमधे नको हां रहायला. कसली भिकार असतात!'.. हा संदीप म्हणजे एक 'वात'कुक्कुट आहे अगदी!
मक्या: 'बरं! मुरूडचं हॉलिडे इन मिळतंय का बघतो'
संदीपः 'अरे वा! तिथे हॉलिडे इन झालंय? मस्त!' बिच्यार्याला फिरक्या पण कळायच्या बंद झाल्यात!
दिल्या: 'हो! शिवाजी राजे जंजिर्याच्या इन्स्पेक्शनला आले की तिथेच रहायचे. त्यांच्या साठी तिथला महाराजा स्विट राखीव असायचा!'
मी: 'ए आरे, पावसाळ्यात कसले कोकणात जाताय? मी नक्कीच नाही येणार!'
संदीप: 'मुरूड नको? आयला एक साधी ट्रिप ठरवता येत नाही आपल्याला अजून?'
सगळेच थोडा वेळ शांत पडले. जांभया अनावर होत होत्या. शिर्यात काय घातलं होतं कुणास ठाऊक! अचानक मक्याच्या डोक्यात स्पार्क पडला.
मक्या: 'अरे नुस्तच पडायचंय, बियर ढोसायचीय तर पुण्यातल्याच एखाद्या हॉटेलात का नाही रहायचं?'
याला म्हणतात चाकोरी बाहेरचा विचार! आधी उगीचच विरोधासाठी विरोध केला तरी बाकीच्यांना पण तो पटलाच आणि आमची ट्रिप मुळशी जवळच्या एका रिसॉर्ट मधे सुफळ संपूर्ण झाली. ते व्हायचं एकमेव कारण म्हणजे ट्रिपला जाऊन नक्की काय करायचं हे सगळ्यांना क्लिअर होतं.. नो इफ्फस अँड बट्स!
वास्तविक, भटकंतीचा विषय निघाला की माझ्या अंगावरचे काटे बघून साळिंदरांना न्यूनगंड येतो. कारण नक्की कुठे जायचं, कधी जायचं, का जायचं, कोणी कोणी जायचं नि काय काय पहायचं हे सर्वानुमते ठरवायचं म्हणजे सत्राशे साठ सुयांच्या नेढ्यातून एकदम दोरा ओवण्याइतकं जटिल.. आणि ते जमलंच तर ती ट्रिप ठरवल्याप्रमाणे होणं म्हणजे सोन्याहून पिवळं, साखरेहून गोड, हिमालयाहून उत्तुंग वगैरे वगैरे! कारण, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अपेक्षा/कल्पना केवळ ग्रुपने जायचं म्हणून एका चौकटीत बसवता येत नाहीत. एखाद्या फॅमिलीची ठरलेल्या सर्व ठिकाणांना पसंती नसते, काहींना कमित कमी पैशात जास्तित जास्त बसवायचं असतं, काहींना ठरवलेली हॉटेलंच आवडत नाहीत, काही लोक इतर जनता वेळेवर तयार होत नाही म्हणून स्वतः मुद्दाम आणखी उशीर करतात.. अशी एक ना अनेक लक्तरं निघायला लागतात.. ट्रिप नंतर हळूच अमुक अमुक असतील तर आम्ही पुढच्या वेळेला येणार नाही अशा सूचना वजा धमक्या ऐकाव्या लागतात! म्हणून, 'काँप्रमाईझ मोड' मधली ट्रिप यशस्वी होत नाही.
एकूण काय? तर ट्रिपचा विषय निघाला की माझा मेंदू ट्रिप होतो आणि भटकंतीची होते भरकटंती!!

Wednesday, April 13, 2011
स्मोकिंग किल्स
जेम्स बाँडला जसं 'लायसन्स टू किल' असतं तसं आम्हाला गणपती उत्सवात 'लायसन्स टू चिल' मिळायचं. मिळायचं म्हणणं तितकसं बरोबर नाही.. आम्ही तो आमचा जन्मसिद्ध हक्क समजायचो.. पाली जशा कुणाच्याही घरातल्या भिंतीं आपल्याच बापाच्या समजतात तसा! रात्री ११ पर्यंत घरी येण्याची घातलेली मर्यादा पहिल्या दिवशी १२, दुसर्या दिवशी १ अशी विसर्जनापर्यंत हळूहळू दुसर्या दिवशीच्या सकाळ पर्यंत रबरबँड सारखी कशी ताणायची हे पोरं आपोआप शिकतात. तेव्हा आम्ही पौगंडावस्थेतले, म्हणजेच पर्मनंट गंडलेले होतो! गणपतीच्या नावाखाली आम्ही काय काय बघायचो आणि कुठे कुठे फिरायचो हे जर आई वडिलांना कळलं असतं तर आम्हाला आमचं घर पण गणपतीसारखं लांबूनच बघायला लागलं असतं!
अशाच एका उत्सवात माझी सिगरेटशी तोंडओळख झाली आणि त्याचं पर्यवसान तिची ओढ लागण्यात झालं! तेव्हा आम्ही उच्चभ्रू लोकांसारखं धूम्रपान करायचो नाही तर बिड्या फुकायचो किंवा मद्यपान करायच्या ऐवजी बेवडा मारायचो. आमचे मध्यमवर्गीय शब्द अगदी क्रूड असले तरी नेमके होते! त्या काळी फुकणार्यांकडे न फुकणारे आदराने बघायचे, हल्ली मी इथल्या शाळेत जाणार्या पोरापोरींकडे बघतो तसंच! त्यामुळे त्यांच्या समोर बिड्या पिताना उगीचच सैन्याची मानवंदना घेणार्या पंतप्रधानासारखं ग्रेट वाटायचं. बिड्या फुकण्यातून बेफिकीर वृत्ती, धाडसीपणा, आत्मविश्वास, बंडखोर प्रवृत्ती इ. इ. अधोरेखित होते असा आमचा एक गंड होता. तसं काही नसतं हे आत्ता कळतंय!
'पीनेवालोंको पीनेका बहाना चाहीए' हे बिडी पिणार्याला देखील १००% लागू पडतं.. कधी नुसता वेळ घालवायला, कधी एखादं काम संपवलं म्हणून उदार मनाने स्वतःलाच बक्षीस म्हणून, कधी वाट पहाता पहाता, कधी एकटेपणा मिटवायला, कधी गर्दीत एकटेपणा मिळवायला, कधी विचाराला चालना देण्यासाठी, कधी विचार मिटवण्यासाठी, कधी नुसती गंमत म्हणून, कधी केवळ दुसर्याला कंपनी म्हणून, कधी केवळ आराम करायचा म्हणून तर कधी काहीही कारण नाही म्हणून.. एक बिडी माराविशीच वाटते!
बिडी ही अनेक न्यूनगंडांची भुतं भस्मसात करणारी आमची एक ज्वलंत आणि प्रभावी मशाल होती. चार्ली चॅप्लिन कसा प्रत्येक गोची नंतर आपल्या मळक्या टायची गाठ ठीक करून, गबाळे कपडे झटकत, जणू काही झालंच नाही अशा आविर्भावाने पुढे जातो? तसं केल्यानं त्याची नाचक्की टळणार असते का? नाही! पण त्याला नुसता टाय ठीक केल्याने एक मानसिक आधार मिळतो.. आणि वाटतं की स्वतःची ढासळलेली प्रतिष्ठा सावरली आहे म्हणून! तसंच आम्ही पदोपदी ढासळणार्या प्रतिष्ठेला बिडीचा आधार द्यायचो. त्यामुळे, ती अशी एकमेव गोष्ट जी माझ्या आनंदात, दु:खात, मानहानीत, भांडणात, प्रेमभंगात, उपेक्षेत.. मनाच्या सर्व अवस्थेत.. सदैव तोंडात राहिली.
