टिव्हीवर लागलेला क्लिंट ईस्टवूड आणि शर्ले मॅक्लेनचा 'टू म्युल्स फॉर सिस्टर सेरा' पहात असताना माझं लक्ष एका गोष्टीनं वेधून घेतलं. शर्लेनं नाही हो.. त्यातल्या टायटल म्युझिकनं!
सुरवातीला एक क्लॅरनेट किंवा फ्लूट एक शांत धुन वाजवून थोडंस गूढ वातावरण निर्माण करतं. मग एक तंतुवाद्य साधी सरळ सोप्पी सुरावट चालू करतं.. कापूस पिंजताना जसे आवाज होतात साधारणपणे तसे सूर ऐकू येतात.. हाच त्या पूर्ण संगीताचा पाया! मग इतर चित्रविचित्र आवाज करणारी वाद्य हजेरी लावतात. तंतुवाद्याच्या पार्श्वभूमीवर परत क्लॅरनेट किंवा फ्लूट आणखी सुंदर सुरावटी फेकतं आणि एक अवीट गोडीचं, परत परत ऐकावसं वाटणारं असाधारण संगीत ऐकायला मिळतं!
ते इथे ऐका
ते ऐकल्यावर माझं पूर्ण पिक्चर मधलं लक्ष उडालं. परत तेच म्युझिक कधी येतंय त्याचीच वाट आतुरतेने माझे कान बघत राहीले. नशीबाने ते म्युझिक पिक्चर भर अधून मधून ऐकायला मिळालं.
खर तर मला संगीतातलं खालच्या 'सा' पासून वरच्या 'सा' पर्यंतच काहीही कळत नाही. संगीतातली माझी गती 'सा'धारणच! मला हिमेश रेशमिया पासून कुमार गंधर्वांपर्यंत सगळे सारखेच! संगीतात कुणी 'गल्ली चुकला' तरी मला तो हमरस्त्यावरूनच चालला आहे असंच वाटतं. सवाई गंधर्वला जाण्यात माझा अंतस्थ हेतु वेगळाच असायचा! अशा संगीत बधीर माणसाचं केवळ संगीतानं लक्ष वेधणार्या संगीतकारावर संशोधन करणं अपरिहार्य होतं.. त्यातून एक महत्वाचा शोध लागला.. तो म्हणजे संगीतकार एनिओ मोरिकोने! निदान मी तरी हे नाव कधी ऐकलेलं नव्हतं. त्या उत्खननात मिळालेली ही माहीती....
१९२८ साली रोममधे जन्मलेला एनिओ मोरिकोने ट्रम्पेट वाजवायला शिकला होता. सुरवातीचं त्याचं संगीत फारसं गाजलं नाही. तरीही सर्जिओ लिऑनने 'ए फिस्ट फुल ऑफ डॉलर्स' या वेस्टर्न पिक्चरचं संगीत दिक्दर्शन त्याच्याकडे सोपवलं. त्यातल्या चित्रविचित्र वाद्यांची सरमिसळ करत केलेल्या अविस्मरणीय सुरावटींमुळे तो प्रचंड लोकप्रिय झाला. इथेही सुरवात फक्त गिटारच्या धुनने होते आणि हळूहळू इतर वाद्यांची जोड मिळत एक सांगितिक भूलभुलैय्या बनतो. त्या नंतर लिऑनच्या बहुतेक पिक्चर्सना त्यानंच संगीत दिलं. नवकेतन - एसडी बर्मनसारखी लिऑनची आणि त्याची जोडी जमली.
याच माणसानं 'फॉर अ फ्यु डॉलर्स मोअर' व 'द गुड द बॅड द अग्ली' सारख्या चित्रपटांचं संगीत दिलं होतं हे वाचून मला तर जुना मित्र अचानक भेटल्याचा सुखद धक्का बसला कारण कॉलेजात असल्यापासून त्या संगीतानं माझ्या मनावर एक ठसा निर्माण केला होता. माझ्याच काय पण शोलेचं टायटल म्युझिक ऐकलंत तर आरडीच्या मनात पण त्यानं घर केलं होतं हे जाणवेल.
जरी त्याचं नाव बहुतांशी वेस्टर्न चित्रपटांच्या संगीताशी जोडलं जातं तरीही त्यानं कॉमेडी, हॉरर, रोमँटिक, थ्रिलर्स असल्या सर्व प्रकारच्या सुमारे ४०० चित्रपटांना संगीत दिलेलं आहे. त्याला काही चित्रपट संगीतासाठी ऑस्कर नॉमिनेशन्स मिळाली होती पण बक्षीस कधीही मिळालं नाही. पण त्याची प्रचंड लोकप्रियता आणि नेहमीच्या पठडीतलं नसणारं व अशक्य सुरावटींनी मढलेल्या संगीतानं जगाचा कर्णवेध करण्याचं सामर्थ्य याचा आदर म्हणून २००७ साली क्लिंट ईस्टवूडच्या हस्ते सन्माननीय ऑस्कर देण्यात आलं.
जुन्या वेस्टर्न सिनेमांचं, वैविध्यपूर्ण, मला फार आवडणारं, म्युझिक एनिओ मोरिकोनेनं दिलं होतं हे आता मी मात्र कधीच विसरणार नाही!
ए फिस्ट फुल ऑफ डॉलर्स --
फॉर अ फ्यु डॉलर्स मोअर -- यातलं गिटार ऐकताना अंगावर काटा आला.
द गुड द बॅड द अग्ली -- यातलं एक मिनीट १८ सेकंदानं येणारं ट्रम्पेट जबरी आहे.
शोलेचं टायटल म्युझिक --
वन्स अपॉन अ टाईम इन अमेरिका: डेबोराज थीम -- अप्रतिम आहे.. ऐकताना समुद्राच्या लाटांवर तरंगत असल्यासारखं वाटलं मला!
मॅलेना चित्रपटाचं संगीत -- http://www.youtube.com/watch?v=dzJxHw4JF10 (या सुंदर संगीताला २००१चं ऑस्कर नॉमिनेशन होतं)
द मिशन -- १९८६चं ऑस्कर नॉमिनेशन. यातून ए आर रेहमानला प्रेरणा मिळाली असावी असं वाटून जातं.
वन्स अपॉन अ टाईम इन द वेस्टः मॅन विथ हार्मोनिका -- यातला माउथऑर्गन प्रचंड गूढ वातावरण निर्माण करतो.
-- समाप्त --
मी माझ्याशीच वेळोवेळी केलेली भंकस म्हणजेच हे चर्हाट! आता फक्त माझ्याशीच का? कारण सोप्प आहे. फारसं कुणी माझी भंकस ऐकून घ्यायला तयार नसतं.
Thursday, January 19, 2012
Sunday, January 8, 2012
वैद्यकीय चाचणीचा बकरा
'तुला मधुमेह झाला आहे' असं डॉक्टरनं वरकरणी चिंताक्रांत चेहरा करून मला सांगितलं तेव्हा मी त्याच्या समोर खुर्चीत बसलो होतो. किंवा डॉक्टर माझ्या समोरच्या खुर्चीत बसला होता असं म्हंटलं तरी ते वावगं ठरणार नाही. तेव्हा मधुमेहासारखा उच्चभ्रूंची मक्तेदारी असलेला रोग झाल्याबद्दल मला सूक्ष्म अभिमान वाटला होता.. कुणाला कशाचा अभिमान वाटेल काही सांगता येत नाही.. पूर्वी पुलंनी हिंदुजा हॉस्पिटल मधे असताना 'गर्वसे कहो हम हिंदुजामें हैं!' असं म्हंटलं होतं म्हणे!
'साखरेचं खाणार त्याला देव देणार' हे लहानपणापासून खूप वेळा ऐकलं होतं पण देव नक्की काय देणार ते ज्ञान डॉक्टरच्या समोरच्या खुर्चीत मिळालं.. बुद्धाला बोधीवृक्षाखाली मिळालं होतं, मला खुर्चीवर मिळालं इतकाच काय तो फरक! पण म्हणून मला मिळालेलं ज्ञान कमअस्सल नव्हतं.
सगळ्याच नव्या आणि ताज्या गोष्टींप्रमाणे मधुमेहाचं देखील सुरुवातीला मला अप्रूप आणि कौतुक होतं.. आणि रोजचा बराचसा वेळ त्याबद्दल उलटसुलट वाचण्यात व ऐकण्यात जायचा.. मधुमेहींनी 'मधु मागसी माझ्या सख्या परि मधु घटचि रिकामे' सारखी गाणी गुणगुणायची नसतात हे ही तेव्हाचच! त्याच काळात, ज्यांचा मधुमेह योग्य पथ्याने किंवा नुसत्या गोळ्या घेऊन आटोक्यात रहातो अशा लोकांना एका नवीन किटोन युक्त पेयाने फायदा होऊ शकेल की नाही या चाचपणीसाठी काही बकरे हवे आहेत असा हाकारा झाला.. मी त्याला ओ दिली. स्वतःसाठी जगलास तर मेलास दुसर्यासाठी जगलास तरच जगलास असल्या उदात्त विचारांचं ओझं बालपणापासून लादलेलं होतं.. ते कमी करण्याची संधी अनायासे चालून आल्यामुळे आपल्याकडून नाही तरी निदान आपल्या शरीराकडून जगाचं कल्याण घडावं म्हणून मी संताची विभूति व्हायचं ठरवलं.
संशोधक डॉक्टर बाईशी झालेल्या प्राथमिक चर्चेप्रमाणे दोन टेस्ट होणार होत्या. पहिली ३-४ तास चालणार होती तर दुसरी दोन तास. ऑफिसमधला नेटवर टीपी करायचा अमूल्य वेळ का दवडावा म्हणून मी संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर टेस्ट घेण्याची विनंती केली. हो, मग? गरज त्यांना होती.. मला नाही.
४:३० ला ऑफिस सुटल्यानंतर घरी जाऊन काहीतरी पोटात ढकलून तिकडे जायचा माझा प्लॅन होता. पण त्या डॉ बाईने त्यात खोडा घातला.. टेस्टच्या आधी ६ तास काहीच खायचं प्यायचं नाही म्हणून ठणकावलं. ऑफिसात काम नसलं तरी भूक लागतेच हो! भुकेचं जाऊ द्या एक वेळ पण काही प्यायचं पण नाही हे अघोरी होतं. यावर मी कुरकुर व्यक्त केल्यावर, मी चाचणीलाच येणार नाही अशी भीति वाटल्यामुळे कदाचित, मोठ्या उदार मनाने मला फक्त पाणी प्यायची परवानगी मिळाली. ठरलेल्या वेळी मी तिथे पोचलो. पोटाने बांग द्यायला सुरुवात केलीच होती. प्रथम दोन कन्सेन्ट फॉर्म भरण्याचं काम झालं. त्यात मी माझा डेटा त्यांना वापरू देण्यापासून ते माझे फोटो (शरीराचे आतले) प्रसिद्ध करू देण्यापर्यंतच्या सर्व भानगडींना संमती मागितली होती.
'तुम्ही पांढर्या उंदरांकडून पण असले फॉर्म भरून घेता का?'.. पोटावरचा भुकेचा ताण आणि उगीचच आलेला वातावरणातला ताण सैल करायला एक विनोद टाकला.. मॉडर्न लोक त्याला फ्लर्टिंग म्हणतात.. मी वातावरण खेळकर करणं म्हणतो.. पण तो तिच्या डोक्यावरून गेला. विनोद हा सर्दाळलेल्या फटाक्यासारखा असतो.. वाजला तर वाजतो नाहीतर नुसती वात जळून ढिस्स होतो.
'तुझी जन्मतारीख काय आहे?'
'२३ एप्रिल १९५७'.. हे ऐकल्यावर तिनं २३ एप्रिल १९७५ का लिहावं? इथे मी टक्कल पडून 'केस सेन्सिटिव्ह' झालोय आणि हिला मी २० वर्षांनी तरूण दिसलो की काय?
'ऑक्सफर्डात येऊन किती दिवस झाले?'.. माझं वजन, उंची, स्मोकिंग व ड्रिंकिंग हॅबिट्स वरचे प्रश्न चालू असताना मधेच आलेल्या या प्रश्नाचा चाचणीशी काय संबंध असेल बरं?
'झाली २ वर्ष!'
'हम्म! म्हणजे माझ्या पेक्षा जास्तच!'
'हो का? आधी कुठे होतीस तू?'.. आपोआप तोंडातून बाहेर पडलं.. तिकडे माझं अंतर्मन वाजलं.. 'असेल दुसर्या कुठल्या गावातली, तुला कशाला हव्या आहेत नसत्या पंचायती?'
'ऑस्ट्रेलिया! माझ्या अॅक्सेंटवरनं समजलं नाही तुला?'.. हे सपशेल अनपेक्षित होतं.
'नाही! उलट तुझं बोलणं मला समजतंय! आमच्या ऑफिसातल्या ऑस्ट्रेलियन माणसाचं मला जेमतेम ६०% समजतं!'
'तुला अजून काही प्रश्न आहेत का?' या शेवटच्या तिच्या प्रश्नावर 'उपाशी पोटी करायचे अत्याचार.. आपलं.. चाचण्या आधी करून घ्या म्हणजे मला काहीतरी खाता येईल' असं म्हणावसं वाटलं.
त्यानंतर तिनं मला शर्ट काढायला सांगितला. आँ? शर्ट काढायचा कन्सेन्ट मी कधी दिला होता? पण जगाच्या कल्याणाचा ध्यास घेतलेला माणूस मी! मुकाट्याने शर्ट काढून तिनं दिलेला एक गाऊन चढवला. त्याचे बंद बांधल्यावर शर्टाची बटणं चुकीच्या काजात घातल्यासारखं दिसायला लागलं. ते बंद नक्की काय बंद करण्यासाठी होते कोण जाणे. डोक्यात 'हे बंध रेशमाचे' च्या विडंबनाची पहिली लाईन बनली.. 'हे बंद गाउनाचे'! माझी पिशवी, शर्ट व जॅकेट एका लॉकरमधे टाकून तिनं किल्ली तिच्याकडे ठेवली. चुकून तिनं ती किल्ली हरवली तर काय होईल या भीषण विचाराने शहारा आला.
मग तिनं माझं रक्त काढण्याची तयारी केली. दंडाला एक पट्टा करकचून बांधल्यावर तिच्या लक्षात आलं की माझ्या हाताखाली काही आधार नाहीये. कुठुनशी एक उशी आणून तिनं माझ्या मांडीवर ठेवली. एकंदरीत तिच्या हालचालींवरून ती त्यात फारशी कुशल नसावी असं मानायला जागा होती. तिनेही रक्त काढता काढता ते बाहेर सांडून त्याला पुष्टी दिली. उशीनं पण थोडं रक्त प्राशन केलं. बचकभर रक्त काढून झाल्यावर तिनं उलटीकडून सलाईन अंगात भरलं. मी पूर्वी बाटलीतली व्हिस्की कमी झाल्याचं बाबांना कळू नये म्हणून तितकंच पाणी भरून ठेवायचो तसं काहीसं वाटलं मला! माझं रक्त त्या दाभणातच गोठू नये हे कारण जरी तिनं सांगितलं तरी ते मला फारसं पटलं नाही. रक्त काढून झाल्यावर ते खुपसलेलं दाभण काढून टाकतात असा माझा अनुभव होता पण ही बया ते तसंच ठेवून जवळच्या टेबलाचे सर्व ड्रावर्स उघडून उसक-मासक करू लागली. थोड्या वेळाने तिने एका चिकटपट्टीने ते दाभण माझ्या हाताला चिकटवलं. म्हणजे सगळं संपेपर्यंत ते दाभण माझ्याशी नको इतकी सलगी करणार होतं! ती मला आता व्यायामाची सायकल मारायला लावणार होती. तेव्हा त्याच दाभणातून दर ३ मिनिटाला माझं रक्त खेचणार होती. इतकं सगळं झाल्यावर तिनं ती उशी कचर्याच्या डब्यात टाकलेली पाहून माझ्या कोकणस्थी मनानं विलंबित आक्रोश केला.
सायकल मारण्याचं ठिकाण बरच लांब निघालं! वेगवेगळ्या जिन्यातून आणि कॉरिडॉरातून, घसरणारा गाऊन बंद ओढून ओढून सावरत, वस्त्रहरणाच्या वेळचे द्रौपदीचे भाव तोंडावर बाळगत, लोकांच्या नजरा चुकवित माझी वरात तिच्या मागून मुकाटपणे चालली होती. एकदाचं ते सायकल सेंटर आलं. तिथे अजून एक डॉ बसलेला होता. तिथं मला कुशीवर झोपवलं आणि इसीजीसाठी छातीवर लीड्स चिकटवली. तिथलं अल्ट्रासाउंड मशीन वापरून हृदयाचे फोटो काढायचे होते. पण ते मशीन काही सुरू होईना. दोघांचे चेहरे चिंताक्रांत झाले. मी आपलं 'नको तेव्हा हवी ती गोष्ट नेमकी बंद पडते' असा दिलासा द्यायचा प्रयत्न केला.
'खरंय, पण हे मशीन कधी बंद पडलं नव्हतं!'.. तिनं टिप्पणी केली! काय पण लॉजिक? असं विधान हृदय बंद पडलेल्या माणसाला पाहून केलं असतं का तिनं?
'There's always a first time for everything'.. माझा वाढता दिलासा आणि तिचं एक स्मित! अरे वा! हिला हसता पण येतं की!
