Posts

भूतचुंबक

बंड्या वाघ माझा शाळासोबती! आम्ही शाळेत असताना त्याला साप चावला होता. त्याचं असं झालं.. त्याच्या घरात आई-वडील कुणी नव्हतं.. तो एकटाच खेळत होता.. मधेच त्याला काहीतरी बांधायला दोरीची आवश्यकता भासली.. म्हणून तो घरात आला.. तर आतल्या दरवाज्यावरच एक, त्याला हवी होती तशी, दोरी लोंबकळताना दिसली.. क्षणाचाही वेळ न घालवता त्यानं ती धरली आणि ओढली.. त्याच्या दुर्दैवाने तो विषारी साप होता.. सापानं त्याचं काम चोख बजावलं.. त्यावर बंड्याला काय करावं ते सुचेना.. आईला शोधून काढून दवाखान्यात जाई पर्यंत थोडा उशीर झाला.. म्हणजे बंड्याला दवाखान्यातच अ‍ॅडमिट करावं लागलं.. थोडे आधी उपचार झाले असते तर लगेच घरी जाता आलं असतं इतकंच.. अपघात असल्यामुळे ती एक पोलीस केस पण झाली. बंड्या वाचला खरा पण घरच्यांच्या आणि आमच्या तोंडचं पाणी पळवलं त्यानं! दुसरे दिवशी एका भुक्कड पेपरात चक्क बंड्याच्या मृत्यूची वार्ता छापून आली.. जिचा त्याच्या घरच्यांना काहीच पत्ता नव्हता.. लगेच शाळेला सुट्टी देण्यात आली.. धक्का बसलेल्या अवस्थेत वर्गातली काही मुलं आणि एक दोन मास्तर सुतकी चेहर्‍याने त्याच्या घरी गेले.. घरी फक्त वडील होते त्याचे...

ऐका हो ऐका!

दिल्या: 'अरे मक्या! काय झालं? इतका काय विचार करतोयस?'.. कधी नव्हे ते भरलेल्या साप्ताहिक सभेत विचारमग्न मक्या डोक्याला हात लावून शून्यात बघत बसलेला होता.. हो. बरेच दिवसांनी आमच्या साप्ताहिक सभेचा कोरम फुल्ल होता.. म्हणजे सगळ्या बायका आलेल्या होत्या.. कधी नव्हे ते तिघींना टीव्हीवर कुठलीही मालिका बघायची नव्हती.. कुठेही नवीन सेल लागलेला नसल्यामुळे आणि चालू सेलना भेटी देऊन झालेल्या असल्यामुळे शॉपिंगला जायचं नव्हतं.. 'हसून हसून पोट दुखायला लागेल' अशी जाहिरात केलेलं कुठलंही विनोदी नाटक कम सर्कस बघायची नव्हती... आणि कुठल्याही गोssड हिरोचा पिक्चर लागलेला नव्हता. मी: 'माया! तू ह्याला तुझ्या जडीबुटीतलं काय उगाळून दिलंस?'.. मी मायाच्या आयुर्वेदिक पदवीवर थोडे शिंतोडे उडवून वातावरणात जान आणायचा प्रयत्न केला. माया: 'माझी कुठलिही मात्रा त्याच्यावर चालत नाही!' मक्या: 'अरे बाबा! आम्ही एक नवीन पॅकेज तयार केलंय.. डॉक्टरांसाठी. छोट्या मोठ्या दवाखान्यातनं जे पेशंट येतात ना.. त्यांच्या अपॉइंटमेंटच्या नोंदी.. त्यांची मेडिकल हिस्टरी.. त्यांच्या टेस्टचे निकाल.. त्यांना ...