त्या काळी फुंकणार्यांचा छळ होत नसे. हल्ली सारखे ते अस्पृश्य नव्हते. उलट, त्यांना आपुलकीने वागविले जाई! विमानात मागे फुकायची खास सोय असायची, रेल्वेत, बस मधे किंवा हॉटेलात कुठेही ओढता यायची. इतकंच काय पण ऑफिसात काम करताना कामाच्या बरोबरीने बिडीची पण ओढाताण चालायची.
धूर तोचि सोडिता, वलय उमटले नवे
आज लागले सखि, व्यसन हे मला नवे
असं मैत्रिणीला बिनदिक्कतपणे सांगू शकणारे काही निधड्या छातीचे बाजीराव, होणार्या बायको पुढे मात्र पळपुटे बाजीराव व्हायचे! त्यामुळे, जर भावी बायको बरोबर असताना मित्रांची गाठ पडली तर त्यांची प्रचंड कुचंबणा व्हायची. त्यात ती 'शी! काय तुझे मित्र सिगरेटी फुंकतात!' असं म्हणाली तर तोंड दाबून बुक्क्यांची शिक्षा! ओबामाला प्रेसिडेंट व्हायची मुळीच खात्री वाटत नसणार. नाहीतर त्याने त्याच्या बायकोला प्रेसिडेंट झाल्यावर सिगरेट सोडेन असं वचनच दिलं नसतं!
बिडीने मानसिक बाजू संभाळली असली तरी आर्थिक बाजू मात्र कमकुवत केली होती. बरं, नुसत्या बिडीचा खर्च नव्हता, इतर अॅक्सेसरीजचा पण खर्च असायचा.. बिडी बरोबर चहा लागायचाच.. शिवाय नंतर वास मारायला पेपरमिंट सारखं काहीतरी! मग घरी खोटं बोलून पैसे लाटणे, तसे नाही मिळाले तर चक्क चोरणे किंवा बापाच्या बिड्या ढापणे हे नोकरी लागे पर्यंत तरी अपरिहार्यच होतं.
परंतु, जगाच्या पाठीवर निर्विघ्नपणे आणि उन्मुक्तपणे बिड्या ओढणार्यांच्या आनंदाने काही लोकांच्या पोटात मळमळायला लागलं.. 'सिगरेटमुळे कॅन्सर होतो' अशी हूल उठवून ती मळमळ बाहेर आली. त्या नंतर सर्वांनी हळूहळू फुंकणार्यांची गळचेपी सुरू केली. त्यांना वाळीत टाकण्यात येऊ लागलं. इथे ओढू नका, तिथे ओढू नका.. शक्यतो कुठेच ओढू नका म्हणून आमच्या स्वातंत्र्याची मुस्कटदाबी चालू केली! तो पर्यंत स्त्री-मुक्तीचं वारं प्यायलेल्या काही बायका बिड्या प्यायला लागल्या होत्या. पण फुकणार्यांनी कधीच संघटित होऊन 'फुकण्यावर बंधनं आल्यामुळे आमच्या भावना दुखावतात' असं ओरडून जाळपोळ वगैरे केली नाही त्यामुळे गळचेपी काही टळली नाही! ऑफिसात, हॉटेलात, विमानात इ. सगळीकडे ओढायला बंदी आली.. कडाक्याच्या थंडीत सत्रांदा ऑफिस बाहेर येऊन फुकायला गेंड्याची कातडी लागते हो!
हॉटेलातल्या स्मोकिंग झोनमुळे फुंकणार्या बरोबर न फुंकणारा हॉटेलात गेला तर दोघांची कुचंबणा व्हायला लागली! विमानात फुकायची बंदी पचवायला मला तरी फार अवघड गेली. आपल्याकडे बघून ती एअर होस्टेस चुकून जीवघेणी हसलीच, तर आपल्याला उलट हसता पण येत नाही.. कारण, बाबागाडीसुद्धा प्रशस्त वाटेल अशा इकॉनॉमी सीटवर बारा बारा तास कोंबून बसल्यामुळे थोबाड पण वाकडं झालेलं असतं हो!
कुठल्याही हूलीचं काय असतं, की ती खूप वेळा ऐकल्यावर आपल्याला खरीच वाटायला लागते.. वानगी दाखल पूर्वीची वाय२केची हूल घ्या नाहीतर सध्याची जोरात चाललेली ग्लोबल वॉर्मींगची हूल घ्या! परिणामी, बिडी ओढताना माझं मन मला ओढू लागलं, अपराधी वाटायला लागलं. त्यात एका इकॉनॉमिस्ट मित्राने, वेडीवाकडी गणितं मांडून, मी जर कधी सिगरेट ओढलीच नसती तर पुण्यात माझे किमान दोन फ्लॅट तरी झाले असते हे दाखवून दिलं. शिवाय, कॅन्सरमुळे पुढे होणार्या हॉस्पिटलच्या आणि उपचाराच्या आकड्यांनी त्याने माझे डोळे पांढरे केले. डॉक्टर मित्र 'सिगरेट तुझा जीव घेणार' असं बजावू लागले. मग मात्र सिगरेट सोडायला पाहीजे असं तीव्रतेने वाटायला लागलं.
प्रत्यक्षात तसं करणं किती कठीण आहे हे फुकणार्यालाच माहीती! बिडीच्या तलफेचा बीमोड करणं हे काडीमोड घेण्यापेक्षा अवघड आहे. काही जणांनी बिड्यांची तल्लफ मारण्यासाठी मावा किंवा खूप काय काय नंबरं असलेली पानं खाऊन पाहिली. काही दिवस जमलं ते! पण नंतर बिडी आणि पान या दोन्ही शिवाय त्यांचं पान हलेना! निकोटिनचा पॅच किंवा निकोटिन विरहित बिड्या असली उत्पादनं विकून काही कंपन्यांना चांगले पैसे सुटतात पण लोकांची बिडी काही सुटत नाही.. कंपन्यांनाही ती सुटायला नकोच असते म्हणा! काही दिवस सोडणं जमल्यावर आपल्या मनावर आता ताबा ठेवता येतो अशा भ्रामक समजूतीमुळे परत ओढणं चालू होतं. मला तरी, 'सिगरेट सोडणं सोप्प असतं. मी खूप वेळा सोडली आहे' या मार्क ट्वेनच्या उक्तीची भरपूर प्रचिती आली. पण धरसोड वृत्ती दाखवत शेवटी मी बिडीमुक्त झालो.
एके दिवशी, आनंदाने एका इकॉनॉमिस्ट मित्राला ही बातमी दिल्यावर त्यानं मला वेड्यात काढला. त्याच्या मते मी बिड्या फुकून देशाच्या इकॉनॉमीला हातभार लावत होतो. सगळ्यांनी फुकणं सोडलं तर सिगरेट कंपन्या बंद पडतील, तिथले कामगार बेकार होतील, तंबाखूचे शेतकरी आत्महत्या करतील, सिगरेट पॅकेजिंग करणार्या कंपन्या गाळात जातील, सिगरेट मार्केटिंग बंद झाल्याचा परिणाम जाहिराती बनविणार्या कंपन्यांचा धंदा कमी होण्यात होईल, तंबाखू आणि सिगरेटींच्या वाहतूकदारांचा धंदा बसेल, कोपर्या कोपर्या वरच्या पानपट्ट्या आणि त्यांना सिगरेटी पुरविणारे वितरक देशोधडीला लागतील, कॅन्सरचं प्रमाण कमी झाल्यामुळे हॉस्पिटलांचा धंदा कमी होईल, त्यामुळे त्यांची डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर माणसांची गरज कमी होईल, त्याचा परिणाम शिक्षण संस्थांवर होईल. बिड्या फुकणार्यांमुळे सामान्य जनतेला टॅक्स कमी पडतो. कारण, 'धूम्रपान आरोग्याला हानीकारक आहे' या नावाखाली सरकार भरपूर टॅक्स लावून फुकणार्यांची पद्धतशीर वाटमारी करतं. सगळ्यांनी फुकणं सोडलं तर कोट्यवधी रुपयांचं हे उत्पन्न बंद होईल आणि ते पैसे सरकारला सामान्य जनते वरचा टॅक्स वाढवून वसूल करण्या शिवाय काय पर्याय राहील बरं?.. माझ्या डोक्यात एक भुंगा सोडून तो नष्ट झाला.