'जाऊ दे! आपण दुसर्या खोलीतलं मशीन वापरू' तिनं आशा सोडली. छातीवर चिकटवलेली लीड्स उपटल्यावर परत माझी वरात लज्जा झाकत तिच्या मागून दुसर्या खोलीत गेली. दार उघडून आत पहाताच अपेक्षित गोष्ट न दिसल्यामुळे, ती मला तिथेच थांबायला सांगून कुठे तरी नष्ट झाली. मी एका हातात दरवाजा आणि दुसर्या हाताने गाऊन गच्च धरून उभा राहीलो होतो. तिर्हाईताला विचारमग्न अवस्थेतला एखादा रोमन मंत्री भासलो असतो. गेलेली मिनिटं युगांसारखी भासली.. त्यावर मला गुलजारचा 'कभी जिंदगी पलोमें गुजर जाती है तो कभी जिंदगी भर एक पल भी नहीं गुजरता' हा डायलॉग विनाकारण आठवला. अचानक तिथे तो दुसरा डॉ आला आणि मला परत जुन्याच ठिकाणी घेऊन गेला. तिथलं मशीन आता सुरू झालं होतं. मी सापडत नाहीये म्हंटल्यावर ती पण जुन्या ठिकाणी अजून एक मशीन ढकलत ढकलत घेऊन आली.
'आँ! मशीन सुरू झालं? काय केलंस तू?'.. ती.
'एक लाथ घातली'.. तो.
तिनं आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहीलं.. परत मला विनोद करायची सण्णक आली. मी खुणेनेच तिला 'मला नाही, मशिनला लाथ घातली' असं सुचवलं आणि वर म्हंटलं.. 'मी मगाशीच ते करायला सांगणार होतो'.. हा विनोद वाजला मात्र!
परत मला कुशीवर झोपवलं आणि इसीजीसाठी छातीवर लीड्स चिकटवली. मग माझ्या छातीला एक प्रोब लावून तिनं बर्याच वेळा हलवला.. शेवटी मी न राहवून हळूच विचारलं 'काय? हृदय सापडतं नाहीये का?'. हा विनोद ढिस्स झाला.. तिने शक्य त्या सर्व बाजूंनी हृदयाकडे बघते आहे असं सांगीतलं. हृदयाची चित्रं काढण्याचं काम बराच वेळ चालू होतं. मला काही दिसत नव्हतं कारण माझी पाठ मशीनकडे होती. मधून मधून बोगद्यातनं चाललेल्या आगगाडीसारखा आवाज यायचा तो माझ्या चेकाळलेल्या हृदयाचा असावा. अखेर तिनं मला हृदयाची चित्रं दाखवली. स्वतःचं धडधडणारं हृदय प्रत्यक्षात पहायची माझी पहिलीच वेळ होती ती!
'चला! म्हणजे मी हार्टलेस नाही हे सिद्ध झालं तर!'
'कोण म्हणतं तुला हार्टलेस?'.. एकंदर आवेषावरून कधीही ती पदर खोचून माझ्या बाजूने भांडायला उभी राहील असं वाटलं.
'सगळेच! माझे मित्र व मैत्रिणी!'
'हम्म्म! हृदयाची एक भिंत थोडी जाड वाटते आहे! तुला कधी हार्ट अॅटॅक आला होता का?'.. अचानक तिनं चिंता व्यक्त केली.
'हो! कॉलेजात खूप वेळा!'.. अजून एक ढिस्स विनोद!
नंतर मी तिला 'किटोन नामक पेय तिथंच बनवलं आहे का?' असं विचारलं. ती म्हणाली की किटोन हे औषध नसून ते शरिरातच तयार होणारं एक द्रव्य आहे. जेव्हा मेंदूला ऊर्जा मिळेनाशी होते म्हणजे जेव्हा आपण सलग १-२ दिवस उपाशी असतो तेव्हा मेंदूकडून शरीराला किटोन बनवण्याची ऑर्डर सुटते. मेंदू त्यातून आवश्यक ती ऊर्जा मिळवतो. मग मला ते भयाण चवीचं पेय पाजण्यात आलं. ते द्यायच्या आधी तशी वॉर्निंग तिनं मला दिली होती.. फिनेल, चुन्याची निवळी, काँग्रेस गवताचा रस, कोरफडीचा रस असल्या विविध रंगाच्या आणि चवीच्या गोष्टी एकत्र केल्यासारखं वाटलं.. पिताना वेडावाकडा चेहरा झालेला पाहून मला तिने एक ग्लास पाणी पण पाजलं. मग मला सायकल मारायला बसवलं. माझ्या तोंडावर मास्क बसवला. मी किती ऑक्सिजन घेतोय आणि किती कार्बन-डाय-ऑक्साईड सोडतोय ते मोजणार होते. आजुबाजुनी हवा आत येऊ नये म्हणून मास्क चेहर्यावर घट्ट बसविण्यात आला.
'कसं वाटतंय?'.. फार घट्ट झाला नाहीये ना त्याची चाचपणी करण्यासाठी तिनं विचारलं.
'अॅस्ट्रोनॉट सारखं'.. मी.
माझं पेडल मारणं चालू झालं. दर ३ मिनिटांनी ते सायकलचं लोड वाढवणार होते. त्यामुळे दर ३ मिनिटांनी सायकल मारायला जड होत जाणार होती. तेव्हाच रक्त पण घेणार होते. पहिल्या ३ मिनिटानंतर लोड वाढवलं आणि रक्त काढायला लागले तर त्या दाभणातून अजिबात रक्त येईना. इकडं दाब, तिकडं दाब, हँडलवरचा हात काढायला लाव असं सगळं करून देखील काहीच रक्त येईना.
'तू माझं सगळं रक्त मगाशी संपवलंस!'.. मी तक्रारीच्या सुरात तिला जरा खिजवलं. शेवटी अथक प्रयत्नानंतर कुठून तरी थोडं रक्त आलं. तो पर्यंत बरीच ३ मिनिटं होऊन गेली होती. मी पेडल मारतच होतो. ते दोघे एकमेकांकडे बघून हसले. मला वाटलं मलाच हसले. म्हणून मी तिच्याकडे पाहीलं. तर ती म्हणाली 'काय पण दाभण लावलंय? असं हेटाळणीच्या सुरात तो म्हणतोय मला'.
शेवटी पाय दुखायला लागले म्हणून आणि थोडा दम पण लागला म्हणून मी सुमारे १८-१९ मिनिटानंतर एकूण ९ कि.मी प्रवास झाल्यावर सायकल मारणं थांबवलं. अधून मधून ते 'यू आर डुईंग व्हेरी वेल!' असं सारखं प्रोत्साहन देत होते. ते तसं सगळ्यांनाच देत असणार म्हणा! शेवटी त्यांनी मला मी किती ऑक्सीजन वापरला नि किती कार्बन-डाय-ऑक्साईड सोडला त्याचे आलेख दाखवले. गंमत म्हणजे मी वापरलेल्या ऑक्सीजन मधला बराचसा शरीरातल्या स्नायूतून आला होता. स्नायूत पण ऑक्सीजन साचविलेला असतो हे मला नवीन होतं. विरळ हवेच्या ठिकाणी तो कसा वापरता येईल हा प्रश्न मला चाटून गेला.
टेस्ट संपली होती. सगळी चिकटवलेली लीड्स उपटून झाल्यावर गाऊन कवटाळून हिंडत हिंडत आम्ही सुरुवातीच्या जागेवर परत आलो. पुढच्या टेस्टच्या आधी मी तिला विचारून माझ्या पिशवीतून आणलेलं थोडं खाऊन घेतलं. आता मला पँट काढायला सांगितलं. हरे राम! प्रकरण गंभीर वळण घ्यायला लागलं होतं! परत एकदा 'जगाच्या कल्याणातून' मोटिवेशन घेऊन मी तयार झालो. मला आता एमआरआय स्कॅन साठी झोपविण्यात आलं. परत छातीला चिकटपट्ट्या लावल्या आणि वर काहीतरी जड ठेवलं. त्रास व्हायला लागला तर त्यांना सांगण्यासाठी माझ्या हातात एक बटण दिलं.
'या हेडफोन मधून ही तुला तिच्या लव्हली व्हॉईस मधे सूचना देईल'.. त्या डॉ ने माझ्या कानाला एक हेडफोन लावता लावता सांगितलं. मला त्याच्या खडूसपणाचं हसू आलं.
'तू का हसतो आहेस? माझा ऑस्ट्रेलियन अॅक्सेंट आवडत नाही का तुला?' तिनं लगेच विचारलं. खडूसपणाला योग्य इंग्रजी शब्द न सुचल्यामुळे मी उत्तर टाळलं. हेडफोनात बॅकग्राउंडला एक टेनर आणि एक गायिका इटालियन भाषेत एक ऑपेरा किंचाळत होते. सगळा जामानिमा झाल्यावर मला एका बोगद्यात ढकलण्यात आलं. बराच वेळ काहीच झालं नाही. परत मला बाहेर काढण्यात आलं. छातीला नवीन लीड्स लावली तरी त्यांना सिग्नल मिळत नव्हता. मधेच सिग्नल मिळतोय असं वाटल्यावर आत ढकलण्यात यायचं पण लगेच सिग्नल गेला म्हणून बाहेर काढलं जायचं.
'माझं हृदय हरवलं आहे का?'.. मगाशी चांगलं धडधडताना याचि देही याचि डोळा पाहिलेलं माझं हृदय आता का सिग्नल देत नाहीये ते मला कळेना.
'तसं नाही. हे ब्लू टूथ काम करत नाहीये.'. शेवटी बर्याच टूथांची ट्रायल झाल्यावर एका टुथाला माझं हृदय आवडलं. त्यानंतर बराच वेळ श्वास घे, श्वास धरून ठेव आणि श्वास सोड अशा सूचना पाळायच्या आणि श्वास धरल्यावर चमत्कारिक आवाज ऐकायचे इतकंच काम मला होतं. शेवटी एकदाचं ते संपल्यावर मला माझ्या लिव्हरची आणि हृदयाची चित्रं दाखवली आणि वरती ती टेस्ट करायला बाहेर १५०० पौंड खर्च होतो हे ही ऐकवलं.
सगळं संपल्यावर तिनं खसाखस त्या चिकटपट्ट्या खेचायला सुरुवात केली. त्या बरोबर माझे चिकटलेले केस उपटल्यामुळे होणार्या प्रचंड वेदना मी दातओठ खाऊन सहन करत होतो. ते पाहून तो डॉ तिला म्हणाला 'जरा हळू! हे काय वॅक्स वर्क वाटलं का तुला?'
दुसर्या टेस्टला जरी २ तास लागणार सांगितलं होतं तरी परत मागच्याच सर्व टेस्ट झाल्या. फक्त या वेळेला वेगळं द्रव्य पाजण्यात आलं आणि कुठलंही उपकरण बंद पडलं नाही म्हणून 'जगाचं कल्याण मिशन' तीन तासात आटोपलं.

Sunday, November 20, 2011
दुसरे महायुद्ध : ऑपरेशन मिंसमीट
मधे बीबीसी वर दुसर्या महायुद्धातल्या ऑपरेशन मिंसमीटबद्दल एक अफलातून माहितीपट दाखविला. ऑपरेशन मिंसमीट हे जर्मन सैन्याला गंडविण्यासाठी ब्रिटिशांनी रचलेल्या एका सापळ्याचं नाव होतं.. ती एक अफलातून गंडवागंडवी होती ज्यामुळे हजारो प्राण पुढे वाचले. त्या माहितीपटात ऐकलेली आणि विकीपीडिया सारख्या सायटींवरून उचलेली ही माहिती आहे.
दुसर्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश हेर खात्यातल्या काही सुपिक टाळक्यांनी व्यवस्थित नियोजन करून एक भेदी पुडी सोडली. ती इतकी बेमालूम होती की तिच्या वावटळीत खुद्द हिटलर गुंडाळला गेला. आणि सर्वात विशेष म्हणजे त्या पुडीचा नायक होता एक मृत देह.. एक प्रेत! (१).
१९४२ च्या शेवटी शेवटी दोस्त राष्ट्रांनी उघडलेली मोरोक्को, अल्जिरिया, पोर्तुगाल व ट्युनिशिया येथील आघाडी यशस्वी होऊ घातली होती. युद्धाची पुढील पायरी म्हणून भूमध्य समुद्राच्या उत्तर भागात मुसंडी मारायचा विचार चालू होता. उत्तर आफ्रिकेतून एक तर इटलीतून किंवा ग्रीसमधून हल्ला चढविला तर पलिकडून येणार्या रशियाच्या सैन्यामुळे जर्मन कोंडित सापडणं शक्य होतं. त्यात पण सिसिलीचा (इटली) ताबा मिळविला तर दोस्तांच्या नौदलाला भूमध्य समुद्रातून निर्धोकपणे फिरता येणार होतं आणि पश्चिम युरोपावर हल्ले करणं शक्य झालं असतं. जानेवारी १९४३ पर्यंत दोस्तांचं दीड लाखाच्यावर सैन्य युरोप वर हल्ला चढविण्यासाठी उत्तर आफ्रिकेत जमलेलं होतं. सगळ्यांनाच हल्ला होणार हे माहिती होतं.. जर्मनांना पण! त्यामुळेच, चर्चिलनं 'एक मूर्ख सोडता बाकी कुणालाही सिसिलीवरच हल्ला होणार हे लगेच कळेल' अशी टिप्पणी केली होती.
म्हणूनच, सिसिली सोडून भलतीकडेच हल्ला होणार आहे अशी हुलकावणी जर्मनांना दिल्याशिवाय ते त्यांचं थोड फार सैन्य दुसरीकडे हलवणं आणि सिसिली काबीज करणं अवघड गेलं असतं. पूर्वीही बिटिशांनी जर्मनांना यशस्वीरित्या गंडवण्याचे प्रयोग केलेले असल्यामुळे त्यात ते थोडे फार तरबेज झालेले होते म्हणून बनवाबनवीची कल्पना ब्रिटिशांच्या डोक्यात घट्ट व्हायला लागली होती.
प्रत्यक्ष हल्ल्याच्या बरेच महीने आधी, ब्रिटिश हेरखात्यातील (MI5) फ्लाईट लेफ्टनंट चोल्मंडले यानं फाटक्या पॅराशूटला बांधलेलं एक प्रेत जर्मनांना सापडेल अशा ठिकाणी फ्रान्स मधे सोडायची कल्पना (२) मांडली. त्यातून एका विमान अपघातात त्या माणसानं उडी मारली पण फाटक्या पॅराशूटमुळे तो मेला हे जर्मनांना दाखवायचं होतं. त्या प्रेताबरोबर एक रेडिओ ट्रान्समीटर पण तो ठेवणार होता. त्याला असं भासवायचं होतं की तो देह एका ब्रिटिश हेराचा आहे आणि त्याचा ट्रान्समीटर जर्मनांच्या हातात पडला आहे याचा ब्रिटिशांना पत्ता नाही. तसं झालं तर ब्रिटिशांना त्या ट्रान्समीटर वरून बनावट माहिती जर्मनांना पुरविणं शक्य झालं असतं. ही कल्पना व्यवहार्य नाही म्हणून निकालात काढली तरी ती दुसर्या एका विभागाने (ट्वेन्टी कमिटी (३)) उचलून धरली. चोल्मंडले ट्वेन्टी कमिटीत होता. त्याच कमिटीत लेफ्टनंट कमांडर माँटेग पण होता. दोघांनी मिळून त्या कल्पनेचा विस्तार करायला सुरुवात केली.. पण एक बदल करून.. ट्रान्समीटर ऐवजी त्या प्रेताबरोबर काही पत्रं ठेवायचं ठरवलं (४). पण त्यात थोडी गोची होती.. महत्वाची कागदपत्रं शत्रुच्या क्षेत्रातून न्यायची नाहीत हा दोस्तांचा दंडक आहे हे जर्मनांना माहिती होतं. म्हणून, ते प्रेत एका विमान अपघाताचा बळी आहे आणि ते स्पेन मधे (फ्रान्सच्या ऐवजी) सापडविण्याची योजना केली. कारण, स्पेन मधलं तथाकथित तटस्थ सरकार 'आबवेहर'ला (जर्मन हेर खाते) सहकार्य करतं हे ब्रिटिशांना माहीत होतं. त्यामुळे, ते प्रेताबरोबर सापडलेली कागदपत्रं जर्मन हेरांना बघायला देतील याची खात्री होती.
त्यांना पाण्यात बुडून व बराच काळ थंड राहिल्यामुळे (हायपोथर्मिया) मेलेल्या प्रेताची गरज लागेल असं एका पॅथॉलॉजिस्टनं सांगितलं. अगदी असं प्रेत सोडा पण साधं प्रेत तरी कसं मिळवायचं हा मोठा प्रश्न होता. कारण मेलेल्या माणसाच्या नातेवाईकांना काय व कसं सांगणार? शिवाय, त्या सगळ्या प्रकाराची वाच्यता होऊन चालणार नव्हतं. पण नशिबाने त्यांना लंडन मधे एका ३४ वर्षीय वेल्श तरुणाचा देह मिळाला. त्याचं नाव होतं ग्लिंड्विर मायकेल! त्याचे आईवडील वारलेले होते आणि कुणीच जवळचे नातेवाईक मिळाले नाहीत. काहीही कामधंदा नसलेला तो लंडनमधे उपाशीपोटी फिरत होता. भूक अनावर झाल्यामुळे त्यानं रस्त्यावर पडलेला ब्रेड खाल्ला. दुर्दैवाने, त्यात उंदराचं वीष घातलेलं होतं. उंदीरांच्या सुळसुळाटामुळे तेव्हा लंडनमधे उंदीर मारण्यासाठी वीष घातलेले ब्रेड टाकले जायचे. उंदराच्या विषातील फॉस्फरसची पोटातल्या हायड्रोक्लोरिक अॅसिड बरोबर प्रक्रिया होऊन एक अत्यंत विषारी गॅस, फॉस्फिन, तयार होतो. त्यामुळे माणूस मरतो. तो ताबडतोब मेला नव्हता कारण त्याच्या पोटात पुरेसं वीष गेलेलं नसल्यामुळे जास्त फॉस्फिन तयार झालं नव्हतं! पण जेव्हढं काही तयार झालं होतं त्यानं त्याची लिव्हर बंद पडली आणि तो मेला. वरवरच्या तपासणीतून तो पाण्यात बुडण्याशिवाय इतर कशाने मेला आहे हे सहज समजलं नसतं.