रिचर्ड फाइनमन

Image
"मी घरी जातोय!" आपल्या ऑफिसमधून बाहेर डोकावून फाइनमनने आपल्या सेक्रेटरीला, हेलन टक ला, सांगीतलं. पण घरी जाण्यासाठी ऑफिसातून बाहेर पडायच्या ऐवजी शर्ट काढत काढत स्वारी परत ऑफिसात गेली. हेलन चक्रावली. थोड्या वेळाने दबकत दबकत तिनं त्याच्या ऑफिसात डोकावलं तर स्वारी शांतपणे कोचावर पहुडली होती. गेले काही दिवस त्याचं हे असं वेड्यासारखं चाललं होतं.. कधी तो लेक्चरला जायचं विसरायचा, तर कधी त्याला आपली पार्किंगमधे ठेवलेली गाडी सापडायची नाही! हे सगळं तो एकदा घरा शेजारच्या फुटपाथला अडखळून डोक्यावर पडल्यामुळे आणि त्याने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे झालं होतं. डोक्याच्या आत थोडा रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याला आजुबाजुची किंवा स्थलकालाची जाणीव राहिली नव्हती आणि आपण काय करतोय हेही त्याला उमगत नव्हतं. शेवटी त्याला डॉक्टरकडे नेल्यावर हे सगळं बाहेर आलं आणि त्याच्यासकट इतरांनाही समजलं. "मला का नाही कुणी सांगीतलं?".. फाइनमनने त्याच्या एका जवळच्या मित्राकडे त्याबद्दल विचारणा केली. मित्र म्हणाला - "ओ कमॉन! तुला कोण सांगणार? तू बर्‍याच वेळेला असं वेड्यासारखं करतोस! तसं बघायला गेलं तर अ...

क्लोज एन्काउंटर्स ऑफ द चायनीज काईन्ड

आपल्या ऑफिसात कामाला नसलेल्या, आपल्या शेजारी रहात नसलेल्या, आपल्याला रोजच्या बसमधे न भेटणार्‍या, आपल्या मुलाच्या मित्राचा बाप नसलेल्या, म्हणजे थोडक्यात आपल्याला कुठेही न भेटणार्‍या आपल्या सारख्याच सामान्य चिन्याशी आपली रोज भेट होण्याची किती शक्यता आहे? माझ्या मते, प्रियांका चोप्रा माझी हिरॉईन होण्याची जेव्हढी शक्यता आहे तेव्हढीच.. पण तरीही ती शक्यता माझ्या बाबतीत वास्तवात आली.. एका चिन्याच्या भेटीचा योग रोज आला. तेव्हा मी रोज ५० मैल लांब असलेल्या गावातून ऑक्सफर्डला गाडी हाकत यायचो. पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे डोळ्यात येणारे पाणी (त्याऐवजी पेट्रोल आलं असतं तर किती बरं झालं असतं असं वाटायचं) आणि डिव्हायडरने प्रत्यक्ष भेटून दाखवलेलं झोपेचं खोबरं या विघ्नांना शरण जाऊन मी एका कार शेअर साईटला साकडं घातलं.. कंप्युटर पाण्यात ठेवला.. आणि थोड्याच दिवसात.. म्हणजे तब्बल एका वर्षा नंतर एका चिन्याने साद दिली. आम्ही प्राथमिक चर्चा करायला प्रथम भेटलो.. पहिलं हाय हॅलो झाल्यावर मी त्याला त्याचा नेहमीचा रस्ता जाणून घेण्यासाठी विचारलं "हाऊ डू यू गो टू ऑक्सफर्ड?". तो: "हाऊ व्हॉट?"...

एका जाज्वल्य उपक्रमाबाबत

"काही नाही. निदान महाराष्ट्रात तरी सगळं शिक्षण मराठीतूनच द्यायला पाहीजे. तरच मराठी जगेल. नाही तर पाली, संस्कृत सारखी मराठी पण नामशेष होईल." दिल्यानं साप्ताहिक सभेत आणलेला नवीन प्राणी.. उत्तम बापट.. मुठी आपटून आपटून पोटतिडिकेनं बोलत होता. त्याच्या वाक्यावाक्यातून मराठीचा जाज्वल्य अभिमान मायक्रोवेव्हमधल्या पॉपकॉर्न सारखा उसळत होता. त्याच्या युवराजसिंगी धडाक्यामुळे माझ्यातही पोटतिडिक निर्माण झाली.. पण तिच्या उत्पत्तिचं मूळ भुकेमधे होतं हे नंतर उमजलं. मी हळूच मक्या आणि दिल्याकडे पाहिलं. ते बिअर पिऊन थंडावले होते, तिकडे उत्तम उत्तम (उत्तमोत्तम म्हणावे का?) पेटला होता. मला त्याचं म्हणणं पटत होतं.. तसं मला कुणीही काहीही जरा ठासून सांगीतलं की पटतंच. मी: "खरय तुझं. आपण तरी काय करणार?".. मी काही तरी गुळमुळीत बोललो. उत्तमः "अरे काय करणार म्हणजे? काय नाही करू शकणार?".. जोरात मूठ आपटून तो आणखी उसळला.. याला आता मूठ आपट बापटच म्हणायला पाहीजे.. तत्काळ मी भलतंच बोलल्याची जाणीव झाली.. मी नर्व्हसपणे इकडे तिकडे पाहीलं. थंडावलेले मक्या, दिल्या मदतीला यायची शक्यता नव्हती. ...