आयला, बिडी जाळल्यामुळे इतक्या लोकांच्या पोटाची आग विझत असेल? गंभीर समस्या आहे ही! यावर नीटच विचार करायला पाहीजे.. आपोआप पावलं जवळच्या पानपट्टी पाशी थांबली.. एक मोठ्ठा झुरका घेऊन खोsल सुस्कारा सोडल्यावर पहिलं काय रजिस्टर झालं असेल तर..
स्मोकिंग किल्स! अँड येस, नॉट स्मोकिंग किल्स टू!
====== समाप्त ======

Thursday, March 10, 2011
अभिनय.. एक खाणे
पूर्वी पुण्यातल्या रूपाली/वैशाली हॉटेलात तुरळक गर्दी असायची. कधीही गेलं तरी बसायला नक्की जागा मिळायची.. शिवाय एका कॉफीवर बराच वेळ शिळोप्याच्या गप्पा ठोकता यायच्या! काही नाही घेतलं तरी वेटर हाकलायला यायचे नाहीत.. त्या मागे बहुतेक हॉटेल अगदीच रिकाम रिकाम वाटू नये हा उद्देश असावा.. 'कामाशिवाय जास्त वेळ बसू नये' छाप पाट्या पण नव्हत्या. वेटरांनाही आमच्याशी गप्पा मारायला वेळ असायचा. हल्ली आत घुसायला पण रांग असते. थोडा वेळ जरी काही न घेता कुणी बसलेलं दिसलं तरी वेटर लगेच येऊन नम्रपणे 'काय आणू?' विचारतात.. चाणाक्ष लोकांना ती 'टळा आता' ची गर्भित सूचना आहे हे लगेच समजतं!
त्या दिवशी कॉलेज सुटल्यावर नेहमी प्रमाणे शीण घालवायला मी रूपालीत धडकलो. एका टेबलावर राम्या शून्यात नजर लावून नुसताच बसला होता. राम्या म्हणजे आमच्यातला सखाराम गटणे. रोज तो तिथे एकच कॉफी घेऊन तासन तास पुस्तकं वाचत बसायचा. पुस्तक बिन राम्या म्हणजे जल बिन मछली, नांगी बिन विंचू, आयाळा बिन सिंह, सोंडे बिन हत्ती.. नाही.. ओसामा बिन लादेन नाही!
'काय राम्या? आज पुस्तक नाही? असं कसं झालं? मुंग्यानी मेरु पर्वत तर गिळला नाही ना?'.. त्याला शून्यातून बाहेर काढायचा मी एक नौटंकी प्रयत्न केला. शेजारी घुटमळणार्या वेटरला, रघूला, काय सण्णक आली कुणास ठाऊक! 'आज जरा हे वाचा'.. असं म्हणून त्यानं एक मेन्यू कार्ड राम्या समोर टाकलं. माझ्या घश्याच्या बाटलीतून शँपेन सारखं हसू उफाळलं.. इडली, डोसा व उत्तप्प्याच्या पलीकडे फारशी शब्द संपत्ती नसलेल्या माणसाकडून असा मस्त विनोद म्हणजे पोपटाच्या तोंडून पुलं ऐकण्यासारखं हो! खूष होऊन टाळी देताना त्याच्याकडे पाहीलं तर त्याला नवीनच चष्मा लागल्याचं दिसलं.
'आयला रघू! तुला चष्मा लागला? छान दिसतोय हं पण!'
'आता मला पण छान दिसतो'.. रघू त्याच्या नेहमीच्या उडपी ढंगाने बोलला.. त्याचा फॉर्म बघून त्याला ताबडतोब कॉफी आणायला पिटाळला.
दरम्यान, इगोच्या पार्श्वभागावर लाथ बसल्यामुळे राम्यानं शून्यातून बाहेर यायच्या ऐवजी रुपालीतून बाहेर पडणे पसंत केले.. मीही कॉफी ढोसून बाहेर आलो तो दिल्या घाईघाईत येताना दिसला... माझ्याकडे बघून एकदम म्हणाला 'पर्फेक्ट!'.. या पूर्वी दिल्यानं माझ्याकडे बघून 'पर्फेक्ट!' म्हंटलं होतं तेव्हा माझ्या पलिकडे एक रेखाचं मोठ्ठं पोस्टर होतं. या खेपेला पानाची टपरी आणि आत कळकट पानवाला होता! आयला! याला या पानवाल्यात आरस्पानी सौंदर्य दिसतंय की काय? मी खलास!
'अरे, पानवाल्यात काय पर्फेक्ट? तुला काय तो साडी नेसून बसल्यासारखा दिसतोय?'
'अरे तू! तूच! हे अंगावरचे बिनइस्त्रीचे कपडे, खांद्याला शबनम, खोल गेलेले डोळे, अर्धवट दाढीचे खुंट वाढलेले! वा! एकदम पर्फेक्ट!'.. हा नक्की टिंगल करतोय की स्तुती? त्याच्या मनातलं काळबेरं समजून न घेता बोलणं हे ट्रॅम्पोलिनवर क्रिकेट खेळण्यासारखं झालं असतं म्हणून रक्षात्मक पवित्रा घेतला!
'चल आत! आपण कॉफी घेऊ म्हणजे उतरेल तुझी!'.. आत जाऊन रघूला ऑर्डर सोडली... 'हं! आता बोल!'
'अरे, इथे फर्ग्युसन कॉलेजात आज एका टिव्ही सिरीयलचं शूटिंग चाललंय. मी तिथून चाललो होतो. त्याचा डायरेक्टर माझ्या चांगल्याच ओळखीचा निघाला. त्याला एका पत्रकाराची आवश्यकता आहे. त्याच्या एका पात्राने टांग मारली वाटतं त्याला! मला म्हणाला एखादा पकडून आण! तू एकंदरीत या शबनम बॅगेमुळे फिट्ट बसशील त्यात!'.. चला, म्हणजे दिल्याला भलतच काहीतरी चढलं होतं तर! पण केवळ माझ्या शबनम पिशवी मुळे मी एका भूमिकेत फिट्ट बसणार? माझ्या अभिनय कौशल्यामुळे नाही? हे तर माझ्याकडे बॅट आहे म्हणून मला क्रिकेट खेळायला बोलावल्यासारखं झालं. आता माझ्याही इगोच्या पार्श्वभागावर लाथ बसली. पण असं सरळ कसं म्हणणार?
'अरे! काहीही काय? उद्या तू मला भरतनाट्यम् करायला सांगशील!'
'नाही! भरतनाट्यम् मधे तू शोभणार नाहीस. एकतर तू असा खिडुक! नाचताना एक गिरकी मारलीस तर चमनचिडीसारखा हवेत उडून जाशील.'.. यॉर्कर टाकायला जावं आणि फुलटॉस पडावा तसं झालं मला!
'कोण डायरेक्टर?'
'सुहास देशपांडे!'... मनात विचार आला.. हा कोण सुहास देशपांडे? कधी नाव ऐकलेलं नाही. बहुतेक माझ्यासारखाच फर्स्ट टायमर दिसतोय. असल्या माणसाकडे काम करायचं? आपली काही लेव्हल आहे की नाही?
'हम्म्म! कधी नाव ऐकलं नाही रे हे! बरं, काय आहे कथानक?'
'मला माहीत नाही'
'कोण कोण आहेत?'.. संभाषण चालू रहावं म्हणून मी उगीचच काहीतरी पचकत होतो.. पोलिसानं पकडलं तर तो सरळ मला लाच द्या असं थोडंच म्हणतो.. कामाला कुठे? पगार किती मिळतो? असले मोडलेल्या नियमाशी दूरान्वयानेही संबंधित नसलेले प्रश्न तो विचारतो.. खरं तर, 'तुला अभिनय जमतो' या अर्थाचं काहीही तो एकदा जरी म्हणाला असता तरी मी भोपळ्यासारखा टुणुक टुणुक उड्या मारत गेलो असतो. पण लक्षात कोण घेतो?