रंगभूमीवरचं पात्र रंगवतात तसं त्या शवाला एक नवीन ओळख दिली गेली. तो रॉयल नेव्हीसाठी कंबाईन्ड ऑपरेशन्स हेडक्वार्टर (५) मधे काम करणारा कॅप्टन (अॅक्टिंग मेजर) विल्यम (बिल) मार्टिन झाला. तो १९०७ मधे वेल्स मधल्या कार्डिफ या गावी जन्माला आला होता. कंबाईन्ड ऑपरेशन्स साठी काम करत असल्यामुळे तो मूळचा नौदलाचा असला तरी पायदळाचा पोशाख घालू शकत होता. किंबहुना, त्याला मुद्दाम नौदलाचा पोशाख नाही घालायचं असं ठरवलं कारण नौदलाचे पोशाख गीव्हज नामक शिंप्याकडूनच बनवावे लागत आणि त्याला प्रेताची मापं घ्यायला लावली असती तर भलताच गाजावाजा झाला असता. पण तो पायदळातला माणूस आहे हे पण दाखवायचं नव्हतं कारण पायदळाच्या कार्यालयातल्या लोकांना पटवणं (बनावट ओळख संभाळण्यासाठी) जास्त कठीण होतं. त्याच्या अॅक्टिंग मेजर दर्जामुळे तो अत्यंत महत्वाची कागदपत्रं नेण्याइतक्या वरच्या दर्जाचा अधिकारी होता, त्याच बरोबर, खूप लोकांना माहीत असण्याइतक्या वरच्या दर्जाचा पण नव्हता. मार्टिन नावाचे, त्याच दर्जाचे, बरेच अधिकारी असल्यामुळेच त्याला ते नाव देण्यात आलं.
त्याच्या बरोबर त्याच्या होणार्या बायकोचा, पॅमचा, फोटो (हा फोटो MI5 मधे कामाला असलेल्या एका मुलीचा होता); तसंच दोन प्रेमपत्रं; साखरपुड्यासाठी घेतलेल्या हिर्याच्या अंगठीची, १९ एप्रिल १९४३ तारखेची, सुमारे £53 किमतीची एस जे फिलिप्स या भारी जवाहिर्याची पावती; त्याच्याबद्दलच्या अभिमानाने ओथंबलेलं त्याच्या वडलांचं एक पत्रं; लॉईड्स बँकेच्या मॅनेजरचं सुमारे £79 ओव्हरड्राफ्ट झाल्याबद्दल पैशाची मागणी करणारं पत्रं; एक सिल्व्हर क्रॉस आणि सेंट ख्रिस्तोफरचं पदक (६); किल्ल्यांचा जुडगा; एक वापरलेलं बसचं तिकीट; एक नाटकाचं तिकीट; सैन्याच्या क्लबमधे ४ दिवस राहिल्याची पावती; गीव्हजकडून घेतलेल्या नवीन शर्टाची पावती (७) अशा गोष्टी होत्या. त्याच्या भूमिकेत अजून रंग भरण्यासाठी त्याला थोडा निष्काळजी दाखविण्यात आलं.. त्याचं आयडी कार्ड हरविल्यामुळे नवीन दिलं आहे तसंच त्याचा ऑफिसच्या पासच्या नूतनीकरणाची तारीख उलटून गेलेली आहे असं दाखवलं गेलं.
संशयाला वाव मिळू नये म्हणून त्याच्या सारख्या अधिकार्याची अंतर्वस्त्रं त्याच्या दर्जाला शोभेलशी हवी होती. पण रेशनिंग असल्यामुळे वूलन अंडरवेअर मिळवणं दुरापास्त होतं. त्याच सुमारास हर्बर्ट फिशर या ऑक्सफर्ड मधील न्यू कॉलेजच्या प्राध्यापकाचा ट्रक खाली सापडून मृत्यू झाला. त्याची अंतर्वस्त्रं मिळविण्यात आली.
सगळ्यात महत्वाचं पत्र लेफ्टनंट जनरल सर आर्ची (आर्चीबॉल्ड) नाय, व्हाइस चीफ ऑफ इंपीरियल जनरल स्टाफ, याने जनरल सर हॅरॉल्ड अलेक्झांडर, कमांडर १८वा आर्मी ग्रुप अल्जिरिया आणि ट्युनिशिया, याला लिहीलं होतं. पत्र १००% खरं वाटावं म्हणून खुद्द आर्चीकडूनच ते लिहून घेतलं. त्यात काही, गार्डस ब्रिगेडच्या नवीन कमांडरची नेमणूक या सारखे, संवेदनशील विषय होते. जनरल विल्सन ग्रीसवर हल्ला चढविणार आहे आणि जनरल अलेक्झांडरने सार्डिनियावर हल्ला करावा असा आदेश होता. शेवटी, खुंटी हलवून बंडल भक्कम करणारं असंही एक वाक्य टाकलं होतं -- 'आपल्याला विजयाची शक्यता खूप आहे कारण जर्मन लोकं आपण सिसिलीवरच हल्ला करणार हे धरून चालले आहेत'. ही कागदपत्रं एका छोट्या बॅगमधे घालून ती त्याच्या थंडीच्या लांब कोटाच्या पट्ट्याला साखळीने अडकविण्यात आली.
मेजर मार्टिनला कोरड्या बर्फाने (गोठवलेला कार्बन-डायॉक्साईड) भरलेल्या एका शवपेटीत कागदपत्रांसह ठेवून ती पेटी स्कॉटलंड मधील होली लॉक या गावतल्या पाणबुडींच्या तळावरील एचएमएस सेराफ या पाणबुडीवर चढविण्यात आली. कार्बन-डायॉक्साईड काही काळाने वितळून पेटीतल्या प्राणवायूला बाहेर हाकलून पेटी व्यापून टाकेल आणि शव टिकायला मदत होईल हा हेतू होता. त्या पेटीत नक्की काय आहे ते पाणबुडीवरच्या फक्त काही लोकांनाच माहिती होतं, बाकीच्यांना त्यात हवामानखात्याला लागणारं अत्यंत गुप्त यंत्र आहे असं सांगितलं होतं. १९ एप्रिलला पाणबुडीने जी बुडी मारली ती स्पेनच्या ह्युएल्व्हा बंदरापासून सुमारे एक मैलावर ३० तारखेला पहाटे ०४:३० वाजता बाहेर आली. ह्युएल्व्हा मधे आबवेहरचा एक हेर आहे आणि त्याचं स्पॅनिश अधिकार्यांशी साटलोटं आहे हे ब्रिटिशांना चांगलं माहिती होतं. ठरल्याप्रमाणे पाणबुडीचा कप्तान पेटी आणि अधिकार्यांना घेऊन बाहेर आला. सर्व बारक्या सैनिकांना खाली पाठवून दिलं. तिथे कप्तानाने अधिकार्यांना खर्या प्रकाराची कल्पना दिली. मग पेटी उघडून मेजर मार्टिनला कोट, छोटी बॅग, लाईफ जॅकेट इ. इ. चढवून जलसमाधी देण्यात आली. त्या आधी कप्तानाने बायबल मधील ३९वं त्साम (अध्याय) वाचलं (हे स्क्रिप्ट मधे नव्हतं तरीही). नंतर ते शव सुमारे ९:३० वाजता एका स्पॅनिश कोळ्याला मिळालं.
तीन दिवसानंतर ते प्रेत स्पेन मधील ब्रिटिश नेव्हल अॅटाशेला मिळालं आणि ४ मेला ह्युएल्व्हा येथे मानवंदनेसकट दफन करण्यात आलं. दरम्यान, ब्रिटिश नौदलाचे अधिकारी, मुद्दाम, ती कागदपत्रं मिळविण्याबद्दल अॅटाशेला बिनतारी संदेश पाठवत होते. जर्मन लोक ते संदेश पकडतात हे त्यांना माहीत होतं. त्यात ते असंही ठसवत होते की स्पॅनिश लोकांना कुठलाही संशय येऊ न देता ती कागदपत्रं हस्तगत करावीत. गम्मत म्हणजे ती कागदपत्रं स्पॅनिश नौदलाकडून सुप्रीम जनरल स्टाफकडे गेली होती आणि तिथून सकृतदर्शनी ती चक्क गहाळ झाली होती. पण ब्रिटिशांनी सोडलेल्या फुसक्या संदेशांमुळे आबवेहरचे हेर सतर्क झाले आणि त्यांच्या दबावामुळे स्पॅनिश लोकांनी ती कागदपत्रं शोधली. ती संशय येणार नाही अशा पद्धतीने उघडून जर्मन लोकांना कॉपी करू दिली. त्या नंतर परत ती पूर्वीसारखी दिसतील अशा प्रकारे बंद करून अॅटाशेकडे सुपूर्त केली. त्याची नीट तपासणी केल्यावर ते पाकीट उघडलेलं होतं हे ब्रिटिशांना समजलं आणि तेव्हा अमेरिकेत असलेल्या चर्चिलला संदेश गेला 'Mincemeat Swallowed Whole'.
त्या हुलकावणीने हिटलर मात्र जाम गंडला. त्याने मुसोलिनीचा सर्व विरोध मोडित काढून असा आदेश दिला की सिसिलीवर हल्ला होणार नाही आणि झालाच तर ती हुलकावणी समजावी. बरचसं सैन्य, कुमक, बोटी, दारुगोळा इ. ग्रीसकडे हलवलं गेलं. ९ जुलैला दोस्तांनी सिसिलीवर हल्ला चढविला. तरीही दोन आठवड्यांपर्यंत जर्मन लोक मुख्य हल्ला सार्डिनिया व ग्रीस इकडेच होणार हे धरून चालले.
साहजिकच सिसिली दोस्तांनी काबीज केलं. पण ते पत्र एक जालीम हुलकावणी होती याचा इतका धसका हिटलरने घेतला की पुढे खरीखुरी पत्रं/नकाशे हातात पडले तरी ती हुलकावणीच आहे असं त्यानं गृहीत धरलं.
पुढे माँटेगने या घटनेवर 'द मॅन हू नेव्हर वॉज' अशी गोष्ट लिहीली आणि त्यावर त्याच नावाचा सिनेमा पण निघाला.
जानेवारी १९९८ मधे मेजर मार्टिनच्या ह्युएल्व्हा इथल्या थडग्यावर 'ग्लिंड्विर मायकेलने मेजर मार्टिनचं काम केलं' अशी टीप टाकण्यात आली.
पुढेही थापेबाजी बिटिशांचं एक प्रमुख अस्त्र राहीलं. त्यावर चर्चिल असं म्हणत असे.. 'सत्य इतकं अमूल्य असतं की ते सतत असत्याच्या कोंदणात लपवावं लागतं'.
तळटीपा --
(१) - ऑपरेशन मिंसमीट हा ऑपरेशन बार्कलेचा एक भाग होता. ऑपरेशन बार्कलेचं ध्येय जर्मनांना सिसिलीवर हल्ला होणार आहे हे समजू न देणं हे होतं. त्यात, पूर्व आफ्रिकेत १२ डिव्हिजन्सचं पूर्णपणे बनावट सैन्य आहे हे भासवणं, ग्रीक दुभाषांना उगीचच कामावर घेणं, बनावट संदेश पाठवणं, दुहेरांतर्फे (डबल एजंट) अफवा पसरवणं इ. इ. बरीच फसवाफसवी होती. सिसिलीवरच्या हल्ल्याला ऑपरेशन हस्की असं नाव होतं.
(२) - प्रेतातर्फे शत्रू पक्षात अफवा पसरवायची कल्पना चोल्मंडलेला इयान फ्लेमिंग (जेम्स बाँडचा लेखक) कडून मिळाली. खुद्द इयान फ्लेमिंगला ती एका रहस्य कथेतून मिळाली होती.
(३) - ट्वेन्टी कमिटीचं मुख्य काम दुहेर (डबल एजंट) सांभाळण्याचं होतं. जर्मन हेरांना पकडल्यावर त्यांना फितवून त्यांच्या तर्फे चुकीची माहिती जर्मनांना पुरविण्याचं काम किंवा डबल क्रॉसिंग ते करायचे. त्याला ट्वेन्टी म्हणण्याचं कारण डबल क्रॉस म्हणजे XX म्हणजे रोमन आकड्यांप्रमाणे ट्वेन्टी!
(४) - प्रेताबरोबर महत्वाची फसवी कागदपत्रं ठेवायची युक्ती नवीन नव्हती. ब्रिटिशांनी प्रथम ती पहिल्या महायुद्धात वापरली. नंतर, ऑगस्ट ४२ मधे उत्तर आफ्रिकेत एका जीपच्या स्फोटात मेलेल्या प्रेताजवळ सुरुंग कुठे लावले आहेत त्याचे नकाशे ठेवून रोमेलच्या सैन्याला फसवलं होतं. परत सप्टेंबर ४२ मधे एका प्रेताबरोबर सैन्य कधी उतरवणार आहेत त्याची फसवी तारीख सांगणारं पत्रं ठेवलं होतं. पण ते त्यांनी उघडलंच नाही किंवा उघडलं पण त्यांना ते काही कारणाने बनावट वाटलं.
(५) - कंबाईन्ड ऑपरेशन्स हे हवाईदल, नौदल आणि पायदळ यातील निवडक जवानांतर्फे, जर्मनांना संत्रस्त करण्यासाठी, कमांडो पद्धतीचे हल्ले करत असे.
(६) - सेंट ख्रिस्तोफर हा एक प्रसिद्ध रोमन कॅथॉलिक धर्मगुरू होता. त्या प्रेताचे कॅथॉलिक पद्धतीने अंत्यसंस्कार व्हावेत हा उद्देश ते पदक बरोबर ठेवण्यामागे होता.
(७) - गीव्हज कडून घेतलेल्या शर्टाच्या पावतीत एक बारीक चूक होती. त्या पावतीप्रमाणे तो शर्ट रोख पैसे देऊन खरेदी केला असं दिसत होतं. परंतु, गीव्हजला कुणीही अधिकारी रोख पैसे देत नसत. सुदैवाने, जर्मनांच्या ते लक्षात आलं नाही.
संदर्भ --
अ - इथे दुसर्या महायुद्धात दिलेल्या काही यशस्वी हुलकावण्यांबद्दल तसंच त्या का यशस्वी झाल्या त्याचं विश्लेषण वाचता येईल : http://www.au.af.mil/au/awc/awcgate/wright/wf05.pdf
ब - विकीपीडिया : http://en.wikipedia.org/wiki/Operation_Mincemeat

Monday, November 14, 2011
गोट्याची शाळा
गोट्याचा शाळेतला प्रवेश त्याच्या या जगातल्या प्रवेशापेक्षा क्लेशकारक निघाला. सुरुवातच मुळी कुठल्या माध्यमातल्या शाळेत घालायचं इथून झाली.. मराठी की इंग्रजी? माझ्या वेळेला इंग्रजी माध्यमाच्या शाळा असल्या तरी तिथे मराठी मुलांना घेत नाहीत असा समज असावा. त्यामुळे, 'कुठलं माध्यम?' सारखे कूट प्रश्न कुणालाही पडले नाहीत.
पूर्वी मी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सरसकट कॉन्व्हेन्ट स्कूल म्हणायचो.. कॉन्व्हेन्ट स्कूल म्हणजे मुलींची शाळा असते असं ज्ञानमौक्तिक माझ्या अकलेचं मंथन करून एकाने काढल्यावर मी कॉन्व्हेन्टला सुद्धा इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणू लागलो. कोंबडा झाकला तरी सूर्य उगवायचा रहात नाही तसं माझं इंग्रजीचं अज्ञान कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी प्रतिष्ठेची लक्तरं उधळल्याशिवाय रहात नाहीत ती अशी!
त्यामुळेच, गोट्याला इंग्रजी शाळेत घालायचा मी गंभीरपणे विचार करत होतो.. म्हणजे मला मराठीचा अभिमान आहे, नाही असं नाही. मराठीचा अभिमान वाटण्याचं मुख्य कारण ती एकमेव भाषा लिहीताना व बोलताना मला अगदी घरात वावरल्यासारखं वाटतं हे असावं! कुठलाही न्यूनगंड नाही की टेन्शन! या उलट इंग्रजीचं! समोर कुणी इंग्रजी बोलायला लागला की माझी सपशेल शरणागती!.. अगदी होल्डिंग ग्रास इन टूथ! आता माझी परिस्थिती थोडी सुधारली असली तरी तेव्हा साधे साधे प्रश्न माझी भंबेरी उडवायला पुरेसे होते. 'व्हॉट इज युवर सरनेम?'.. हा वरकरणी बाळबोध प्रश्न माझ्या मनात माझ्या सरांच नाव विचारलं आहे की माझं नाव हा संदेह निर्माण करायचा. किंवा.. 'हाऊ ओल्ड आर यू?'.. असं कुणी विचारलं की मला रागाने 'मी म्हातारा नाहीये' असं म्हणावसं वाटायचं.
