Posts

फुकटचे सल्ले!

शाळा कॉलेजात असताना अनेकांनी येता-जाता मला "सरळ" वळण लावण्याच्या नावाखाली केलेल्या फुकटच्या उपदेशांनी माझं पित्तं फार खवळायचं! कधी (म्हणजे बर्‍याचवेळेला) मी मारलेल्या बंडला उघडकीस आल्या तर 'खोटं बोलू नकोस, खोटं बोलल्यानं पाप लागतं'. कधी रविवारी सकाळी जरा उशीरा पर्यंत लोळलो तर लगेच 'उठा आता, नुस्ते लोळत पडू नका. लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान, संपत्ती आरोग्य लाभे! समजलेत काय चिमणराव?' अशी हजामत! असलं काही सतत ऐकल्यावर कुठल्याही कुणाचंही डोकं फिरेल, मग माझ्यासारख्या टीनेजराची काय कथा? बरं, याबद्दल कुणाकडे तणतण केली तर 'तू मोठ्यांचा आदर करायला पाहिजेस, त्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागायला शिकलं पाहिजेस' हे वरती!   पण जसजसं माझं वय वाढत गेलं आणि आयुष्य अनेक अनुभवांनी समृद्ध होत गेलं तसतसं त्यातलं बरचसं तितकंस बरोबर नव्हतं हेही लक्षात आलं. आणि आता वयाची साठी ओलांडल्यावर कुठल्याही मोठ्या माणसाची तमा न बाळगता मी इतकं नक्की म्हणू शकतो की .. कधीही खोटं न बोललेली व्यक्ती अस्तित्वात नाही. थोडं फार खोटं बोलल्याशिवाय या जगात कुणीही कसं काय जगू शकेल? प्रत्येकावर काहीना ...

शॅकल्टनची अफाट साहस कथा

Image
शॅकल्टनचे हरवलेले एंड्युरंस जहाज 107 वर्षानंतर सापडले (चित्र-5) ही नुकतीच आलेली बातमी वाचली आणि माझ्या मनात घर करून राहिलेल्या त्याच्या अचाट साहसकथेला परत उजाळा मिळाला. सुमारे 40/45 वर्षांपूर्वी रीडर्स डायजेस्ट मधे ती वाचली होती तेव्हापासून अर्नेस्ट शॅकल्टन हे नाव आणि त्याचं साहस माझ्या कायमचं लक्षात राहिलं आहे. तसं पाहिलं तर अनेक साहसवीरांनी केलेल्या अनेक मोहिमांसारखीच त्याची पण एक मोहीम! अनेक संकटं, धोके व साहसांनी भरलेली!आणि ती यशस्वी पण नाही झाली. मग असं काय विशेष होतं त्यात? ते जाणण्यासाठी त्या मोहिमेची नीट माहिती सांगितली पाहिजे मग मला त्यातलं काय नक्की भावलं ते सांगता येईल. तो काळ दोन्ही धृवांवर प्रथम कोण पाय ठेवतो या जीवघेण्या स्पर्धेचा होता. त्यासाठी अनेक देशांच्या मोहिमा झाल्या. शॅकल्टनने रॉबर्ट स्कॉटच्या दक्षिण धृवाच्या शोध मोहिमेत (1901-04) भाग घेतला होता. ती त्याची पहिली मोहीम, पण त्याला ती प्रकृतीने साथ न दिल्यामुळे अर्धवट सोडावी लागली. स्कॉट दक्षिणेला 82 अंशापर्यंत जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर शॅकल्टनने केलेल्या मोहिमेत ((1907-09) तो 88 अंशापर्यंत पोचला, दक्षिण धृवाप...