'मोहन आगाशे, शेखर कपूर आणि काही सटरफटर! च्यायला, तू स्वत:ला अमिताभ वगैरे समजतोयस काय? लागला आपला... स्क्रिप्ट काय, हिरो कोण आहे, हिरॉईन कोण असले प्रश्न विचारायला! गप चल!'.. दिल्याला एक सुसंवाद म्हणून काही साधता येत नाही!
'पण असं कसं शूटिंगला जायचं? ते काय पिक्चरला जाण्याइतकं सोप्पं आहे काय?
मला नक्की काय करायचंय ते पण माहीत नाही. मला जमणार नाही ते! मी असं ऐनवेळेला कधी केलेलं नाही काम!'
'काय बोलतोस राव? तूच गेला होतास ना आपल्या कॉलेजच्या एकांकिका स्पर्धेत ऐनवेळेला!'.. अरे! हो की! मी ते साफ विसरलो होतो.. पण आत मधे कुठे तरी सुखावलो.. त्याला ते आठवलं म्हणून.
त्या स्पर्धेत आमच्या एकांकिकेच्या आधी दुसर्या एकाची एकांकिका होती.. जवळ जवळ एकपात्रीच होती.. युद्धकाळात एका जर्मन माणसाच्या आश्रयाला आलेल्या एका ज्यू वर काही तरी होतं.. त्यातला ज्यू 'तो' होता आणि जर्मन माणसाला एक किरकोळ प्रवेश होता.. तो जर्मन येऊन त्याला थोडा ब्रेड आणून देतो, काहीतरी डायलॉग मारतो आणि परत जातो, असा तो प्रवेश! त्याचं जर्मन पात्र ऐनवेळेला आलंच नाही.. त्यानं ते माझ्या गळ्यात घातलं.. काकुळतीला येऊन म्हणाला - 'या बुडत्याला तूच एक काडीचा आधार आहेस!'.. म्हणजे मी काडी! पण मी तयार झालो. मग थोडं फार जर्मन दिसण्यासाठी एकाचा शर्ट आणि दुसर्याचे बूट चढवले.. हो, कोल्हापूरी चप्पल घातलेला जर्मन बघितल्यावर बूट फेकून मारले असते लोकांनी!.. स्टेजवरून त्यानं खूण केल्यावर मी एंट्री घेतली.. तिथे अंधार होता.. मी खिशात हात घालून अंधारातून हळूहळू चालत असताना एक स्पॉटलाईट पण तेजाळत गेला.. आणि मी स्पष्ट होत गेलो.. माझी एंट्री लोकांना का आवडली कुणास ठाऊक!.. पण नुसता टाळ्यांचा कडकडाट झाला.. आता ब्रेड आणि डायलॉग टाकायचा की झालं.. पण ब्रेड कुठाय? मी घाईघाईत ब्रेडच न्यायचा विसरलो होतो.. तरी प्रसंगावधान राखून, खिशातून हात काढून ब्रेड द्यायची नुसती अॅक्शन केली आणि डायलॉग टाकला.. 'आज एव्हढाच ब्रेड! खा आणि मर भिकारड्या!'.. माझ्या आवेशामु़ळे तो हडबडला आणि पुढचे डायलॉगच विसरला.. त्यानं ब्रेड खायच्या ऐवजी मीच त्याला खाल्ला असं लोक म्हणतात.
'कॉलेजात चालतं रे काहीही! टिव्हीवर कसं चालेल असं?'.. मी जरा जास्त गूळ लावून मिळतोय का ते बघत होतो.
'उलटं, काही चुकलं तर तिथं रिटेक घेता येतात.'
सगळे मुद्दे खोडल्यामुळे मी वरकरणी नाखुषीने त्या हॉलवर गेलो. खरच तिथं शूटिंग चाललेलं होतं. ती २ भागांची मालिका होती, पूर्ण हिंदीतून पण जास्त मराठी नट नट्या घेऊन! एका कोपर्यात खुद्द शेखर कपूर कुणाबरोबर तरी चकाट्या पिटत बसला होता. दुसरीकडे मोहन आगाशे आणि इतर एका शॉटच्या डायलॉगची प्रॅक्टीस करत बसले होते. त्यांच मराठी ढंगाचं हिंदी ऐकताना मला हसू फुटत होतं.. पण सगळेच गंभीरपणे घेत होते.. त्यांच्यात एकमेकांच्या समोर टिंगल करायची पद्धत नसल्यामुळे असेल!.. मग मी पण भिंतीला टांगलेल्या चित्रासारखा निश्चल झालो.
आगाशे आणि शेखर कपूर दोघेही एकेका कंपनीचे मालक असतात. आगाशेची कंपनी पैशाचं बळ वापरून घशात घालायचा शेखर कपूरचा प्लॅन असतो. शेअरहोल्डरच्या मिटिंगमधे आगाशेला बरेच जण छळतात त्यामुळे तो शेवटी फार चिडलेला आहे असं त्या शॉट मधे होतं. रिहर्सल संपून ४/५ टेक नंतर तो शॉट ओके झाला. शेवटी, डायरेक्टर आगाशेला म्हणाला 'डॉक्टरसाहेब, आपले डोळे दाखवा न जरा!'.. मग आगाशेच्या कमी जास्त चिडलेल्या डोळ्यांचे शॉट झाले.
या सगळ्या भानगडीत बराच वेळ चालला होता. रुपालीतून बाहेर पडून जवळ जवळ पाच एक तास होऊन गेले होते तरी माझ्या शॉटचा पत्ता नव्हता. बाहेर पडून घरी फोन करून येण्या इतका वेळ पण डायरेक्टर देत नव्हता. उशीराचं कारण 'शूटिंगला गेलो होतो' असं सांगितलं असतं तर बाबांनी मलाच शूट केला असता. प्रत्येक उभरत्या तार्याच्या नशिबी अवहेलना आणि टिंगल असल्यामुळे मी शांत राहीलो. शेवटी एकदाचा तो ऐतिहासिक शॉट आला... आज एक नवीन तारा उदयास येणार होता.
शॉट शेखर कपूरच्या पत्रकार परिषदेचा होता.. डायरेक्टरने बर्याच लोकांना पत्रकार पकडून आणायला सांगीतलं होतं असं लक्षात आलं. त्या परिषदेतले सर्वच पत्रकार माझ्यासारखेच उभरते कलाकार होते. शेखर कपूरच्या एका उत्तरा नंतर पत्रकार म्हणून मला फक्त एक डायलॉग टाकायचा होता.. 'आप क्या कुछ नहीं कर सकते, मेहतासाब?'
शॉट सुरू झाला.. सगळे नवशिके इकडे तिकडे बघत होते. डायरेक्टर ओरडला.. इकडे तिकडे बघू नका. शेखर कडे बघा, मधे मधे 'समजलं' अशा अर्थाने डोकं हलवून नोट्स लिहील्याचं अॅक्टिंग करा. दुसरा शॉट.. शेखर कपूरचं 'ते' उत्तर संपत आलं त्याच वेळेला एक स्पॉटलाईट माझ्या थोबाडाकडे वळू लागला.. मी देहभान विसरलो.. माझी तंद्री लागली.. मी हळूहळू चालत होतो.. थोड्याच वेळात प्रखर प्रकाशाने माझं सर्वांग उजळून निघालं आणि.. 'आज एव्हढाच ब्रेड! खा आणि मर भिकारड्या!'.. काही समजायच्या आत हा डायलॉग पडला.. कसा कुणास ठाऊक! माझ्या आवेशाने या वेळेला शेखर कपूर हडबडला आणि डायलॉग विसरला. डायरेक्टरने जोरदार 'कट' 'कट' केली.. नंतर येऊन माझ्या डोळ्यात वेडाची झाक वगैरे दिसत नाही ना ते पाहून गेला. मी भयंकर ओशाळलो.. मला बघून मृत्यू पण ओशाळला असता. मला स्वतःची प्रचंड लाज वाटली आणि खूप दडपण आलं.