कॉलेजात असताना, मास्तर वर्गात येऊन बकाबका इंग्रजी बकले की मला पिंजर्यात सापडलेल्या उंदरासारखं वाटायचं. सायन्सचा एक मास्तर चांगला होता.. मराठी माध्यमातल्या पोरांची कुचंबणा तो ओळखून होता. सुरुवातीलाच त्यानं वर्गात जाहीर केलं की - 'जर तुम्हाला काही समजलं नाही तर मला सांगा मी ते मराठीत परत सांगेन'. एकदा तो नेहमी प्रमाणे हातवारे करून फिजिक्स शिकवत होता.. 'इफ यू हिट धिस पार्टिकल (पार्टिकल म्हणजे एका हाताची मूठ) हॅविंग मास एम विथ फोर्स एफ (फोर्स म्हणजे दुसर्या हाताची झापड) इन धिस डिरेक्शन देन इट विल अॅक्सिलरेट अँड गो इन धिस डिरेक्शन (इथे मूठ एका दिशेला हेलपाटत जाताना) विथ मोमेंटम पी अँड व्हेलॉसिटी व्ही (इथे माझी भंजाळलेली मुद्रा)'. ते काही मला समजेना.. कारण पार्टिकल, मोमेंटम असे सगळेच घणाघाती शब्द.. कधीही न ऐकलेले!.. त्या पार्टिकल मोशनमुळे मला मोशनलेस इमोशन की इमोशनलेस मोशन की काहीतरी झालं! मग मी धाडस करून त्याला मराठीत सांगायला सांगितलं. त्यावर.. 'या पार्टिकलला, ज्याचं मास एम आहे (परत मूठ), त्याला या डिरेक्शन मधून एफ फोर्सने हिट केला (परत झापड) तर तो अॅक्सिलरेट होईल आणि या डिरेक्शन मधे (परत मूठ हेलपाटताना) मोमेंटम पी अँड व्हेलॉसिटी व्हीने जाईल (परत माझी भंजाळलेली मुद्रा). समजलं?'. आहे का कुणाची बिशाद नाही समजलं म्हणायची? 'म्हणशील? म्हणशील परत मराठीत सांगा म्हणून?'.. असं म्हणून स्वतःच्या कानाखाली जोरात वाजवावीशी वाटली.
मग मी पुस्तकं वाचून एकलव्यासारखा आपला आपण अभ्यास करायचा ठरवला. पहिल्या पॅरातच अडलेला मोमेंटम शब्द पॉकेट डिक्शनरीत न सापडल्यामुळे 'वद जाऊ कुणाला शरण' अशी अवस्था झाली! एकलव्याचं बरं होतं, त्याला नुसतीच बाण मारायची प्रॅक्टीस करायची होती. त्याचं काय इतकं कौतुक करतात लोकं? कॉलेजात आम्ही पण बाण मारायला शिकलो होतो गुरु किंवा पुतळ्याशिवाय! त्यात काय विशेष? पुतळ्याकडून सोडा पण त्यानं आमच्या हाडामांसाच्या मास्तरांकडून थोडं फिजिक्स जरी शिकून दाखवलं असतं ना, तरी मी मानलं असतं त्याला!
मी आणि सरिता, आम्ही दोघेही मराठी माध्यमातले! त्यामुळे कल मराठीकडे जास्त होता. पण माझं मत फिरायला आमचा भाजीवाला कारणीभूत ठरला. तो स्वतः चौथी पर्यंत शिकलेला असल्यामुळे त्याच्या पोराला सर्व शाळांनी वाळीत टाकलं होतं. तरीही, त्या पठ्ठ्याने, इकडे तिकडे वशिलेबाजी करून एका शाळेत प्रवेश मिळवलाच. त्या नंतर त्यानं आम्हाला अभिमानाने सांगितलं की आता माझा पोरगा शिकून इंग्रजीत भाजी विकणार! त्याची 'व्हिजन' योग्यच होती म्हणा.. काही दिवसात 'कोथिंबीर कशी दिली?' च्या ऐवजी 'कॉरिअंडरचं प्राईस काय?' असली धेडगुजरी पृच्छा करणारी गिर्हाईकं वाढणार! इंग्रजी ही बिझनेसची भाषा आहे हा भाजीवाल्याने दिलेला दृष्टांत आणि लहानपणापासून इंग्रजीशी झालेल्या झटापटीचे व्रण यामुळे मी, सरिता नको नको म्हणत असताना, गोट्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलाच.
याचा अर्थ मी 'त्या' विशिष्ट वर्गातला.. बोलणार एक पण करणार भलतंच या वर्गातला.. माणुस आहे असा नाहीये. मातृभाषेतून शिकवलेलं जास्त समजतं वगैरे म्हणणारा पण आपल्या पोराला इंग्रजी शाळेत घालणारा.. लाच घेणार्यांना आणि देणार्यांना तुरुंगात टाकलं पाहीजे म्हणून फेसबुकावरच्या मोहीमेत उत्साहाने सामील होणारा पण पोलिसांनं पकडलं तर लगेच वाटाघाटींना बसणारा.. शाळांनी देणग्या घेऊ नयेत म्हणून तावातावाने भांडणारा पण आपल्या पोरासाठी मागतील तितके पैसे गपगुमान देणारा.. भारतीयांचा स्विस बँकेतला काळा पैसा जप्त करावा म्हणून ठणाणा करणारा पण स्टँप ड्युटी कमी पडावी म्हणून स्वतःच्या घराची किंमत कमी दाखवणारा.. असो. 'मातृभाषेतून शिकवावं' चा पुरस्कार करणार्यांना माझा एक बावळट सवाल आहे.. गुजराथीशी लग्न केलेला कानडी माणूस पुण्यात रहात असेल आणि घरी हिंदीत बोलत असेल तर त्यानं आपली पोरं कुठल्या माध्यमात घालावीत?
माध्यमाचा अडथळा पार केल्यावर मग शाळांचे फॉर्म मिळविण्यासाठी रांगा लावणे, नंतर फॉर्म भरण्यासाठी रांगा लावणे, मग इंटरव्ह्यूसाठी पोराला क्लासेस लावणे आणि त्यातून येणारे ताणतणाव, चिडचिड, रडारड व दडपण झेलणे इ. इ. अडथळ्यातून गेल्यावर, मला नाही वाटत गोट्या मोठा झाल्यावर 'लहानपण देगा देवा!' असं चुकून कधी म्हणेल म्हणून!
शाळेत फक्त मुलांनाच नाही तर पालकांना पण इंग्रजी बोलण्याची सक्ती होती. त्यातून मुलांना इंग्रजी बोलण्याची सवय व्हावी वगैरे उच्च हेतू असेल, पण आमची पंचाईत झाली त्याचं काय? मला तर बाकीच्या सर्व अडथळ्यांपेक्षा हा अडथळा जीवघेणा वाटला. शाळेत कधी मधी पेरेंट टीचर मिटिंगला जायची वेळ आली की सरिता मलाच पुढे करायची. कारण मलाच इंग्रजी शाळेत घालायची हौस होती ना? मग त्याच्या गृहपाठापासून ते मिटिंगांपर्यंत सर्व मीच निस्तरायला पाहीजे होतं! त्या मिटिंगांमधलं इतर पालकांचं इंग्रजी ऐकूनच अगाथा ख्रिस्तीनं 'मर्डर, शी रोट' लिहीलं की काय कुणास ठाऊक! एका आईला 'माझी Parent's Representative व्हायला काही हरकत नाही' हे म्हणायचं होतं तर ती म्हणाली.. 'I dont have mind to become parent's representative'. एका आईने, आपल्या सोन्याची, केलेली ही कौतुक मिश्रित तक्रार.. 'Teacher, he is like straight thread at school but he is like ghost at home'. इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टीस करण्यासाठी या बायका घरी 'पानं वाढली आहेत' चं भाषांतर, 'लिव्हज हॅव ग्रोन' असं करत असतील काय? माझी ही परिस्थिती फार काही वेगळी नव्हती. कधी कधी ऑन्टीच्या प्रश्नांना उत्तरं देता देता मला 'नाईन केम टू माय नोज' म्हणावसं वाटायचं ! तरी बरेचदा मी 'झाकलं थोबाड सव्वा लाखाचं' हा मंत्र वापरून निभावून न्यायचो.
त्या नंतरचा अडथळा म्हणजे त्याचा गृहपाठ! गृहपाठाचे प्रश्न त्याच्या बरोबर सोडवताना माझ्याच तोंडाला फेस यायचा. एक दिवस..
'बाबा, एक सम सॉल्व कर ना'
'हं.. सांग!'.. क्रिकेट वर्ल्ड कप मधे फिक्सिंग झालं होतं की नव्हतं या वरची रसभरित चर्चा मोठ्या मुश्किलीनं बाजूला ठेवीत मी!
'२६ इन्टू १५ किती?'
'ही काय सम आहे? हा तर गुणाकार आहे'
'गुणाकार म्हणजे?'.. असले मराठी शब्द कानावर पडले की गोट्याच्या डोक्याची घसरगुंडी होते हे वेगळं सांगायला नकोच.
'आरे, मल्टिप्लिकेशन'
'आमच्या ऑन्टी याला सम म्हणतात'.. गोट्याच्या शाळेत टीचरला ऑन्टी म्हणण्याचा दंडक आहे. आमच्या मास्तरणींना आम्हाला 'मावशी, काकू किंवा आत्याबाई' म्हणायला सांगितलं असतं तर त्यांना काय वाटलं असतं कोण जाणे!
'बरं! मग सांग. पाच सख किती?'
'म्हणजे?'.. बोंबला! त्यांच्या भाषेत पाढे कसे म्हणतात बरं?..... हां!..
'फाईव्ह सिक्सा?'.. आमच्या पाढ्यांना कशी एक मस्त लय होती. यांच्या टेबल्सना ती मुळीच नाही.
'थर्टी'
'गुड! मग इथे झिरो लिही आणि आता हातचे आले तीन'
'हातचे? म्हणजे?'.. गोट्याची परत विकेट. त्या बरोबर माझी पण विकेट! हातच्याला काय म्हणतात ते कोणा लेकाला माहिती? नंतर गोट्याशी झालेल्या बौद्धिक चर्चेतून 'हातचा' म्हणजे 'कॅरी' हे निष्पन्न झालं आणि एकदाचं ते सम सुटलं! असाच एकदा, त्रैराशिक म्हणजे काय हे सांगताना, मी उणलो (नॉन-प्लस झालो) होतो.
'ऑस्सम!'.. गोट्यानं प्रशस्ती पत्रक दिलं. सुमारे ३ फूट उंचीचा इसम मला एक सम घालतो आणि सुटल्यावर ऑस्सम म्हणतो या सम, अल्ला कसम, मति गुंगवणारं काय असेल?
उत्तरापर्यंत पोचण्याआधी दुसर्याचं नक्की म्हणणं काय आहे ते दोन्ही पार्ट्यांना आपापल्या भाषेतून समजून घेण्याची झटापट नेहमीच करावी लागायची. त्यात, त्यानं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मला येत नाही हे नंतर लक्षात आलं की आणखीनच चिडचिड! एकदा त्याच्या 'बाबा! चंद्र म्हणजे प्लॅनेट असतो का?'.. या सरळसोट प्रश्नाचं, माझं अज्ञान लपविण्यासाठी, मला असं तिरसट उत्तर द्यावसं वाटलं होतं... 'चंद्र हा ग्रह आहे असा काही लोकांचा ग्रह आहे. चंद्र हे नाम ही आहे आणि संज्ञा पण! शनीच्या चंद्रांना जशी नावं आहेत तशी पृथ्वीच्या चंद्राला नसल्यामुळे त्याची आणि आपली फार कुचंबणा होते. जसा शनीचा एक चंद्र टायटन तसा पृथ्वीचा चंद्र हा आपला नेहमीचा चंद्र असं म्हंटलं जातं. नशीब पृथ्वीची बाब तशी नाहीये. नाहीतर पृथ्वी ही चंद्राची पृथ्वी आहे किंवा शनी ही टायटनची पृथ्वी आहे असं म्हणावं लागलं असतं.'
गोट्याला फक्त गणितातल्या समांचा त्रास व्हायचा असं नाही. तर, त्याला आणि पर्यायाने मला प्रत्येक विषयात नेहमी काही तरी वेगळे प्रश्न पडायचे.
'बाबा! सॅटर्नच्या रिंग्ज म्हणजे काय असतं?'
'शनिची कडी? त्याबद्दल काय पाहीजे?'.. प्रश्न मराठीत भाषांतरित केल्यामुळे गोट्याला अनंत प्रश्न पडतात.
'शनी म्हणजे?'
'सॅटर्न!'
'ओह! मग त्याच्या रिंग्जबद्दल माहिती पाहीजे आहे. रिंग्ज म्हणजे कडी का? ती दाराला असते तशी?'
'ती कडी नाही रे! कडी म्हणजे कडंचं अनेकवचन!'
'म्हणजे?'
'प्लुरल! कडं म्हणजे रिंग, कडी म्हणजे अनेक रिंगा'.. त्याच्या प्रश्नांची उत्तरं सहसा त्याच्या पुस्तकात नसतात. ती गुगल करावी लागतात. एकाचं उत्तर काढून देई पर्यंत त्याचे पुढचे प्रश्न तयार असतात.. 'बाबा! सॅटर्नच्या सारखी इतर प्लॅनेटना रिंग असते का?'.. मी गारद.. 'आयला! मला कधी असले प्रश्न पडले नव्हते. अजूनही पडत नाहीत आणि याला कसे काय पडतात?'. याचं उत्तर मात्र गुगल करून नक्की सापडलं नसतं!
'बाबा! गे म्हणजे काय?'.. गोट्याच्या निरागस प्रश्नानं एकदा मी शेपटीवर पाय पडल्यासारखा ताडकन उडालो होतो.. रावण पिठलं रेटून माझा कुंभकर्ण झाला होता तरीही! माझ्या पायाखालची टाईल सरकली. आयला! कुठल्याही गोष्टीकडे मोकळ्या मनाने पोरांना बघता यावं म्हणून हल्ली पोरांना शाळेपासूनच 'हे' 'हे' 'असलं' शिकवतात? गोट्या पूर्वी, पुढे चाललेल्या ट्रकांवरचं वाड्मय वाचून, असले अस्वस्थ करणारे प्रश्न टाकायचा तेव्हा मी बंडला मारून वेळ मारून न्यायचो! आता काय बंडल मारावी बरं? मी मनातल्या मनात उत्तराची जुळवाजुळव करू लागलो.. गे प्रकाराचं समर्थन करताना लोकं नेहमी ते पशुपक्षात पण असतं म्हणून ते नैसर्गिक आहे अशी काहीतरी बनावट विधानं करतात ते माहिती होतं.. काही पशुंना शिंग असतात किंवा पक्ष्यांना पंख असतात आणि ते आपल्याला नसतात.. ते का नाही अनैसर्गिक देव जाणे! त्यामुळे मी तसलं काही त्याला सांगणार नव्हतो. विचार करायला अजून थोडा वेळ मिळावा म्हणून मी सहजच त्याला विचारलं.. 'कुठे आला तुला हा शब्द? दाखव बघू!'.. त्याच्या एका धड्यातली 'a bird's gay spring song' अशी ओळ वाचून माझा जीव खरोखर भांड्यात पडला. ते तसं न विचारताच मी त्याला काहीबाही सांगितलं असतं तर त्याच्या डोक्याचं काय भजं झालं असतं कुणास ठाऊक!
एकदा ऑन्टीने गोट्याचा, बर्याच लाल वर्तुळांनी माखलेला, मराठीचा पेपर वर 'मराठीकडे लक्ष देणं आवश्यक आहे' असा शेरा मारून घरी पाठवला. त्याच्या पेपरातली/निबंधातली निवडक वाक्यं, त्यातली रक्तबंबाळ वाक्यं कुठली ते सांगायला नकोच --
निभंध - माझा आवडता पक्षी - मोर
मोर आपला राष्ट्रिय पक्षी आहे. त्याचा पिसारा फारच कलरफुल अणि attractive असतो. त्याचा पिसारा खुप लांब असल्याने तो उडु शकत नाही. त्याचा पिसारा सुन्दर असला तरी त्याचे पाय ugly असतात. peahen ला पिसारा नसतो. मोर हां कार्तिकेय आणि सरस्वतीचे vehicle आहे. पुण्याजवळ मोरांचे reserve forest आहे तिथे खुप मोर बघायला मिळतात.
विरुद्धार्थी शब्द
---------------
मित्र x मैत्रींण
गाय x म्हैस
धीट x coward
लिंग बदला
------------
भाऊ x भैण
गाय x ऑक्स
मोर x मोरीण (कारण लांडोर आठवत नव्हतं, मागे निबंधात पिहेन लिहिल्यामुळे ऑन्टीने झापलं होतं)
समानार्थी शब्द
----------------
बहीण - बगीनी
भाऊ - बंदू
आनंद - happy
त्याने पेपरात काही शब्द असे लिहीलेले होते - बकशीस (बक्षीस), धरीतरी (धरित्री), एकोणशंभर ( ९९ ).
मुख्य म्हणजे गोट्यानेही तो पेपर, न घाबरता, मला वाचायला दिला. असले शेरे घरी दाखवायची माझ्यावर वेळ यायची तेव्हा माझी जाम टारटूर होत असे! माझ्या प्रगती(?) संबंधीच्या ज्या पत्रांवर घरच्यांच्या सहीची आवश्यकता नसायची ती पत्रं मी घरी दाखवायच्या भानगडीतच पडायचो नाही. उगीच नसते शेरे दाखवून अवलक्षण कशाला करून घ्या?