महाराजाची विहीर

Image
इंग्लंड मधील काही भू-प्रदेशांना उत्कृष्ट नैसर्गिक सौंदर्यानं नटलेले भू-प्रदेश ( Area of Oustanding Natural Beauty) असा दर्जा इथल्या सरकारने दिलेला आहे. ऑक्सफर्डच्या जवळ असे दोन भू-प्रदेश आहेत.. कॉट्सवोल्ड आणि चिल्टर्न! छोटे छोटे हिरवेगार डोंगर, हिरव्या रंगाच्या विविध छटांची झाडं, मधेच वहाणारी एखादी नदी आणि रमणीय शेतं या नेहमीच्याच गोष्टी विविध बाजुंनी वेगवेगळ्या कोनांमधून इतक्या विलोभनीय दिसतात की तिथून हलावसं वाटत नाही. दोन्ही प्रदेशात बरीच छोटी छोटी सुंदर गावं वसलेली आहेत. मी त्यातल्याच चिल्टर्न भागातील हेंली-ऑन-थेम्स या थेम्स नदीवर वसलेल्या गावाला भेट द्यायला जायचं ठरवलं. ऑक्सफर्ड पासून हे केवळ 25 मैलांवर ( 40 किमी) असल्यामुळे जायला फार वेळ लागणार नव्हता. मार्गी लागल्यावर हेंली गावाच्या अलिकडे रस्त्यातील एका पाटीने लक्ष वेधलं (चित्र-1 पहा). चित्र-1: रस्त्यावरची पाटी तपकिरी रंगाच्या पाटीवर 'Maharajah's Well' असं वाचल्यावर मी नक्की चुकीचं वाचलं याची मला खात्रीच होती. इकडे प्रेक्षणीय स्थळांच्या पाट्या तपकिरी रंगाच्या करण्याची पद्धत असल्यामुळे बघू या तरी हे एक काय...

आधुनिक कुटुंब!

बीबीसी वर आलेला हा एक सत्य घटनांवर आधारित लेख आहे. भविष्यात काय प्रकारची कुटुंब व्यवस्था असू शकेल याची थोडी कल्पना या लेखामुळे येते. युके बाहेर कदाचित तो न दिसण्याची शक्यता आहे म्हणून त्याचा सारांश इथे देतोय. ही कहाणी जेसिका शेअर नामक अमेरिकेतील मिडवेस्ट भागात रहाणार्‍या एका स्त्रीची आहे. तिचे दुसर्‍या एका स्त्री बरोबर लेस्बियन संबंध असताना त्या दोघिंनी मुलं होऊ देण्याचा निर्णय घेतला. त्याही पुढे जाऊन दोघींनी 4 मुलं होऊ देण्याचं ठरवलं व त्यांची नावं काय असतील तेही ठरवलं. लेखात दुसर्‍या स्त्रीचं नाव दिलेलं नसल्यामुळे आपण तिला रिटा म्हणू. कृत्रिम गर्भधारणेसाठी कुणाचं तरी वीर्य मिळवणं गरजेचं होतं. रिटानं तिच्या बहिणीच्या नवर्‍याचं नाव सुचवलं. जेसिका तेव्हा विद्यापीठात शिकत होती. शिकता शिकता तिने 'गे व लेस्बियन यांचे कायदेशीर हक्क' अशा एका विषयाचाही अभ्यास केला. त्यातून तिला असं समजलं की वीर्य कुणाचं आहे हे माहिती असेल तर त्याचा पुढे त्रास होऊ शकतो. जर पुढे मागे जन्मदात्या स्त्रीचं निधन झालं तर मुलांचा ताबा त्या माणसाकडे जाऊ शकतो. असे निर्णय पूर्वी न्यायालयात झालेले आहेत. तसं झ...

त्यांची माती, त्यांची माणसं!

'कुठल्याही देशात जा स्थानिक लोकं बाहेरून आलेल्या लोकांबद्दल चीड व तिरस्कार व्यक्त करताना दिसून येतील. एका दृष्टीने ते बरोबर आहे म्हणा! स्वतःचा प्रदेश ही बर्‍याच प्राण्यांच्या डोक्यात गोंदवलेली गोष्ट आहे. कुत्री, लांडग्यांपासून आदिमानवानापर्यंत आपल्या प्रदेशाचं रक्षण करणं, त्याच्या जवळपास कुणी येत नाही ना ते बघणं हे डिनए मधेच आहे. शिवाय, उपरे लोक त्यांच्या त्यांच्या विश्वात मग्न असतात, स्थानिक लोकात मिसळत नाहीत. म्हणून त्यांनी त्यांच्या कोषातून बाहेर पडायला हवं, इथल्या मातीत मिसळायला हवं!'... कुणाचं तरी भाषण मी जांभया देत ऐकत होतो. पण भाषणा नंतर जेवण असणार होतं त्यामुळे उठून पण जाता येईना. मनाशी म्हंटलं मी ह्यांच्या गर्दीत मिसळलो तरी मला एकाकी वाटतं तर मातीत काय मिसळणार? त्यातल्या त्यात  पबात मिसळण्याची कल्पना भुरळ घालणारी आहे म्हणा! इकडचे पब हे आपल्या गावाकडच्या पारासारखे चकाट्या पिटायची प्रमुख ठिकाणं असतात. 'स्टिफ अपर लिप' वाले असले तरी या गोर्‍यांची पण जीभ तरल द्रव्यानं सैल होतेच व मग अदृश्य सांस्कृतिक भिंती कोलमडून पडतात. पण पबाचा उपयोग मातीत मिसळण्यासाठी करायचा असेल...