त्या दडपणाखाली, तिसरा शॉट मी शेखरला मेहतासाब म्हणायच्या ऐवजी कपूरसाब म्हणून घालवला. आणि चौथ्या शॉटमधे माझा डायलॉग भलत्याच ठिकाणी पॉझ घेऊन टाकला, असा.. 'आप क्या?'.. पॉझ.. 'कुछ नहीं कर सकते, मेहतासाब!'.. झालं.. त्या वेळेला तो डायरेक्टर 'कट' 'कट' ओरडायच्या ऐवजी माझ्याकडे बघून 'हल' 'कट' असं ओरडला हे मी शपथेवर सांगू शकतो. त्याच्या नशीबानं पाचवा शॉट ओके झाला आणि सगळ्यांनाच हायसं वाटलं.
१४ मार्चला माझा अद्वितीय अभिनय टीव्हीवर झळकणार असल्याचं तमाम आप्तेष्टांना आणि हितचिंतकांना कळवलं. तो दिवस आणि ती वेळ येईपर्यंत प्रचंड उत्कंठा लागून राहिलेली होती. अखेर, टीव्हीवर ते प्रकरण झळकलं.. कधी नव्हे ते मन लावून पाहीलं.. पण माझा पार्ट त्यात आलाच नाही.. नंतर दिल्याकडून असं समजलं की मी शेखर कपूरला खाल्ला म्हणून एडिटरने मलाच खाल्ला. घनघोर निराशा!.. त्या नंतर मी परत कुठल्याही शूटिंग मधे भाग घ्यायचा नाही असा निश्चय केला. सुदैवाने कुणी विचारायला पण आलं नाही.. आणि तारा उगवायच्या आधीच त्याचा नि:पात झाला.
माझ्यामुळे उगीचच एक भिकार प्रोग्रॅम बघायला लागल्याबद्दल बर्याच जणांच्या शिव्या मी खाल्ल्या. पण काही हितचिंतकांनी 'आयला! काय काम केलंस लेका तू! मस्तच! केवळ ग्रेट! काय बेअरिंग संभाळलं होतस! खल्लास! तुझं भवितव्य उज्वल आहे' इ. इ. सांगून मात्र मलाच खाल्ला!
(टीप :- काही नाव खरी असली तरी सर्व प्रसंग बनावट आहेत. )

Monday, January 24, 2011
सरकार राज
सरकारी कार्यालयाचे अनंत झटके खाल्ल्यामुळे कार्यालय या शब्दाची कार्य + आलय अशी फोड कुणा गाढवानं केली हा प्रश्न मक्या मला नेहमी विचारतो. त्याच्या मते त्याची फोड खरी 'कार्य जिथे लयास जाते ते ठिकाण' अशी सार्थ व्हायला हवी होती.. शाळांमधलं शिक्षण कालबाह्य आहे ते असं! मक्याचं आणि सरकारी कार्यालयांचं काहीतरी वाकडं आहे हे मात्र नक्की! त्यानं सरकारी कार्यालयाच्या जितक्या वार्या केल्या तितक्या पंढरीच्या केल्या असत्या तर प्रत्यक्ष विठोबा 'कर कटेवरी' अवस्थेत त्याच्या घरात येऊन खाटेवर उभा राहीला असता. संत महात्म्यांना कधी सरकारचा बडगा बघायला मिळाला नसावा नाही तर त्यांनी 'जन्म मरणाचे फेरे परवडले पण सरकारी हापिसाचे नको!' असा टाहो फोडला असता.
लग्नानंतरचे झटके खायच्या आधी मक्याला आणि त्याच्या होणार्या बायकोला (मायाला) रजिस्टर्ड लग्न करण्याचा झटका आला. वास्तविक, त्यांचं लग्न हे दोन्हीकडचं पहीलं आणि शेवटचं होतं तरीही ते दोघे 'काहीतरी नवेच करा' या मानसिकतेचे बळी असल्यामुळे त्यांच्या हट्टापायी कुणाचंच काहीही चाललं नाही! मग काय? मी आणि मक्या मॅरेज रजिस्ट्रेशन हापिसात लग्नाआधी बर्यापैकी लवकर हजर झालो.. रजिस्टर्ड लग्नासाठी किमान एक महिन्याची नोटीस द्यावी लागते हे समजलं होतो म्हणून. आजुबाजुच्या परिसराची आणि त्या हापिसाची एकूण दैन्यावस्था पाहिल्यावर आम्हाला झोपडपट्टी निर्मूलन केंद्रापाशी आलो की काय असं वाटलं! सरकारी हापिसं अशा निवडक गलिच्छ आणि बकाल भागातच का असावीत बरे? बहुधा, तसा नियमच असावा.. कारण, त्यामुळे त्यांना कागदोपत्री लोकाभिमुख की काय ते व्हायला जमत असेल!
एकाच हापिसात मॅरेज रजिस्ट्रेशन आणि जमिनींचे व्यवहार यांची कामं होतात असं समजलं.. दोन्ही कामं करणारा कर्मचारी वर्गही एकच! मॅरेज सर्टिफिकेट ऐवजी मक्याला चुकून ७/१२ चा उतारा दिला तर काय करायचं ही शंका चाटून गेली मात्र! हापिसाच्या भिंती 'सख्या चला बागांमधी रंग खेळू चला' या गाण्याच्या शूटिंगसाठी वापरल्या सारख्या ठायी ठायी पानाच्या पिचकार्यांनी रंगलेल्या होत्या! हापिसात शिरल्यावर नजरेला प्रथम फक्त फायलींचे ढिगारेच ढिगारे दिसले. प्रकाश अंधुक होता कारण खिडक्यांसमोरही फायलीच.. अंधुक प्रकाशामुळे ट्युबा लावलेल्या.. सगळ्या धुळीने माखलेल्या.. त्यातल्या काही बंद तर काही कोंबडी सारख्या पक् पक् पकाक करणार्या.. सर्वदूर कोळ्यांची जाळी! एका कोपर्यात पाण्याचा माठ! वरती लयीत घ्रंs घ्रंs आवाज करणारे पण हवा न सोडणारे काळवंडलेले पंखे! फायलींनी अर्धी अधिक व्यापलेली कळकट टेबलं! खुर्च्यांवर मळकट उशा टाकलेल्या.. काही खुर्च्या डुगुडुगू नयेत म्हणून फायलींनीच लेव्हल केलेली.. बहुतेक फायली मळकट आणि तिथल्या कारकुंड्यांसारख्याच तट्ट फुगून कचर्याच्या डब्यासारख्या वाहणार्या!
अंधारात नीट निरीक्षण केल्यावर ढिगार्यांच्या मागे लपून बसलेले कारकून दिसले. सगळ्यांचेच चेहरे जवळचं कुणीतरी खपल्यासारखे सूतकी होते! 'एक टेबल झेलू बाई, दोन टेबलं झेलू' असा भोंडला खेळत शेवटी एका कारकूनापाशी उभे ठाकलो तेव्हा त्यांचा लंच टाईम झाला. आम्ही किती वेळेबरहुकूम काम करतो हे कर्मचारी दिवसातून फक्त दोनच वेळी दाखवतात.. एकदा लंच टाईमला आणि दुसर्यांदा हापिस सुटायच्या वेळेला! तासाभराने आम्ही परत उगवलो तेव्हा, कुत्रं जसं आपलीच शेपटी पकडण्याचा निष्फळ प्रयत्न करून आपण किती बिझी आहोत असं भासवत असतं तसाच हा पण कार्यमग्न होता! काही वेळाने त्याला शेपटी शिवाय अजूनही काहीतरी काम आहे याची जाणीव झाली. त्याच्याशी झटापट केल्यावर समजलं की नोटीस द्यायचे फॉर्म संपले आहेत आणि ते एक आठवड्यांनी येणार आहेत.