याचाच अर्थ असा की गोट्याला अजून शाळकडू मिळालेलं नव्हतं! बाळकडू म्हणजे पाळण्यात मिळालेलं ज्ञान असं म्हणतात, तसं शाळकडू म्हणजे शाळेत मिळालेलं ज्ञान म्हणायला पाहीजे! उदा. होमवर्क केलेला नसताना मास्तरला कसं फसवावं, किंवा दोन दोन प्रगतीपुस्तकं (एक घरात दाखवायला व एक शाळेत दाखवायला) बाळगून दोन्ही पार्ट्या कशा खूष ठेवाव्या.. वगैरे वगैरे!. अर्थातच, गोट्याने ते पत्र दाखवल्याचा मला आनंद झाला पण चॅप्टरगिरी करायला तो अजून शिकला नाही म्हणून थोडं दु:खही झालं!
पण त्याचं मराठी, आम्ही घरी मराठी बोलत असूनही, इतकं कच्चं का? त्याचं मूळ त्याच्या सुरवातीच्या मराठीच्या पुस्तकात तर नसेल? 'काळानुरुप बदल हवेत' या सध्याच्या विचारसरणीच्या प्रभावामुळे मला असं वाटलं होतं की त्यांच्या मराठीच्या पुस्तकात 'कमल नमन कर' ऐवजी 'कमल गुगल कर' अशी काही वाक्यं घुसडली आहेत की काय! पण नशिबाने प्रत्यक्षात तसं काही नव्हतं. बरंचसं विचारकुंथन केल्यावर जे माझं इंग्रजीचं झालं तेच त्याचं मराठीचं होणार हे लक्षात आलं.
तो पेपर वाचल्यावर 'तरी मी तुला सांगत होते..' चा पाढा लावला नसता तर ती सरिता कुठली? पण शेवटी तिला ही पोराचं कसं होणार ही चिंता लागलीच.. मग काही तरी थातुर मातुर सांगून मी तिचं सांत्वन करायचा एक दुबळा प्रयत्न केला... अगं! सगळं ठीक होईल! मला पण शाळेत कुठं काय येत होतं? पण आता ठीक चाललंय ना?
डोंच्यु वरी, वरचे वरी
असेल माझा हरी
तर देईल खाटल्यावरी!

Tuesday, October 11, 2011
वाळवी
'बॅकप हुकला नि कंप्युटर रुसला'.. म्हणजेच, जेव्हा बॅकप घेतलेला नसतो तेव्हाच नेमकी त्याची गरज भासते अशी 'जंगलातली एक म्हण' या धर्तीची 'आयटीतली एक म्हण' आहे! हा अनुभव घेतल्याशिवाय कोणताही कोडगा प्रथितयश कोडगा म्हणवला जातं नाही. बॅकपचं यंत्र बिघडण्यापासून एक दिवस बॅकप नाही घेतला तर काय होणार आहे? असल्या अनाठायी आत्मविश्वासापर्यंत बॅकप न घेण्याची अनंत कारणं असू असतात! पण महत्वाचा डेटा असलेल्या कंप्युटरने डोळे फिरवायचं कारण मात्र शेअरबाजार कोसळण्याइतकच अनाकलनीय असतं.
'बॅकप मधेच नाही तर रिस्टोअर कुठून होणार?'.. म्हणजेच, बॅकप वरचा डेटा परत जसाच्या तसा रिस्टोअर झाल्याशिवाय बॅकप नीट झाला आहे असं मानू नये.. 'आयटीतली अजून एक म्हण'! हे 'माणूस मेल्याशिवाय विषाची परीक्षा होत नाही' असं म्हंटल्यासारखं वाटेल कदाचित! पण ते तितकंच सत्य आहे. याचा अनुभव ज्या कोडग्याने घेतला असेल तो खरा 'सर्टिफाईड कोडगा'! या म्हणीच्या पुष्ट्यर्थ एक उदाहरणच द्यायला पाहीजे -- पूर्वी एकदा एका बँकेच्या शाखेचा डेटाबेस कोलमडला. ते त्यांना खूप उशीरा समजलं. तोपर्यंत चुकीच्या डेटाबेसचाच बॅकप जुन्या बॅकप टेपांवरती घेऊन घेऊन सर्व बॅकपची वाट लागलेली होती. त्या आधी बँकेने संगणकीकरण यशस्वी झाल्याचं जाहीर करून लेजर लिहीणं बंद केलेलं होतं. अशा भग्नावस्थेतून खातेदारांचा डेटा परत आणायचा म्हणजे भस्मातून उदबत्ती उभी करण्यातला प्रकार!
पण, डेटाचा पूर्ण राडा झालेला होता तरीही ती शाखा मात्र चालू होती. खातेदार रोज येऊन जाऊन त्यांची काम निर्वेधपणे करत होते. हो, बँकेकडे काहीच मार्ग नव्हता कुणाच्या अकाउंटला किती पैसे आहेत ते बघायचा तरीही! जेव्हा बँकेच्या लोकांना ते कशी काय बँक चालवत आहेत ते विचारलं, तेव्हा त्यांचं उत्तर असं होतं.. 'त्याचं काय आहे! कुणी पैसे काढायला आला की आम्ही त्यालाच दरडावून विचारतो.. काय? आहेत का पैसे खात्यात? तो पटकन हो म्हणाला तर देतो आम्ही त्याला पैसे.' ही गोष्ट ऐकल्यापासून बँकेतले लोक उगीचच माझ्यावर भुंकले की मला निष्कारण काळजी वाटते.
त्या शाखेच्या कर्मचार्यांसारखाच अगतिकपणाचा अनुभव एकदा मलाही आला. त्याची सुरुवात आमच्या कंपनीचं लग्न एका, अमेरिकन, इन्फर्मेशन सिक्युरिटीच्या क्षेत्रात काम करणार्या, कंपनीशी लागण्यापासून झाली. मधुचंद्राच्या काळात एक दिवस आमच्या बॉसने घोषणा केली -- 'पुढचे ३ दिवस त्या कंपनीचे लोक आपल्या सर्वांबरोबर चर्चा करणार आहेत. तेव्हा सगळ्यांनी जरा नीट सुटाबुटात या.'.. बॉसरूपी दैत्याने आज्ञावजा दवंडी पिटून मिटींगची सांगता केली. लग्न झाल्यापासून आमचा दैत्य एकेक अगम्य शब्द शिकून यायला लागला होता.. असल्या मिटींगला तो ऑल हॅन्डस् मिटींग म्हणायला लागला होता. त्यामुळे मला उगीचच 'साथी हाथ बढाना' या गाण्याची आठवण व्हायची.. इतक्या रडक्या चालीमुळे सर्व लोकांमधे हसत खेळत एकजुटीने काम करायची स्फूर्ती कशी काय निर्माण होऊ शकते ते एक त्या निर्मात्याला आणि संगीतकाराला ठावे! बाकी, 'ऑल हॅन्डस्' म्हंटलं तरी त्याचे एकट्याचेच जोरजोरात हातवारे चालायचे.. बाकीचे हॅन्डस् एकमेकांना खाणाखुणा करण्यात नाही तर 'शो' साठी नेलेल्या नोटबुकावर चित्र काढण्यात गुंतलेले असायचे. मिटिंग मधे बसून नोटबुकात काहीतरी खरडणे हे कीर्तन ऐकता ऐकता वाती वळण्याइतकंच सूचक आहे. या धर्तीवर कीर्तनाला 'ऑल हँड्स बॅबलिंग' का नाही म्हणत कुणास ठाऊक!
झालं! दुसरे दिवशी माझा लग्नातला सूट शोधायला बसलो. महत्प्रयासानंतर तो एकमेव जीर्ण सूट बोहारणीला द्यायच्या ढिगार्यात सापडला. पाहिल्या पाहिल्या मला एकदम दोन प्रश्न पडले.. या रंगाचा सूट होता आपला? आणि आपण कसे काय इतके बारीक होतो? थोडा फार कसर लागलेला असला तरी थोडी फार कसरत केल्यावर सुटाची कसर तो भरून काढू शकला असता. मधेच प्रश्न आला.. भर गच्च उन्हाळ्यात सूट घालून कसं जायचं? क्षणभर मी थबकलो. तरी नशीब! मी मुंबईत रहात नव्हतो, कारण मुंबईत सूट घालून जाणं म्हणजे रेनकोट घालून पोहण्याइतका विक्षिप्तपणाचा कळस!
तरी ही मी मला त्यात कसबसं कोंबलं.. आरशात पाहिलं, तर दोन गाद्या, भरपूर पांघरुणं आणि उश्या कोंबून, वरून करकचून पट्टा आवळलेला, होल्डॉल दिसला! तो अनसुटेबल सूट घातल्यावर मला मुळीच सुटसुटीत वाटत नव्हतं, पण नाईलाज होता.. त्याकाळी मी सायकलवर जायचो.. त्या दिवशी, आधीच होल्डॉल तशातही सायकलवरी बैसला, अशी केविलवाणी परिस्थिती झाली.. बघणार्या कुत्सित नजरांकडे मी दुर्लक्ष केलं तरी कफलिंक्सना तो अपमान सहन झाला नाही.. त्यांनी कुठल्या तरी खड्ड्याचं निमित्त साधून स्वतःची मानखंडना थांबवली. ते माझ्या उशीरा लक्षात आलं. कफल्लिंक अवस्थेत(अशा स्थितिला हा अगदी समर्पक शब्द आहे की नाही?) ऑफिसला जावं लागलं, पण त्यालाही नाईलाज होता. तसाच मिटींग रूम मधे दाखल झालो. पटकन कुणीच ओळखीचं दिसलं नाही.. नेहमी पांढर्या शुभ्र कपड्यांमधे दिसणारा, एखाद्या हॉटेलचा वेटर साध्या कपड्यात रस्त्यावर दिसला तर तो ओळखता येतो काय?
मिटींग रूम मधे बरेच होल्डॉल दिसल्यामुळे मला हायसं वाटलं. थोड्या वेळातच दैत्य आणि काही गोरे आले. ते आल्या आल्या सगळे खाडकन् अटेन्शन मधे उभे राहीले.. आता प्रत्येका समोरून मानवंदना स्वीकारत ते पुढे सरकणार अशी भीती मला वाटत असतानाच ते गोरे, चारचौघात, केसात सहज हात फिरविताना विग हातात आल्यासारखे, चांगलेच ओशाळलेले दिसले.. कारण.. ते सगळे जीन आणि टी-शर्ट मधे होते. मग त्यांना बरं वाटावं म्हणून दैत्यानं आपली कंठलंगोटी काढल्यावर सगळ्यांनीच आनंदाने आपापले गळफास काढले. त्या दिवशी दैत्याला शिव्या घालत घरी गेलो आणि दुसरे दिवशी नेहमीच्या कपड्यात मिटींगला आलो. गोरे आधीच येऊन बसले होते.. आम्ही आल्यावर ते खाडकन् अटेन्शन मधे उभे राहीले. त्या दिवशी आमचे विग हातात आले कारण ते सुटाबुटात आलेले होते.
पुढच्या काही महीन्यात मी त्या गोर्यांवर चांगलीच छाप पाडली की काय ते मला माहीत नाही. पण त्यांनी मला अमेरिकेला घेऊन जायचं कारस्थान रचलं, आणि लवकरच मी दैत्याला टुकटुक करून अमेरिकेचं विमान धरलं. ('सहार विमानतळावरून बोईंग ७४७ हवेत झेपावलं.. आजुबाजूचे रस्ते, इमारती आणि झाडं हळूहळू लहान होत होत शेवटी दिसेनाशी झाली.. त्यासरशी माझं मन एकदम भूतकाळात झेपावलं', अशी ष्ट्यांडर्ड सुरुवात करून एक अति टुक्कार प्रवासवर्णन पाडायचा मोह मी जड अंतःकरणानं टाळतोय, याची जाणकारांनी नोंद घ्यावी!) मी त्या गोर्यांवर का छाप पाडू शकलो असेन याचा मला तिकडे गेल्यावर अंदाज आला. तिकडचे कोडगे आपल्या कुठल्याही प्रश्नाला 'आय डन्नो' म्हणून उडवून लावतात. भारतातले कोडगे माहीत नसलं तरी काहीतरी फेकतातच!
इन्फर्मेशन सिक्युरिटी कंपनी असल्यामुळे तिथे काम करणार्यांना 'सिक्युरिटी' नामक बागुलबुवाची भीति वाटण्याचा आणि लोकांना घालण्याचा पगार मिळायचा. आपल्या प्रॉडक्टचा कोड/डेटा चोरीला जाईल किंवा नष्ट होईल ही अशीच एक भीति! येता जाता 'इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट' सारखे जड जड शब्द किंवा आयपीआर सारखी त्याहून जड संक्षिप्त रूपं फेकली जायची. 'इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट'चं सोडा, भारतात तर आपण घेतलेल्या प्रॉपर्टीचे राईट पण आपल्याकडे आहेत की नाहीत याची खात्री नसते कधी! सुरुवातीला नवीन असल्याने, आणि विशेषत: भारतातून आलेलो असल्यामुळे, मला ही वाटायचं की असेल बुवा यांचा कोड भारी लिहीलेला, सहज समजण्यासारखा आणि व्यवस्थित डॉक्युमेंट केलेला! पण तसं काही नव्हतं. तो कोड तिथे खूप वर्ष काम केलेल्या भल्या भल्यांना सुद्धा समजायचा नाही, मग तो कोड चोरांना समजेल ही भीति माझ्या मते अनाठायी होती. आणि त्यासाठीची सुरक्षा ही एव्हरेस्टवर बुजगावणं लावण्यासारखी होती.
अशा आक्रस्ताळी सुरक्षेच्या ठिकाणी मी एकदा बिनधास्तपणे भरपूर डेटा बदलला. बॉस अर्थातच खवळला. तिकडचा असला म्हणून काय झालं? शेवटी बॉसच तो! इकडचे तिकडचे सगळे बॉस इथून तिथून सारखेच असतात! त्याच्या मते मी तो एखाद्या छोट्या टेस्ट डेटाबेस मधे आधी चालवून बघायला पाहीजे होता. टेस्ट न करता कसलेही बदल करायची पद्धत नाहीये.. पद्धत जास्त महत्वाची! आपण आधी खिरापत खाऊन मग आरती म्हणतो का? नाही. वगैरे! वगैरे! असल्या भाषेत नाही नाही ते बोलला मला! खरं तर चूक काहीच झालेली नव्हती. पण, शेवटी सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणून मी गप्प बसलो. बॉसने मला इन्फर्मेशन सिक्युरिटी काय असते? ती कशी ठेवायची? तिचं नियोजन कसं करायचं? यावर एक भलं मोठं बाड चघळायला दिलं!
काही दिवसांनी मला एका छोट्या सहा महिन्यांच्या प्रॉजेक्ट वर बसविण्यात आलं. आमच्या ऑफिसात बर्याच कंपन्यांचा डेटा होता. त्यातला काही एका कंपनीला उपलब्ध करून द्यायचा होता. आमच्या मोठ्ठ्या डेटाबेस मधून रोज काही डेटा माझ्या डेटाबेस मधे घातला जायचा. आलेला नवीन डेटा, रोज पहाटे, मी त्या कंपनीच्या ऑफिस मधल्या डेटाबेस मधे कॉपी करायचो. दिवसभरात, त्या डेटाबेस मधे त्यांचे लोक बरेच बदल करायचे, ते मी दररोज रात्री माझ्या डेटाबेसला कॉपी करायचो. त्यावरून नंतर आमच्या ऑफिसात काही रिपोर्ट निघायचे.
सहा महीने कुठे कसलाच प्रॉब्लेम आला नाही. प्रोजेक्ट पण संपलं. सगळं दृष्ट लागण्याइतकं सुरळीत झालं होतं. असं झालं की माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकते, डास गुणगुणतो, भुंगा भणभणतो इ. इ. 'सगळं सुरळीत चालणं म्हणजे जगबुडीची नांदी'.. 'आयटीतली अजून एक म्हण'! जो कोड १००% बरोबर वाटतो त्यातच पुढील आयुष्यातली बगमारी लपलेली असते. तरी पण प्रोजेक्ट संपल्यामुळे आता काय झोपणार म्हणून मी पण झोपलो. शेवटी, प्रोजेक्ट गुंडाळायच्या आधी सहज एक शेवटची नजर माझ्या डेटाबेसवर टाकायची दुर्बुद्धी झालीच!
ज्या टेबलात मला भरपूर डेटा सापडायला पाहीजे होता तिथे अगदीच किरकोळ डेटा दिसला. अजगर म्हणून बघायला जावं आणि गोगलगाय निघावी तसं झालं. आयला डेटा गेला कुठे? कुणी तरी उडवला की काय? डेटाबेसच्या सिसिटिव्हीवर (म्हंजे ऑडिट ट्रेलमधे) काही कुणी उडवल्याच्या खुणा नव्हत्या. घशाला कोरड पडली. कानशिलं लाल झाली. बोटं गार पडली. नाकाचा शेंडा गरम झाला. मग मात्र आमच्या डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेटरला शरण गेलो. त्यालाही खाडखुड करून काही सापडलं नाही. एव्हाना बॉसला काही तरी गडबड असल्याची कुणकुण लागली. शेवटचा उपाय म्हणून मी त्याला बॅकप वरून पूर्वस्थितीला आणायला सांगितलं. तर बॅकप मधे पण सगळा डेटा नाही. ते ऐकल्यावर मात्र एकजात सगळे हादरले. असल्या कंपनीला डेटा देणं हा चोराला तिजोरी संभाळायला देण्यातला प्रकार वाटला असता लोकांना!