ऑक्सब्रिजच्या सुरस आणि चमत्कारिक कथा व प्रथा!

Image
ऑक्सब्रिज म्हणजे ऑक्सफर्ड आणि केंब्रिज ही दोन्ही विद्यापीठं! हा शब्द जेव्हा दोन्ही विद्यापीठांबद्दल एकदम बोलायचं असतं तेव्हाच वापरतात. दोन्ही शहरांबद्दल एकत्रित पणे बोलण्यासाठी हा शब्द वापरत नाहीत. तसं केम्सफर्ड असाही एक शब्द पण होऊ शकला असता म्हणा पण ऑक्सब्रिज प्रचलित झाला. इंग्रजीत दोन तीन शब्दातली अक्षरं एकत्र करून एक वेगळा सुटसुटीत शब्द बर्‍याच वेळेला करतात. उदाहरणार्थ ब्रेक्झिट! ऑक्सब्रिजला चांगला 800 वर्षांपेक्षा मोठा इतिहास आहे, त्यामुळे तिथेल्या सुरस आणि चमत्कारिक कथा व प्रथांना रुजायलाही बराच अवधी मिळालेला आहे. ऑक्सफर्डच्या नागरिकांना मानहानीकारक अशी एक प्रथा 500 वर्ष चालू होती. दर वर्षी १० फेब्रुवारीला महापौर आणि ६१ मान्यवर नागरिकांना सेंट मेरीज चर्चपर्यंत शोकयात्रा काढून चॅन्सेलराची क्षमायाचना करण्याची व काही पैसे दंड देण्याची एक प्रथा होती. तिचा उल्लेख माझ्या 'ऑक्सफर्डचा फेरफटका' या लेखात आलेला असल्यामुळे इथे परत सांगत नाही. इतर काही कथा व प्रथांबद्दल इथे सांगतो. इकडच्या विद्यापीठांमधे नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापिठाचं अधिकृत सदस्यत्व घ्यावं लागतं. या सा...

प्रेमा तुझा गंज कसा?

'हॅलो! कोण बोलतंय?'.. राजेशनं आवाज बदलून बबिताचा फोन घेतला. 'हॅलो! मी बबिता बोलतेय! राजेशला फोन द्या जरा!' 'सॉरी मॅडम! पण राजेश सर प्रचंड कामात आहेत. काही मेसेज आहे का? ते नंतर फोन करतील'.. बबिताला राजेशकडच्या या नवीन असिस्टंटने थोडं संभ्रमात टाकलं खरं पण लगेचच तिची पेटली. 'राजेsssssश! यू ब्लडी प्रिक! हौ कुड यू?' 'हाsssssय बब्बड!' .. राजेशनं आवाजात खोटं खोटं मार्दव आणलं.  'अरे हाय काय म्हणतोस? स्टुपिड!!'.. बबिताचा चढलेला सूर राजेशला अपेक्षितच होता. 'हाय नाहीतर काय बाय म्हणू?'.. विनोद करून ताण सैल करायच्या प्रयत्नाला यश मिळालं नाही. 'तू माझ्या पेंटिंगच्या एक्झिबिशनला यायचं प्रॉमिस केलं होतंस! मी सकाळी तुला रिमाईंड केलं होतं. तरिही यू लेट मी डाउन! का? का?'.. बबिता सात्विक संतापाने बोलत होती त्यात तिला मागून एका बाईचा आवाज ऐकू आला व ती दचकली.  म्हणजे तिला मिळालेले रिपोर्ट खरे होते तर! 'आयॅम सॉरी गं बब्बड! पण मला प्रचंड काम आहे इथे! अक्षरशः चहा घ्यायला पण वेळ नाही गं! आणि मला कुठं काय कळतंय त्यातलं?'.. राजेश काकुळतिच्...