दोन तीन आठवडे गेले तरी फॉर्म्सच दुर्भिक्ष संपेना.. या हापिसातले लोक दोन लग्नेच्छुक लोकांची ताटातूट करणारे व्हिलन अकस्मात होताहेत की काय अशी परिस्थिती व्हायला लागलेली!.. मग चाचरत चाचरत त्याला चहा प्यायचं गाजर दाखवलं.. तर पठ्ठ्या लगेच तयार झाला. चहा पिता पिता मी त्याच्या विविध अडचणीतून कामं करण्याच्या वृत्तीची उगाचच प्रशंसा केल्यावर गडी खुलला! मग त्याची 'मी किती थोर! मी कशी पटापट कामं उरकतो!' टाईप भंकस ऐकून घेताना आता तो दुर्लभ फॉर्म जादूने उपलब्ध होणार याची मला खात्रीच झाली! हळूच त्याला मक्याचं लग्न कसं जवळ आलं आहे याची अडचण सांगितली. त्यावर त्याने 'खरच फॉर्म संपले आहेत हो' असं सांगून आमच्या गनिमी काव्याचं शिरकाण केलं. फॉर्म विना मक्याचा आधुनिक रामदास कसा होणार आहे त्याचं सविस्तर वर्णन केल्यावर त्यानं आमची दया येऊन एक उपाय सुचवला! त्याच्या हापिसात एक फॉर्म फ्रेम करून ठेवला होता! का कुणास ठाऊक! कदाचित त्याला हौतात्म्य प्राप्त झालं असावं.. पण हार घातलेला दिसत नव्हता! त्यानं आम्हाला फॉर्म म्हणून त्या फ्रेमची झेरॉक्स वापरायला सांगितलं!
आनंदाने 'तो' फॉर्म घेरी नेऊन मक्याने भरला आणि आपली सही ठोकून मायाकडे सहीसाठी कुरीयर केला.. कारण ती दुसर्या गावची होती. ३/४ दिवसांनी सही झालेला फॉर्म घेऊन आम्ही परत त्याच हापिसात त्याच कारकुना समोर उभे राहीलो! फॉर्म बघितल्यावर तो खेकसला.. 'हे काय? इथे कोण सह्या करणार?'. नीट बघितलं तर फॉर्मच्या समासातल्या २/३ जागा तो दाखवत होता.. जिथे सह्या पाहीजेत असं फॉर्मवर कुठेही लिहीलेलं नव्हतं.. आणि कितीही रिडिंग बिट्विन द लाइन्स केलं असतं तरी कळालं नसतं! त्या ठिकाणी मक्याच्या आणि मायाच्या सह्या हव्या होत्या! परत कुरीयर आणि ३/४ दिवसांची निश्चिंती! हा मक्या मॅरेज रजिस्ट्रेशन हापिसाचे जितके फेरे घालतोय तितके लग्नात घातले तर त्याला पुढच्या ७ जन्मात परत लग्नाला म्हणून उभं रहावं लागणार नाही असं मला वाटून गेलं!
एकदाचा तो सह्याबंबाळ फॉर्म त्या कारकुनाच्या पसंतीस उतरला आणि आम्हाला हुश्श होतंय न होतंय तोच त्यानं आम्हाला तो फॉर्म घेऊन त्याच्या साहेबाकडे जायला सांगितलं. साहेब म्हणजे लग्न नोंदणी आणि जमिन व्यवहार नोंदणीचा रजिस्ट्रार! त्याला भेटून लग्नाचं आमंत्रण द्यायचं असतं लग्न नोंदणीची कायदेशीर बाजू संभाळण्यासाठी! साहेबाच्या हापिसात साहेब टेबलावर आणि पुढच्या खुर्च्यांवर बरीच रिकामटेकडी मंडळी पारावर बसल्यासारखी गप्पा हाणीत बसलेली होती. साहेब फॉर्म हातात घेताच म्हणाला - 'हां! कुठं आहे जमीन?'. मक्या चांगलाच पिसाळला, पण करतो काय? रजिस्टर लग्न करून आपण कसे पुढारलेले आहोत हे दाखवायचं होतं ना! त्यानं तो लग्नाच्या रजिस्ट्रेशनचा फॉर्म आहे हे म्हंटल्यावर साहेब तो फॉर्म बघितल्यासारखा करून म्हणाला - 'आत्ताच त्या वेळेचं काही सांगता येत नाही.. अजून जवळपास सव्वा महिना आहे लग्नाला! तुम्ही मला रजिस्ट्रेशनला बोलावण्यासाठी एक अर्ज करा! आणि लग्नाच्या २ दिवस आधी या! तेव्हा मी सांगेन!". तेव्हा हा म्हसोबा काय सांगणार? जमणार नाही यायला म्हणून? या पेपर पुशर मंडळींना आपल्याला सतत प्रेशर कुकर मधे ठेवण्यात एक अलौकिक आनंद मिळतो.
मक्याला अर्ज लिहीण्यासाठी कागद हवा होता. कारकुनाकडे मागितला तर सरकारी हापिसात तो देण्याची प्रथा नाही असं ठणकावण्यात आलं. शेवटी झेरॉक्सच्या दुकानातून विकत आणला. वेष असावा बावळा परंतु अंतरी नाना कळा याची जिवंत उदाहरणं म्हणजे हे कारकून! त्यांच्या अंगातली एक कळ आहे ती कुठल्याही कामाला ना! ना! करण्याची.. मात्र ती आपल्याला नाना कळा देऊन जाते! घाईघाईने अर्ज खरडून साहेबाच्या हातात कोंबला.. तो वाचून तो हसत म्हणाला - 'भारी आहात तुम्ही! त्या दिवशीच्या जाण्या-येण्याचा खर्च देऊ असं पण लिहा त्यात!'. आहे की नाही मजा? आता लग्नाला बोलावल्यावर त्याला जेवायला पण घालणारच ना? पण त्याचा जीव जाण्या-येण्याच्या खर्चात अडकला होता! ती ओळ टाकून त्याला फॉर्म देताना मक्यानं धाडस करून त्याला विचारलं की दोन दिवस आधी भेटल्यावर तो काय गुपित सांगणार आहे ते! त्यावर तो म्हणाला की मला तेव्हा तुम्हाला सांगता येईल मला कुठून पिकप करायचं ते!
शेवटी, लग्नाच्या दोन दिवस अगोदरची एक फेरी आणि लग्नानंतरच्या सर्टिफिकेट घेण्यासाठीच्या ३ फेर्या घातल्यावर आम्हाला मोक्ष मिळाला. लग्नाचं ओरिजिनल सर्टिफिकेट म्हणून 'त्या' झेरॉक्स केलेल्या फॉर्मचीच झेरॉक्स मिळाली. त्या काळात असं वाटत होतं की राजा केळकर संग्रहालयातून एक तलवार चोरून आणावी आणि तिचं पाणी यांना पाजावं, म्हणजे त्यांच्या घोड्यांना आपण पाण्यात दिसायला लागू!
या अनुभवानंतर लगेचच मक्यानं एक सिद्धांत मांडला - सरकारी कामं पहिल्या फटक्यात होत नाही. करॉलरी, ज्यांचं काम पहिल्या फटक्यात होतं ते सरकारी ऑफिसातलं नसतं. लग्नानंतर थोड्याच दिवसात त्याला अजून एक सिद्धांत मांडण्याची वेळ आली-- नवरा बायकोच्या आवडी निवडी कधीही जुळत नाहीत. करॉलरी, ज्यांच्या आवडी निवडी जुळतात ते एकमेकांचे नवरा बायको नसतात.