हे थोडं वाळवी लागल्यासारखं झालं होतं.. नुसती नजर टाकून वाळवी लागलेली अजिबात कळत नाही. कपाटात ठेवलेली पुस्तकं अगदी दार उघडलं तरी व्यवस्थित दिसतात. पण एखादं पुस्तक काढलं तरच सर्व पुस्तकातून गेलेला बोगदा दिसतो.
उत्खनन करता करता असा शोध लागला की अॅडमिनिस्ट्रेटरचाच एक प्रोग्रॅम होता जो माझा डेटाबेस साफ करून त्यात कंपनीच्या डेटाबेस मधला डेटा घालायचा. पण, रोजच्या डेटाला खूप जागा लागायची म्हणून मी दर १५ दिवसांनी, त्या कंपनीच्या ऑफिसातला, झालेल्या कामाचा डेटा साफ करत असे.. असं गृहीत धरून की माझ्या डेटाबेस मधे सगळा डेटा सुरक्षित आहे. जंगलाच्या दर्शनी भागाला धक्का न लावता आतल्या भागात निर्वेधपणे जंगलतोड चालल्यासारखी स्थिती होती. आणि साफ झालेल्या डेटाबेसचा बॅकप हा कोर्या कागदाच्या झेरॉक्स इतकाच उपयोगी!
तसा तो जालीम प्रोग्रॅम अॅडमिनिस्ट्रेटरला कुणी लिहायला सांगितला होता ते त्याला आठवत नव्हतं. पण मला ते समजलंच. आमच्या सिस्टिमची चाचणी चालू असण्याच्या काळात बॉसनंच तो प्रोग्रॅम लिहायला सांगितला होता! चाचणी संपल्यावर तो काढून टाकायला सांगायचं विसरला.
त्या नंतर, ते इन्फर्मेशन सिक्युरिटीचं भलं मोठं बाड चाळल्यासारखं करत मी मुद्दाम बॉस समोरून जात असे!

Wednesday, September 7, 2011
वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन
जॉर्ज बुश त्याच्या टेक्सास मधल्या रँच वरच्या तळ्यात पाय बुडवून निवांतपणे विचारशून्य अवस्थेत मासे पकडत बसला होता. तसं 'विचारशून्य बुश' हे गाईचं गोमूत्र किंवा पिवळा पीतांबर म्हंटल्या सारखचं! आजुबाजूला ४-५ बॉडीगार्डस आपण त्या गावचेच नाही असं भासवायचा प्रयत्न करत उभे होते. वॉर ऑन टेररची घोषणा करून वर्ष दीड वर्ष होऊन गेलेलं होतं. जिकडे तिकडे विविध देशांचे सैनिक बिन-लादेन साठी गळ टाकून बसले होते, पण तो बिन-धास्त होता. दोन्हीही गळ टाकूंना यश नव्हतं.. आता गळ म्हंटल्यावर कसं कोण सापडणार? खरं तर बुशला 'ओसामा बिन लादेन' हे नाव मनातून फार आवडायचं, भारदस्त वाटायचं. डोक्यात खोल कुठेतरी स्वत:च नाव 'ओसामा बिन बुशेन' असं काहीतरी करावं असा पण विचार चालायचा. काही झालं तरी बुशच्या लोकप्रियतेला बिन लादेन मुळे उधाण आलं होतं.. अल्ला मेहरबान तो गधा पेहलवान म्हणतात तसं.. त्याबद्दल बुशला कृतज्ञता होती.. पण हे तो उघडपणे बोलू शकत नव्हता.
'मि. प्रेसिडेन्ट, आपल्याला डोनल्ड रम्सफेल्ड साहेबांचा फोन आहे'.. अचानक त्याची खाजगी सचिव, मार्गारेट ऊर्फ मॅगी, चिवचिवली आणि बुश एका विचारशून्य अवस्थेतून दुसर्या विचारशून्य अवस्थेत गेला. आधीची सेक्रेटरी, नताशा, बाळंतपणाच्या रजेवर गेल्यानंतर मॅगी नुकतीच जॉईन झाली होती.. पण अजून ती बुशच्या अंगवळणी पडली नव्हती.
'आयला! तू कोण? सिक्युरिटीssssssssssssssssss!'.. जरासा अनोळखी चेहरा दिसला तरी बुशला ती अतिरेक्यांची चाल वाटून छातीत धडधड व्हायची! पण आजुबाजूच्या ४-५ बॉडीगार्डस पैकी एकही धावत आला नाही. त्यांच्या ते अंगवळणी पडलेलं होतं!
'सर! मी मॅगी! नवीन सेक्रेटरी!'.. मॅगीनं न कंटाळता सुमारे ७३व्यांदा तेच उत्तर दिलं.
'मॅगी? ही नताशा आताशा दिसत नाही ती? कुठे गेली?'
'सर, ती बाळंतपणाच्या रजेवर गेली आहे! आणि आपल्याला डोनल्ड रम्सफेल्ड साहेबांचा फोन आहे'.. मॅगी थंड सुरात म्हणाली. बुशच्या दुर्लक्षामुळे मॅगीला उपेक्षितांचे अंतरंग अंतर्बाह्य उमजलं होतं.. कधी कधी तिला वाटायचं - एकवेळ क्लिंटनचं 'संपूर्ण' लक्ष चालेल पण बुशचं दुर्लक्ष नको!
'आयला! या डोनल्ड डकला हीच वेळ सापडली का? त्याला सांग एक मासा गावला की लगेच फोन करतो म्हणून!'.. माशांबरोबर चाललेल्या लपंडावात व्यत्यय आलेला बुशला खपत नाही.
'पण सर! ते अर्जंट मॅटर आहे म्हणतात!'.. त्यावर बुशचा चेहरा शँपेन मधे माशी पडल्यासारखा झाला.
'अगं! माशांचं मॅटर पण अर्जंटच आहे म्हणावं! तळलेले मासे तर फारच डिलिशस मॅटर असतं! ऑsss!'.. बुशच्या पायाला अचानक एक मासा चावून गेल्यानं तो कळवळला.. गळाला लावलेल्या मॅटर पेक्षा माशांना बुशच्या पायाचं मॅटर जास्त डिलिशस वाटलं असावं.
'सर! खरंच फार सीरियस मॅटर आहे म्हणत होते'.. मॅगी काकुळतीला आली.
'व्हॉटिज द मॅटर?'
'वेल! ते म्हणत होते की .. इटिज द मॅटर ऑफ द अँटी मॅटर दॅटिज द मोस्ट इंपॉर्टन्ट मॅटर! अॅज अ मॅटर ऑफ फॅक्ट, इटिज नॉट एक्झॅक्टली अ मॅटर देअरफर नॉट अॅन ऑर्डिनरी मॅटर, बट अ मॅटर ऑफ लाईफ अँड डेथ!.. असं बर्याच वेळा मॅटर मॅटर म्हणाले! त्यावरून मला काहीतरी अर्जंट मॅटर आहे इतकंच समजलं!'.. कशाचाही अर्थबोध न होणारी सर्व वाक्यं लक्षात ठेवून, जशीच्या तशी, एका पाठोपाठ एक, धडाधड फेकण्याचं तिचं कौशल्य खरंच अफलातून होतं.. आपल्याकडच्या कुठल्याही परीक्षेत ती सहज पहिली आली असती.
'ओ माय गॉड! व्हॉटिज द मॅटर विथ यू?'.. मॅटरची मात्रा उगाळून उगाळून लावल्याने बुशच्या ग्रे मॅटरची पुरती वाट लागली.
'सर! आय मीन, देअर इज सम अर्जंट मॅटर ऑफ द अँटी मॅटर!'
'आँ! अगं नक्की काय ते सांग ना! अर्जंट मॅटर की अँटी मॅटर?'.. काही लोकांना बेडरुम, बाथरुम सारखंच मशरुम पण वाटतं त्यातला प्रकार!
'सर, दोन्हीही!'
'श्या! काय छपरी आहे लेकाची! साध्या एका मॅटर बद्दल धड बोलेल तर शप्पत! नुसती मॅटर मॅटर करतेय.. हिला पण मॅटर्निटी लीव्हवर पाठवायला पाहीजे' .. बुश स्वतःशीच पुटपुटला, मग तिला म्हणाला.. 'बरं जा! मॅटर घेऊन ये.. आय मीन.. फोन घेऊन ये!'
'सर, फोन इकडे आणता येत नाही! सिक्युअर लाईन आहे'
'आयला! सिक्युअर म्हणजे लाईन काय खांबाला सिक्युअर केली आहे काय? बरं! मी येतो तिकडे!'
बुश गळ टाकून.. म्हणजे सोडून.. फोन घ्यायला गेला.
'अरे डोनल्ड! लेका काय जगबुडी आली की काय? तुला मी कित्ती वेळा सांगितलंय की मला मासे पकडत असताना पकडू नकोस.. आय मीन.. डिस्टर्ब करू नकोस म्हणून! पटकन सांग आता काय मॅटर आहे ते? तिकडे मासे माझी वाट पहात आहेत!'
'सॉरी मि. प्रेसिडेन्ट! पण काय करणार मॅटरच तसं आहे! फॅक्ट ऑफ द मॅटर इज, मला तुम्हाला सांगणं भागच होतं, नो मॅटर व्हॉट यू आर डुइंग! इट्स अ मॅटर ऑफ द अँटी मॅटर! यू नो? देअर इज धिस अँटी मॅटर विच इज नॉट रिअली ए मॅटर!'. आज सगळ्यांना मॅटरची ढाळ का लागली आहे ते बुशच्या आकलनशक्तीच्या बाहेरचं होतं.
'डोन्या! मला जरा नीट सांगशील का?'
'सर! ते फोनवर सांगता येणार नाही! देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. तुम्ही ताबडतोब वॉशिंग्टनला या! मी डिफेन्सच्या शास्त्रज्ञांबरोबर आपली एक मिटिंग अॅरेंज केलेली आहे. त्यात सगळा उलगडा होईल'. देशाची सुरक्षितता म्हंटल्यावर बुशला काही पर्याय राहीला नाही. ९/११ च्या आधी असंच दुर्लक्ष केल्यामुळे फार मोठी नामुष्की झाली होती.. जगज्जेत्या मुष्टिधारकाच्या आकडेबाज मिशा त्याच्याच नाकावर बसून दिवसाढवळ्या कुरतडल्यासारखी! परत तसंच केलं तर तो निवडून येण्याची शक्यताच नव्हती. मॅगीला त्याने ताबडतोब एका विमानाची व्यवस्था करायचं फर्मान सोडलं.
'सर! एअरफोर्स वन विमानतळावर सज्ज आहे!'.. तिला कल्पना होतीच.
'अगं! मी येताना त्याच विमानाने आलो ना? आता जाताना एअरफोर्स टू ने जातो. म्हणजे अतिरेक्यांवर सॉलिड गेम पडेल. हे बघ! ९/११ नंतर मी प्लॅन केलेलं काहीच करायचं नाही असं ठरवलंय!'.. बुश 'व्हॉट अॅन आयडिया सरजी!' असा चेहरा करून डोळे मिचकावत म्हणाला.
'सर! ते 'एअरफोर्स टू'च आहे. पाटी बदलली आहे फक्त!'.. आता मॅगीने 'व्हॉट अॅन आयडिया सरजी!' असा चेहरा करून डोळे मिचकावले.
'वा! वा! ब्रिलियंट! बहोत खूब!'.. 'आपण त्याचं घर उन्हात बांधू हां!' म्हंटल्यावर पोरं कशी खुलतात तसा बुश खूष झाला.. आणि त्याला प्रथमच मॅगीबद्दल थोडा आदर वाटायला लागला.
व्हाईट हाऊसच्या मिटिंग रूम मधे बुशने पाऊल ठेवलं. तिथे स्टेट सेक्रेटरी कॉलिन पॉवेल, डिफेन्स सेक्रेटरी डोनल्ड रम्सफेल्ड, सेक्रेटरी ऑफ होमलॅन्ड सिक्युरिटी टॉम रिज आणि असेच बरेचसे सटर फटर सेक्रेटरी व डिफेन्स मधले तज्ज्ञ शक्य तितके लांब चेहरे करून बसले होते. मधून मधून शेजारच्याशी हलक्या आवाजात हातातल्या कागदांवर काहीतरी खुणा करत बोलत होते.
'हं! बोला काय प्रॉब्लेम आहे ते!'.. बुशने वेळ न घालवता मुद्द्याला हात घातला.. कारण त्याला लगेच परत जाऊन माशांना हात घालायचा होता.
'सर! सीआयए कडून एक इंटेलिजन्स रिपोर्ट आलाय. इराक वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन बनविण्याच्या प्रयत्नात आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यात तालिबान पण सामील असावं असा अंदाज आहे. ते जर खरं असेल तर तालिबान इथे 'रिटर्न ऑफ ९/११' करून हलकल्लोळ माजवेल'.. टॉम रिजने सूतोवाच केलं.
'आपल्याला माहिती पण नसलेलं असं कुठलं वेपन असणार ते? कुठलंही असलं तरी नोहाऊ आपल्याकडूनच ढापला असणार ना त्यांनी!'.. बुशला अमेरिकेच्या तंत्रज्ञानातल्या आघाडीबद्दल तिळमात्र देखील शंका नव्हती.
'नाही सर! त्याचा नोहाऊ आपल्याकडे नाही!'.. बुशला परत माश्याने चावा घेतल्याचं फिलिंग आलं.
'आँ! असं काय आहे जगात की जे अमेरिकन शास्त्रज्ञांनी शोधलेलं नाही!'
'आहे सर! इंटरनेट!'.. एक शास्त्रज्ञ पचकला.. तो मूळचा युरोपातला होता.
'हॅ! इंटरनेटसारखं चिल्लर काहीतरी नका सांगू हो! असो! काय नवीन वेपन आहे ते?'
'सर, ते अँटी मॅटर बाँब बनवत आहेत असं सीआयएचं म्हणणं आहे'.. परत मॅटरने डोकं वर काढल्यामुळे बुश खवळला.
'आरे! काय सकाळपासनं सगळे मॅटर अँटी मॅटर बडबडताहेत? मला कुणी साध्या सोप्प्या भाषेत या मॅटर बद्दल सांगणार आहे का?'.. पॉवेलनं एका शास्त्रज्ञाला खूण केली आणि तो बोलू लागला.
'मि. प्रेसिडेन्ट! आपल्या विश्वातल्या सर्व वस्तू ज्या पासून बनलेल्या आहेत त्याला मॅटर म्हणतात.. हे पेन, कागद, टेबल, कपडे, जमीन, गाड्या, घरं सगळं सगळं मॅटर पासून बनलंय! अँटी मॅटर म्हणजे असं मॅटर की जे मॅटर नाहीये.. पण मॅटरसारखं आहे. म्हणजे आपण अँटी मॅटरने बनलेल्या जगाची कल्पना केली तर त्यात सुद्धा हे पेन, कागद, टेबल, कपडे, जमीन, गाड्या, घरं.. सगळं सगळं असेल पण अँटी मॅटर पासून बनलेलं! त्यात अँटी माणसं असतील अँटी ऑक्सीजनवर जगणारी आणि अँटी जमिनीवर चालणारी, अँटी प्रोटॉन आणि अँटी इलेक्ट्रॉन म्हणजे पॉझिट्रॉन पासून बनलेला अँटी हायड्रोजन वायू असेल, असे प्रत्येक गोष्टींचे अँटी अवतार असतील. पण.. पण.. (इथे एक ड्रॅमॅटिक पॉझ) मॅटर आणि अँटी मॅटर एकत्र राहू शकत नाहीत. ते एकमेकांच्या संसर्गात आल्यावर एकमेकांना नष्ट करतात. व्हेन मॅटर अँड अँटी मॅटर इंटरॅक्ट, बोथ मॅटर अँड अँटी मॅटर सीझ टु मॅटर'.
'ऑं? नष्ट करतात? म्हणजे नक्की काय करतात?'
'म्हणजे एक ग्रॅम मॅटर आणि एक ग्रॅम अँटी मॅटर एकत्र आले तर २ ग्रॅम इतके मास (वस्तुमान) भस्मसात होऊन प्रचंड ऊर्जा बाहेर पडते.. E=mc**2 या सूत्राप्रमाणे! काहीही शिल्लक रहात नाही.'
'काहीच शिल्लक रहात नाही?.. राख, धूर वगैरे तरी राहीलच की!'.. बुशला ती कल्पना अल्कोहोल विरहीत बिअर सारखी वाटली.
'नो सर! काहीच नाही! नो मास! म्हणून तर आम्ही त्याला वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन म्हणतो!'.. आता जोर 'मास' वर आला.
'आय सी! इटिज नॉट अ स्मॉल मॅटर देन!'.. बुशला नवीन शस्त्राची अंधुक कल्पना आल्यासारखं वाटलं.
'सर! बट देअरिज नो मॅटर लेफ्ट'.. 'नो' वर जोर देत शास्त्रज्ञ म्हणाला.. शास्त्रज्ञांना सगळं कसं अगदी प्रिस्साईज बोलायला लागतं.
'ओके ओके! पण मला सांगा, हे त्या लोकांनी कसं शोधलं? आपल्या शास्त्रज्ञांना कसं काय माहिती नाही याबद्दल?'.. माणसाची निर्मिती पण अमेरिकन शास्त्रज्ञांनीच केली असणार इतका बुशचा त्यांच्यावर अंध विश्वास होता!