उच्चारकल्लोळ

कुणी मला सांगीतलं की "मी माझं नाव लिहीतो 'खरे' पण म्हणतो 'खोटे'", तर मी म्हणेन खर्‍याची दुनिया नाही राहिली राव! हो, मग दुसरं काय म्हणणार? उच्चार जर 'खोटे' करायचाय तर 'खरे' लिहायचंच कशाला? 'खोटे' च लिहीना लेका! हे असं मला तरी वाटतं, तुम्हालाही तसंच वाटेल कदाचित! कारण, आपल्या देवनागरी लिपीत अक्षराप्रमाणे आणि अक्षराला लावलेल्या काना, मात्रा वेलांटी इ. इ. प्रमाणे नेमका उच्चार सूचित होतो. काही शब्दं हुलकावणी देऊन जातात, नाही असं नाही.. उदा. तज्ञ हा शब्द तज्ज्ञ असा लिहीला जातो, तर सिंह चा उच्चार सिंव्ह असा होतो... पण बहुतांशी उच्चार नीट करायला जमतात. देवनागरी लिपीत अक्षरांचे उच्चार जमले की बहुतेक शब्दांचे उच्चार जमतात.. अर्थात, थोड्या गोच्या वगळता. मराठीतल्या 'च' चा उच्चार काही शब्दांमधे 'च्य' असा होतो, उदा. चप्पल.. उच्चार च्यप्पल न करता चप्पल असा केला तर चांगलं गाणं ऐकताना मधेच जबरी खरखर आल्यासारखं वाटतं. 'ज' चं पण तसंच आहे. 'लक्ष्य' चित्रपटात अमिताभने एका मराठी माणसाची भूमिका केली आहे.. कॅप्टन दामले त्याचं ...

अवकाश वेध

Image
ऑक्सफर्डच्या हिस्टरी ऑफ सायन्स म्युझियम मधे अ‍ॅस्ट्रोलेब (Astrolabe) या एका जुन्या बहुपयोगी उपकरणाबद्दलची माहिती ऐकण्याचा योग नुकताच आला. ते यंत्र पूर्वी त्या म्युझियममधे पाहिलेलं होतं पण त्याचा वापर तेव्हा कसा करायचे ते समजलं नव्हतं. त्यामुळे ते भाषण ऐकायला उत्सुकतेने गेलो. अ‍ॅस्ट्रोलेब हे वेळ बघण्यासाठी तसेच आकाशातील ग्रह व तारे यांच्या जागा शोधण्यासाठी वापरलं जायचं. ते ८ व्या शतकात मुस्लिम देशामधे वापरायचे. तिथून १२ व्या शतकात ते युरोपात आले. भाषणात ते यंत्र दाखवून ते कसं वापरायचं याचं व्यवस्थित प्रात्यक्षिक दिलं. त्या दिवसापासून यावर एक लेख लिहायला पाहीजे असं डोक्यात घोळत होतं. पण प्रत्यक्ष हातात यंत्र न घेता आणि तुम्ही समोर नसताना तुम्हाला ते कसं सांगावं याचा विचार चालू होता आणि अधिक माहितीसाठी गुगल करणंही चलू होतं. इंटरनेट हे एक मोठं रद्दीच दुकान आहे, त्यात काहीही सापडतं किंवा कधी कधी काहीच नाही. सुदैवाने माझ्या हाती एक खजिनाच हाताला लागला. हा लेख त्या मिळालेल्या खजिन्याबद्दल आहे. अ‍ॅस्ट्रोलेबचा इतिहास इथे आहे. या व्हिडिओत अ‍ॅस्ट्रोलेबने वेळ कशी बघायची याचं प्रात्यक्षिक दिस...