Wednesday, December 15, 2010
पेशाचे भोग
'कंप्युटर विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे देतो' असं मास्तरने सांगितल्यावर एका नवशिक्याने, निरागसपणे, 'पुण्याहून मुंबईला जाणारी डेक्कन क्वीन किती वाजता सुटते?' असा सोप्पा प्रश्न कंप्युटरला टाकला. त्यावर कंप्युटरने एरर! एरर! असा, दाराच्या फटीत शेपटी चिणल्यासारखा, जीवघेणा आक्रोश केल्यावर तो नवशिक्या त्याच्या विरुद्ध फतवा निघाल्यासारखा टरकला. त्यावर त्या मास्तरने, 'कंप्युटर मधे आपणच आधी माहिती भरायची असते, मग कंप्युटर तीच माहिती आपल्याला परत देतो' अशी सारवासारवी केली. कसली सॉलीड गेम टाकली की नाही? जी माहिती आपल्याला आधी पासूनच आहे ती प्रथम कंप्युटर मधे भरायची, नंतर तीच, प्रश्न विचारून काढून घ्यायची?
कितीही चमत्कारिक वाटली तरी आवळा देऊन आवळाच काढायची कला मला जमलीच! कारण पूर्वी कॉलेजमधे प्रॅक्टिकल्स न करता फक्त बरोब्बर उत्तरं देणारीच ऑब्झर्व्हेशन्स जर्नल मधे लिहायची चालुगिरी! त्यानंतर मात्र माझं घोडं अल्गोरिदम नामक दलदलीत जे फसलंय ते अजून पर्यंत!
कंप्युटर नवसाला पावावा म्हणून अल्गोरिदम नामक र्हिदम कोणत्याही ड्रमवर वाजवला जात नाही.. हे सुरवातीलाच मुद्दाम सांगतोय, नंतर तक्रार चालणार नाही! तर, अल्गोरिदम म्हणजे एखादी कृती कशी करायची याबद्दल कंप्युटरला दिलेल्या सविस्तर सूचना! आपल्या मते त्या कितीही सविस्तर आणि बिनचूक असल्या तरी कंप्युटर एखाद्या मोलकरणी प्रमाणे घालायचा तो घोळ घालतोच! कुणाला नुसती रेसिपी वाचून पहील्या फटक्यात उत्तम पदार्थ करायला जमलंय का कधी? तसंच!
अल्गोरिदमची भानगड कळण्यासाठी असं समजा की कंप्युटर एका फूटपाथवर आहे आणि त्याला पायी रस्ता कसा क्रॉस करायचा आहे. तर काय काय सूचना द्याल? थोडं सामान्यज्ञान वापरलं तर प्रथम झेब्रा क्रॉसिंग शोधायला सांगता येईल, नंतर आधी उजवीकडे मग डावीकडे गाडी नाही ना याची खात्री करून मग रस्ता क्रॉस करायला सांगता येईल. प्रथम दर्शनी या सूचना पुरेशा वाटतात पण या सूचना देऊन कंप्युटरला समजा टिळक रोडच्या फूटपाथवर उभा केला तर त्याला गंज चढेल पण तो रस्ता क्रॉस करू शकण्याची खात्री नाही. का? कारण पहिलीच सूचना! झेब्रा क्रॉसिंग शोधा! पुण्यात ते सापडण्यासाठी अस्तित्वात असलं पाहीजे ना? असलंच तर दिसलं पाहीजे. पुण्यामधे सिग्नल लागल्यावर झेब्रा क्रॉसिंगवर गाडी नाही उभी केली तर आपल्याला पुढे जाऊच देणार नाहीत असं समजतात.
समजा, क्रॉसिंग दिसलं तरी पुढे लफडा आहेच! उजवीकडे बघितल्यावर एखादी पार्क केलेली गाडी दिसली तर कंप्युटर 'युगे अठ्ठावीस फुटपाथ वरी उभा' राहील. त्यासाठी ती सूचना 'स्वतःच्या दिशेने येणारी गाडी दिसली तर ती जाई पर्यंत उभे रहा' अशी बदलायला पाहीजे. हा अल्गोरिदम घालून कंप्युटरला अमेरिकेत रस्ता क्रॉस करायला लावला तर तो कदाचित पलिकडच्या फूटपाथ ऐवजी स्वर्गात सापडेल कारण तिकडे गाड्या रस्त्याच्या उजव्या बाजूने चालवतात. त्यामुळे तिकडे आधी डावीकडे आणि नंतर उजवीकडे बघायला लागेल. अशा प्रकारे, प्रत्येक सूचना कुठे आणि कधी चालेल याचा कंटाळा येई पर्यंत उहापोह करून अल्गोरिदम लिहीला तरच डोक्याचा भावी ताप कमी होतो. हुश्श!
हे सगळं मी तुम्हाला माझ्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणून सांगत नाहीये.. वेल! म्हणजे, ते अगदीच खोटं नाहीये.. म्हंटलं तर झालाय, म्हंटलं तर नाही! त्याचं काय आहे, कंप्युटरला अल्गोरिदम भरवायचं माझं रोजचंच काम आहे. म्हणूनच प्रत्येक सूचनेला काय काय विघ्न येतील याचाच येता जाता विचार माझ्या डोक्यात सतत चालतो. ती कशी आणि कुठे झोपेल हे सारखं बघायचं.. असंभाव्य किंवा अतर्क्य गोष्टी घडतील असं गृहीत धरून!
त्या सवयीचा इतका गुलाम झालोय मी की साध्या साध्या कामांमधे देखील कीस काढतो अगदी! बायकोने नुसतं पोराला शाळेत सोडायला सांगितलं तरी माझ्या डोक्यात असंख्य विचारभुंगे भुणभुणायला लागतात.. ट्रॅफिक किती असेल?.. दुसरा रस्ता आहे का जायला?.. वेळेवर पोचणार का?.. पोरगा तयार होणार का लवकर?.. स्कूटर न्यावी की कार?.. पेट्रोल आहे का?.. पेट्रोल भरायची वेळ आली तर वेळ गाठणार का?.. पाऊस आला तर?.. वेळेवर पोचलो नाही तर काय करायचं?.. मला ऑफिसला पोचायला किती उशीर होईल?.. ऑफिसात आज काय करायचंय सकाळी?.. तंद्रीमधे पोराला ऑफिसलाच घेऊन गेलो तर?
असो. साधारण कल्पना आली ना तुम्हाला? इथंच ते प्रकरण थांबत नाही, तर त्या विचार भोवर्यात मी पूर्ण गुरफटतो. बायकोकडे तोंड अर्धवट उघडं टाकून पहात रहातो पण प्रत्यक्षात शून्यात पहात असतो. त्यामुळे पुढच्या सूचना न्युट्रिनो सारख्या कुठेही न अडखळता डोक्याच्या आरपार सरळ निघून जातात. त्या पुढच्या नाट्याचे यशस्वी प्रयोग घराघरातून सतत होत असतात त्यामुळे ते इथे सांगत बसत नाही.
मला वाटतं की हे पेशाचे भोग फक्त माझ्याच नशिबी असावेत. कारण, इतर लोकांना त्यांच्या पेशाचा घरगुती आयुष्यात उपद्रव झालेला मी तरी ऐकलेला नाही. उदा.. ट्रॅफिक पोलीस.. त्याच्या बायकोने जर 'स्वयंपाक करायला जाते' म्हणून घराच्या बाहेरचा रस्ता धरला तर तो जोरजोरात शिट्टी मारून तिला 'बाजूला' घेईल का? किंवा वीजमंडळातल्या कारकुनाच्या बायकोने त्याला विजेचं बिल भरायला सांगितलं तर तो तिला दुसर्या टेबलावर जा म्हणेल का? वाण्याला घरात कागदाचा तुकडा दिसला तर तो समोर दिसेल ती वस्तू त्यात गुंडाळून मोकळा होईल का? एखादा वकील, त्याला गावाहून परत येण्यास जास्त दिवस लागणार असतील तर असं पत्र बायकोला लिहीताना पाहीलं आहे का ?..
My Dear Shubha(Mrs. Shubha Vinayak Dange, Aged 34, resident of 234/56, Vakratunda Co-op Soc, Sadashiv Peth, Tilak Road, Pune 411004. Hereinafter referred to as 'Darling'.)