'सर! आपल्याला माहिती होतं त्याबद्दल! पॉल डिरॅक या इंग्लिश शास्त्रज्ञाने त्याचा शोध लावलाय.. खूप पूर्वी.. १९२८ मधे. पण कुणाला त्याचा बाँब बनवता येईल असं का वाटलं नाही ते माहीत नाही!'.. मधेच पॉवेलनं आपलं ज्ञान पाजळलं.
'त्याचं काय आहे सर, अँटी मॅटर सहजा सहजी मिळत नाही! खरं तर विश्वाची निर्मिती झाली तेव्हा मॅटर आणि अँटी मॅटर सम प्रमाणात निर्माण झालं होतं. पण आत्ता पाहीलं तर विश्वात सर्वत्र मॅटरच पसरलेलं दिसतंय. अँटी मॅटर कुठे गुल झालंय कुणास ठाऊक? त्याचा पत्ताच नाही'.. आता रम्सफेल्डला पण चेव चढला.
'अरे! तुम्ही गुगल करून पहा. गुल झालेल्या सर्व गोष्टी गुगल मधे सापडतात'.. ही सूचना ट्रॅफिक जॅम मधे सापडलेल्याला पार्किंग तिकीट देण्याइतकी मूर्खपणाची होती. आपल्यालाही थोडं फार समजतं असं शास्त्रज्ञांना दाखवायची खुजली बुशला नेहमीच व्हायची.
'विथ ड्यु रिस्पेक्ट मि. प्रेसिडेन्ट! पण नाही सापडलं!'.. आलेला सर्व वैताग 'मि. प्रेसिडेन्ट'च्या उच्चारात कोंबत एक शास्त्रज्ञ फणकारला.. मोठ्या पदावरच्या माणसाबरोबर बोलताना झालेली चिडचिड त्याच्या पदाच्या उल्लेखात दडपायची असते हे सर्वज्ञात होतं.
'मग नक्कीच ते अतिरेक्यांनी पळवलं असणार. दुसरं काय?'.. कधी मासे मिळाले नाही तर त्याचा ठपका बुश अतिरेक्यांवर ठेवायचा.
'एक्झॅक्टॅली सर! सीआयएचं तेच म्हणणं आहे. अतिरेक्यांनी ते पळवून इराकच्या आटलेल्या तेलविहीरीत लपवून ठेवलं आहे असा संशय आहे. तुम्ही नुसता इशारा करा, ८ दिवसात इराकवर कब्जा करून सगळं अँटी मॅटर तुमच्यापुढे हजर करतो. दॅट विल एंड द मॅटर वन्स अँड फॉर ऑल'.. युद्ध पिपासू रम्सफेल्ड चुकून एक शास्त्रीय सत्य बोलून गेला. सर्व शास्त्रज्ञांच्या कळपाला मात्र अँटी मॅटरचा आडोसा करून मोठी रिसर्च ग्रँट मिळवण्यात जास्त रस होता.
'अरे भाऊ! पण असा कसा काय एकदम हल्ला करता येईल? काही तरी ठोस कारण हवं! यूएन काय म्हणेल?'.. पॉवेलची राजनैतिकता जागी झाली. अँटी मॅटर वापरून इराक वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन बनविण्याच्या प्रयत्नात आहे, हे जगाला सांगितलं तर, अँटी-वॉर लॉबी आपल्याला उघडपणे विरोध करेल, असं वाटल्यामुळे, कुठेही अँटी मॅटरचा उल्लेख न करता, नुसतंच वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन असं म्हणायचं ठरलं.
'पण मला एक सांगा! या अँटी मॅटर बाँबची वात मॅटरची असेल की अँटी मॅटरची?'.. बुशच्या वातुळ प्रश्नाने शास्त्रज्ञांना वात आला.. सर्व सेक्रेटरींनी मख्ख चेहरा करून शास्त्रज्ञांकडे पाहीलं. शास्त्रज्ञांच्या डोळ्यासमोर उदबत्तीने लवंगी फटाका लावणारा बुश आला. परत एकदा 'ड्यु रिस्पेक्ट' दिल्यावर एका शास्त्रज्ञाने त्याला अँटी मॅटर आणि मॅटर यांची भेसळ करून चालत नाही याची परत आठवण करून दिली.
'येस्स्स! मला एक आयडिया सुचली आहे. आपण अँटी मॅटर वापरून अँटी टेररिस्ट निर्माण करू या! म्हणजे, जेव्हा टेररिस्ट आणि अँटी टेररिस्ट दोन्ही एकमेकांना भेटतील तेव्हा एकमेकांना कायमचे नष्ट करतील'.. बुशची अजून एक 'व्हॉट अॅन आयडिया सरजी!' मोमेंट!
'ग्रेट आयडिया! खरच सॉलिड आयडिया!'.. रम्सफेल्डनं भरभरून दाद दिली आणि बुशने मान ताठ करून बाकिच्यांकडे पाहीलं.
'मला वाटतं, आपण अँटी मॅटर वापरून टेररिस्ट निर्माण करायला पाहीजेत. कारण, अँटी-मॅटर वापरून केलेले अँटी-टेररिस्ट हे टेररिस्टच होतील.. दोन अँटी एकमेकांना कॅन्सल करतील म्हणून'.. टॉम रिजचं एक अभ्यासपूर्ण मत!
'मला वाटतं हे सगळं संशोधन करण्यासाठी आपल्याला एक नवीन सुसज्ज प्रयोगशाळा हवी. 'नवीन' या साठी की त्यामुळे ती आपल्याला गुप्त ठेवता येईल!'.. एका शास्त्रज्ञाची 'लोहा गरम है हाथोडा मार दो' मोमेंट!
ताबडतोब बुशने उदार मनाने कित्येक हजार कोटी डॉलरचं बजेट गुप्त प्रयोगशाळेसाठी दिलं. अँटी मॅटर अस्तित्वात असलं तरी ते काही मिली सेकंदाच्या वर टिकत नाही, हे शास्त्रज्ञांना माहिती होतं.. त्यांच्या वर्तुळात अँटी मॅटर ही एक टर उडवायची गोष्ट झाली होती. वॉर ऑन टेरर मुळे संशोधनाचं बजेट कमी करून डिफेन्सचं वाढवलेलं होतं. त्यामुळेच त्यांनी ते पैसे आनंदाने घेऊन त्यांच्या आवडत्या संशोधनावर घालवले. असामान्य गुप्ततेमुळे कुणालाच ते शास्त्रज्ञ कशावर आणि का काम करत आहेत ते समजायला मार्ग नव्हता.
दरम्यान, तिकडे प्रचार यंत्रणांनी, वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शनचा बागुलबुवा दाखवून युद्धाची संमती मिळवली. युद्ध करून, इराक काबीज करण्यात आलं. लगेच तिकडे शास्त्रज्ञांची टीम अँटी मॅटरचा शोध घ्यायला पाठविण्यात आली. अपेक्षेप्रमाणे, त्यांच्या हाताला अँटी मॅटरच काय कुठलंही सटर फटर मॅटर लागलं नाही.
शेवटी, वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शनचं मॅटर क्लोज केल्यामुळे एक अँटी क्लायमॅक्स मात्र झाला.

Monday, August 8, 2011
शाही शुभमंगल!
एक वेळ विद्युतमंडळ झटका कधी देईल ते सांगता येतं पण राजेरजवाड्यांना केव्हा काय करायचा झटका येईल ते नाही. आता हेच पहा ना, त्या वेस्टमिन्स्टर अॅबीत केटचं आणि विल्यमचं साग्रसंगीत लग्न झालं.. सॉरी विवाह झाला, पुलंच्या म्हणण्याप्रमाणे आलतू फालतू लोकात लग्न होतात, उच्चभ्रूंमधे विवाह होतात. ते बघायला कोट्यवधी लोक नटुन थटुन टिव्ही समोर बसले होते म्हणे! आता एकदा तो विवाह झाल्यावर परत भारतीय पद्धतीने कशाला करायला पाहीजे? पण राणीच्या उतारी वर हुकूम कोण टाकणार? तिच्या अवती भोवती फिरकायची खुद्द प्रिन्स फिलिपची पण छाती नाही!
प्रिन्स फिलिप कोण म्हणून विचारताय? इंग्लंडात असं विचारणं हे पंढरपुरात विठोबा कोण विचारण्यासारखं आहे. हा प्रिन्स फिलिप म्हणजे ड्युक ऑफ एडिंबरा म्हणजे राणीचा सख्खा नवरा! पण मग तो प्रिन्स कसा? किंग का नाही? कारण, इंग्रंजांची संबोधनं कुणाच्याही आकलन शक्तीच्या कमाल मर्यादे बाहेरची असतात!
अत्यंत व्यग्र दिनचर्येमुळे आणि सततच्या प्रलोभनांमुळे लग्नासारखी क्षुल्लक गोष्ट राजेरजवाडे सहज विसरू शकतात या गोष्टीला इतिहास साक्षी आहे. मग विल्यम किंवा केट भलतं सलतं काही तरी करून बसले तर राणीला तोंड दाखवायला एकतरी दरबार शिल्लक राहील का? म्हणून दोन वेळा लग्न केल्यास त्यांच्या मनात एकमेकांबद्दलच्या प्रेम भावनेचं ठिबक सिंचन होईल व बाँडिंग वाढीस लागेल अशी शक्यता राणीला वाटली असावी.
तसंही हल्ली इकडे भारतीय पद्धतीनं लग्न करायचं फॅडच व्हायला लागलंय म्हणा! भारतीय पद्धतीने लग्न केलं तर म्हणे लग्न जन्मोजन्मी टिकतं. डोंबल त्यांचं! जमाना बदललाय हल्ली! हल्ली 'दर वर्षी वेगळा पती दे' असं वडाला साकडं घालणार्यांचं प्रमाण वाढलंय! पण डायानाचं ते तसं झाल्यापासून राणी शँपेन सुद्धा फुंकून पिते असं आमचे भिंतीचे कान सांगतात.
आधी अरुण नायर आणि लिझ हर्ली यांनी भारतीय पद्धतीने लग्न केलं (त्यांच आता मोडलंय म्हणा).. नंतर केटी पेरी आणि रसेल ब्रँडने री ओढली.. नाही! नाही! मोडण्याची नाही! लग्नाची म्हणतोय मी! जे जे काही तथाकथित वलयांकित लोकं करतात ते ते आपण नाही केलं तर आपलं वलय लयास जाईल अशी सार्थ भीती राणीला पडली असणार, दुसरं काय?
तर या अभूतपूर्व विवाह सोहळ्याचा हा बैठा वृत्तांत आहे!
भारतीय लग्नपद्धती बद्दल इंग्लंडात अंधार असल्यामुळे लग्नाच्या प्रोजेक्टचं मॅनेजमेंट आऊटसोर्स करायचं ठरलं. तसं भारताबद्दल प्रचंड अज्ञान आहे म्हणा! भारतात प्रचंड गरिबी आहे हे त्यातलंच एक! कारण भारतातली गरिबी दिसते, इकडची दिसत नाही!.. इकडचे गरीब करदात्यांनी दिलेल्या घरात, करदात्यांनीच दिलेल्या भत्त्यावर नोकरी न करता आनंदाने रहातात.. इतकाच काय तो फरक!
प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून नारायण पेक्षा कोण योग्य माणूस सापडणार? पण आऊटसोर्सिंग मुळे केंटरबरीचे आर्चबिशप आणि इतर मान्यवर पाद्र्यांनी संप केला.. त्यांना अनुल्लेखाने मारण्यात आलं. 'दर्जाचा विचारही न करता सर्व काही भारतीय लोकांकडून स्वस्तात करून घ्यायची प्रथा बोकाळत चालली आहे. या निमित्ताने भारतीय लग्नपद्धती शिकण्याची आमची एक अमूल्य संधी हिरावली गेली आहे आणि ही बाब अत्यंत चिंताजनक आणि शरमेची आहे.'.. असे खेदजनक सूर त्यांनी काढले.
हे लग्न मुंबईत करायचा घाट घातल्यावर वसंतसेनेपासून शिवसेने पर्यंत सर्वांच्या हातात कोलीत मिळालं. बिहार्यांचा प्रश्न ऐरणीवर नसल्यापासून त्यांनाही बरेच दिवसात जाळपोळ करायला काही स्फोटक मिळालेलं नव्हतं. त्यांचं लग्न इथे लावण्यातून आपली गुलामी वृत्ती अजूनही कशी दिसून येते आहे हा त्यांचा मुख्य मुद्दा होता. पण अर्थमंत्र्यांना त्यातून मेडिकल टूरिझम सारखी मॅरेज टूरिझम ही इंडस्ट्री खुणावत होती. त्यावर सेनेने त्यांची नेहमीची 'खणकर' भूमिका घेऊन सहार विमानतळाची धावपट्टी खणायची धमकी दिली. शेवटी राणीनेच माघार घेतली आणि लग्न बकिंगहॅम पॅलेस मधेच करायचं ठरवलं. साहजिकच, अर्थमंत्र्यांच्या संधीची चिंधी झाली.
मग प्रश्न आला पुरोहित निवडीचा! तशी जाहिरात झळकल्यावर विहिंपने 'प्राण गेला तरी गोमांस खाणार्या पापी लोकांचं कुणी पौरोहित्य करणार नाही' अशी भूमिका घेतल्यामुळे बर्याच गुरुजींची इच्छा असून केवळ समाज काय म्हणेल या भीती पोटी माघार घ्यावी लागली. भटजी मिळण्याची मारामार झाल्यामुळे नारायणाने त्याच्याच एका मित्राला, सतीशला, ते काम दिले. घरी नियमित होणारी त्याची पूजा वगळता त्याचा पूजेशी असा संबंध आलेला नव्हता. मग त्याला भारतात काही दिवसाच्या क्रॅश कोर्सला पाठवलं. गेल्या गेल्या कार क्रॅश करून त्यानं सुरुवात केली.. उरलेला वेळ हॉस्पिटलमधे पाय वर करून रामरक्षेसारखे थोडे फार संस्कृत श्लोक पाठ करण्यात घालवल्यावर लगेचच तो एक्स्पर्ट भटजी म्हणून दाखल झाला. आयटीत नेहमी असंच चालत असल्यामुळे कुणालाच त्यात वावगं वाटलं नाही. पण आपली हुशारी दाखवली नाही तर तो नारायण कसला? त्यानं एका भटजीला आपला सल्लागार नेमून विहिंपच्या फतव्यातून व्यवस्थित पळवाट काढली.
यथावकाश पत्रिका जमते आहे की नाही ते पहायचा दिवस ठरला, त्याबद्दल सतीशला माहिती नव्हतं. जेव्हा समजलं तेव्हा तो बायको बरोबर शॉपिंग करत होता. अशा संभाषण दर्या नेहमीच्याच असल्याने त्यालाही काही आश्चर्य वाटलं नाही. मग तसाच घाईघाईत बायकोला घेऊन राजवाड्यावर दाखल झाला. सल्लागार परस्पर आला. टाईट जीनची प्यांट आणि स्लिव्हलेस टॉप घालून बायको आली होती. तिच्या वजनापेक्षा अंगावर घातलेले पौंड जास्त होते. वास्तविक, खांदे उघडे टाकून किंवा डोक्यावर हॅट न घालता राणी समोर जायचं नसतं! आणि गुडघे थोडे वाकवून आणि झगा हातांनी किंचितसा उचलून राणीला अभिवादन करायचं असतं. तिनं काय पकडलं आणि काय उचललं तिचं तिला माहिती! राणीला हसू आवरलं नाही पण शाही शिष्टाचार अंगी भिनलेले असल्याने तिने ते हसू मंद स्मितामधे बदलले.
मागे मिशेल ओबामा सुद्धा उघड्या खांद्यांनी राणीला भेटली होती. त्यावर कुणीतरी भोचक प्रश्न विचारलाच 'How could she meet the queen with bare arms?' त्यावर त्याला असं मार्मिक उत्तर मिळालं 'Because, americans are allowed to bear arms'. थोडक्यात काय, तर लोकांनी असा रीतिरिवाजांचा आणि परंपरांचा केलेला खुर्दा राणीला, बिचारीला, चालवून घ्यावा लागतो! कारण शेवटी एका खालसा राज्याची ती नाममात्र राणी! बाकी इंग्रजांवर, त्यांनी फक्त भारतातच तनखा बहाद्दर राजे केले, असा पक्षपाती आरोप करता येणार नाही म्हणा!
पत्रिका जमवायला बसले खरे पण दोघांच्या पत्रिकेचाच पत्ता नव्हता. पत्रिका करायची म्हणजे पंचांग हवे. नक्की कशासाठी आपण घाईघाईत निघालो आहोत ते न समजल्यामुळे सल्लागार काहीच न घेता आला होता. 'हे पंचांग'.. नारायणाने काखोटीला मारलेल्या लॅपटॉप वर एक पंचांग काढून दिले. हल्लीच्या जगात गुगलगाय झाल्याशिवाय पंचांग पण हाताला लागत नाही. त्यामुळेच, 'प्राचीन संस्कारांचा आणि अर्वाचीन तंत्रज्ञानाचा वैभवशाही मिलाफ' अशा शब्दात वर्तमानपत्रांनी या विवाहाचा उदोउदो केला.