I, (Mr. Vinayak Shreedhar Dange, Aged 35, resident of 234/56, Vakratunda Co-op Soc, Sadashiv Peth, Tilak Road, Pune 411004. Hereinafter referred to as 'I'.), came to Delhi for official work on Monday the 28th of Oct. 2010, and whereas, the work was delayed because of the act of God, and whereas, I am not able to get train and plane tickets, and whereas, it is not clear when I can leave from here, I am not sure when I can be home.
______ (स्वाक्षरी)
(Mr. Vinayak Shreedhar Dange) Dated: 5 Nov 2010
Witness: _______ (Mr. Jayram Ramram Taliram, Aged 43, resident of 8502/41, Aarakshan road, Connaught place, New Delhi- 110092.)
Dated: 5 Nov 2010
कॉल सेंटर मधे काम करणार्या एखाद्या बाईला, घरी, तिच्या नवर्याचा फोन आला तर तिनं त्याला.. तुमची जन्मतारीख काय?.. तुमच्या आईचं लग्नापूर्वीच नाव काय?.. तुमचा पत्ता काय? इ. इ. प्रश्न विचारून हैराण केलेलं कुणी ऐकलं आहे काय? एखादा वेटर, घरी बायकोने खाण्यासंबंधी काहीही विचारलं तर 'इडली, वडा, डोसा, उत्तप्पा, कांदा उत्तप्पा, टोमॅटो आमलेट....' अशी सरबत्ती करेल काय? शाळा मास्तराने घरी बायकोला अंगठे धरून उभं रहाण्याची शिक्षा दिल्याचं ऐकलं आहे काय? घराच्या दाराची घंटा वाजल्यावर बस ड्रायव्हरला कधी गिअर टाकण्याची हालचाल करताना पाहीलं आहे काय? गारुड्याला बायकोसमोर पुंगी वाजवताना पाहीलंत का? रिकाम्या न्हाव्याला उगीचच कात्रीचा चुकचुकाट करीत बसलेला पाहीलाय का कुणी?
नाही ना? तेच तर मी म्हणतोय की इतर लोकांचं जिणं त्यांच्या पेशाच्या प्रदूषणापासून मुक्त आहे. तुम्हाला एखादी केस माहिती असलीच तर ती मी एक्सेप्शन प्रुव्हस द रूल म्हणून सोडून देईन. तुमचे केस जातील पण माझ्या सारखी केस नाही मिळणार! मला कंप्युटरनं झपाटलंय! कंप्युटरचं प्रोग्रॅमिंग करता करता त्यानंच माझं डोकं फॉर्मॅट करून तिथं चक्क नवीन ओएस टाकली आहे. आता तर, कुठलीही काम करण्याआधी मी नुसतं काय बोंबलेल याचा विचार करून थांबत नाही तर त्या प्रसंगी मार्ग कसा काढता येईल त्याचंही चर्वितचर्वण करायला लागलोय! इतका सगळा सखोल विचार केला तरी ते काम बोंबलायचं थांबत नाहीच शेवटी! फरक इतकाच की बोंबलण्याचं कारण आधी विचार न केलेल्या पैकी असतं. तरीही विक्रमादित्याचा आदर्श ठेवून, तेच काम पुढच्या वेळेस करायच्या वेळेला बोंबलण्याच्या नवीन कारणाचाही समावेश करायला जातो. याचा परिणाम फक्त अख्ख्या फॅमिलीची डोकी तापवण्यात होतो.. आणि माझंही!
उदाहरणार्थ, मंडईतून भाजी आणण्याची साधी गोष्ट! आयुष्यात पहिल्यांदा मी भाजी आणायला निघालो तेव्हा तुफान डोकं चालवल्यावर मला आणायच्या भाज्यांची यादी करायचं सुचलं. ती यादी एखाद्या कवितेच्या रसग्रहणासारखी लांबलचक झाली. पण प्रत्येक भाजी किती किलो घ्यायची हे न लिहील्यामुळे संजीवनी न शोधू शकणार्या हताश हनुमानाप्रमाणे घरी द्रोणागिरी एवढ्या भाज्या आल्या. त्याचं वेगळं रामायण झालं आणि माझे गाल, मारुती प्रमाणे, पुढचे बरेच दिवस फुगलेले राहीले. पुढच्या वेळेस यादीत सगळं नीट लिहून घेऊन गेलो पण माठ नामक भाजी ऐवजी पाण्याचा माठ नेण्याचा माठपणा केला. कुणा लेकाला माहिती माठ हे भाजीचं पण नाव असतं ते?
पुढच्या वेळेस गेलो तेव्हा मी भाजीवाल्यासमोर आणि माठ कसा ओळखायचा हा यक्ष प्रश्न माझ्यासमोर एकदमच उभे ठाकले. भाजी विकण्याची गरज त्याला जास्त आहे त्यामुळे तो योग्य ती भाजी देण्याचं काम चोख करेल असं समजून निर्धास्तपणे मी त्याला माठ मागितला. पुष्कळशा टोपल्या आजुबाजूला पसरून बर्याच आत मध्यभागी तो कोळ्यासारखा बसलेला होता. उत्तरादाखल त्यानं फक्त एक टोपली माझ्याकडे फेकली. एका यकश्चित भाजीवाल्या समोर माठ नावाखाली मायाळू घेऊन स्वतःचं हसं करून घ्यायचं नव्हतं मला! शिवाय, त्यानं भर मंडईत माझं शैक्षणिक वस्त्रहरण केलं असतं तर ते केव्हढ्याला गेलं असतं? मग माझी प्रतिष्ठा जपण्यासाठी माठ सोडून तिथून ताठ मानेने सटकलो. पण घरी बायकोशी गाठ होती.. हो, लग्नापासून बांधलेली! तिच्या लाथाळ्या खाल्ल्या. पुरुष हा क्षणकालाचा पती आणि अनंत काळाचा फुटबॉल असतो, हे मूलभूत ज्ञान मला तेव्हा झालं! शाळा कॉलेजात आई बाप, मोठी भावंड, मास्तर, नातेवाईक.. तारुण्यात बॉस, बायको, पोरंबाळं.. म्हातारपणी पोरांच्या बायका इ. इ. सगळे पुरुषांवर यथेच्छ पाय धुवून घेतात. नाही म्हणायला फक्त शैशवातच काय ते थोडं फार कोडकौतुक होतं पुरुषांच! म्हणूनच प्रौढत्वी निज शैशवास जपायला सांगतात की काय न कळे!
कधी सांगितलेली भाजी मंडईत नसणे तर कधी अधपाव म्हणजे नेमके किती असा प्रश्न पडणे अशा नवनवीन समस्या उद्भवणं काही थांबत नाही आणि त्या वेळेला मख्खपणे काम जमत नाही हे पण सांगता येत नाही! घोर कुचंबणा! कंप्युटरचं माणसापेक्षा बरं असतं. कुठेही तो अडकला की एरर फेकून हात झटकून रिकामा होतो. आठवा, मायक्रोसॉफ्टचे 'जनरल प्रोटेक्शन फेल्युअर' हे तीन अगम्य शब्द! ते स्क्रीनवर नाचले की एक्सप्रेस वे वरून भरधाव जाता जाता अचानक समोर मोठ्ठं विवर दिसल्यावर जसं फेफरं येईल तसं येतं. विचार करा, ओबामाची सुरक्षा व्यवस्था मायक्रोसॉफ्टकडे असताना त्याच्यावर हल्ला झाला तर ते 'जनरल प्रोटेक्शन फेल्युअर' ही भीषण एरर देऊन त्यातून अंग काढू शकतील का? असा सुलभ ऑप्शन माणसांना नसतो.
तरीही मी विचार करायचा थांबत नाही. मला ते व्यसन लागलंय. हेच बघाना, एकाने मला याच वेडावर लेख लिहायला सांगितलं तर लगेच.. कादंबरी लिहावी की साधा लेख?.. लिखाण टाकताना मधेच सर्व्हर झोपला तर?.. लोकांना अश्लील वाटला तर?.. हा लेख दुसर्या कुठल्या लेखाची कॉपी वाटला तर?.. .. .. .. .. ..

Subscribe to:
Posts (Atom)