पत्रिका करता करता मुलाचा राक्षसगण निघाल्यामुळे बाका प्रसंग उभा राहीला. इतक्या मोठ्या राज्याच्या राजपुत्राचा राक्षसगण? राजघराण्याला देवासमान मानणार्या जनतेला काय वाटेल? आणि ते सांगायचं कसं? त्यात मुलीचा मनुष्यगण निघाल्याने गणाचे गुण जुळेनात. शेवटी न डगमगता नारायणाने बेधडकपणे ३६ गुण जुळल्याचं सांगितलं. खरं तर हाडवैरासाठी राखीव असलेला हा आकडा नेमका पत्रिका पूर्ण जुळलेली आहे हे दाखवायला कसा काय वापरतात कोण जाणे! सल्लागाराने ११ जुलैच्या सोमवारी सकाळी १०:२३चा मुहूर्त काढून अजून एका राष्ट्रीय सुट्टीची सोय केली.
आधी एकदा लग्न झालेलं असल्यामुळे साखरपुडा बायपास झाला. लग्न झालेल्यांच परत लग्न लावताना काही वेगळे मंत्र/विधी असतात की नसतात यावर काही भटजींमधे एका ऑनलाईन फोरमवर घणाघाती चर्चा चालू होती.. विशेषत: सोडलग्न करायची गरज आहे का यावर! त्याची परिणती नेहमी प्रमाणे एकमेकांची उणीदुणी काढण्यात आणि एकमेकांना शेलक्या शिव्या देण्यात झाल्यामुळे नारायणाने नेहमीचेच विधी करायचं ठरवलं.
मुलीकडची लग्नाची पत्रिका अशी ठरली -
||सद्गुरू श्री पोप प्रसन्न आणि श्री श्री आनंदमयी मेरी माँ प्रसन्न||
आमचे येथे जीझस कृपेकरून आमची जेष्ठ कन्या चि. सौ. कां. कॅथरिन हिचा विवाह राजपुत्र विल्यम (हिज हायनेस प्रिन्स ऑफ वेल्स श्री. चार्लस विंडसर आणि कै. प्रिन्सेस डायाना यांचे जेष्ठ चिरंजीव) याच्याशी दिनांक ११ जुलै, २०११ सकाळी १०:२३ वाजता बकिंगहॅम पॅलेस येथे करणेचे योजिले आहे. कार्य सिद्धिस नेणेस जीझस समर्थ आहेच. तरी आपण विवाहास अगत्य येणेचे करावे.
प्रीतिभोजन दुपारी १ ते ३.
कृपया विल्यम आणि केटच्या लग्नाच्या भेटवस्तू या संकेत स्थळावर लिहीलेल्या भेटवस्तूपैकीच गोष्टी भेट म्हणून द्याव्यात.
-- खालती मिडलटन फॅमिलीतल्या बर्याच जणांच्या नावांबरोबर 'आमच्या केटी ताईच्या लग्नाला यायचं हं!'.. असे एका शेंबड्या बंटीबाबा मिडलटनाचे चिमखडे बोल पण होते.
पत्रिका छापून आल्यावर नीट वाचून बघायला बजावायचं नारायण विसरला नाही.
भेटवस्तूंच्या यादीत मिक्सर मायक्रोवेव्ह असल्या गृहोपयोगी वस्तू पाहून सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात होते. 'राजपुत्र झाला म्हणून काय झालं? शेवटी केटला स्वयंपाकीणच बनवणार का?' या भाषेत काही स्त्री मुक्तांचा संताप मुक्त झाला. शिवाय, राजघराण्यातल्या लोकांना असल्या वस्तूंची गरज कधी पासून पडायला लागली? असा पण सूर होता. त्यांच्याकडच्या गृहोपयोगी वस्तू जगावेगळ्या असतात व त्यांना शेफ किंवा बटलर अशी काहीशी नावं असतात. त्यांच्यात बागेतलं तण कुणी काढायचं यावर तणतण होऊन ताणतणाव निर्माण होत नाहीत. त्यासाठी माळी नावाचं उपकरण असतं!
सावकाश गाडी केटच्या पोशाखाकडे वळाली.
'एलिझाबेथ इमॅन्युएलला सांगू या कपडे डिझाईन करायला'.. एका पोक्त पण मनाने तरुण असलेल्या बाईंनी आपले विचार मांडले.
'तिला नको. माझं ऐका, त्या पेक्षा अॅलेक्झांडर मॅक्वीनला सांगू. आता तो जिवंत नाही पण त्याच्याकडची डिझायनर भारी आहे एकदम!'.. नारायणाचं ठाम मत.
'पण डायानाचे तिच्याचकडे केले होते म्हणे!'
'हो! ते ८१ साली! तेव्हा तिचं आणि डेव्हिडचं लग्न नव्या कापडासारखं घट्ट होतं. ९० साली ते विरल्यावर तिचा डेव्हिडशी आणि कलेशी एकदमच घटस्फोट झाला'.. हे ऐकल्यावर लहान थोर समस्त स्त्री वर्गात नारायणाबद्दल अपार आदर निर्माण झाला.. वास्तविक असलं ज्ञान नारायणाला त्याच्याच सौ कडून बर्याच पैशांच्या मोबदल्यात वेळोवेळी मिळालेलं होतं.
'बघ बाबा! राणीची अशी काहीशी इच्छा होती म्हणे!'
'तिला काय समजतंय म्हातारीला? आणि त्याला केटचे कपडे सुटसुटीत बनवायला सांगा! मागच्या लग्नासारखा १०० फुटी लांब झगा नकोय म्हणावं! लग्नात होम वगैरे असणार आहे, त्यात जाऊन पेटला तर भर लग्नात सती जायची वेळ यायची!'.. भलभलत्या रिस्कांचा विचार प्रोजेक्ट मॅनेजर नाही करणार तर कोण?
बकिंगहॅमच्या हिरवळीवर भरजरी कापडं लावून शाही शामियाना उभारला. आत मधे मोठ मोठाली झुंबरं टांगलेली होती. सबंध पाऊल रुतेल असला गुबगुबीत गालिचा पसरलेला आणि मुख्य प्रवेशद्वारापासून स्टेज पर्यंत रेड कार्पेट अंथरलेलं, सर्वत्र उंची अत्तर फवारलेलं, एकीकडे चंदनाचं स्टेज, मांडी घालण्याची सवय नसल्यानं स्टेजवर एका हस्तिदंती टेबलावर होमाची सोय, भोवती बसण्यासाठी रत्नजडित आसनं असा सगळा थाट! जिकडे पहावं तिकडे निव्वळ वैभव टांगलेलं, पसरलेलं, ल्यायलेलं, फवारलेलं किंवा लपेटलेलं होतं. अस्वलाला केसांचा आणि मोराला मोरपिसांचा काय तोटा? तसंच!
पण आफ्रिकेतला दुष्काळ लक्षात घेऊन नारायणाने अक्षतांसाठी तांदूळा ऐवजी सोन्याचा वर्ख लावलेल्या थर्मोकोलच्या खास अक्षता बनवायला सांगितल्या व अक्षतांसाठी लागणारा तांदूळ आफ्रिकेत वाटपासाठी पाठवला. त्यातून मूठभर लोकांना मूठभर भात मिळाला. आपल्या आनंदामधे गरिबांसाठी दयेचा एक कोपरा ठेवणार्या राजघराण्याच्या औदार्याचं तोंड फाटे पर्यंत कौतुक झालं. कृतज्ञते दाखल राणीने नंतर नारायणाला 'सर'की बहाल केली.
काही लोकांमधे लग्नात गोंधळ घालायला गोंधळी बोलावण्याची प्रथा आहे. त्यांना लग्नातला अंगभूत गोंधळ कमी वाटतो की काय कुणास ठाऊक! म्हणजे कोकणस्थांनी बोलावलं तर ठीक आहे एक वेळ, पण देशस्थांनी सुद्धा? मात्र सिक्युरिटीचा गोंधळ होईल म्हणून शाही गोंधळ रद्द करण्यात आला.
हा विवाह सोहळा टीव्हीवर जिवंत दाखवणार असल्याचं ऐकल्यावर सल्लागार भटजी घाबरला.. विहिंपच्या कार्यकर्त्यांनी टीव्ही पाहिला तर त्याला सहकुटुंब जिवंत ठेवणार नाहीत म्हणून तो घरीच थांबला. घरून व्हॉईस चॅट वापरून तो सगळे मंत्र म्हणणार होता. राज घराण्यातल्या लोकांसमोर सोवळं नेसून कसं जायचं (शिवाय इंग्लंडातली थंडी) म्हणून सतीश सुटाबुटात आला होता. विधी चालू असताना त्याचा टाय मधे मधे होमाकडे झेपावत होता. मग केटने दिलेल्या केसातल्या आकड्याने त्याने तो शर्टाला अडकवला.
प्रिन्स चार्लस स्कॉटलंडचा ट्रॅडिशनल ड्रेस म्हणजे लाल काळ्या चौकटीचा स्कर्ट आणि वर एक जॅकेट घालून आला होता. शामियान्यापायी हिरवळीवरच्या काही किड्यांची घरंदारं उध्वस्त झाल्या कारणाने त्यांनी प्रिन्सशी अंमळ जास्तच सलगी दाखवली. त्यामुळे प्रिन्स मधेच राजवाड्यात जाऊन सुटाबुटात आला.
सावत्र मुलाचं लग्न म्हणून कॅमिला चांगलीच नटून थटून आली होती. ओठांना लिपस्टिक, खुरांना नेल पॉलिश व गालाला रूज चोपडून डोक्यावर फॅन्सी हॅट ठेवल्यावर एखादी गाय जशी दिसेल तशी ती दिसत होती.
राणी आणि प्रिन्स फिलिप त्यांच्या नेहमीच्या उंची पोशाखात होते.
प्रिन्सेस बिअॅट्रिसने हॅट घातली आहे की डिश अँटेना लावली आहे यावर मतभेद होते. इतर स्त्रिया ऑक्टोपस, जेली फिश, शिंपला, किंवा घरटं इत्यादी गोष्टीं सारख्या दिसणार्या वैशिष्ट्यपूर्ण हॅटा घालून आल्या होत्या.
विवाहविधी पहाटे पासूनच सुरू झालेले होते. पाहुणे मंडळी हळूहळू उगवत होती. लवकरच उपस्थितांच्या लक्षात आलं की भारतीय लग्नात वधू वर आणि त्यांचे आईबाप एका कोपर्यात काहीतरी विधीत सतत गुंतलेले असतात. ते लक्षपूर्वक पहाणे हे पाहुण्यांवर बंधनकारक नसते. त्यामुळे त्यांनी खुर्च्या हव्या तशा फिरवून आपापली गटबाजी प्रस्थापित करून गप्पा हाणायला सुरुवात केली.
त्यातलं हे निवडक शाही गॉसिप!
'या विल्यमच्या भोवती हजार जणी फिरतात म्हणे! सांगत नाही पण तो कधी कुणाला!'
'तशा वडाच्या झाडाभोवती पण लाख जणी फिरतात. झाड सांगतं काय कधी?'
'दोघे एकाच कॉलेजात शिकत होते म्हणे!'
'हो नाहीतर काय! एकत्रच रहात होते की आणि!'
'त्यानं म्हणे केटला एका फ्याशन शो मधे झिरझिरीत कपड्यात पाहीलं आणि पाघळला! आम्हाला काय घालता येत नाहीत का तसले कपडे?'
'बिच्चारी डायाना! आज कित्ती आनंदात असली असती!'
'चार्लसनेच मारलीन म्हणतात तिला! काय पाहीलंन त्या कॅमिलात कोण जाणे!'
'विल्यमनं तसं काय नाय केलंन म्हणजे मिळवली!'
'डायानाने पोरांना अगदी मध्यमवर्गीय वळण लावलंन हो! मॅक्डोनल्डस मधे घेऊन जायची ती त्यांना!'
'मॅक्डोनल्डस? हे काय असतं?'
'डायाना पण काय अगदी सोज्वळ वगैरे नव्हती हां! ती पण फिरली नंतर बर्याच जणांबरोबर!'
'काय भिकेचे डोहाळे लागलेत विल्यमला! तोलामोलाच्या मुलीशी तरी लग्न करायचं!'
'बाप तसा मुलगा!'
'हा विल्यम त्या एअरफोर्सच्या किरकोळ पगारात कसा काय रहात असेल? ड्रायक्लिनिंगचा तरी खर्च निघत असेल का त्यातून?'
मुहूर्ताची वेळ जवळ आली तशी नारायणाने माईक उचलून सूचनांचा भडिमार केला.. 'हे पहा, मंगलाष्टकं म्हणणार्यांनी आधीच स्टेजवर या, नाहीतर मुहूर्ताची वेळ आली, तरी मंगलाष्टकं सुरूच राहतात. लग्न लागल्यावर वधू-वरांना कपडे बदलण्यासाठी अर्धा तास तरी लागेल, तेव्हा आधीच त्यांना भेटण्यासाठी रांगा लावू नयेत. जेवणाची तयारी असली, तर तोपर्यंत जेवून घ्यायला हरकत नाही. तिसरी महत्त्वाची सूचना अशी आहे की, आजकाल लग्न लागल्यावर वधू-वरांना उचलून घेण्याची एक नवीच प्रथा पडत चालली आहे. मागे एका लग्नात वजन न पेलल्याने वधू पडली. त्यातून अनर्थ होण्याची भीती असते. तेव्हा असा प्रकार कुणी करू नये. सर्वांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असल्याने मुद्दामहून या सूचना करतो आहे.'
सतीशने आणि नारायणाने अंतरपाट धरला. सल्लागार भटजीने व्हॉईस चॅटवरून मंगलाष्टकं सुरू केली. अधून मधून नेट कनेक्शन बोंबलत होतं त्यामुळे नारायणाने सतीशला मंगलाष्टकं म्हणायला सांगितल्यावर त्याची ततपप झाली.
'अरे शार्दुलविक्रीडित वृत्तातलं काहीही म्हण.'.. नारायणाने आपलं ज्ञान पाजळलं. एसेसीत ऑप्शनला टाकलेलं ते वृत्त अचानक असं खिंडीत पकडेल याची सतीशला मुळीच कल्पना नव्हती. मग नारायणाने त्याला मंगलाष्टकांच्या चालीवर 'आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक' म्हणून दाखवलं आणि त्याच पद्धतीने श्लोक म्हणायची सूचना केली. सल्लागाराची मंगलाष्टकं शॉर्ट वेव्ह रेडियो स्टेशनसारखी वर खाली होत होती त्यामुळे प्रेक्षकांना दोन दोन मंगलाष्टकांचा आनंद मिळाला.
गंगा सिंधु सरस्वती ..... विजयते रामं रमेशंभजे!
रामेणाभिहता निशाचरचमू ..... गोदावरी नर्मदा!
मग मात्र नारायणाने मोबाईल काढून (एका हाताने अंतरपाट धरलेला होताच) सल्लागाराला फोन लावला.
'अरे कुठलं भिकार ब्रॉडबँड घेऊन ठेवलं आहेस रे? त्यापेक्षा डायल-अप वापरून ये बरं!'
'ब्रॉडबँड'कुठलं? माझ्याकडे साधं रबरबँड पण नाहीये. मी डायल-अपच वापरतोय'.. ही जोक मारायची वेळ होती का?
शेवटी बाकीची मंगलाष्टकं फोनवर म्हंटली, तसं आधीच का नाही केलं कोण जाणे! सगळ्या गोष्टी उगीचच कटिंग एज टेक्नॉलॉजीने करण्याचा अट्टाहास म्हणजे शेजारी बसलेल्याशी बोलायला फेसबुक वापरण्यातला प्रकार! यथावकाश 'तदेव लग्नं... शुभमंगल सावधान' वगैरे झाल्यावर तुतार्या, सनई चौघडा असल्या बर्याच वाद्यांनी कल्ला केला. एव्हांना सर्व पाहुण्यांना अक्षतांचा खरा उपयोग समजला होता. त्यांच्यातल्या त्यांच्यात विविध आकाराच्या हॅटांमधे अक्षता फेकून गोल मारायची साईड स्पर्धा लग्न होऊन गेल्यानंतरही चालू होती.
सप्तपदी चालू असताना काही अल्लड तरुणींनी विल्यमच्या चपला पळवल्या. अशा वेळेला काय करायचं असतं ते माहिती नसल्यामुळे विल्यमने त्याच्या सेक्रेटरीला सांगून दुसरा जोड मागवला. मग नारायणाने त्यातली गंमत सांगितल्यावर विल्यमने प्रत्येक तरुणीला हाईड पार्कमधे फिरवून आणण्याचे वचन दिले.. अर्थातच, केटच्या डोक्यातून येणार्या धुराकडे दुर्लक्ष करून.. आणि एक छदामही न देता चपला परत मिळवल्या.
केटने वेगवेगळ्या प्रसंगी घेतलेले उखाणे
बकिंगहॅमच्या कोनाड्यात उभी मेरी माता
विल्याचं नाव घेते माझा नंबर पयला
लाडू करंज्यांनी भरला आहे रुखवत
विल्यमरावांनी घेतला किस सर्वांच्या देखत
बकिंगहॅम पॅलेसची सिक्युरिटी झेड
विल्यमरावांना लागलंय विमानांचं वेड!
शेवटी बकिंगहॅम पॅलेसात उंबरठ्यावरचं माप लाथाडून केट जाणार होती. पण इकडे उंबरठ्यांची फ्याशन नाहीये हे नारायणाने आधीच ओळखून चंदनाचा एक खास उंबरठा तयार करून घेतला होता. परत एकदा संभाषणाच्या खाईमुळे केटला माप पायाने लवंडायचे माहीत नव्हते. त्यात उंबरठ्याची सवय नसल्यामुळे केट उंबरठ्याला अडखळून पडली.. उंबरठा आणि मापासकट डाईव्ह मारून केटचा गृहप्रवेश झाला.. आणि ते आनंदाने नांदू लागले!

Subscribe to:
Posts (Atom)